Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3032

The Kerala Story OTT: ‘द केरळ स्टोरी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार; कधी आणि कुठे?

0
The Kerala Story OTT: ‘द केरळ स्टोरी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार; कधी आणि कुठे?


‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील ३२००० हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे ब्रेनवॉश करण्यात आले. यानंतर त्यांना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांना सीरियाला पाठवण्यात आले, जिथे त्यांच्यासोबत धक्कादायक घटना घडल्या.



Source link

KK Death Anniversary: ‘या’ गाण्याने बदलले होते केकेचे आयुष्य

0
KK Death Anniversary: ‘या’ गाण्याने बदलले होते केकेचे आयुष्य



Singer KK Death Anniversary: प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके याच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…



Source link

Gautami Patil: आधी पाठिंबा नंतर वक्तव्यावरुन माघार; चार शब्दात संभाजीराजेंच्या विधानावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

0
Gautami Patil: आधी पाठिंबा नंतर वक्तव्यावरुन माघार; चार शब्दात संभाजीराजेंच्या विधानावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया


गौतमीने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गौतमीला संभाजीराजे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर ती म्हणाली की, “खरं तर, मला याबद्दल माहीत नाही. त्यामुळे त्याबद्दल माहिती घेतल्यावर मी बोलेन. पण, पण दादांच्या बाबतीत नो कॉमेंट्स. दादा काहीही म्हणाले तरी मी त्यावर काहीच बोलू शकत नाही. मी त्यांना मानते. बरेच लोक माझा कार्यक्रम बघायला येतात. जर मी अश्लील कृत्य करत असते तर इथे कार्यक्रम करूच शकले नसते.”



Source link

शरद पवारांची लोकसभेसाठी जोरदार तयारी, सातारा, माढ्याची चाचपणी | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा व माढा मतदारसंघाची चाचपणी केली. या दोन्ही मतदारसंघातील पदाधिकार्‍यांकडून आढावा घेताना त्यांनी संभाव्य उमेदवारीबाबत कानोसाही घेतला. दरम्यान, राष्ट्रवादीने लोकसभेसाठी जोरदार व्यूहरचना आखल्याचे समोर आले असून माढ्यातून आ. रामराजे ना. निंबाळकर की संजीवराजे ना. निंबाळकर याचीही उत्सुकता यावेळी दिसून आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक मंगळवारी राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खा. श्रीनिवास पाटील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आदींसह आजी, माजी खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सातार्‍यातून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, नितीन पाटील, प्रभाकर देशमुख, सुरेंद्र गुदगे, दीपक पवार, नंदकुमार मोरे, मनोज पोळ, सुनील माने, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदार व पदाधिकार्‍यांनी सातारा लोकसभेसाठी पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने राष्ट्रवादीची एकजूट दाखवण्याचा विश्वास शरद पवार यांच्यापुढे व्यक्त केला; तर माढा लोकसभेसाठी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर किंवा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित केले जाणार असून त्यासाठी सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

सातारा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनील माने यांनी सांगितला. यावेळी खा. शरद पवार यांनी प्रत्येक मतदारसंघात बूथ बांधणी करावी, तसेच राष्ट्रवादीचे आमदार नसलेल्या मतदारसंघात विशेष लक्ष घालून बूथ बांधणी करावी, तेथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकार्‍यांना ताकद देण्याची सूचना केली. यावेळी सर्वांनीच सातारा लोकसभेला पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीने मैदानात उतरण्याची तयारी केल जाईल, तसेच आगामी काळात पक्षाची एकजूट दाखवली जाईल, असा विश्वास आजी माजी आमदारांनी व्यक्त केला.

माढा लोकसभेच्या चर्चेवेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर किंवा संजीवराजे यांच्या पैकी एकाला संधी देण्याची मागणी झाली. यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी माढातून रामराजेंनाच संधी दिल्यास सोयीचे होईल, असे सांगितले. यावर सोलापूरात समाविष्ठ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा करुनच नाव निश्चित कले जाईल, असे पवार यांनी सांगितले.

उदयनराजे विरोधी उमेदवार असतील असे समजून नियोजन…

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचा एक असे तीन आमदार आहेत. तर विरोधी भाजपचा एक व शिवसेना (शिंदे गट) दोन असे एकूण तीन आमदार आहेत. महाविकास आघाडी एकत्र लढल्यास तीन विरुद्ध तीन अशी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. पण, राष्ट्रवादी स्वतंत्र लढली तर दोन आमदार असल्याने ताकद कमी पडणार आहे. उदयनराजेंचे सातारा विधानसभा मतदारसंघात लीड कमी होणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचाच प्रयोग सातार्‍यात करण्याकडे सर्वांचा कल राहणार आहे. त्यावर खा. शरद पवार काय निर्णय घेणार आणि कोण उमेदवार असणार यावर सर्व अवलंबून राहणार आहे.



Source link

Swara Bhasker: ‘हा तर बलात्काऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न…’; कुस्तीपटूंच्या समर्थनात स्वरा भास्करची पोस्ट!

0
Swara Bhasker: ‘हा तर बलात्काऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न…’; कुस्तीपटूंच्या समर्थनात स्वरा भास्करची पोस्ट!


Swara Bhasker Tweet: भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने पाठिंबा दिला आहे. या दरम्यान स्वर भास्करने एक ट्वीट केले आहे, जे आता तुफान व्हायरल होत आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करावी, अशी मागणी कुस्तीपटू सातत्याने करत आहेत. मंगळवारी (३० मे) साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी एक निवेदन जारी करत, आपण देशासाठी मिळवलेली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी हरिद्वारला जात आहोत, असे म्हटले होते. शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी त्याठिकाणी धाव घेत कुस्तीपटूंना रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी प्रचंड गदारोळ सुरू होता. आता अभिनेत्री स्वरा भास्करने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तपास यंत्रणा ब्रिजभूषण शरण सिंह यांना वाचवत असल्याचे तिने म्हटले आहे.



Source link

Adipurush: प्रदर्शनाआधीच ‘आदिपुरुष’ गाठणार ५०० कोटींचा टप्पा! इतकी कमाई नेमकी कशी झाली? वाचा..

0
Adipurush: प्रदर्शनाआधीच ‘आदिपुरुष’ गाठणार ५०० कोटींचा टप्पा! इतकी कमाई नेमकी कशी झाली? वाचा..


Adipurush Prerelease collection: एकीकडे ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून प्रचंड खळबळ माजली आहे. तर, दुसरीकडे या चित्रपटावरून अनेक वादही पाहायला मिळत आहेत.



Source link

सातारा : चोरट्यांकडून 7 घरफोड्या उघडकीस | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयितांना अटक केले असता, त्यांनी 7 घरफोड्यांची कबुली दिली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) 49 सिलेंडर टाक्यांसह सोन्याचा ऐवज जप्त केला आहे. संशयितांमध्ये चौघेजण असून त्यांच्याकडे 6 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे.

जीवन शहाजी रावते (रा. दत्तनगर, कोडोली, सातारा), अमर बापूसाहेब देवगुडे (रा. खोकडवाडी, कोडोली, सातारा), महेश अंकुश देशमुख (रा. हरपळवाडी, ता. कराड), विजय आत्माराम रिटे (रा. व्यंकटपुरापेठ, सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सुमारे 10 महिन्यांपूर्वी अतित ता. सातारा येथील भारत गॅस एजन्सीच्या गोडावून मधून सिलेंडरच्या टाक्या चोरी झाल्या होत्या. याबाबत एलसीबी पोलिसांना संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काही जणांची धरपकड केली असता संशयितांनी अतित येथून 35 सिलेंडरच्या टाक्या व पुसेगाव येथून 14 सिलेंडरच्या टाक्या चोरी केल्याची कबुली दिली. तसेच आणखी दोन घरफोड्या केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 01 हजार 500 रुपये किमतीच्या 49 सिलेंडर टाक्या व गुन्ह्यात वापरलेले 2 लाख रुपयांचे वाहन जप्त केले.

एलसीबी पथकाने संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी मिळाली. संशयितांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी सातारा, माण, पाटण या तालुक्यातही घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार संशयितांकडून चोरीस गेलेले 3 लाख 30 हजार 100 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, तांबा पितळेची भांडी जप्त करण्यात आली.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोनि अरुण देवकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष पवार, रवींद्र भोरे, रवींद्र तेलतुंबडे, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, पोलिस तानाजी माने, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, मुनीर मुल्ला, अमोल माने, राकेश खांडके, प्रवीण कांबळे, स्वप्नील दौंड, सचिन ससाणे, मयूर देशमुख, मोहसिन मोमीन, वैभव सावंत, पंकज बेसके, प्रवीण शिंदे, प्रकाश वाघ यांनी कारवाईत सहभाग घेतला.

The post सातारा : चोरट्यांकडून 7 घरफोड्या उघडकीस appeared first on पुढारी.



Source link

सातार्‍यात शिवप्रेमींकडून बाईकचा थरार; शिवतीर्थासह परिसर दुमदुमला | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने आयोजित बाईक रॅलीस शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले रॅलीत सहभागी झाल्याने शिवप्रेमींनी जल्लोष केला. या बाईक रॅलीचा सातारकरांनी थरार अनुभवला.

शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.३०) पोवईनाक्यावरील शिवतीर्थ ते राजवाडा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
शिवप्रेमींनी सायंकाळपासूनच पोवईनाका परिसरात प्रचंड गर्दी केली होती. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उत्सव समितीकडून ठिकठिकाणी उभारलेल्या कमानी लक्ष वेधून घेत होत्या. शिवतीर्थावर शिवप्रेमींचे जथ्येच्या जथ्ये दाखल होत होते. हलगी व ढोल ताशांच्या गजराने कार्यक्रमास रंगत आणली. आयोजकांच्यावतीने उपस्थितांना भगवे फेटे घालण्यात आले. यासह उपरणे यांच्याही वाटप करण्यात आले. यामुळे शिवतीर्थ भगवे झाले होते.

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी.. जय शिवाजी,’ ‘हर.. हर महादेव,’ अशा घोषणांनी शिवतीर्थ दुमदुमून गेले. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै. ‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सुनील काटकर, मनोज शेंडे, पंकज चव्हाण, किशोर शिंदे, राजू भोसले, राजू गोरे, संग्राम बर्गे, पत्रकार शरद काटकर, श्रीकांत आंबेकर, रवींद्र माने, प्रितम कळसकर, रवींद्र झुटिंग, शंकर माळवदे, स्मिता घोडके आदि प्रमुख उपस्थित होते. या रॅलीत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते.

हेही वाचा;











Source link

Naseeruddin Shah: मुस्लिमांचा द्वेष करणं ही हल्ली फॅशन झालीय; नसिरुद्दीन शाह यांचं बेधडक विधान

0
Naseeruddin Shah: मुस्लिमांचा द्वेष करणं ही हल्ली फॅशन झालीय; नसिरुद्दीन शाह यांचं बेधडक विधान


नसीरुद्दीन शाह यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी त्यांची ‘ताज-डिव्हाइडेड बाय ब्लड’ (Taj divided by blood) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेब सीरिजमध्ये त्यांनी अकबर ही भूमिका साकारली. या सीरिजच्या प्रमोशनच्या वेळी त्यांनी ‘मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माते होते’ असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधले होते.



Source link

Aai Kuthe Kay Karte: कांचन आणि अप्पांनी मानले आशुतोषचे आभार, काय आहे प्रकरण?

0
Aai Kuthe Kay Karte: कांचन आणि अप्पांनी मानले आशुतोषचे आभार, काय आहे प्रकरण?


त्यावर आशुतोष अप्पांना समजावतो. ‘अप्पा, यशने असे काहीही केलेले नाही. यशला उपचाराची गरज आहे. यश ज्या वयातून जात आहे त्या वयातून आपण सर्वजण गेलो आहोत. परीक्षेत नापास झालो, कामात यश आले नाही तर काय करायचे याचा सल्ला आपण देतो. पण हेच जर नात्यांच्याबाबत घडले तर, म्हणजेच नाती तुटली, माणसे लांब गेली तर त्यातून कसे बाहेर यायचे, याचे शिक्षण कुठेच मिळत नाही’ असे यश म्हणतो.



Source link