Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2984

सातारा : विहेतील अपघातग्रस्त जीप चालकाचा मृतदेह सापडला | पुढारी

0









मारूल हवेली; पुढारी वृत्तसेवा :  कराड-पाटण राज्यमार्गावरील विहे येथे क्रूझर जीप विहिरीत पडून झालेल्या अपघातातील चालकाचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला. जीप चालक मल्हारपेठ (ता. पाटण) येथील असून पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मल्हारपेठ पोलिस तपास करीत आहेत.

संभाजी कृष्णा पवार (वय 50) असे अपघातात मृत्यू झालेल्या जीपचालकाचे नाव आहे. मंगळवारी संध्याकाळी विहेहून मल्हारपेठला येत असताना क्रूझर जीप विहे जवळील विहिरीत कोसळली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले होते. क्रेनच्या सहाय्याने जीप बाहेर काढल्यानंतर जीपमध्ये कोणी आढळले नव्हते. रात्रीची वेळ त्यात पाऊस सुरू असल्याने उशिरा रात्री बचाव कार्य थांबविले होते. पोलिसांनी दुसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी पुन्हा बचाव कार्य सुरू केले. यावेळी संभाजी पवार यांचा मृतदेह आढळला.

रस्त्याकडेच्या विहिरी धोकादायक

कराड-पाटण मार्गावरील विहे व निसरे विहीर या ठिकाणावरील विहिरी धोकादायक स्थितीत आहेत. विहिरींना संरक्षक कठडे नसून सुरक्षेच्या द़ृष्टीने कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. यापूर्वीही येथे अपघात झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधितांकडून खबरदारी घेतली जावी, अशी मागणी होत आहे.











Source link

सातारा : केळवली धबधबा फेसाळू लागला; डोंगररांगांवर रिमझिम पाऊस | पुढारी

0









परळी; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍याच्या पश्चिमेकडील परळी खोर्‍यात असलेला केळवली धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. कधी रिमझिम पाऊस तर कधी दाट धुके अशा आल्हाददायक वातावरणामुळे केळवली धबधबा व परिसर पर्यटकांना आकर्षित करु लागला आहे.

सातारा तालुक्यातील परळी खोर्‍यातील केळवली धबधबा हा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी असणारा निसर्ग तसेच टप्प्या-टप्प्याने कोसळणारा हा धबधबा निसर्गप्रेमींना साद घालत असतो. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने आतापर्यंत हा धबधबा वाहत नव्हता. मात्र गेल्या आठवडाभरापासून या परिसरात पावसाची रिमझिम सुरू असल्याने या धबधब्याने आता कोसळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले या परिसरात पडू लागली आहेत.

परळी परिसर निसर्ग सौंदर्याची खाण

सातारा शहरातून बोगद्यातून बाहेर आल्यावर परळीतून पुढे नित्रळ व केळवली असा धबधब्याला जाण्याचा मार्ग आहे. परळी येथूनच एका बाजूला सज्जनगड व समोर दिसणारे केळवली सांडवलीचे विस्तीर्ण पठार त्याचबरोबर उजव्या बाजूला उरमोडी जलाशय असा हा निसर्गाचा अदभूत नजराणा पहायला मिळतो. त्यामुळे आपोआपच या परिसराकडे पयर्र्टकांचे लक्ष वेधले जाते. या परिसरात विविध पशुपक्षी तसेच अनेक औषधी वनस्पती व भात शेतीची खाचरे असल्यामुळे हा परिसर निसर्ग सौंदर्याची खाणच आहे.











Source link

सातार्‍यात कोयता नाचवून दहशत | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : कोयता नाचवत दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार सातार्‍यातील मतकर कॉलनीत घडला. खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या संशयिताने महिलेची छेडही काढली. या घटनेने परिसरात तणावाचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राम तुकाराम दुबळे, (रा. मतकर कॉलनी, गेंडामाळ, सातारा) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना 27 जूनरोजी रात्री 10 वाजता घडली आहे.

संशयित राम दुबळे हा कोयता नाचवत सातार्‍यातील एका उपनगरात दगड मारत सुटला होता. त्यामुळे परिसरातील नागरिक घरातून बाहेर आले. दगडफेकीच्या प्रकरणातून एका महिलेने संशयिताला जाब विचारताच त्या महिलेला संशयिताने मारहाण केली. संशयिताने महिलेची छेड काढून दमदाटी करत दहशत माजवली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

परिसरातील आणखी एका नागरिकाने संशयिताला जाब विचारण्याचा प्रयत्न करताच संशयिताने त्यांनाही शिवीगाळ करत घरात घुसून साहित्याची तोडफोड केली. त्यामुळे परिसर हादरुन गेला. संशयित एवढ्यावरच थांबला नाही. त्याने बाहेर येवून उभ्या असलेल्या जीप, टेम्पो, कार या वाहनांना लक्ष्य करत तोडफोड केली. सुमारे अर्धा तास संपूर्ण परिसराला संशयिताने वेठीस धरले. ‘माझ्या विरोधात कोणी तक्रार करायची नाही. तक्रार कोणी केली तर गाठ माझ्याशी आहे,’ असे म्हणून संशयित तेथून पसार झाला. या घटनेनंतर संबंधित महिलेने शाहूपुरी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. संशयिताची माहिती घेऊन त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, तो पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.











Source link

Satara : आंबेनळी घाटात मेटतळे नजीक मध्यरात्री दरड कोसळली | पुढारी

0









सातारा पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाटात मेटतळे नजीक मध्यरात्री दरड कोसळली. रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे,

माहितीनुसार, गेले काही दिवस कोसळणाऱ्या धुवाधार पाऊस सुरु आहे. या पावसाने महाबळेश्वर – प्रतापगड मुख्य रस्त्यावर आंबेनळी घाटामध्ये मेटतळे गावानजीक बुधवारी (दि.२७) मध्यरात्री दरड कोसळली. माती व दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.  आज सकाळी (दि.२९) सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जेसिबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरु होते दरड हटविलानंतर वाहतूक पुर्ववत सुरु होणार आहे.

हेही वाचा 











Source link

सातारा : कास पुष्प पठारावर आता तंगुसाच्या जाळीचे कुंपण | पुढारी

0









बामणोली; पुढारी वृत्तसेवा :  जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावर असणारी जैवविविधता व विविध प्रजातींच्या फुलांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी सातारा वनविभाग व कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने आता तंगुसाच्या जाळीचे कुंपण बसविण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी पावसाने सुरुवात केल्याने कास परिसरात फिरायला जाणारे पर्यटक वाढले. फुलांच्या संवर्धनासाठी घालण्यात आलेल्या तारेच्या जाळीचे कुंपण काढल्याने फिरायला गेलेले पर्यटक कास पठारावर जेथे फुले येतात त्या भागात सैरावैरा फिरू लागले होते. याबाबत दै. पुढारीने आवाज उठवल्यानंतर कास पठार कार्यकारी समिती व उप वन संरक्षक महादेव मोहिते यांच्या उपस्थितीत हंगाम नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत तंगुसाचे कुंपण बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही माहिती समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत यांनी दिली. कास पुष्प पठारावर रस्त्याच्या बाजूला साधारणपणे चार ते सहा किलोमीटर लांब व चार मीटर उंच असे हे तंगसाच्या जाळीचे कुंपण लवकरच बसवण्यात येणार आहे. यासाठी सुमारे आठ ते दहा लाख रुपये खर्च केला जाणार आहे. केवळ हंगाम कालावधीपुरते मर्यादित हे कुंपण दरवर्षी घातले जाणार आहे.











Source link

सातारा : अंबेनळी घाटात दरड कोसळली; पोलादपूर मार्गावरील घटना | पुढारी

0









महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा :  महाबळेश्वर व परिसरात गेले काही दिवस संततधार पाऊस पडत असून या पावसाने मंगळवारी रात्री अंबेनळी घाटात किल्ले प्रतापगड -पोलादपूर मार्गावर कालिका माता पॉईंट नजीक दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

 रात्री प्रतापगड रेस्क्यू टीम सदस्यांसह स्थानिकांच्या मदतीने दरड हटविण्याचे काम सुरु होते. मात्र, बुधवारी सकाळी पुन्हा छोटीशी दरड कोसळली. अखेर जेसीबीने ही दरड हटवून दुपारी वाहतूक पुर्ववत करण्यात आली. यावेळी पोलादपूर पोलिसांसह तहसीलदार व बांधकाम विभागाचे पथक उपस्थित होते. दरड कोसळल्याने या रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्याचे चित्र होते तसेच रस्त्याकडेचे संरक्षक कठडेही कोसळले होते. सध्या अवजड वाहने या मार्गावरून जाणे धोकादायक असून घाटाचा वापर टाळून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











Source link

Adipurush : ‘आदिपुरुष’वर बंदीची मागणी होत असताना अभिनेता म्हणतो, असे सिनेमे मुलांना आवर्जून दाखवायला हवेत!

0
Adipurush : ‘आदिपुरुष’वर बंदीची मागणी होत असताना अभिनेता म्हणतो, असे सिनेमे मुलांना आवर्जून दाखवायला हवेत!


Siddhant karnick Statement : ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदीची मागणी होत असताना सिनेमातील एका कलाकारानं असे चित्रपट आणखी बनायला हवेत, असं मत व्यक्त केलं आहे.



Source link

सातारा येथे ५४४ कोटींचा गुंतवणूक प्रकल्प | पुढारी

0


मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप होत असताना बुधवारी पार पडलेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत 40 हजार कोटी रुपयांच्या विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. हे प्रकल्प सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई या भागांत होणार आहेत. यामुळे सुमारे 1 लाख 20 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. विप्रो परी रोबोटिक्स कंपनीचा 544 कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प सातारा येथे होणार आहे.

या गुंतवणुकीत पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे देशातील पहिल्या सुमारे 12 हजार 482 कोटींच्या इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरीनिर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. नवी मुंबईच्या महापे येथे होणार्‍या जेम्स अँड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर दिली.

पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे गोगोरो इंडिया प्रा. लि. कंपनीमार्फत इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरीनिर्मिती तसेच स्वॅपिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करण्यात येणार आहे. हा देशातील पहिला प्रकल्प ठरणार असून, त्याला अतिविशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली. गोगोरो संपूर्ण महाराष्ट्रात आगामी काळात सुमारे 12 हजार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स स्थापन करणार आहे. त्यामुळे राज्यात इलेक्ट्रिक व्हेईकल पायाभूत सुविधा आणि ई.व्ही.च्या वापराला चालना मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे इलेक्ट्रिक व्हेईकल्स आणि बॅटरीनिर्मिती करणार्‍या इथर एनर्जी कंपनीद्वारे 865 कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. इथर एनर्जी ही भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांपैकी एक आहे. जी प्रगत आणि कनेक्टेड इलेक्ट्रिक दुचाकी बनवते. या प्रकल्पामुळे राज्यामध्ये पुरवठादार इको-सिस्टीम स्थापन होण्यास मदत होणार आहे.

पुणे येथे देशातील पहिल्या ई-बसनिर्मितीच्या 776 कोटी गुंतवणुकीच्या पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि. या घटकाच्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली. पुणे येथे पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स या घटकाकडून भारतातील तांत्रिकद़ृष्ट्या सर्वात प्रगत व्यावसायिक इलेक्ट्रिक आणि सदर हायड्रोजन इंधन-सेल वाहननिर्मिती सुविधा उभारण्यात येणार आहेत. इलेक्ट्रिक व्हेईकल आणि नवीन ऊर्जेवरील वाहने पुढील दशकात देशातील उत्पादन उद्योगात सर्वात मोठे योगदान देणार आहे. या घटकामार्फत उभारला जाणारा प्रकल्प पुणे येथे इलेक्ट्रिक व्हेईकल आणि हायड्रोजन हब बनू शकतो.

रायगड येथे परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीचा 2 हजार 700 कोटी गुंतवणूक प्रकल्प, 2 हजार 33 कोटी गुंतवणुकीच्या स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज कंपनीचा प्रकल्प रायगड येथे, जनरल पॉलिफिल्मस् कंपनीचा 500 कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प नंदुरबार येथे, विप्रो परी रोबोटिक्स कंपनीचा 544 कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प सातारा येथे, तर 110 कोटी गुंतवणुकीचा गणराज इस्पात कंपनीचा प्रकल्प अहमदनगर येथे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

जेम्स अँड ज्वेलरी आर्ट प्रमोशन कौन्सिलद्वारे नवी मुंबई येथील महापे येथे स्थापित होणार्‍या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्प म्हणून दर्जा देण्यात आला. सुमारे 21 एकर जागेवर इंडिया ज्वेलरी पार्क होणार आहे. 1 हजार 354 औद्योगिक आणि व्यापारी आस्थापना या ठिकाणी सुरू होतील.

जेम्स अँड ज्वेलरी उत्पादनांची निर्यातीला चालना

महाराष्ट्रात रत्ने आणि आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्यासाठी तसेच गुंतवणूक, उत्पादन, रोजगार, व्यापार आणि निर्यात यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण 20 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सुमारे 1 लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. यामुळे जागतिकस्तरावर जेम्स अँड ज्वेलरी उत्पादनांची निर्यात वाढण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून, प्रस्तावित इंडिया ज्वेलरी पार्क प्रकल्पांतर्गत जोड प्रकल्प म्हणून वेगाने विकसित होत असलेल्या लॅब ग्रोन डायमंड उद्योगावर विशेष भर देण्यात येणार आहे. त्याद्वारे मेगा पार्क फॉर लॅब ग्रोन डायमंडस् विकसित करण्याचे सरकारचे नियोजन आहे.



Source link

Ambeneli Satara Landslide : पहाटे 2 वाजता आंबेनेळी घाटातील मेटतळेत कोसळली दरड, वाहतूक बंद

0



<p>प्रतापगडावर जाण्याचा मार्ग बंद, वाहतूक बंद. पहाटे 2 वाजता आंबेनेळी घाटातील मेटतळेत कोसळली दरड, वाहतूक बंद</p>



Source link

Neena Gupta: पहिल्या किसिंग सीननंतर नीना गुप्तांची झाली होती वाईट अवस्था; डेटॉलनं धुतला होता चेहरा!

0
Neena Gupta: पहिल्या किसिंग सीननंतर नीना गुप्तांची झाली होती वाईट अवस्था; डेटॉलनं धुतला होता चेहरा!


नीना गुप्ता यांनी एका मालिकेत किसिंग सीन दिला होता. मालिकेतील हा किसिंग सीन शूट केल्यानंतर त्यांनी आपला चेहरा चक्क अँटीसेप्टिकने धुतला होता. या किसिंग सीननंतर त्या इतक्या अस्वथ झाल्या होत्या की, त्यांना रात्रभर झोप देखील आली नाही. अभिनेत्री नीना गुप्ता यांनी नुकतीच माध्यमांना एक मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी काही वर्षांपूर्वीचा एक किस्सा शेअर केला आहे.



Source link