
लकडडबग्घा
या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात, अंशुमन झा हा प्राणीप्रेमी आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ बनला आहे, जो कोलकात्यातील प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांचा सामना करतो. हा चित्रपट ‘झी ५’वर ३० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात, अंशुमन झा हा प्राणीप्रेमी आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ बनला आहे, जो कोलकात्यातील प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांचा सामना करतो. हा चित्रपट ‘झी ५’वर ३० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

एएनआयच्या रिपोर्टनुसार, अधिवक्ता ममता राणी यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकाकर्त्या ममता राणी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. ममता राणी यांनी आपल्या याचिकेत म्हटले की, ‘सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. कारण चित्रपटातील भगवान श्री राम आणि भगवान हनुमाना यांच्यासह धार्मिक पात्रांच्या वास्तविक रूपाशी छेडछाड करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटावर बंदी घातली नाही, तर लोकांच्या नैतिक मूल्यांवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.’

‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरात आलिया सिद्दीकी सतत तिच्या नवाजुद्दीनसोबत तुटलेल्या लग्नाबद्दल बोलत असायची. यावरून सलमान खानने देखील तिला फटकारले होते. मात्र, आलियाच्या या सततच्या बडबडीने केवळ सलमानच नाही, तर पूजा भट्टही वैतागली होती. पूजा भट्टने देखील आलियाला या वरून फटकारले होते. यावरून दोघींमध्ये खडाजंगी झाली होती. मात्र, आता आलियाला थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
मारूल हवेली, पुढारी वृत्तसेवा : कराड-पाटण राज्यमार्गावर विहे गावच्या हद्दीतील विहिरीत जीप कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवार, दि. 27 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिस यंत्रणेने भर पावसात बचावकार्य सुरू ठेऊन क्रेनच्या मदतीने जीप बाहेर काढली आहे. मात्र, जीपमध्ये कोणीही आढळून आले नसल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते.
अपघातग्रस्त क्रुझर जीप (क्र.एम.एच. 05 ए 6261) ही विहिरीतून बाहेर काढण्यात आली असून, ती मल्हारपेठ येथील असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास विहेवरून मल्हारपेठकडे निघालेली गाडी विहे स्मशानभूमी जवळ असलेल्या विहिरीत
कोसळल्याची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरिक्षक उत्तम भापकर, अजित पाटील व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिर खोल असून पाण्याने भरल्यामुळे नेमकी कोणती गाडी आतमध्ये पडली आहे, याबाबत निश्चित समजून येत नव्हते. त्यामुळे तात्काळ क्रेन बोलावून गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. रात्रीची वेळ व पडणारा पाऊस यामुळे गाडी बाहेर काढताना अडचणी येत होत्या. त्यातच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस वाहनांना वाट काढून देत होते.
दोन तासाच्या प्रयत्नानंतर रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने जीप बाहेर काढण्यात आली. पोलीसांनी जीपमध्ये कोणी आहे काय हे शोधले असता आतमध्ये कोणीही आढळून आले नाही. ही जीप मल्हारपेठ येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जीप विहिरीत पडली तेव्हा त्यामध्ये कोण-कोण होते याबाबत स्पष्ट झालेले नाही. जीपचालक किंवा अन्य कोणीही मिळून आले नसून पोलीसांकडून रात्री उशीरापर्यंत बचाव कार्य तसेच अधिक माहिती घेण्याचे काम सुरू होते.
कराड, पुढारी वृत्तसेवा : कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी मागील तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. संततधार, दमदार पाऊस पडत नसला तरी अधूनमधून येणार्या पावसाच्या सरींमुळे शेतकरी वर्ग सुखावल्याचे चित्र आहे. धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर येथेही पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात किंचितशी वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. हा पाऊस असाच सातत्याने पडावा अशी सार्वत्रिक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या 10.89 टीएमसी इतका उपलब्ध तर त्यापैकी केवळ 5.89 टीएमसी उपयुक्त साठा शिल्लक आहे. या अत्यल्प पाणीसाठ्यामुळे धरणातील पाण्यावर होणार्या वीजनिर्मितीसह सिंचनावरही मर्यादा आहेत. दरम्यान सिंचनासाठी पूर्वेकडे सोडण्यात येणारे पाणी आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. धरणातील पाण्यावर पश्चिमेकडे पोफळी, अलोरे व कोयना चौथा टप्पा या तीन टप्प्यातून 1920 मेगॅवॅट वीजनिर्मिती केली जाते. पाण्याअभावी चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती बंद ठेवण्यात आली आहे. सध्या जलपातळी 618.617 मीटरवर असली तरी राज्यातील अन्य प्रकल्पातून उपलब्ध होत असलेली वीज, त्यापटीत कोयनेतून अपेक्षित मागणी नसल्याने व धरणातील पाणीसाठा लक्षात घेता कोयना चौथ्या टप्प्या मार्फत तयार होणारी वीजनिर्मिती मागील काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे.
यानंतर धरणात अपेक्षित पाऊस व त्या पटीत पाणीसाठा झाल्यानंतरच चौथ्या टप्प्यातून वीजनिर्मिती पुन्हा सुरू करण्यात येईल. अद्यापही कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी व अलोरे जलविद्युत प्रकल्पातून अपेक्षित व मागणीनुसार टप्प्याटप्प्याने वीजनिर्मिती सुरू आहे. दरम्यान यावर्षी उशिरा का होईना पण आता पावसाला सुरुवात झाली आहे. हा पाऊस यापुढे असाच अखंडित व अपेक्षित पडावा अशा सार्वत्रिक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत 24 तासातील व 1 जूनपासूनचा पाऊस पुढीलप्रमाणे- कोयना 21 ( 257 ) मि. मि. , नवजा – 48( 318 ) मि. मि. , महाबळेश्वर – 86 ( 454 ) मि. मि . नोंद आहे.
सिंचनासाठी पुन्हा पाणी सोडले…
पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी काही काळासाठी बंद करण्यात आले होते. सोमवारपासून पुन्हा सिंचनासाठी पूर्वेकडे धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : प्रतापगड पासून काही अंतरावर असणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळ्याची घटना आज (दि. २७) घडली. या दुर्घटनेमुळे दगड व माती रस्त्यावर आल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंट जवळ दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आंबेनळी घाट दोन्ही बाजूंकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. प्रतापगड रेस्क्यू टीम सदस्यांसह स्थानिकांच्या मदतीने दरड हटविण्याचे काम सुरु आहे. मंगळवारी (दि. २७) रात्री १० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. दगड व माती हटविल्यानंतर वाहतूक पुर्ववत सुरु होईल अशी माहिती घटनास्थळावरुन मिळत आहे. घटनास्थळावरुन अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही.
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर झालेल्या दुर्घटनेनंतर प्रवाशांनी ताम्हेणी घाटातून जाणाऱ्या मर्गाचा अवलंब करावा अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
<p>लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग. गेल्या 48 तासांत 182 मिलिमीटर पावसाची नोंद. </p>
Source link

नुकत्याच पार पडलेल्या टास्कमध्ये स्पर्धकांना एकमेकांना नॉमिनेट करायचे होते. जेव्हा पूजा भट्टची वेळ आली, तेव्हा तिने आलिया सिद्दीकीचे नाव घेतले. याचे कारण विचारले असता ती म्हणाली की, ‘गेल्या एका आठवड्यापासून मी आलियाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप गोंधळात आहे. मी तिला समजूच शकत नाही. गेल्या २४ तासांत, मी तिचं एक असं रूप पाहिलं ज्यामुळे मलाच आता भीती वाटू लागली आहे. जिया शंकर, बाबिका ध्रुवे नेहमीच एकमेकींशी भांडत राहतात. मात्र, काल रात्री, आलियाने भांडण सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नंतर तिने बाबिकाच्या वाढदिवसाच्या केकचा एक मोठा तुकडा खाण्यास अजिबात संकोच केला नाही. जेव्हा, तुम्ही एखाद्याला नापसंत करता आणि तिरस्कार करता, तेव्हा तुम्ही त्यांच्या वाढदिवसाचा केक एवढ्या आनंदाने कसा खायला जाऊ शकता?’

या महोत्सवात देशपरदेशातून तब्बल ११३ लघुपटांचा समावेश करण्यात आला होता. त्यात विशेषतः युनायटेड स्टेट्स, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम, ब्राझील, युनायटेड अरब एमिरेट्स,ऑस्ट्रेलिया,पोलंड,जर्मनी, क्रोएशिया, सिरियन अरब रिपब्लिक, स्वित्झर्लंड , मेक्सिको, अर्जेन्टिना, कोलंबिया, फ्रांस, इजिप्त, कझाकिस्तान अशा भारतासह परदेशातूनही बऱ्याच लघुपटांचा समावेश होता. यातील उत्कृष्ट लघुपटांच सादरीकरण महोत्सवात करण्यात आलं.

तपास यंत्रणा एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत सध्या तब्बल ७००हून अधिक शूटर सक्रिय आहेत. ही टोळी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमागे आणि इतर अनेक हायप्रोफाइल हत्यांमागील सूत्रधार आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. सलमानला टोळीकडून अनेक धमकीचे मेल आले होते, त्यानंतर मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि इतर आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. लॉरेन्स बिश्नोई सध्या पोलिस कोठडीत आहे. तर, गोल्डी ब्रार याच्यावर कॅनडाच्या पोलिसांनी बक्षीस ठेवले आहे. इंटरपोलने त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.