Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2982

Rhea Chakraborty Birthday: सुशांतच नव्हे, बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्यांशी जोडलं गेलेलं रिया चक्रवर्तीचं नाव!

0
Rhea Chakraborty Birthday: सुशांतच नव्हे, बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्यांशी जोडलं गेलेलं रिया चक्रवर्तीचं नाव!


हर्षवर्धन कपूर

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर याचा मुलगा हर्षवर्धन कपूर याच्यासोबत रिया चक्रवर्तीचे नाव जोडले गेले होते. २०१७मध्ये रिया चक्रवर्ती हर्षवर्धन कपूरसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत येऊ लागली होती. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन आणि रिया अनेकदा एकमेकांची मस्करी करताना दिसायचे. रियाच्या वाढदिवसाच्या पार्टीतही ते सोबत दिसले होते. अनेक प्रसंगी दोघे एकत्र हँग आउट करतानाही दिसले होते. मात्र, हर्षवर्धनची सारा अली खानसोबत जवळीक वाढल्यानंतर रिया आणि तो वेगळे झाले.



Source link

Buldana Accident: बुलढाणाच्या मलकापूरात आयशरची बसला धडक; गर्भवती महिलेसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

0
Buldana Accident: बुलढाणाच्या मलकापूरात आयशरची बसला धडक; गर्भवती महिलेसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू


Buldana Road Accident: बुलढाण्याच्या मलकापूर येथे झालेल्या भीषण अपघातात एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.



Source link

Buldana Bus Fire: बुलढाण्यात प्रवासी बसला भीषण आग; २५ जण ठार, ८ जण जखमी

0
Buldana Bus Fire: बुलढाण्यात प्रवासी बसला भीषण आग; २५ जण ठार, ८ जण जखमी


बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर ३२ प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसला भीषण आग लागली. या आगीत जवळपास २५ प्रवासांचा होरपळून मृत्यू झाला. तर, ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणा येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती बुलढाण्याचे एसपी सुनील कडासणे यांनी दिली.



Source link

SSR : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा उलगडा अजूनही का नाही?; सीबीआयनं सांगितलं कारण

0
SSR : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा उलगडा अजूनही का नाही?; सीबीआयनं सांगितलं कारण


सीबीआय म्हणते…

सीबीआयनं २०२१ मध्ये कॅलिफोर्नियास्थित Google आणि Facebook च्या मुख्यालयाला पत्र पाठवून सुशांतनं डिलिट केलेले सर्व चॅट, ईमेल आणि पोस्टचे तपशील शेअर करण्याची विनंती केली होती. त्यामुळं तपासात मदत झाली असती आणि नेमकं काय घडलं याचे धागे जोडता आले असते. मात्र, ‘तांत्रिक पुरावे देण्याबाबत अमेरिकेनं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आम्ही अजूनही वाट पाहत आहोत. त्यामुळंच हे प्रकरण रखडलं आहे, असं सीबीआयच्या एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितलं.



Source link

सातारा : निरा उजवा कालव्यात पडून एकाचा मृत्यू | पुढारी

0









साखरवाडी; पुढारी वृत्तसेवा सुरवडी ता. फलटण गावच्या हद्दीमध्ये निरा उजवा (१४ मोरी) कालव्यात सायकलवरून तोल जाऊन २५ फूट खोल कोरड्या कालव्यात डोक्यावर पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना गुरूवार दि. २९ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक २९ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वसंत हरिभाऊ काटकर (वय ६०) रा. खामगाव ता. फलटण हे सायकलवरून सुरवडी गावच्या हद्दीतील नीरा उजवा कालव्यावरून खामगावच्या दिशेने जात होते. १४ मोऱ्या नामक ओढ्यावरील पुलावरून जात असताना त्यांचा सायकलवरून तोल गेल्याने ते २५ फूट खोल कोरड्या कालव्यामध्ये डोक्यावर पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी साखरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून, फिर्याद दीपक काटकर यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार कदम करीत आहेत.

हेही वाचा : 











Source link

Gadar 2 : सनी देओलच्या ‘गदर २’ची उत्कंठा शिगेला; ‘उड जा काले कावा’ गाण्याला किती व्ह्यूज मिळाले माहित्येय?

0
Gadar 2 : सनी देओलच्या ‘गदर २’ची उत्कंठा शिगेला; ‘उड जा काले कावा’ गाण्याला किती व्ह्यूज मिळाले माहित्येय?


सनी देओलनं स्वत: इन्स्टावर केलं शेअर

‘गदर २’चं हे गाणं सनी देओलनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलं आहे. ‘फिर से होगी प्यार की बरसात, उड जा काले कावा के साथ’ असंही त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. या गाण्याचे बोल आनंद बक्षी यांचे आहेत. या गाण्याला दोन तासांत दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘गदर २’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यानं प्रमोशनही जोरात सुरू झालं आहे.



Source link

सातारा : वेण्णालेक धुक्‍यात हरवले; कास पठार, बामणोली, तापोळा पर्यटकांनी फुलले | पुढारी

0









सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा महाराष्‍ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्‍हणून महाबळेश्वर पर्यटकांचे आकर्षणाचे मुख्य ठिकाण आहे. नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक व परिसर धुक्यात हरवला आहे. पावसाळी वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी येथे गर्दी होत आहे. दाट धुकं, कडाक्याची थंडी व धुवाधार पाऊस अश्या अल्‍हाददायक वातावरणात पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. हौशी पर्यटक अशा थंड पावसाळी वातावरणात नौकाविहाराचा आनंद घेत असून, या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे.

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्‍हणून प्रसिध्द आहे. देशभरातील पर्यटक महाबळेश्वर मध्ये पर्यटनासाठी येत असतात. वर्षभर महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी पहावयास मिळते. मात्र पावसाळ्यात या ठिकाणी प्रचंड पाऊस आणि धुके पडते. धुवाधार पाऊस, थंडगार वारे आणि धुक्‍याची दुलई अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले महाबळेश्वरकडे वळतात. या ठिकाणचे वेण्णालेक धुक्‍यात हरवलं असून, थंडगार वाऱ्यात पावसांच्या धारा अंगावर झेलत बोटींगचा आनंद लुटण्याची मजा पर्यटक अनुभवत आहेत. कास पठार, बामणोली, तापोळा हा परिसरही हिरवाईने नटला असून, पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्‍याचे दिसून येत आहे.

हेही वाचा  











Source link

3 idiots sequel : आमिर खानच्या थ्री इडियट्सचा सिक्वेल येणार; अभिनेता शर्मन जोशी काय म्हणाला पाहा!

0
3 idiots sequel : आमिर खानच्या थ्री इडियट्सचा सिक्वेल येणार; अभिनेता शर्मन जोशी काय म्हणाला पाहा!


‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता आमिर खान प्रमुख भूमिकेत होता. त्याशिवाय, आर माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर, बोमन इराणी, ओमी वैद्य आणि मोना सिंह यांनी यात भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. आमिर खान याच्या ‘तारें जमीन पर’ या चित्रपटाप्रमाणेच ‘थ्री इडियट्स’नंही शिक्षणाकडं बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन लोकांना दिला होता. या चित्रपटाचं समीक्षकांनीही प्रचंड कौतुक केलं होतं.



Source link

संगम माहुली फाटा येथे रास्ता रोको | पुढारी

0









खेड, पुढारी वृत्तसेवा : बाँम्बे रेस्टॉरंट ते संगममाहुली रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे कहाम दीड ते दोन महिन्यांपासून सुरू आहे. अनेक ठिकाणी हे काम निकृष्ट दर्जाचे असून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. काम रखडल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यासाठी रस्त्याचे काम मार्गी लागावे, यासाठी नागरिकांनी गुरूवारी संगममाहुली फाटा येथे रास्तारोको केला.

बाँम्बे रेस्टॉरंट ते संगममाहुली या अवघ्या 3 ते 4 किमी रस्त्याला दीड वषांचा कालावधी लागला आहे. अनेक ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम अपुर्‍या स्थितीत आहे. तर सध्या काम बंद असल्याने पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रोज 30 ते 35 दुचाकी वाहने घसरत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत ठेकेदाराला विचारणा केल्यानंतर फक्त आश्वासने दिली जात आहे. परंतु काम केले जात नाही.

ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण केल्याने, खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. मोठी दुर्घटना झाल्यावर संबंधित ठेकेदार अधिकारी जागे होणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी केली. यावेळी नागरिकांनी सरकार व ठेकेदारा-विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. आंदोलनादरम्यान ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी श्रीकांत घाडगे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. घाडगे यांनी दि. 5 जुलैपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. दिलेल्या वेळेत काम पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. यावेळी संगमनगर, कृष्णानगर, विकासनगर, संगममाहुली, क्षेत्रमाहुली, खावली, सोनगाव सं. निंब, महागाव येथील नागरिक उपस्थित होते.











Source link

करहरमध्ये घुमला विठूनामाचा गजर | पुढारी

0









कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : प्रतिपंढरपूर करहर, ता. जावली येथे आषाढी एकादशी सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठलाची महापूजा आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते व आ. शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी विठूरायाच्या जयघोषाने अवघी करहरनगरी दुमदुमली.

करहर येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष केला. महापूजेवेळी करहर येथील तीन वारकरी दांपत्यांनाही विठूरायाच्या पूजेचा मान देण्यात आला. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, तहसीलदार हणमंत कोळेकर, नायब तहसीलदार संजय बैलकर, सहा. पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, पुजारी संतोष खिस्ते उपस्थित होते.

धार्मिक विधी पार पडल्यानंतर मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. काटवली, बेलोशी, दापवडी व पंचक्रोशीतील शेकडो दिंड्या व पालख्या करहर नगरीत दाखल झाल्या. कुडाळ, सोमर्डी, बामणोली, शेते, करंदी येथूनही पालख्या आणि दिंड्या आल्या होत्या. बसस्थानकावर विठ्ठल नामाचा जयघोष करत रिंगण सोहळा रंगला.











Source link