Saturday, August 15, 2026
Homeसाताराशड्डू ठोकून विकास होत नाही: अजित पवारांचे शंभूराज देसाईंवर टीकास्त्र | पुढारी

शड्डू ठोकून विकास होत नाही: अजित पवारांचे शंभूराज देसाईंवर टीकास्त्र | पुढारी

शड्डू ठोकून विकास होत नाही: अजित पवारांचे शंभूराज देसाईंवर टीकास्त्र | पुढारी

[ad_1]








ढेबेवाडी: पुढारी वृत्तसेवा: पाटण विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या कराड – चिपळूण रस्त्याचीअवस्था काय आहे ? पाटण तालुक्याचे प्रतिनिधी काय करतात ? विजय मिळाल्यानंतर शड्डू ठोकून विकास होत नाही व जनतेच्या समस्या सुटत नाहीत, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना लगावला.

पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुढे (ता. पाटण) येथील गणेश मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

या सरकारने भ्रष्ट्राचाराची परिसीमा गाठली आहे. विरोधातील गावांचा विकास रोखण्याचे काम, शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून हवे तसे काम करून घेण्याचे उद्योग सुरू आहेत. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी दबावाला बळी पडून काम करू नये. ज्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मराठा समाजाच्या सुरक्षेसाठी शिवसेना काढली, त्या शिवसेनेत तुम्ही मोठे झाला, शिवसेनेने तुम्हाला मंत्री केले आणि त्याच शिवसेनेशी गद्दारी करून विश्वासघात करून बाळासाहेबांच्या मुलाला सत्तेबाहेर काढले,अशा गद्दारांची विश्वासार्हता काय? भविष्यात ते जनतेशी तरी विश्वासू राहणार का ? असा टोलाही अजित पवार यांनी देसाई यांना लगावला.

हेही वाचा 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments