Monday, July 6, 2026
Home Blog Page 3001

सातारा : वडिलांच्या डोळ्यादेखत मुलाला बसने दिली धडक | पुढारी

0









वेणेगाव, पुढारी वृत्तसेवा : वडिलांच्या आजारी मित्रास पाहून गावी परत येत असताना खोडद फाटा (ता. सातारा) येथे वडिलांसमोरच महामार्ग ओलांडणार्‍या मुलाचा बसने धडक दिल्याने मृत्यू झाला. विकास दिलीप चव्हाण (वय 19, रा. प्रभुचीवाडी, ता. जावली) असे या मुलाचे नाव आहे. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

याप्रकरणी एस.टी.चालक दिनकर शिवाजी पवार (वय 49 रा.वर्णे ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील दिलीप श्रीरंग चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. दिलीप चव्हाण व विकास हे बाप-लेक भुईंजजवळील रामोशीवाडी येथे विकासच्या आजारी मित्राला भेटायला गेले होते. तेथून ते वडापमधून शेडगेवाडीकडे निघाले होते. निसराळे फाटा येथे या दोघांनी जेवण केले. जेवण झाल्यानंतर विकास हा हायवेच्या पलिकडे जावून येतो, असे सांगून रस्ता ओलांडण्यासाठी गेला.

याचदरम्यान सातारा बाजूकडून येणार्‍या बसने विकासला जोरदार धडक दिली. या अपघातात विकास हा गंभीर जखमी झाला. यानंतर वडील दिलीप आणि स्थानिकांनी विकासला नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान विकासचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हवालदार जितेंद्र इंगुळकर, दीपककुमार मांडवे, संजय जाधव यांनी प्राथमिक माहिती घेत कार्यवाही केली.











Source link

Adipurush: बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ची वाईट अवस्था, पाचव्या दिवशी कमाईत घसरण

0
Adipurush: बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ची वाईट अवस्था, पाचव्या दिवशी कमाईत घसरण


हिंदी भाषेत ‘आदिपुरुष’ चित्रपटाने १२०.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर तेलुगूमध्ये ११०.८५ कोटी कमावले आहेत. मल्याळम १.१ कोटी रुपये, तमिळ २.७ कोटी रुपये आणि कन्नड भाषेतील चित्रपटाने १.७ कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ५६.७५ कोटी रुपये कमावले, दुसऱ्या दिवशी ६५.२५ कोटी रुपयांची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी ६९.१ कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठ्या प्रमाणवर घट पाहायला मिळाली. केवळ १६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.



Source link

Asit Modi: लैंगिक शोषणच्या आरोपांवर असित मोदीने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

0
Asit Modi: लैंगिक शोषणच्या आरोपांवर असित मोदीने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…


शोमध्ये ‘मिसेस सोढी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने हा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी जारी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलिसांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी, ऑपरेशन हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या मालिकेतील अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीच्या आधारे आयपीसी कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जेनिफर मिस्त्रीने असितवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. सोशल साईटवर व्हिडीओ शेअर करत तिने आपली व्यथा मंडळी होती. आता एफआयआर नोंदवल्यानंतर असितवर अटकेची टांगती तलवार आहे.



Source link

Salman Khan: ‘दबंग ३’ मधील अभिनेत्रीचा सलमान खानच्या बॉडीगार्डवर गंभीर आरोप

0
Salman Khan: ‘दबंग ३’ मधील अभिनेत्रीचा सलमान खानच्या बॉडीगार्डवर गंभीर आरोप


पुढे ती म्हणाली, “शूट संपल्यानंतर मला एकदा सलमान सरांना भेटायचे होते. त्यासाठी मी जवळपास ५० लोकांशी बोलले. मी पंडित जनार्दन यांची भेट घेतली आणि सलमान सरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला आश्वासन दिले आणि आम्ही सलमान सरांना भेटायला गेलो. पण तिथे मला वाईट वागणूक देण्यात आली. माझा अपमान केला. मला श्वानासारखे बाहेर काढण्यात आले. कारण मला त्यांच्याबरोबर एक फोटो काढायचा होता. सुमारे १०० लोकांसमोर माझा अपमान झाला. तेथे मला वैयक्तिकरित्या ओळखणाऱ्या अनेकांचा समावेश आहे. या घटनेनंतर मी १० दिवस झोपू शकले नाही. सलमान सर घटनास्थळी उपस्थित नव्हते, पण ते आजूबाजूला होते, त्यांना हवे असते तर ते हस्तक्षेप करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे सलमान खान सरांना पुन्हा कधीही भेटायला मला आवडणार नाही”



Source link

International Yoga Day: “तुला शिकवीन चांगलाच धडा”मधील शिवानी इतकी फिट कशी? जाणून घ्या फिटनेस फंडा

0
International Yoga Day: “तुला शिकवीन चांगलाच धडा”मधील शिवानी इतकी फिट कशी? जाणून घ्या फिटनेस फंडा



International Yoga Day 2023: “तुला शिकवीन चांगलाच धडा” मालिकेतील शिवानी रांगोळी इतकी फिट कशी? जाणून घ्या तिचा फिटनेस फंडा



Source link

सातारा : ऐन पावसाळ्यात ५५ गावे तहानलेली | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात ऐन पावसाळ्याच्या दिवसात माण, खटाव, कोरेगाव, वाईसह अन्य तालुक्यातील सुमारे 55 गावे व 227 वाड्यांमध्ये पाण्याची ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या वाढू लागली आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

पावसाळ्याच्या दिवसातही जिल्ह्यात कडक उन्हाळा निर्माण झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उन्हामुळे भूजल पातळीत घट निर्माण झाली असल्याने पाण्याचे स्त्रोतही कोरडे पडू लागले आहेत. नदी, नाले, ओढे, विहिरी, तलाव व धरणांची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून जिल्ह्यातील काही गावात व वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील माण तालुक्यातील 33 गावे व 208 वाड्यामधील 51 हजार 727 नागरिक व 3 हजार 940 जनावरांना 24 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातील जायगाव, मांजरवाडी गावातील 1 हजार 968 नागरिक व 204 जनावरांना 2 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातील सासवडमधील 750 नागरिक व 545 जनावरांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यातील एका गावातील 185 नागरिक व 158 जनावरांना एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

वाई तालुक्यातील 5 गावे व 6 वाड्यांमधील 5 हजार 320 नागरिक व 3 हजार 51 जनावरांना 2 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यातील एका वाडीमधील 540 नागरिक व 130 जनावरांना एका टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जावली तालुक्यातील 2 गावे एका वाडीमधील 2 हजार 73 नागरिक व 574 जनावरांना 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील 6 गावे व एका वाडीमधील 2 हजार 245 नागरिक व 522 जनावरांना 4 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सातारा तालुक्यातील 1 गाव 3 वाड्यांमधील 624 नागरिक 85 जनावरांना एका टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. कराड तालुक्यातील 5 गावांमधील 3 हजार 507 नागरिक व 2 हजार 385 जनावरांना 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे

जिल्ह्यातील माण 24, खटाव 2, फलटण 1, कोरेगाव 1, वाई 2, पाटण 1, जावली 2, महाबळेश्वर 4, सातारा 1 व कराड 3 असे मिळून टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमधील नागरिक व जनावरांना 41 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यास आणखी टँकर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.



Source link

कोयना धरणात उपयुक्त पाणीसाठा केवळ 6 टीएमसी | पुढारी

0









पाटण, पुढारी वृत्तसेवा : कोयना धरणांतर्गत विभागात अद्यापही पाऊस पडत नसल्याने धरणातील पाणीसाठा अधिकाधिक खालावत चालला आहे. कोयना चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती बंद ठेवली असून पूर्वेकडे सिंचनासाठी व पोफळी, अलोरे जलविद्युत प्रकल्पांसाठी अत्यल्प पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या उपयुक्त केवळ 6.03 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.

105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या 11.03 टीएमसी म्हणजेच एकूण क्षमतेच्या 10.03 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी उपयुक्त साठा अवघा 6.03 टीएमसी आहे.

धरणातील पाण्यावर पश्चिमेकडे पोफळी, अलोरे व कोयना चौथा टप्पा या तीन टप्प्यातून 1920 मेगॅवॅट वीजनिर्मिती केली जाते. पाण्याअभावी तसेच राज्यातील अन्य प्रकल्पातून उपलब्ध होत असलेल्या वीजेमुळे कोयनेतून अपेक्षित मागणी नसल्याने चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती बंद ठेवली आहे. सध्याची जलपातळी 618.696 मीटर इतकी आहे. धरणात अपेक्षित पाऊस व पाणीसाठा झाल्यानंतरच चौथ्या टप्प्यातून वीजनिर्मिती पुन्हा सुरू करण्यात येईल. अद्यापही कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी व अलोरे जलविद्युत प्रकल्पातून अपेक्षित व मागणीनुसार टप्प्याटप्प्याने वीजनिर्मिती सुरू आहे. धरणाची एकूणच पाणी साठवण क्षमता खालावत असल्याने चिंता वाढली आहे.











Source link

Reema Lagoo: ‘मैंने प्यार किया’वेळी रिमा लागू यांचे वय कळल्यावर व्हाल चकीत

0
Reema Lagoo: ‘मैंने प्यार किया’वेळी रिमा लागू यांचे वय कळल्यावर व्हाल चकीत


‘मैने प्यार किया’, ‘पत्थर के फूल’, ‘साजन’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘जुडवा’ या चित्रपटांमध्ये रिमा यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. मुलांच्या कलाने घेणारी, त्यांची गुपितं समजणारी, प्रेमामध्ये साथ देणारी आणि वेळ पडल्यास रागे भरणारी आई रिमा यांनी रुपेरी पडद्यावर साकारली. आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगण, संजय दत्त, राहुल रॉय, गोविंदा ते अगदी जुही चावला, काजोल यांच्या आईच्या भूमिकेतही रिमा ठळकपणे लक्षात राहिल्या.



Source link

‘प्यार जिंदगी है!’ : लोकप्रिय हिंदी रोमॅंटिक चित्रपटांचा वाचनीय निर्मितीप्रवास

0
‘प्यार जिंदगी है!’ : लोकप्रिय हिंदी रोमॅंटिक चित्रपटांचा वाचनीय निर्मितीप्रवास


Pyar Zindagi Hai book Review: हिंदी चित्रपटांच्या आरंभापासून ज्या ‘लव्ह स्टोरीज’ आजपर्यंत रुपेरी पडद्यावर आल्या आणि त्यातल्या ज्या विविध कारणांमुळे ‘हिट्ट’ झाल्या त्यातल्या काही वेचक प्रेमकथापटांचा रोचक परिचय करुन देणारं ‘प्यार जिंदगी है!’ हे पुस्तक लेखिका अनिता पाध्ये यांनी लिहिलं आहे. 



Source link

Ajinkya Raut: हृता दुर्गुळेनंतर या अभिनेत्रीसोबत अजिंक्य करणार रोमॅन्स, नवी मालिका येणार

0
Ajinkya Raut: हृता दुर्गुळेनंतर या अभिनेत्रीसोबत अजिंक्य करणार रोमॅन्स, नवी मालिका येणार


अभिनेता अजिंक्य राऊत पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचे या आधीचे काम प्रेक्षकांना विशेष आवडले. त्याच्या नव्या भूमिकेची त्याचे चाहते मनापासून वाट पाहत होते. अजिंक्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेतून दिसणार आहे. मालिकेचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना विशेष आवडतो आहे कारण मालिकेची नायिका जान्हवी तांबट ही वेगळ्या रूपात दिसते आहे. ती चक्क एका बॉडीगार्डच्या वेशात आपल्याला दिसते आहे, तेही पुरुष बॉडीगार्डच्या वेशात. आता हा बॉडीगार्ड कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईल, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. या मालिकेत अजून कोण कलाकार असतील आणि एकंदर मालिका कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईल याची प्रेक्षक वाट बघताहेत. ही मालिका १७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link