Monday, July 6, 2026
Home Blog Page 3000

Subhedar Teaser: स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची यशोगाथा, सुभेदारचा टीझर प्रदर्शित

0
Subhedar Teaser: स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची यशोगाथा, सुभेदारचा टीझर प्रदर्शित



Subhedar Teaser: ‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत झळकणार आहे. ‘शिवराज अष्टक’मधील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ‘सुभेदार’ या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.



Source link

World Music Day: ‘या’ कलाकरांनी संगीतात देखील कमावले आहे नाव

0
World Music Day: ‘या’ कलाकरांनी संगीतात देखील कमावले आहे नाव


संगीत आपले मन शांत करण्यास मदत करते आणि मूड देखील सुधारते. संगीताचे हे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी २१ जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. आनंदाचा काळ असो किंवा कठीण प्रसंग, एकट्याने किंवा मित्रांसोबत आनंद घेणे, प्रवास करणे किंवा घरी वेळ घालवणे, प्रत्येक प्रसंगात संगीत हा आपला उत्तम साथीदार ठरतो. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी संगीत क्षेत्रात नाव कमावले आहे. चला जाणून घेऊया या कलाकारांबद्दल…



Source link

Rubina Dilaik : अपघातानंतर रुबिना दिलैकने घेतला कामातून ब्रेक; सुट्टी घेऊन शिमलामध्ये करतेय आराम!

0
Rubina Dilaik : अपघातानंतर रुबिना दिलैकने घेतला कामातून ब्रेक; सुट्टी घेऊन शिमलामध्ये करतेय आराम!


अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रुबिना म्हणत आहे की, ‘नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, जसे की तुम्ही पाहू शकता आणि आतापर्यंत तुम्हाला अंदाज आला असेल की, मी शिमल्यात आहे. मला शिमलाचे सौंदर्य आणि शांतता नेहमीच आवडते. इथे सगळं काही आरामशीर आहे आणि इथेच आमचे घर आहे. त्यामुळे अपघातानंतर छोटा ब्रेक घेण्याचा विचार केला. मला हीच गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती.’



Source link

Shivendraraje VS Udayanraje Bhosale भूमिपूजनावरुन दोन्ही राजे भिडले, संपूर्ण राडा कॅमेऱ्यात कैद

0



<p>साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमनेसामने. बाजार समितीच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजनावरून दोन्ही राजेंमध्ये वाद. दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. उदयनराजेंचा विरोध झुगारून शिवेंद्रराजेंनी केलं भूमिपूजन.&nbsp;</p>



Source link

साताऱ्यात बाजार समितीच्या भूमीपूजनावरून राडा

0


सातारा :  साताऱ्यात शिवराज ढाब्याजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेच भूमिपूजनाच्या कार्यक्रमामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमने सामने आले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावलं. मात्र तरी देखील उदयनराजेंचा विरोध झुगारून  शिवेंद्रराजे भोसले यांनी भूमीपूजन केलं. या प्रकारानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले.  यामुळे साताऱ्यात दोन्ही राजेंमधला वाद पुन्हा उफाळून आला आहेत. 

आज सकाळी दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचं भूमिपूजन होणार होतं. मात्र नऊ वाजता उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले, आणि तिथं असलेलं साहित्य फेकून दिलं. तसंच, एक कंटेनरही जेसीबीनं नष्ट केला. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसह येत उदयनराजेंचा विरोध झुगारून त्यांच्या समोर भूमीपूजन केलं.

माझ्या जागेत भूमिपूजन करायचं नाही असे म्हणत  उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंच्या  कार्यकर्त्यांना झापलं. वाद सुरू असतानाच  आमजार शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंसमोर भूमिपूजन केले. त्यानंतर काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्ती करत परिस्थिती नियंत्रणात आणली.   

शेतकरी आणि व्यापाऱ्यासाठी हे मार्केट यार्ड उभे करत आहे. यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. ज्यांचा या भूमीपूजनला विरोध आहे त्यांनी कोर्टाकडून स्टे ऑर्डर आणून आपली बाजू मांडावी. आज सत्याचा विजय झाला आहे. भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे. जे  कामाला विरोध करत आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवेंद्रराजेंनी केली आहे.  

उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील वाद आजचा नाही.   अनेक वेळा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन झाले. मात्र कोणत्या तरी किरकोळ कारणांवरून दोन्ही राजे आमने सामने आल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. 



Source link

साताऱ्यात राजे वाद उफाळला; खा. उदयनराजे समर्थकांनी उधळला आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा कार्यक्रम | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा शहरालगत आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन होणार होते. यासाठी उभारलेल्‍या मंडपाचे खा. उदयनराजे भोसले समर्थकांनी मोडतोड करत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही तेथे जाऊन तळ ठोकला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरालगत आज सकाळी 10 वाजता आ. शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकहाती सत्ता आहे. सध्या ही इमारत सातारा एसटी परिसरात आहे. नव्या इमारतीसाठी शहरालगत खिंडवाडी येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी भूमिपूजनचा कार्यक्रम आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थित होणार आहे.

भूमिपूजन सोहळा व त्यानंतर सभा असे कार्यक्रमाचे स्वरूप ठरले आहे. यासाठी परिसरात मोठा मंडप टाकून सजावट करण्यात आली होती. मात्र आज बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास खा. उदयनराजे भोसले समर्थकांनी या परिसरात येऊन जोरदार राडा केला. मंडपाचे नुकसान करून तो पाडला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे अर्धा तास परिसरात तणाव कायम होता. दरम्यान, या घटनेची माहिती आ. शिवेंद्रराजे भोसले यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हळूहळू आमदार समर्थकांनी परिसरात गर्दी केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस दल अलर्ट झाले व परिसराला छावणीचे स्‍वरूप आले आहे. यामुळे आता पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 











Source link

Shilpa Shetty: स्वत:ला फिट ठेवण्यासाठी शिल्पा शेट्टी करते ही योगासने, तुम्ही देखील करु शकता

0
Shilpa Shetty: स्वत:ला फिट ठेवण्यासाठी शिल्पा शेट्टी करते ही योगासने, तुम्ही देखील करु शकता


योगासने केल्याने शरीराचा समतोल राखला जातो, लवचिकता येते, रक्ताभिसरण चांगले होते आणि शरीरात कुठेही दुखणे किंवा जडपणा असल्यास या समस्येपासूनही सुटका मिळते. तुम्हालाही रोज योगा करायचा असेल आणि कोणते योगासन करावे हे समजत नसेल, तर शिल्पा शेट्टीकडून टिप्स घ्या.



Source link

पालकमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने धरणग्रस्तांचे पाण्यात उतरून आंदोलन | पुढारी

0









ढेबेवाडी, पुढारी वृत्तसेवा : तीन महिन्यांहून अधिक काळ कोयना धरणग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. मात्र पाटण तालुक्याचे भुमीपूत्र असलेल्या पालकमंत्र्यांनी आपल्या तालुक्यातील धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. हा धरणग्रस्तांचा अपमान असून त्यांचा निषेध करीत आहोत अशा शब्दांत श्रमिक मुक्तीदलाच्या नेतृत्वाखालील वांग -मराठवाडी धरणग्रस्तांनी धरणस्थळी झालेल्या जाहीर मेळाव्यात निषेध व्यक्त केला.

श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्तांचे फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु आहे. 27 मार्च रोजी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रान्वये श्रमिक मुक्ती दलास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत धरणग्रस्तांच्या मागण्यांसदर्भात बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते. 13 मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरणग्रस्तांच्या शिष्ट मंडळाला येत्या 15 दिवसात मंत्रालयात बैठक घेऊन विचार विनिमय करून निर्णय घेण्याचे अभिवचन दिले होते. पण ते सुद्धा पाळलेले नाही.

त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व धरणस्थळी निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानुसार वांग – मराठवाडी धरणस्थळी झालेल्या मोर्चात श्रमिक मुक्ती दलाचे वांग प्रकल्पाचे समन्वयक दिलीप पाटील व सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला. मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे दिलीप पाटील यांनी सांगितले. धरणग्रस्तांना जलाशयात उतरून समूहिक शपथ देण्यात आली.











Source link

कोयना धरणांतर्गत विभागांचे स्ट्रक्चरल ऑडिट गरजेचे | पुढारी

0









पाटण, गणेशचंद्र पिसाळ : कोयना धरणांतर्गत विभागातील जलविद्युत प्रकल्पांना पाणी पुरवणार्‍या इंटेक टनेल तसेच लेक टॅपिंगचा बहुतांश भाग पाण्याने तळ गाठल्याने उघड्यावर पडला आहे. एका बाजूला पाण्याअभावी गंभीर परिस्थिती निर्माण होत असताना दुसरीकडे पाण्याखाली असलेल्या यंत्रणा उघड्यावर पडल्याने त्याची सद्यस्थिती समोर आली आहे. तब्बल साठ वर्षांपूर्वीच्या या यंत्रणात कालानुरूप अनेक बदल झाल्याने आता याबाबतचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे महत्त्वाचे बनले आहे.

या तांत्रिक व नैसर्गिक संधीचा लाभ घेऊन संबंधित विभागाकडून याची तपासणी व गरज असेल त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना झाल्या तर धरण सार्वत्रिकदृष्ट्या सुरक्षित होईल. यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत जलतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

कोयना धरण शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने तापोळा ते कोयना धरणाच्या भिंतीच्या ठराविक अंतरापर्यंतचा सर्व भूभाग कोरडा पडला आहे. यातूनच धरणांतर्गत जलविद्युत प्रकल्पांना पाणी पुरवठा करणार्‍या यंत्रणाही उघड्यावर पडल्याने त्यांची वस्तुस्थितीही समोर येत आहे. पश्चिमेकडील जलविद्युत प्रकल्पांसाठी पाणीपुरवठा करणार्‍या पोफळी, अलोरे व कोयना चौथा टप्पा या प्रकल्पांसाठी पाणीपुरवठा करणार्‍या पहिल्या व दुसर्‍या लेक टॅपिंगची जागा, पोफळी टप्पा एक व दोनसाठी पाणीपुरवठा करणार्‍या इंटेक टनेलची अवस्था जवळपास तशीच पहायला मिळत आहे.

पाण्याखालचा हा भू-भाग व यंत्रणा उघड्या पडल्या असून त्या ठिकाणच्या सुरक्षित भिंतीसह साठ वर्षांपूर्वी केलेले काँक्रीट, लोखंडी फाटक दरवाजांची उघडझाप त्या- त्या वेळी न झाल्याने त्याची सडलेली व गंजलेली अवस्था, भूकंपात अंतर्गत काँक्रीटला गेलेले तडे, काँक्रीटची कमी झालेली ताकत व मोठ्या प्रमाणावर चिरा पडल्याने जमिनीत पाणी झिरपण्याचे वाढलेले प्रमाण, अंतर्गत बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पडलेले मोठे,दगड माती. आदींमुळे अनेक ठिकाणी बांधकामाची अवस्था दयनिय झाल्याचे पहायला मिळत आहे. गतवर्षी सर्जवेल तथा उल्लोळक विहिरीचा गंभीर प्रश्नदेखील अचानकपणे समोर आला होता. धरणाला भगदाड अशा चर्चांना ऊत आला होता. घटनेचे गांभिर्य समोर आल्यावर शासनाला जाग येऊन त्याची निविदाही काढण्यात आली.

धरणांतर्गत सध्या पाण्याअभावी ज्या यंत्रणा उघड्यावर पडल्या आहेत त्याची तातडीने युद्धपातळीवर तपासणी झाली तर निश्चितच वस्तुस्थिती समोर येईल. शक्य असेल व छोट्या प्रमाणात काम असेल तर तातडीने कमी खर्चात ते पूर्णत्वाला नेले जाऊ शकते. याशिवाय त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असेल तर यावर्षी तपासणी करून अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करून त्यासाठी प्रशासकीय तरतुदी करून आगामी काळात धरणात पाणीसाठा कमी होईल किंवा वेळप्रसंगी या कामासाठी पाणी कमी करून अंतर्गत कामे केली तर निश्चितच धरण सर्वच बाजूंनी सुरक्षित होईल. यासाठी शासन व प्रशासनाकडून तातडीने गंभीर दखल घेण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात धरणाला किंवा जलविद्युत प्रकल्पांना मोठा धोका निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी राज्यकर्ते शासन व प्रशासन जबाबदार राहील याचाही विचार होणे गरजेचे आहे.

कोयना धरण परिसरात अद्याप पाऊस सुरू नाही. त्यामुळे प्रशासनाला काम करताना फारशा अडचणी येणार नाहीत.
(पूर्वार्ध)











Source link

महिला वारकर्‍यांना शिवीगाळ; महामार्ग अडवून निषेध | पुढारी

0









साखरवाडी, पुढारी वृत्तसेवा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील तांबमाळ, ता. फलटण येथील वखार महामंडळाच्या धान्य साठवण इमारतीच्या आवारात येथील सुरक्षा रक्षक व दोघा अज्ञातांनी दिंडीतील महिला वारकर्‍यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली. याप्रकाराचा निषेध नोंदवत पुणे येथील विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक भजनी मंडळाच्या दिंडीतील वारकर्‍यांनी ठिय्या मारुन महामार्ग बंद केला.

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पाच दिवसांच्या मुक्कामी सातारा जिल्ह्यात आला आहे. लोणंद येथील दोन दिवसांचा मुक्काम उरकून हा सोहळा फलटण तालुक्यातील तरडगावच्या दिशेने मार्गस्थ झाला.

पालखी मार्गावरील तांबमाळ येथील वखार महामंडळाच्या धान्य साठवण इमारतीच्या आवारात सुरक्षा रक्षकाने हा मार्ग काटेरी झुडपे टाकून बंद केला होता. यावरुन वारकरी व सुरक्षा रक्षक विजय (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य दोघांबरोबर वादावादी झाली. यामुळे संतप्त वारकर्‍यांनी पुणे-पंढरपूर महामार्गावरच ठिय्या मांडून वाहतूक रोखली. स्थानिक नागरिक व पोलिसांनी संबंधित सुरक्षारक्षकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वारकर्‍यांनी महामार्ग खुला केला.











Source link