Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2983

कृष्णा खोरे व रामराजेंचा काडीमात्र संबध नाही : खा. रणजितसिंह | पुढारी

0









फलटण, पुढारी वृत्तसेवा : आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी जे आतापर्यंत राजकारण केले ते फक्त आणि फक्त खोटे बोलूनच केले आहे. रामराजे व धोम-बलकवडी, नीरा-देवधर अगदी ज्या महामंडळाचे हे स्वत:ला जनक म्हणवून घेतात त्या कृष्णा खोरे महामंडळाचासुध्दा त्यांचा काडीमात्र संबंध नाही, अशी टीका खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी आ. रामराजेंवर पत्रकार परिषदेत केली.

खा. रणजितसिंह म्हणाले, कृष्णा खोरे महामंडळाचा पहिला प्रस्ताव रामराजे राजकारणात येण्याआधीचा आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे हे महामंडळ स्थापन झाले. त्यानंतर भाजप व सेना युतीत धोम-बलकवडी प्रकल्प मार्गी लागला. यामध्ये रामराजे यांनी 30 वर्षे ज्यावर तालुक्याचे राजकारण केले त्या धोम-बलकवडी प्रकल्प व रामराजेेंचा काडीमात्र संबंध नाही. आगामी काळात हा प्रकल्प बारमाही करणार आहे.

आता आठमाही करण्याचे टेंडर प्रकाशित करण्यात आले आहे. काहीच महिन्यात नीरा-देवधरचे झिरो वॉटर धोम-बलकवडीद्वारे फलटण तालुक्यात पाणी आणणार आहे. धोम-बलकवडीची जेव्हा आखणी झाली होती. तेव्हाच हे करायचे ठरले होते. फक्त अडगळीत पडलेले प्रश्न मी मार्गी लावत आहे. नीरा-देवधर व धोम-बलकवडीच्या जोड कालव्यास स्वराज हिंद नाव देण्यात येणार आहे.

फलटण ते बारामती रेल्वेचे टेंडर प्रसिध्द झाले आहे. भविष्यात फलटण तालुक्याला याचा फायदा होणार आहे. फलटण येथे जिल्हा न्यायालयाला मंजुरी मिळाली आहे. तसेच फलटण येथे काही महिन्यात जिल्हास्तरीय सर्व कार्यालये सुरू करणार असल्याचेही खा. रणजितसिंह म्हणाले.











Source link

Adipurush: क्रिती सेनन नव्हे ‘आदिपुरुष’मध्ये ‘जानकी’च्या भूमिकेत दिसल्या असत्या ‘या’ अभिनेत्री!

0
Adipurush: क्रिती सेनन नव्हे ‘आदिपुरुष’मध्ये ‘जानकी’च्या भूमिकेत दिसल्या असत्या ‘या’ अभिनेत्री!


Adipurush Janaki Character:आदिपुरुष‘ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सतत या चित्रपटावर जोरदार टीका होत आहे. या चित्रपटाच्या संवादांवरून प्रेक्षक कलाकारांवर जोरदार निशाणा साधत आहेत. इतकेच नाही तर, चित्रपट पाहिल्यानंतर लोक निर्माता ओम राऊत याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करत आहेत. या चित्रपटात अभिनेता प्रभास ‘राघव’च्या भूमिकेत दिसला आहे. तर, अभिनेत्री क्रिती सेनन ही ‘जानकी’च्या भूमिकेत दिसली आहे. मात्र, या आधी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात क्रिती सेनन नव्हे तर, दुसऱ्याच अभिनेत्रींची वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र, या सगळ्यांनीच चित्रपटाला नकार दिला. पाहा कोणाकोणाला ऑफर झाली होती ‘जानकी’ची भूमिका…



Source link

सातारा : पंढरीला जाताना काळाचा घाला; एक ठार, 7 जखमी | पुढारी

0









कोरेगाव / वरकुटे – मलवडी, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकर्‍यांच्या गाडीला लोधवडे (ता. माण) येथे गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. पुढे जाणार्‍या वाहनाला ओव्हरटेक करताना बोलेरो उलटल्याने हा अपघात झाला. या अपघातात चालक ठार झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. सर्व भाविक कोरेगाव तालुक्यातील आहेत. या घटनेची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

कल्याण भोसले (रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तर अण्णा गाढवे (वय 42), पप्पू भिसे (वय 40), दादासाहेब थोरात (वय 42), सागर भोसले, विजय माने (वय 45), श्रीमंत पवार (वय 50) व रूद्र भोसले (13, सर्व रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव) अशी जखमींची नावे आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त गुजरवाडी, ता. कोरेगाव येथील प्रगतशील शेतकरी कल्याण भोसले हे बोलेरो (क्रमांक एम. एच. 11. बी. एच. 0896) घेऊन पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी निघाले होते. या गाडीत त्यांच्यासह 8 जण वारकरी होते. गुरूवारी सकाळी 8 वाजता बोलेरो गोंदवले खुर्द, लोधवडे फाट्यानजीक आली असता दुसर्‍या गाडीला ओव्हरटेक करताना बोलेरो उलटली. ती चार वेळा पलटी होऊन रानात जाऊन पडली.

अपघाताची माहिती समजताच लोधवडे, संभाजीनगर येथील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गाडीतून बाहेर काढले. मात्र, या अपघातात कल्याण भोसले यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर उर्वरित जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी सातारा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.











Source link

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाची संततधार सुरूच आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून खरीप पेरण्या युध्दपातळीवर सुरू आहे. पावसामुळे पश्चिम भागातील धबधबे फेसाळू लागले असून पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे.

जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, जावली, महाबळेश्वर व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाताच्या तरव्यांना हा पाऊस समाधानकारक आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारठा निर्माण झाला आहे. पश्चिम भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. डोंगररांगात छोटे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. पावसाळी पर्यटनासाठी कास, ठोसेघर, चाळकेवाडी, बामणोली, तापोळा, पाचगणी, महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे.

जिल्ह्यातील शेत शिवारात खरीप हंगामातील मशागतीची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत तर काही ठिकाणी पेरणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतशिवारे बळीराजाच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. ठिकठिकाणी शेतकर्‍यांची पेरणीसाठी धांदल उडाली आहे. शहर व परिसरात विविध कृषि दुकानामध्ये बियाणे व खते खरेदीसाठी शेतकर्‍यांची गर्दी होवू लागली आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी शहर व परिसरातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी साहित्य विक्रीसाठी आले असून रेनकोटस, टोप्या, छत्री, जर्कीन्स, बुट, चपल्या यासह अन्य साहित्यास नागरिकांमधून चांगली मागणी आहे.

महाबळेश्वरला जोर कायम

गुरूवारी सायंकाळी 6.30 पर्यंत सातारा जिल्ह्यात सातारा तालुक्यात 10.2 मिमी, जावली 21.3 मिमी, पाटण 12.3 मिमी, कराड 2.5 मिमी, कोरेगाव 3.1 मिमी, खटाव 0.6 मिमी, माण 0.1 मिमी, फलटण 0.4 मिमी, खंडाळा 3.1 मिमी, वाई 8.9 मिमी आणि महाबळेश्वर तालुक्यात 59.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.



Source link

Satara Ambenali Ghat Update : आंबेनळी घाट वाहतुकीसाठी खुला

0



<p>आंबेनळी घाट वाहतुकीसाठी खुला. घाटातील दरड हटवण्यात यश</p>



Source link

सातारा : कण्हेर परिसरात पेरणीसह मशागतीच्या कामांना वेग | पुढारी

0









कण्हेर : पुढारी वृत्तसेवा : जून महिन्याच्या अखेरीस मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने कण्हेर परिसरात पेरणीसह मशागतींच्या कामांना वेग आला आहे. गेल्या चार दिवसापासून सकाळ व संध्याकाळ मान्सूनच्या रिमझिम सरी बरसू लागल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून खरिपाच्या हंगामाची लगबग सुरू झाली आहे. परिसरातील शेतांमध्ये शेतकऱ्यांची शेतातील अंतर्गत मशागतींसह पेरणीची लगबग दिसून येत आहे.

जून महिना संपत आला तरी मान्सून न बरसल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र गेल्या चार दिवसापासून दमदार पाऊस पडल्याने संपूर्ण चित्र बदलले आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतातील जमीन भुसभुशीत होऊन मशागत व पेरणी करणे सोपे जाऊ लागले आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतींबरोबर पेरणीच्या कामाला जोमात सुरुवात केली आहे. तर मान्सूनच्या आशेवर अडसाली ऊस लागणीलाही सुरुवात झाली आहे.

या परिसरात मुख्य पीक असलेल्या सोयाबीन पिकांची टोकणी व पेरणीवर भर दिला जात आहे. भात, भुईमूग, घेवडा, मुग, उडीद यांचीही पेरणी केली जात आहे. बहुतांश ठिकाणी शेतीच्या नांगरणी व पेरणीसाठी बैलांचे औत व ट्रॅक्टरच्या साह्याने शेती केली जात आहे. जलसिंचन योजनेच्या आधारे लावलेल्या भाताच्या तरव्यांना पावसाने चांगले जीवदान दिले आहे. पेरणी योग्य पाऊस बरसला असला तरी शेतकरी दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा करत आहे.

हेही वाचा : 











Source link

सातारा : ठोसेघर धबधबा फेसाळला!, हिरवे- हिरवे गार गालिचे जिकडे- तिकडे चोहीकडे! | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटकांचे आकर्षण असलेला ठोसेघर धबधबा काल बुधवार (दि. २८) रोजीपासून वाहू लागला आहे. डोंगर दरामध्ये पावसाची रिपरिप सुरू झाल्याने परिसर पर्यटकांना साद घालू लागल्याचे चित्र याठिकाणी दिसत आहे.

‘डोंगरदरी कपारीतून, जलधार लागली झरू, शुभ प्रभात घालीमोह, मन लागे भिरभिरू’ या काव्यपंक्तीप्रमाणे हा परिसर दिसू लागला आहे.

ठोसेघर धबधब्यावर यावर्षी ठोसेघर गॅलरी आणि ज्या ठिकाणी धबधब्याचा पाण्याचा प्रवाह पडतो त्या ठिकाणी गुहा करण्यात आली आहे. यामुले धबधब्याच्या पाण्यात जाळीच्या कडेला उभे राहून भिजण्याचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. यावर्षी धबधबा व्यवस्थापनाने वेगवेगळ्या ठिकाणी थांबण्यासाठी अडोशे तयार केले आहेत. तसेच निसर्गाची माहिती सांगणारे फलक बसण्यासाठी बाकडी अशी व्यवस्था केल्याने पर्यटकांना अधिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पावसात भिजल्यावर उभे राहण्यासाठी नैसर्गिक कुटी ही उभारण्यात आली आहे.

हेही वाचा : 











Source link

सातारा : पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या बोलेराचा अपघात; सात जण जखमी | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : लोधवडे फाटा (ता. माण) येथील सातारा-पंढरपूर रस्त्यावर पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या बोलेरो गाडी आज सकाळी आठ वाजता पलटी होऊन झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. सर्व जखमी कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील आहेत.

चालक कल्याण भोसले (वय 45), आण्णा गाढवे (वय 42), पप्पू भिसे (वय 40), दादासो थोरात (वय 42), सागर भोसले, विजय माने (वय 45), श्रीमंत पवार (वय 50), रुद्र भोसले, अशी जखमींची नावे आहेत. या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दहिवडी चे स पो नी अक्षय सोनवणे यांनी दिली.

सकाळच्या वेळी भरधाव वेगाने चाललेली बोलेरो गाडी अचानक लोधवडे फाटा येथे आली असताना चालकाचा ताबा सुटल्याने गाडी तीन वेळा पलटी झाली. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून अपघातातील जखमींना सातारा येते उपचारासाठी हलवलेले आहे.

हेही वाचा : 

 

 











Source link

Ambenali Landslide : आंबेनळी घाटातील दरड जोसीबीनं हटवण्याचं काम सुरु

0



<p>आंबेनळी घाटातील दरड जोसीबीनं हटवण्याचं काम सुरु. पहाटे दोन वाजता आंबेनळी घाटातील मेटतळेत दरड कोसळली</p>



Source link

सातारा : ‘शासन आपल्या दारी’चे 2.74 लाख लाभार्थी; जितेंद्र डुडी यांची माहिती | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयात जाण्याचा त्रास वाचावा आणि त्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा. यासाठी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘शासन आपल्या दारी’ या योजना जिल्ह्यात तळागाळात राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गंत जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 74 हजार 348 नागरिकांना विविध लाभांचे वाटप करण्यात आले आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी उत्तम कामगिरी केली, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी काढले.

सातारा जिल्ह्यात 15 एप्रिल ते 30 ऑगस्ट या कालावधीत शासन आपल्या दारी ही योजना राबवण्यात येत आहे. 13 मे रोजी दौलतनगर (ता. पाटण) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. ही योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमार्फत नागरिकांना जास्तीत जास्त लाभ देण्यात येत आहे. गावपातळीवर या अभियानाची माहिती देऊन नागरिकांकडून लाभासाठी अर्ज भरून घेण्यात आले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. स्थानिक पातळीवर आयोजित मेळाव्याच्या ठिकाणी विविध दालनांद्वारे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याच ठिकाणी लाभांचे वाटपही करण्यात आले. योजनेचा लाभ घेण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व व्यवस्था असल्याने प्रशासनाच्या पुढाकाराबाबत नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. वेळ आणि खर्चात बचत होत असून हा उपक्रम पुढेही सुरू ठेवावा, अशी मागणी होत आहे.

कराड तालुक्यात सर्वाधिक लाभ

जिल्ह्यात 2 लाख 74 हजार 348 जणांना लाभांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये सातारा तालुका 38 हजार 913, जावली 15
हजार 23, कोरेगाव 19 हजार 521, कराड तालुक्यात 48 हजार 62, फलटण 32 हजार 748, वाई 18 हजार 608, महाबळेश्वर 7
हजार 718, खंडाळा 19 हजार 169, माण 18 हजार 760, खटाव 26 हजार 718, पाटण 29 हजार 108 लाभांचे वाटप करण्यात
आल्याचे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी सांगितले.

या विभागांची कामगिरी

जिल्ह्यात तालुकास्तरावर या योजनेची अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यात महसूल, महिला व बाल विकास, शिक्षण, आरोग्य, कृषि, नगर विकास, समाज कल्याण, ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छ मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अशा विविध विभागांमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या योजनेला जिल्हावासियांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात 2 लाख 74 हजार 348 जणांना लाभाचे वाटप करण्यात आले. सर्वसामान्यांचा शासकीय कार्यालयात जाण्याचा वेळ या उपक्रमामुळे वाचला आहे.
-जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी, सातारा



Source link