Friday, October 2, 2026
Homeसातारासातारा : दारूची बाटली न दिल्याने खून | पुढारी

सातारा : दारूची बाटली न दिल्याने खून | पुढारी

[ad_1]








तासवडे टोलनाका; पुढारी वृत्तसेवा :  दारूची बाटली न दिल्याच्या कारणावरून तळबीड (ता. कराड) येथे गळा दाबत चाकूने वार करून एकाचा खून करण्यात आला. महेंद्र शंकर वाघमारे (वय 47, रा. तळबीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. घटना शुक्रवारी रात्री घडली असून, प्राथमिक चौकशीतून तळबीड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

महेंद्र वाघमारे यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे ते कायम कुटुंबापासून दूरच राहत होते. दारू पिल्यानंतर रोज संध्याकाळी गावातील मंदिरात किंवा एखाद्या वस्तीवरील जनावरांच्या शेडमध्ये ते झोपत असत. शुक्रवारी वाघमारे हे दारू पिऊन तळबीड येथील ग्रामपंचायतीसमोरील मारुती मंदिरात झोपण्यास गेले. मध्यरात्री एक जण वाघमारे यांच्याजवळ आला व त्यांच्या खिशातील दारूची बाटली मागू लागला. परंतु, वाघमारे यांनी बाटली देण्यास नकार दिल्याने संशयिताने वाघमारेवर चाकूने वार केला. तसेच त्यांचा गळा आवळला.

दरम्यान, शनिवारी सकाळी मारुतीचे दर्शन घेण्यासाठी गावातील लोक आले. त्यावेळी सदरची घटना उघडकीस आली. पोलिसांनी तळबीड गावात शोध मोहीम राबवत संशयितास ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे व सहकार्‍यांनी संशयितास ताब्यात घेतले.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments