Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3022

राज्यात प्रथमच ‘स्पोर्टस् अ‍ॅप’; क्रीडा कार्यालय हायटेक | पुढारी

0


सातारा; विशाल गुजर :  केंद्र असो की राज्य सरकार खेळाडूंपर्यंत पोहचत नाही, खेळाडूंना सुविधा मिळत नाहीत, अशी नेहमीच ओरड होते. अधिकाधिक खेळाडूंपर्यंत पोहोचता यावे यासाठी सातारच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथमच स्वतःचे सातारा स्पोर्टस् अ‍ॅप तयार केले आहे. त्या माध्यमाद्वारे खेळाडूंच्या संपर्कात राहण्याचा वेगळा प्रयत्न केला जात आहे. इतर कार्यालयाप्रमाणे सातारा जिल्हा क्रीडा कार्यालयही हायटेक झाले आहे.

क्रीडाविषयक परिपूर्ण माहिती

अ‍ॅपमध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांची नावे देण्यात आली असून त्यांचे संपर्क नंबर देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या खेळाच्या स्पर्धा कधी, कुठे, केव्हा होणार याचा कॅटलॉगही आहे. खेळांच्या स्पर्धांचे वर्षभराचे वेळापत्रक देण्यात आले आहे. फोटो गॅलरीमध्ये सातारा जिल्हा क्रीडा कार्यालय, तालुका क्रीडा कार्यालये, शहरात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांचे फोटो आहेत. खेळाडूंना आवश्यक असणारे सर्व मेल, आयटी या विभागात आहेत. तसेच जिल्हा, तालुका क्रीडा अधिकारी यांचे पत्ते, फोन नंबर, मेल आयडी देण्यात आले आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून खेळाडूंना आपल्या मोबाईलवर स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करता येणार असून सरकारच्या क्रीडा विषयक नव्या घोषणा पाहता येणार आहेत.

अ‍ॅपद्वारे मिळणार सर्व माहिती…

क्रीडा विभागाने सातारा स्पोर्टस् अ‍ॅप विकसित केले आहे. बहुतांश लोक कॉम्प्युटरपेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात म्हणून या साधनाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना सातारला येण्याची गरज भासू नये, हादेखील या अ‍ॅप मागचा उद्देश आहे. खेळांची माहिती, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू माहिती, शासन निर्णयाबाबत माहिती अवगत करून देण्यात येणार आहे.

मोबाईल संकल्पनेतून अ‍ॅप

सध्या बहुतांश व्यवहार हे मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन होत असतात. बँकेतून पैसे ट्रान्स्फर करणे असो अथवा रेल्वेचे तिकीट काढणे असो, सर्वच व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन होत आहेत. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने खेळाडूंपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईलचा वापर करण्याचे निश्चित केले आणि सातारा स्पोर्टस् अ‍ॅप तयार केले आहे.

स्पर्धांसाठी करता येणार नावनोंदणी

या अ‍ॅपच्या माध्यमातून खेळाडूंना हवी ती माहिती मोबाईलच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच विविध प्रकारच्या स्पर्धांची नावनोंदणी करता येणार आहे. या अ‍ॅपमध्ये सातारा जिल्हा विषयी माहिती देण्यात आली असून सरकारतर्फे खेळासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकार व भारत सरकारतर्फे देण्यात आलेल्या पुरस्काराप्राप्त पुरस्कारार्थींची नावेही यात घेण्यात आली आहेत.

शहरासह जिल्ह्यातील खेळाडूंना कोणत्याही माहितीसाठी कार्यालयात हेलपाटे मारायला लागू नयेत यासाठी सातारा स्पोर्टस् अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातारा जिल्ह्याविषयी माहिती, पुरस्कार, क्रीडा संकुल, क्रीडा संघटना, क्रीडा प्रकार, फोटो गॅलरी, संपर्क, खेळांची माहिती, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू माहिती, शासन निर्णय याबाबत माहिती अवगत करून देण्यात येणार असल्याने खेळाडू व मार्गदर्शकांना हे अ‍ॅप सोयीचे होणार आहे.
– युवराज नाईक, जिल्हा क्रीडाधिकारी



Source link

सातारा: महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा | पुढारी

0









पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हाधिकारी यांनी महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर महाबळेश्वर महसूल विभाग व इतर प्रशासकीय अधिकारी खडबडून जागे झाले आहे. महाबळेश्वर, पाचगणी रस्त्यावरील वेण्णा लेक परिसरात दुतर्फा असणारी अतिक्रमणे आज (दि.७) काढण्यात आली. सकाळपासून वन विभाग, बांधकाम विभाग, महसूल विभाग यासह इतर विभागाने थेट कारवाई सुरू केली.

जेसीबीच्या साह्याने अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी रुचेस जेवणसी यांनी दोन महिन्यापूर्वी महाबळेश्वर तालुक्यातील अतिक्रमणाबाबत ठोस निर्णय घेतले आहेत. निसर्गाचे लचके तोडून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी मोहीम उघडली आहे. वेण्णा लेक परिसर वनविभागाच्या हद्दीत येतो. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली आहेत. आज सकाळपासून ही अतिक्रमणे काढण्यास सुरूवात झाली आहे.

बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने यापूर्वी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या होत्या. त्यावरून काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतली होती. मात्र, ज्यांनी अतिक्रमण काढली नाहीत. त्यांच्यावर थेट कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अतिक्रमण मोहिमेत हस्तक्षेप करणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

हेही वाचा 











Source link

सातारा : संतोष जाधव यांच्यावर सशस्‍त्र हल्‍ला, दोनजण ताब्‍यात | पुढारी

0









सातारा: पुढारी वृत्तसेवा संगम माहुली, ता. सातारा येथील युवा नेते संतोष भाऊ जाधव यांच्यावर मंगळवारी रात्री दोघांनी कोयत्या सारख्या शस्त्राने वार केले. यामध्ये ते व त्यांची पत्नी जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पानपट्टी टपरी टाकायच्या कारणातून वाद झाल्याने त्याची माफी मागायला गेल्यानंतर संशयितांनी हे कृत्य केल्याचे समोर येत आहे.

हर्षद संभाजी साळुंखे व जयदीप सचिन धनावडे (दोघे रा. क्षेत्र माहुली ता. सातारा) यांच्या विरुद्ध संतोष जाधव यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, संतोष जाधव यांची दोघेजण पूर्वीच्या वादातून माफी मागायला म्हणून संतोष जाधव यांच्याकडे गेले. ते बेसावध असतानाच संशयितांनी कोयत्याने त्यांच्यावर वार केले. यामध्ये त्यांच्या डोक्याला जखम झाली. संतोष जाधव यांच्या पत्नी यांनाही संशयितांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याही जखमी झाल्या. यानंतर परिसरातील नागरिकांनी जाधव यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची व पत्नीची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, पोलिस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत. सातारा शहर पोलिस ठाण्यात पहाटे गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : 











Source link

SatyaPrem Ki Katha: चित्रपटाच्या अर्ध्या बजेट इतकं कार्तिकचं मानधन! ‘सत्यप्रेम की कथा’साठी कियाराला किती पैसे मिळाले?

0
SatyaPrem Ki Katha: चित्रपटाच्या अर्ध्या बजेट इतकं कार्तिकचं मानधन! ‘सत्यप्रेम की कथा’साठी कियाराला किती पैसे मिळाले?


SatyaPrem Ki Katha Cast Fees: ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात काम करण्यासाठी कार्तिक आर्यनने भरमसाठ फी आकारली आहे.



Source link

Tula Shikvin Changla Dhada: अधिपती आणि अक्षरा यांच्या नात्याची नवी चाहूल! विश्वासाला जाणार तडा

0
Tula Shikvin Changla Dhada: अधिपती आणि अक्षरा यांच्या नात्याची नवी चाहूल! विश्वासाला जाणार तडा


झी मराठीवर मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत, आणि प्रेक्षकांनाही पुढे काय होणार याची उत्सुकता लागलेली आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील अधिपती आणि अक्षरा या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. ही मालिका आता एका वळणावर पोहोचली आहे. मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: ‘मी अरुंधती नाही’, असे का म्हणाली संजना? मालिकेत नवे वळण

0
Aai Kuthe Kay Karte: ‘मी अरुंधती नाही’, असे का म्हणाली संजना? मालिकेत नवे वळण


गेल्या काही दिवसांपासून संजना आणि अनिरुद्ध यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. हा दुरावा आशुतोषची बहिण वीणा आल्यामुळे निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. अनिरुद्ध आणि वीणा एकत्र काम करत असतात. आता संजना अनिरुद्धला सोडून जाणार का? असा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडत आहे.



Source link

Zara Hatke Zara Bachke: हिट की फ्लॉप? जाणून घ्या चित्रपटाची पाचव्या दिवसाची कमाई

0
Zara Hatke Zara Bachke: हिट की फ्लॉप? जाणून घ्या चित्रपटाची पाचव्या दिवसाची कमाई



Zara Hatke Zara Bachke box office collection: सारा अली खान आणि विकी कौशनचा चित्रपट हिट ठरत आहे की फ्लॉप जाणून घ्या…



Source link

Bigg Boss OTT 2: रितेश देशमुखची ‘ही’ अभिनेत्री ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये एन्ट्री घेणार; सगळ्यांना ‘वेड’ लावणार!

0
Bigg Boss OTT 2: रितेश देशमुखची ‘ही’ अभिनेत्री ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये एन्ट्री घेणार; सगळ्यांना ‘वेड’ लावणार!


Bigg Boss OTT 2 latest update:बिग बॉस ओटीटी’ सीझन १च्या यशानंतर आता या शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुपरस्टार सलमान खान लवकरच बिग बॉस ओटीटी होस्ट करताना दिसणार आहे. लवकरच ‘बिग बॉस ओटीटी २’ सुरू होणार असून, यातून अनेक नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘बिग बॉस ओटीटी २’ हा रिअॅलिटी शो १७ जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. यंदा ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये कोण कोण सहभागी होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या शोसाठी अभिनेत्री जिया शंकरचे नाव फायनल करण्यात आले आहे.



Source link

Avatar 2: प्रतीक्षा संपली! ‘अवतार २’ आता घरबसल्या पाहता येणार! कधी व कुठे? जाणून घ्या…

0
Avatar 2: प्रतीक्षा संपली! ‘अवतार २’ आता घरबसल्या पाहता येणार! कधी व कुठे? जाणून घ्या…


Avatar 2 OTT Release: जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.



Source link

Adipurush : ‘आदिपुरुष’चा नवा ट्रेलर प्रदर्शित, काय आहे नवे?

0
Adipurush : ‘आदिपुरुष’चा नवा ट्रेलर प्रदर्शित, काय आहे नवे?



Adipurush new trailer: ‘आदिपुरुष’ १६ जून रोजी चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यापूर्वी चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.



Source link