Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3034

सातारा : वर्येत प्लायवूडच्या दुकानाला भीषण आग; कोट्यावधींचे नुकसान | पुढारी

0









कण्हेर : पुढारी वृत्तसेवा वर्ये ता.सातारा येथील दोन्ही प्लायवूडच्या दुकानांना अचानक भीषण आग लागली. या आगीत शामुलचंद ओसवाल व रूपाशेठ या व्यावसायिकांच्या मालमत्तेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुकानातील फ्लायवूड व केमिकलमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरात सर्वत्र धुराचे लोट मोठ्या प्रमाणात वाहू लागले. या भीषण घटनेमुळे परिसरातील बघ्यांनी गर्दी केली आहे.

वर्ये हद्दीतील रामनगर कालव्यानजीक असलेल्या या फ्लायवूडच्या दुकानाला आज (मंगळवार) सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या दुकानातील कामगारांच्या आग लागल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड करीत संबंधित मालकास दूरध्वनीवरील कळविले. मात्र दुकानातील मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लायवुडच्या विशेषतः केमिकलमुळे आगिने भीषण स्वरूप धारण केले होते. काही क्षणातच आगीच्या माहाकाय ज्वाळांनी वेढले. या भीषण आगीने शेजारील रूपचंद सोळंकी यांचे घरे व रूपाशेठ यांच्या दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे.

या आगीने शेजारील कुटुंबातील लोक हादरून गेले असून, महिलांना अश्रू अनावर झाले. आग विझवण्यासाठी सातारा व भुईंज साखर कारखान्याचा अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले असून, दोन्ही बंबांच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, दुकानदार हादरून गेले आहेत. आगीचे कारण अद्यापही समजू शकलेली नाही.

.हेही वाचा : 











Source link

Dipika Kakar: कोण म्हणतंय मी अभिनय सोडणार? ‘त्या’ अफवांवर संतापली दीपिका कक्कर

0
Dipika Kakar: कोण म्हणतंय मी अभिनय सोडणार? ‘त्या’ अफवांवर संतापली दीपिका कक्कर


दीपिका म्हणाली की, ‘मी हे बोलले, कारण मी संसारच्या बाबतीत काहीशी जुन्या विचारांची व्यक्ती आहे. आणि मला वाटते की, जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा, त्याची काळजी आईने घेतली पाहिजे. सुरुवातीची काही वर्षे आई बाळाजवळच असली पाहिजे. हीच सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. मी माझ्या आजूबाजूला अशी मुले मोठी होताना पाहिली आहेत. आम्ही सकाळी अभ्यास करायचो, तेव्हा आई पण उठून बसायची. मला हे क्षण माझ्या मुलासोबत जगायचे आहेत. असे जीवन माझ्यासाठी स्वप्नवत असणार आहे. पण मी अभिनय सोडणार नाही.’



Source link

Paresh Rawal Birthday: बॉसच्या लेकीवर फिदा झाले होते परेश रावल! ‘अशी’ होती अभिनेत्याची फिल्मी लव्हस्टोरी

0
Paresh Rawal Birthday: बॉसच्या लेकीवर फिदा झाले होते परेश रावल! ‘अशी’ होती अभिनेत्याची फिल्मी लव्हस्टोरी


स्वत: परेश रावल यांनी एका मुलाखतीत त्यांची रंजक प्रेमकहाणी शेअर केली होती. आपल्या पत्नीबद्दल बोलताना परेश म्हणाले होते की, स्वरूपला बघून पहिल्या नजरेतच मी मोहित झालो होतो. ही गोष्ट त्यांनी सगळ्यात आधी आपल्या मित्राला जाऊन सांगितली. परेश यांच्या मित्राला म्हणजेच महेंद्र जोशी यांना ही गोष्ट सांगत ते म्हणाले की, हीच मुलगी माझी बायको होईल. यावर महेंद्र त्यांना म्हणाला की, तू ज्या कंपनीत काम करतोस त्या कंपनीच्या बॉसची ती मुलगी आहे, हे तुला माहीत आहे ना? मात्र, परेश रावल यांनी स्वरूप यांच्याशीच लग्न करण्याचा निर्णय मनाशी पक्का केला होता.



Source link

सातारा : उरमोडीत बुडालेल्या जीवलग मित्रांचे मृतदेह सापडले; दोघेही अभियांत्रिकीचे विद्यार्थी | पुढारी

0


परळी; पुढारी वृत्तसेवा :  सदरबझार, सातारा येथील दोन जीवलग मित्र रविवारी उरमोडी धरणपात्रात सायळी गावाजवळ पोहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. रात्री उशिर झाल्याने त्यांचा शोध घेता आला नव्हता. सोमवारी सकाळी रेस्क्यू टीमने शोध कार्य राबवले. या मोहिमेत अखेर बुडालेल्या या दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले.

सौरव सुनील चौधरी (वय 22) व आकाश रामचंद्र साठे (20) अशी बुडून मृत्यू झालेल्या मित्रांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सौरव आणि आकाश हे मित्र दुचाकीवरून उरमोडी धरणावर पोहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सायळी गावच्या हद्दीत असलेल्या झुडुपातील रस्त्यातून धरणपात्रात प्रवेश केला. त्या ठिकाणी दोघेही पोहण्यास गेले. या दोघांव्यतिरिक्त पोहणारे अन्य कोणीही नव्हते. ते पोहत होते त्यापासून काही अंतरावर एक कुटुंबीय गप्पा मारत बसले होते. त्या युवकांनी कपडे व मोबाईल काठावर ठेवले होते. बराच वेळ ते पोहत होते. यादरम्यान, सौरवचा मोबाईल वारंवार वाजत होता. धरणाच्या कडेला बसलेल्या कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आली. सतत फोन वाजत असल्याने त्यांनी तो फोन उचलला.

यावेळी सौरवच्या आईने सौरव कुठे आहे? कोण बोलत आहात? असे प्रश्न संबंधितांना केले. त्यावेळी कुटुंबियांनी हा मोबाईल उरमोडी धरण परिसरातील असून इथे दोन युवक पोहण्यासाठी गेले आहेत. मात्र, बराच वेळ झाले ते इकडे परत आलेच नाहीत आणि पाण्यातही दिसत नसल्याचे सौरवच्या आईला सांगितले.

हे ऐकताच सौरवच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. फोन ठेवल्यानंतर त्यांनी घरातील इतर सदस्यांना ही माहिती दिली. सौरवचा मोठा भाऊ गौरव व त्याचे काही मित्र घटनास्थळी धावले. त्यांनी परिसरात पाहणी केली मात्र त्यांना काहीही आढळून आले नाही. तोपर्यंत अंधारही झाला होता. यानंतर या घटनेची कल्पना गौरवच्या मित्रांनी आ. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला दिली. मात्र, रात्री खूप उशिर झाल्याने रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी शोध मोहीम राबवण्यास नकार दिला.

सोमवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी सौरव आणि आकाश यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. सकाळी 9 वाजता रेस्क्यू टीमचे काही सदस्य दाखल झाले. मात्र, त्यांनाही यश आले नाही. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनीही स्वतः बोटीतून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही यात अपयश आले. यानंतर अंबवडे येथील काही युवकांनी शर्थीचे प्रयत्न करत दुपारी 12 वाजता आकाशचा मृतदेह बाहेर काढला. स्थानिक नागरिक व सातारा येथील काही कातकरी व्यक्ती तसेच कुटुंबियांनी शोध मोहीम सुरूच ठेवली होती. यावेळी पाऊसही पडत होता. अखेरीस सायंकाळी 5.20 वाजता सौरवचा मृतदेह शोधण्यात यश आले. दोन्ही मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

दरम्यान, दोन्हीही युवकांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच मित्रपरिवार उरमोडी धरणाच्या परिसरात ठाण मांडून होते. यावेळी परिसरातील मुलांनीही गर्दी केली होती. मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.



Source link

सातारा दरोड्यातील संशयित कोल्हापूरचे | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : काशिळ गावच्या हद्दीत महामार्गावर दरोडा टाकून 17 लाख 62 हजार रुपये किमतीचे चांदी व सोन्याचे दागिने लंपास करणार्‍या टोळीतील सर्व सात संशयितांना जेरबंद करण्यात सोमवारी पोलिसांना यश आले. हे सर्व जण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 17 लाख 19 हजार 820 रुपयांचा माल तसेच गुन्ह्यात वापरलेली छर्‍याची बंदूक, तीन चॉपर, इनोव्हा कार व मोबाईल असा 24 लाख 72 हजार 820 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सर्फराज नदाफ (वय 34), मारुती मिसाळ (21), समीर मुलाणी (29), रियाज मुजावर (33 चौघे रा. कुंभोज, ता. हातकणंगले), सूरज कांबळे (24), करण कांबळे (34 दोघे रा. सावर्डे, ता. हातकणंगले) व गौरव घाटगे (23, रा. मिणचे, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

दि. 27 रोजी मध्यरात्री काशिळ हद्दीत लूटमारीची ही घटना घडली होती. संशयितांनी 17 लाख 62 हजार रुपये किमतीचे 110 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 17 किलो चांदी चोरून नेली होती. संशयित सोलापूर हायवेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कासुर्डी टोल नाका येथे नाकाबंदी करून त्यांना पकडण्यात आले. दोन दिवसांत सात जणांना अटक करण्यात आली.

ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, कराड उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



Source link

Rain Update: वाईच्या पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पिकांसह मालमत्तेचं नुकसान | पुढारी

0









वाई, पुढारी वृत्तसेवा: वाई तालुक्याच्या पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतमालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बागायती शेतातील भाजीपाला मातीमोल झाला आहे. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जाहिरातीचे फलक रस्त्यावर कोसळले आहेत. नागरिकांची अवकाळी पावसाने चांगलीच तारांबळ उडाली.

मोठ्या प्रमाणात वित्तहानी

गेले ‍चार दिवस वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. तसेच वातावरणही ढगाळ झाले होते. घराबाहेर पडलेल्या नागरिकांची पावसाने त्रेधा उडवली. काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस पडत असल्याने भूस्खलन होण्याची भीती निर्माण व्यक्त केली जात आहे. अतिवृष्टीच्या खुणा अजूनही ताज्या असल्याने वाई तालुक्यातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

 

हेही वाचा

 











Source link

Film City: फिल्म सिटीमध्ये शूटिंग करणाऱ्यांना ‘हे’ नियम पाळणे बंधनकारक

0
Film City: फिल्म सिटीमध्ये शूटिंग करणाऱ्यांना ‘हे’ नियम पाळणे बंधनकारक



Film City: फिल्म सिटीमध्ये शूटिंग करणाऱ्या प्रॉडक्शन हाउसेससाठी स्वच्छता गाइडलाइन्स जाहिर करण्यात आल्या आहेत. नियम मोडल्यास त्या प्रोडक्शन हाउसला ५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे.



Source link

Marathi Serials: ‘या’ मालिकांमध्ये पाहायला मिळणार वटपौर्णिमा विशेष आठवडा

0
Marathi Serials: ‘या’ मालिकांमध्ये पाहायला मिळणार वटपौर्णिमा विशेष आठवडा


या भागांमध्ये खासकरून ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘नवा गडी नवा राज्य’, ‘लवंगी मिरची’ आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकांचे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये आपण पाहणार आहोत की वटपोर्णिमेच्या दिवशी कलेक्टर अपर्णा सुरेश माने आपले कर्तव्य व्रत पूर्ण करत अर्जुनला भ्रष्टचाराच्या आरोपाखाली अटक करणार आहे. दुसरीकडे ‘नवा गडी नव राज्य’ मध्ये राघव वर येणार आहे एक नवीन संकट, आनंदीचे वटपोर्णिमेचे व्रत वाचवू शकेल का राघवला या संकटातून?



Source link

Aamir Khan: आमिर खान करणार फातिमा सना शेखशी तिसऱ्यांदा लग्न? बॉलिवूड अभिनेत्याचा दावा

0
Aamir Khan: आमिर खान करणार फातिमा सना शेखशी तिसऱ्यांदा लग्न? बॉलिवूड अभिनेत्याचा दावा


काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट, अभिनेता आमिर खानने पत्नी किरण रावला घटस्फोट दिला. अचानक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी घटस्फोट घेतल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर आता आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचा दावा एका अभिनेत्याने केला आहे.



Source link

Adipurush: सीतेच्या विरहात व्याकुळ श्रीराम; ‘आदिपुरुष’ मधील गाणं ऐकून डोळ्यात येईल पाणी

0
Adipurush: सीतेच्या विरहात व्याकुळ श्रीराम; ‘आदिपुरुष’ मधील गाणं ऐकून डोळ्यात येईल पाणी


मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि भावपूर्ण गायनाच्या पलीकडे, मधुर ट्रॅक आपल्याला आदिपुरुषांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या जगात आमंत्रित करतो, ज्यामध्ये प्रभू श्री राम आणि सीता माँ यांच्या गुणांचे आणि सद्गुणांचे चित्रण होते, त्यांची धार्मिकता, करुणा आणि दैवी कृपा अधोरेखित होते. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष, टी-सिरीज, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफिल्स मधील राजेश नायर यांनी निर्मित केला आहे आणि तो १६ जून २०२३ रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होईल



Source link