Saturday, October 3, 2026
Homeसातारासातारा: उरमोडी धरणात दोन तरूण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला | पुढारी

सातारा: उरमोडी धरणात दोन तरूण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला | पुढारी

[ad_1]








सातारा: पुढारी वृत्तसेवा: सातारा तालुक्यातील परळी येथील उरमोडी धरणात रविवारी दुपारी दोन तरूण पोहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने धरणात बुडाले. याबाबतची माहिती रविवारी सायंकाळी त्यांच्या कुटुंबीयांना दिली.

रात्री उशिर झाल्यामुळे बुडालेल्या तरूणाचा शोध घेता आला नाही. त्यामुळे आज सकाळी सातारा तालुका पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीम, स्थानिक ग्रामस्थ व कातकरी यांच्या मदतीने शोध कार्य सुरू करण्यात आले.
दरम्यान, दुपारी बाराच्या सुमारास एका तरूणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. तर आणखी एका तरूणाचा शोध सुरू आहे. घटनास्थळी कुटुंबीय तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध घेण्यास अडथळा येत आहे.

हेही वाचा 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments