Monday, July 6, 2026
Home Blog Page 3002

Sumbul Touqeer: बिग बॉस फेम अभिनेत्रीने वडिलांच्या दुसऱ्या लग्नाची केली जोरदार तयारी Photos Viral

0
Sumbul Touqeer: बिग बॉस फेम अभिनेत्रीने वडिलांच्या दुसऱ्या लग्नाची केली जोरदार तयारी Photos Viral



Sumbul Touqeer father Wedding: अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांच्या दुसऱ्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत.



Source link

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध वीणाला फसवतोय; नितीन आशुतोषला सांगणार सत्य

0
Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध वीणाला फसवतोय; नितीन आशुतोषला सांगणार सत्य


स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. वीणा, आशुतोष आणि अनिरुद्ध हे बिझनेस पार्टनर झाले आहेत. वीणाने अनिरुद्धसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सगळ्यात नितीनने अनिरुद्ध वीणाला फसवत असल्याचे सांगितले आहे.



Source link

Ashadhi Wari 2023: चांदोबाचा लिंब येथे वारकऱ्यांनी अनुभवले ‘याची देही याची डोळा’ उभे रिंगण | पुढारी

0


नवनाथ गोवेकर : तरडगाव

चांदोबाचा लिंब येथे ‘माऊली माऊली…’ आणि हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील ‘उभे रिंगण’ सोहळा आज (दि.२०) पार पडला. भाविक वारकऱ्यांनी ‘याची देही याची डोळा’ हा सोहळा (Ashadhi Wari 2023)  अनुभवला.

अश्व धावे अश्वामागे। अवघा सोहळा पाहावा डोळे भरूनी । वैष्णव उभे रिंगणी। टाळ, मृदुंगा संगे। गेले रिंगण रंगुनी ॥ या रचनेचा प्रत्यय आणून देणाऱ्या या सोहळ्यात टाळ-मृदंगांचा गजर अन् विठ्ठलनामाचा जयघोष झाला. रिंगण सोहळा यावर्षीही वारकऱ्यांसाठी वारीचा आनंद द्विगुणीत करणारा ठरला.

तळपत्या उन्हाच्या झळ्या, फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदंगाचा गजर, कोणी लेकरांना डोक्यावर घेऊन तर कोणी मिळेल, त्या जागी टाचा उंच करून, कोणी जवळ उभ्या असणाऱ्या वाहनांच्या टपावर, तर कोणी झाडावर चढून उभे रिंगण पाहण्यासाठी अतुराले होते. दुपारच्या भर उन्हात तान्ह्या बाळापासून ते नव्वदी पार असलेले माऊली रिंगण सोहळ्याचा आनंद आपल्या डोळ्यात टिपण्यात अतुर झाले होते. रंगरंगोटी केलेले, फुलांची सजावट केलेले चांदोबाचा लिंब मंदिर सर्वांना आकर्षित करत होते.

अखेर माऊलींची पालखी तरडगाव पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या चांदोबाचा लिंब याठिकाणी पोहोचली. चोपदारांनी उभे रिंगण सोहळ्याच्या जागेची पाहणी केली. सोहळ्यातील सर्व दिंड्यातील वारकरी रस्त्याच्या मध्ये एकमेकांसमोर दोन रांगांमध्ये उभे राहत माऊली… माऊली… ग्यानबा तुकारामचा जयघोष सुरू करत रिंगणाची महती दाखवून दिली.

माऊलीच्या पालखीसोबत दोन अश्व एकावर स्वतः माऊली तर दुसरा अश्व शितोळे सरकारांचा ज्यावर चोपदार हातात भगवी पताका घेऊन बसलेले. सर्वांच्या नजरा चोपदार दंड उंचावून इशारा देण्य़ाकडे लागल्या होत्या. अखेर चोपदारांनी दंड उंचावून रिंगण सुरू झाल्याचा इशारा दिला. दोन्ही अश्व तुफान वेगाने रथापासून पुढे उभ्या असलेल्या वारकऱ्यांच्या दुतर्फा असलेल्या मानवी साखळीतील शेवटच्या दिंडीपर्यंत पोहोचले आणि पुन्हा त्याच वेगाने परत माऊलींच्या चांदीच्या रथापर्यंत पोहचले.

अश्वांच्या टापांचा आवाज टाळ मृदंगाच्या आवाजात आपलेही अस्तित्व तेवढ्याच दिमाखात सिद्ध करत होता. शेवटी एकाच गर्दी उसळली ती अश्वांच्या टापाखालची माती आपल्या कपाळी लावण्यासाठी. माऊलींचे अश्व ज्या मार्गावरून धावत गेले त्या जागेवर फुगड्या, उंच उड्या मारून अखंड वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्याचा आनंद साजरा केला. रथापुढे आल्यानंतर दोन्ही अश्वांना पेढ्यांचा प्रसाद भरवला आणि चोपदारांनी चांदीचा राजदंड उंचावत रिंगण सोहळा पार पाडल्याचे संकेत दिले. त्यानंतर लाखो वैष्णव तरडगावच्या दिशेने मुक्कामासाठी मार्गस्थ झाले.

हेही वाचा 



Source link

Bebe Rexha: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायिकेवर चाहत्याने फेकला फोन, डोक्याला गंभीर दुखापत

0
Bebe Rexha: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायिकेवर चाहत्याने फेकला फोन, डोक्याला गंभीर दुखापत



Bebe Rexha: सध्या सोशल मीडियावर गायिका बीबीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चाहत्याने तिच्या डोक्यावर फोन फेकून मारला आहे.



Source link

सातारा: पाटेघर, आलवडी परिसरात गव्यांचा मुक्त वावर | पुढारी

0









पुढारी वृत्तसेवा : सोमनाथ राऊत : परळी खोऱ्यातील दुर्गम असणाऱ्या व कास पठाराच्या खालील बाजूस असलेल्या पाटेघर, आलवडी परिसरात गवे तसेच हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. अगदी घराच्या बाजूला असणाऱ्या शेतामध्येही गव्यांचे भरदिवसा कळप फिरू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आलवडी येथे आज (दि.२०) दुपारी शेतकऱ्यांनी रानात आलेल्या गव्यांचा कळप हुसकावून लावण्यासाठी पाळीव कुत्री त्यांच्या मागावर पाठवली. मात्र, गवे व पाळीव कुत्रे एकमेकांच्या मागे लागू लागली.

गवे व हिंस्र प्राण्यांच्या वावरामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. कोअर झोन व बफर झोन परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंस्त्र प्राण्यांच्या भीतीने शेती करणे बंद केले आहे. डोंगरदऱ्यातील माणसे आपल्या रानात एकटी दुकटी जाण्यास घाबरत आहेत. तरी या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पाटेघर, अलवडी, धावली, जांभळमुरे, कासानी या परिसरातून होत आहे.

हेही वाचा 











Source link

Manoj Bajpayee: प्रत्येक सीन शूट करण्यापूर्वी मनोज बाजपेयी करतो मद्यपान? अभिनेत्याने सांगितले सत्य

0
Manoj Bajpayee: प्रत्येक सीन शूट करण्यापूर्वी मनोज बाजपेयी करतो मद्यपान? अभिनेत्याने सांगितले सत्य


मनोजने मद्यपानाबाबत सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देत म्हटले की, “जेव्हा मी शुटिंग करत होतो, तेव्हा एका ज्यूनियर मुलीने मला विचारलं, ‘सर तुम्ही पीत आहात ते काय आहे?’ मी त्या मुलीला म्हणालो, ‘औषध आहे..’ यावर ती मुलगी मला म्हणाली, ‘आमच्या कलाकारांच्या ग्रुपमध्ये अशी एक अफवा आहे की, तुम्ही प्रत्येक सीन शूट करण्यापूर्वी वोडकाचा एक शॉट घेता…”



Source link

सातारा : लोणंदकरांनी दिला भक्तीमय वातावरणात माऊलींना निरोप | पुढारी

0









लोणंद (जि. सातारा) : पुढारी वृतसेवा – माऊलींच्या पालखी सोहळ्याला भक्तीमय वातावरणात लोणंदकर नागरिकांनी निरोप दिला. लोणंद येथील अडीच दिवसाचा मुक्काम आटोपून आज दुपारी १ च्या सुमारास तरडगावकडे मार्गस्थ झाला. माऊलीला निरोप देताना ग्रामस्थांनी माऊलींच्या रथावर पुष्पवृष्टी केली.

रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या इमारतीवरून नागरिक रथावर पुष्पवृष्टी करत होते. अत्यंत भक्तीपूर्ण व भावपूर्ण वातावरणात माऊलीचा पालखी सोहळा गांधी चौक, शास्त्री चौक, स्टेशन चौक मार्गे फलटण पुलावरून मार्गस्थ झाला. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या जयघोषाने आणी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात लोणंदनगरी डुंबून गेली होती. अडीच दिवसाच्या कालावधीत माऊलीच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा शेवटपर्यंत सुरू होत्या. भाविकांचा महापूर शेवटपर्यंत तसाच सुरू होता. माऊलीच्या पालखी सोहळ्याला लोणंदकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.











Source link

Adipurush: तेलुगू की हिंदी? ‘आदिपुरुष’ची सर्वाधिक कमाई कुठून झाली

0
Adipurush: तेलुगू की हिंदी? ‘आदिपुरुष’ची सर्वाधिक कमाई कुठून झाली


हिंदी भाषेत ‘आदिपुरुष’ चित्रपटाने १२०.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर तेलुगूमध्ये ११०.८५ कोटी कमावले आहेत. मल्याळम १.१ कोटी रुपये, तमिळ २.७ कोटी रुपये आणि कन्नड भाषेतील चित्रपटाने १.७ कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ५६.७५ कोटी रुपये कमावले, दुसऱ्या दिवशी ६५.२५ कोटी रुपयांची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी ६९.१ कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठ्या प्रमाणवर घट पाहायला मिळाली. केवळ १६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.



Source link

Alia Bhatt: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा लक्षवेधील टीझर पाहिलात का? आलिया-रणवीरचा रोमँटिक अंदाज

0
Alia Bhatt: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा लक्षवेधील टीझर पाहिलात का? आलिया-रणवीरचा रोमँटिक अंदाज


‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या १ मिनिट १९ सेकंदाच्या टीझरमध्ये अनेक दृश्ये पाहायला मिळतात. टीझरवरुन चित्रपटात फॅमिली ड्रामा, रोमॅन्स, डान्स, इमोशन, म्यूझिक हे सर्व पाहायला मिळणार आहे. टीझरवरुन चित्रपटात शबाना आझमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.



Source link

Harshad Atkari: हर्षद आणि शर्वरी दिसणार रोमँटिक अंदाजात, ‘कुन्या राजाची गं तू रानी’नवी मालिका येणार

0
Harshad Atkari: हर्षद आणि शर्वरी दिसणार रोमँटिक अंदाजात, ‘कुन्या राजाची गं तू रानी’नवी मालिका येणार


स्टार प्रवाहवर १८ जुलैपासून सुरु होतेय नवी मालिका कुन्या राजाची गं तू रानी. डोंगरवाडी सारख्या छोट्याश्या खेडेगावात रहाणाऱ्या मात्र मोठी स्वप्न पहाणाऱ्या गुंजाची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. गुंजा म्हणजे एक रानफळ. गुंजाचं झाड औषधी असतं, त्याचा पाला आपण गोड पानात खातो. गुंज्याची सगळी फळं वजनाला परफेक्ट एका भाराची असतात, म्हणून सोनं तोलत असताना ग्रामीण भागात आजही दोन गुंज, पाच गुंज सोनं असं म्हटलं जातं. रानातल्या या मौल्यवान फळावरुनच गुंजाला गुंजा हे नाव पडलं. अभिनेत्री शर्वरी जोग या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकणार आहे.



Source link