Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2985

Upasana Singh Birthday: ‘सोनपरी’मध्येही झळकली होती कपिल शर्माची ‘बुआ’! उपासना सिंहबद्दल ‘हे’ माहितीये का?

0
Upasana Singh Birthday: ‘सोनपरी’मध्येही झळकली होती कपिल शर्माची ‘बुआ’! उपासना सिंहबद्दल ‘हे’ माहितीये का?


Happy Birthday Upasana Singh: अभिनेत्री उपासना सिंह हिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये सहायक भूमिका करून प्रेक्षकांच्या मनावर आपली अमीट छाप सोडली आहे.



Source link

Bakri Eid: आषाढी एकादशीला ‘कुर्बानी’ नाही; लोणंद येथील मुस्लिम समाजाचा निर्णय | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशी आणि मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद (Bakri Eid) हा सण गुरुवारी (दि.२९) एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय लोणंद येथील मुस्लिम समाजाने घेतला आहे. लोणंद पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक झाली.

यावेळी मुस्लिम समाजाचे विश्वस्त व समाज बांधवांच्या मिटींगमध्ये बकरी ईद (Bakri Eid) दिवशी धार्मिक प्रार्थना म्हणजेच ईद ची नमाज अदा केली जाईल. कुर्बानीचा कार्यक्रम हा आषाढी एकादशीच्या दिवशी न करता धार्मिक परंपरेत सांगितल्याप्रमाणे पुढच्या दोन दिवसात केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. आषाढी एकादशी हा वारकऱ्यांचा मोठा उत्सव असतो. यंदा याच दिवशी बकरी ईदचा देखील सण आहे. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणंद शहरात मुक्कामी असते. यावेळी येथील मुस्लिम बांधव सामाजिक बांधिलकी जपत वारकरी बांधवांची सेवा करतात. आणि धार्मिक सलोखा जोपासतात.

यामुळे हा स्नेह जपत धार्मिक सहिष्णुता व एकमेकांच्या परंपरांचा आदर करण्यासाठी बकरी ईदच्या दिवशी धार्मिक महत्त्व असलेला कुर्बानीचा कार्यक्रम पुढच्या दोन दिवसात करण्यात येईल, असा निर्णय लोणंद मुस्लिम जमातीचे विश्वस्त व समाज बांधवांनी घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे.

यावेळी मुस्लिम समाजाचे विश्वस्त महंमद कच्छी, जब्बार पटेल, कय्युम मुल्ला, कायदेशीर सल्लागार ॲड. बबलू मणेर, नगरसेवक गणी कच्छी, जाविद पटेल, असगर इनामदार, महंमद मुल्ला, राहिदसय्यद, अशरफ इनामदार, इरफान पटेल आदी समाज बांधव उपस्थित होते.

हेही वाचा 



Source link

72 Hoorain Trailer: आत्मघातकी बॉम्बर्सची कथा; वादग्रस्त ‘७२ हुरें’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

0
72 Hoorain Trailer: आत्मघातकी बॉम्बर्सची कथा; वादग्रस्त ‘७२ हुरें’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!


72 Hoorain Trailer Released: ’७२ हुरें’ या चित्रपटाची निर्मिती राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पुरण सिंह यांनी केली आहे. हा चित्रपट एकूण १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



Source link

सातारा : केळवलीचा धबधबा ओसंडू लागला | पुढारी

0









सोमनाथ राऊत : (परळी) ; पुढारी वृत्तसेवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे तेथील धबधब्‍यांचे काय वर्णन करावे, निसर्गाचे चमत्कार पाहायचे असतील तर त्यासाठी निसर्गात रमून जावे लागते. गेल्या आठवडाभरापासून पावसाने सावकाश का असेना पण सुरूवात केली आहे. त्‍याचा बदल निसर्गातही दिसत आहे. डोंगर रांगातले धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. सातारा जिल्‍ह्याच्या परळी खोऱ्यातील केळवली धबधबा ही आता ओसंडून वाहू लागला आहे. शेकडो फुटावरून कोसळणारा हा धबधबा, खाली पाण्याचे तळे आणि मोठमोठ्या दगड धोंड्यातून वाहत जाणारे फेसाळणारे शुभ्र पाणी हा निसर्गाचा अविष्कार मन मोहवून टाकतो.

या पाण्यातून आसमंतात उडणारे तुषार धबधब्‍यापर्यंत जाण्याआधीच आपल्‍याला चिंब भिजवून टाकतात. हिरव्यागार झाडाझुडपातून आणि दगडाच्या कडी कपारीतून उंचच उंच दुधाच्या धारा जणू जमिनीवर पडत असल्याप्रमाणे पांढराशुभ्र पाण्याचा स्त्रोत वाहू लागला आहे. हा निसर्ग अनुभवायचा असेल तर या परिसरात गेलंच पाहिजे.

परळी खोऱ्यात डोंगरदर्‍यातून सध्या पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे कधी पाऊस तर कधी उन्ह आणि त्यातून मधूनच येणारे दाट धूके यामुळे हा परिसर विलोभनीय वाटू लागला आहे.

कसे जाल…

सातारा शहरातून व बोगद्यातून परळी, परळीतून नीत्रळ केळवली इथपर्यंत वाहनाने जायचे. तिथून सुमारे दोन किलोमीटर चालत केळवलीचा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो. जाताना उरमोडी धरणाचे विहंगम दृश्य तसेच पायवाटेने जाताना हिरवेगार डोंगर पक्षांचा किलबिलाट हे सर्व पाहताना निसर्गाचा साक्षात्कार होतो.

हेही वाचा : 











Source link

Nutan Bungalow: मुसळधार पावसामुळे अभिनेत्री नुतन यांच्या बंगल्याची पडझड; ठाण्यातील घराचा भाग कोसळला!

0
Nutan Bungalow: मुसळधार पावसामुळे अभिनेत्री नुतन यांच्या बंगल्याची पडझड; ठाण्यातील घराचा भाग कोसळला!


अभिनेत्री नुतन यांच्या मालकीच्या या बंगल्याची बाल्कनी आणि काही भाग पावसाच्या माऱ्याने कोसळला आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख यासीन तडवी यांनी दिली आहे. नुतन यांचा हा बंगला गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी पाठवून मातीचा ढिगारा हटवण्यात आला आहे. सादर घटना ही मंगळवारी (२७ जून) सायंकाळी घडली होती. संध्याकाळी ६.१५च्या सुमारास ही माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली होती.



Source link

Ashadhi Ekadashi : मराठी मालिकांमध्येही घुमणार विठू नामाचा गजर! ‘आषाढी’च्या निमित्ताने येणार नवे ट्वीस्ट

0
Ashadhi Ekadashi : मराठी मालिकांमध्येही घुमणार विठू नामाचा गजर! ‘आषाढी’च्या निमित्ताने येणार नवे ट्वीस्ट


Ashadhi Ekadashi in Marathi Serials: छोट्या पडद्यावरच्या सगळ्याच मालिकांमध्ये आषाढी निमित्ताने विशेष भाग पाहायला मिळणार आहेत. या निमित्ताने मालिकांमध्ये ट्वीस्ट आणि टर्न येणार आहेत.



Source link

Asin Thottumkal: ‘गजनी’ फेम असीन पतीपासून विभक्त होणार? सोशल मीडियाद्वारे उचललं मोठं पाऊल!

0
Asin Thottumkal: ‘गजनी’ फेम असीन पतीपासून विभक्त होणार? सोशल मीडियाद्वारे उचललं मोठं पाऊल!


Asin Thottumkal deleted social media post: ‘गजनी’ फेम अभिनेत्री असीन थोट्टूमकल हिने २००८मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. आमिर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटात कल्पनाची भूमिका साकारून ती रातोरात प्रसिद्ध झाली होती. मात्र, नंतर तिने लग्न करण्याचा निर्णय घेत, चित्रपट जगतापासून दूर जाण्याचा निश्चय केला. असीनने मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहुल शर्मा यांच्यासोबत संसार थाटून मनोरंजन इंडस्ट्रीतून कायमचा निरोप घेतला. मात्र, आता लग्नाच्या सात वर्षानंतर, अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.



Source link

कराड : विहिरीत जीप कोसळलेल्या चालकाचा मृतदेह सापडला | पुढारी

0









मारूल हवेली : पुढारी वृत्तसेवा कराड-पाटण राज्यमार्गावर विहे गावच्या हद्दीतील विहिरीत जीप कोसळल्‍याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना मंगळवार, दि. 27 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातातील चालकाचा मृतदेह आज (बुधवार) सकाळी सापडला आहे. संभाजी कृष्णा पवार (वय ५०, रा. मल्हारपेठ) असे त्‍या व्यक्‍तीचे नाव आहे.

मंगळवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास क्रुझर जीप विहिरीत कोसळली होती. स्थानिक नागरिक  व क्रेनच्या साह्याने जीप बाहेर काढण्यात यश आले होते. मात्र यावेळी कोणीही सापडले नव्हते. अंधार व पाऊस असल्याने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बचाव कार्य व शोधमोहीम थांबवण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा विहिरीत शोध घेण्यात आल्यानंतर सकाळी ७:३० वाजता गाडी चालक संभाजी पवार यांचा मृतदेह मिळून आला आहे.

हेही वाचा : 











Source link

Nauvari Song: ‘नऊवारी साडी’ ठरतेय युट्युबवर सुपरहिट! संजू राठोडच्या व्हायरल गाण्याने २० मिलियन व्हूज

0
Nauvari Song: ‘नऊवारी साडी’ ठरतेय युट्युबवर सुपरहिट! संजू राठोडच्या व्हायरल गाण्याने २० मिलियन व्हूज


संजूचं नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘नऊवारी’ गाण्याने तर केवळ एका महिन्यातच मिलिअन प्रेक्षकांची मने जिंकली. संजू, गौरव राठोड, प्राजक्ता घाग, मनिष महाजन आणि ‘नऊवारी’ गाण्याच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीने तयार झालेल्या या गाण्याने २० मिलिअनचा टप्पा पार केला आहे. तर, स्पॉटिफाय या ऑडियो प्लॅटफॉर्मवर १ मिलिअन स्ट्रीम्स मिळाले आहेत. इंस्टाग्रामवर चार लाखांहून अधिक लोकांनी रिल्स बनवल्यामुळे हे गाणं ट्रेंड झालं आहे. ‘नऊवारी’ अगोदर ‘डिंपल’, ‘देव बाप्पा-बाप्पावाला गाणा’, ‘स्टाईल मारतंय’ या गाण्यांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. कोणतही गाणं तयार केलं की, १ मिलिअनचा आकडा पार करायचाच, याच हेतूने संजूने गाणी तयार केली आणि त्याच्या यशाचा आलेख बघता संजूच्या कलेचं आणि जिद्दीचं चीझ झालं, असं नक्कीच म्हणता येईल.



Source link

Prathamesh Laghate: ‘आमचं ठरलंय’च्या घोषणेनंतर प्रथमेश लघाटेच्या घरी सुरू झाली लग्नाची तयारी! पाहा व्हिडीओ…

0
Prathamesh Laghate: ‘आमचं ठरलंय’च्या घोषणेनंतर प्रथमेश लघाटेच्या घरी सुरू झाली लग्नाची तयारी! पाहा व्हिडीओ…


‘आमचं ठरलंयच्या घोषणेनंतर आता हळूहळू केळवाणांना सुरुवात होतीय! हे फीलिंग खूप भारी आहे! अतिशय पारंपरिक पद्धतीने, प्रचंड आपुलकीने, पंच पक्वांनाच्या जेवणाने, अतिशय आग्रहाने खाऊ घालून माझ्या केळवणांचा शुभारंभ “चतुरंग”ने केला त्याबद्दल चतुरंगच्या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद!’, असे म्हणत प्रथमेश लघाटे याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.



Source link