Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2987

सातारा : पाचवडच्या जनावरांच्या बाजारात ईदसाठी बकरी खरेदीला गर्दी | पुढारी

0









सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा गुरुवारी बकरीईद आहे. त्‍या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित बाजार म्हणून ओळखला जाणाऱ्या व महामार्गावरील महत्वपूर्ण असलेल्या पाचवड येथील जनावरांच्या बाजारात बकरी खरेदीसाठी व्यापारी व नागरिकांनी गर्दी केली होती. यामध्ये सर्वसामान्य खरेदीदार यांनी पांच हजार रूपयांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत बकऱ्यांच्या वयोमानानुसार किमती ठरल्या, एक वर्षापुढील बकरी 30 ते 40 हजार रुपयांची किंमत होऊन व्यवहार झाले.

कोरोना महामारीत नंतर सुरू झालेल्या या जनावरांच्या बाजारावर रोगराईचे संकट आल्याने आजही इतर गाई, म्हैशी, बैल या जनावरांची खरेदी विक्री व्यवहार होत नसल्याने पांचवडच्या बाजारात ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नसल्याची खंत मार्केट कमिटीचे संचालक व व्यापारी संघटनेचे नेते दत्ताशेठ बांदल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वाई तालुक्यातील शेतकरी वर्गाची सूचना स्वीकारून वाई येथे मार्केट कमिटीने दिवसातून दोन वेळा भाजी मंडई सुरू केली. याचाही लाभ शेतकरी बंधू व व्यापाऱ्यांना घेण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : 











Source link

Devraj Patel: व्हायरल बॉय देवराज पटेलचा अखेरचा व्हिडीओ बघून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी! पाहा Video…

0
Devraj Patel: व्हायरल बॉय देवराज पटेलचा अखेरचा व्हिडीओ बघून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी! पाहा Video…


देवराज पटेल याच्या निधनानंतर त्याचे अनेक जुने व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत त्याचा शेवटचा इन्स्टाग्राम व्हिडीओ पाहून चाहते भावूक होत आहेत. त्याचा हा शेवटचा व्हिडीओ चाहते सतत सोशल मीडियावर शेअर करत आहेत. देवराजच्या शेवटच्या इन्स्टा व्हिडीओवर कमेंट करत चाहते त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. या व्हिडीओमध्ये देवराज म्हणताना दिसत आहे की, ‘नमस्कार मित्रांनो, देवाने माझा चेहरा असा बनवला आहे की लोकांना कळत नाही, क्यूट म्हणा की क्यूटिया… बाय.’ या व्हिडीओसोबत देवराजने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पण मी क्यूट आहे मित्रांनो.. नाही का? ‘ यावर त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.



Source link

Sonu Sood: चित्रपट फ्लॉप झाले तर सोनू सूद कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारणार? पाहा काय म्हणाला अभिनेता…

0
Sonu Sood: चित्रपट फ्लॉप झाले तर सोनू सूद कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारणार? पाहा काय म्हणाला अभिनेता…


आणखी एका युजरने सोनू सूदला सांगितले की, ‘सर कृपया माझ्या पत्नीला गोलूला सांगा की, मी तिच्यावर खूप प्रेम करतो’ यावरही सोनू सूदने उत्तर दिले. त्याने लिहिले की, ‘गोलू भाभी सोहेल भाई तुझ्या प्रेमात आहे. काळजी घ्या भाऊ.’



Source link

Amol Palekar: सरकार आणि राजकारणी मुखवटाधारी जमावाला पाठिंबा देतायत; अमोल पालेकर बरंच काही बोलले!

0
Amol Palekar: सरकार आणि राजकारणी मुखवटाधारी जमावाला पाठिंबा देतायत; अमोल पालेकर बरंच काही बोलले!


या प्रसंगी बोलताना अमोल पालेकर म्हणाले की, ‘आज जर शाहू महाराज हयात असते तर, लैंगिक शोषणाचे आरोप असलेले खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून खेळाडूंना इतके दिवस आंदोलन करावे लागले नसते. महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि असे गुन्हे करणाऱ्यांना तातडीने शिक्षा देण्याचे आदेश शाहू महाराजांनी दिले होते. ते नेहमीच सनातनी विचारधारेशी लढले.’



Source link

Abdu Rozik: छोट्या पडद्यावर होणार अब्दू रोजिकची एन्ट्री; ‘या’ प्रसिद्ध मालिकेत झळकणार!

0
Abdu Rozik: छोट्या पडद्यावर होणार अब्दू रोजिकची एन्ट्री; ‘या’ प्रसिद्ध मालिकेत झळकणार!


याच ट्रॅकमध्ये दामिनी अब्दूला गुनगुनचे अपहरण करण्यासाठी पाठवणार आहे. नंतर याचा उलगडा होईल की, अब्दूच्या पात्राचा गुनगुनला इजा करण्याचा हेतू नव्हता. पण, तो पैशासाठी दामिनीच्या आदेशाचे पालन करत होता. अब्दू उद्यापासून या कॅमिओ ट्रॅकच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. नुकताच अब्दू त्याचा जवळचा मित्र आणि मंडली गँगचा सदस्य शिव ठाकरे याला पाठिंबा देण्यासाठी केपटाऊनला पोहोचले होता.



Source link

सातारा : जिल्ह्यात तुरळक सरी; बळीराजा चिंतेत | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले असले तरी मान्सूनचा पाऊस काही जोर पकडेनासा झाला आहे. यामुळे बळीराजाची चिंता मिटेनाशी झाली आहे. सोमवारी सातार्‍यात दिवसभर ऊन- पावसाचा खेळ सुरू होता. मात्र, मुसळधार पावसासाठी बळीराजाचे चातकासारखे वाट पहात आहेत.

शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. रविवारीही जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सोमवारी मात्र पावसाने पूर्णत: उघडीप दिली असल्याचे चित्र पहावयास मिळाले. सर्वत्रच अधूनमधून ऊन व ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. दिवसभर सातारा शहर व परिसरात ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मान्सून पाऊस लागून राहील अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, सोमवारी ऊन व निरभ्र आकाशामुळे मान्सून पावसाची आशा मावळली. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे पुन्हा आभाळाकडे डोळे लागून राहिले आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यात सातारा 10.9 मि.मी., जावली 15.5 मि.मी., पाटण 16.3 मि.मी., कराड 3.9 मि.मी., कोरेगाव 3.6 मि.मी.,खटाव 1.1 मि.मी., माण 1.1 मि.मी., फलटण 2.2 मि.मी., खंडाळा 8.0 मि.मी., वाई 5.9 मि.मी. आणि महाबळेश्वरमध्ये 63.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.











Source link

सातारा : सोळशी खोर्‍यात 6.5 टीएमसीचे धरण; दीड महिन्यात पीएफआर अहवाल | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर तालुक्यात सोळशी येथे 6.5 टीएमसीचे धरण बांधले जाणार आहे. जलसंपदा विभागाच्या सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाकडून सोळशी धरणाचा सर्व्हे सुरू असून दीड महिन्यांत प्राथमिक सर्व्हे करून पूर्व संभाव्यता अहवाल (पीएफआर) राज्य शासनास सादर केला जाणार आहे.

सातार्‍याच्या पश्चिम भागात मोठे, मध्यम पाणी प्रकल्प आहेत. बहुतांश धरणांची कामे होत आली आहेत. मात्र, तरीही जिल्ह्याचा दुष्काळ संपलेला नाही. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाणी प्रकल्पासाठी बर्‍याच साईट्स आहेत. महाबळेश्वर तालुक्यात सोळशी गावाजवळ पाणी प्रकल्पासाठी एक महत्त्वाची साईट्स सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाने शोधली आहे. हा प्रकल्प झाल्यास यासाठी खर्चाच्या तुलनेत याठिकाणी मोठा पाणीसाठा निर्माण होऊ शकतो, हे स्पष्ट झाल्यानंतर या धरणासाठी आवश्यक इतर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प पूर्णत्त्वाला जावा यासाठी लक्ष घातले. जलसंपदा विभागाला सूचना केल्या. त्यानंतर सोळशी धरणाच्या प्रकल्पाच्या प्राथमिक सर्व्हेचे काम सुरू झाले. हे काम दीड महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर या पाणी प्रकल्पासाठी पूर्व संभाव्यता अहवाल (पीएफआर) राज्य शासनास सादर करून त्यास मंजुरी घेतली जाणार आहे. पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासाठी नाशिक येथील जल विज्ञान विभागाची परवानगी मिळाल्यानंतर या पाणीप्रकल्पाचे विस्तृत सर्व्हेक्षण होईल.

या सर्व्हेक्षणात प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल. हा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) शासनास मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया शक्य तितक्या गतीने व्हावी, यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. नियोजित सोळशी प्रकल्पात सुमारे 6.5 टीएमसी पाणीसाठा निर्माण होऊ शकतो. त्यासाठी सुमारे 3 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सोळशी धरणाची माहिती मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी नुकतीच जिल्हा दौर्‍यावर असताना घेतली. प्राथमिक सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर त्यापुढील पूर्व संभाव्यता अहवालास मंजुरी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यावेळी जलसंपदा विभागाचे अव्वर मुख्य सचिव दिपक कपूर, जलजीवन मिशनचे सचिव अमित सैनी, पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता अमर काशिद आदि उपस्थित होते.











Source link

Sajay Raut : संजय राऊत यांच्या दौर्‍यामुळे ठाकरे गट चार्ज | पुढारी

0


कराड; पुढारी वृत्तसेवा : Sajay Raut : राज्य पातळीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे खंदे फलंदाज खा. संजय राऊत यांचा रोजच राजकीय ‘सामना’ पाहायला मिळतो. पाटण तालुक्यातील दौर्‍यात त्यांनी विद्यमान शिवसेना – भाजप युतीचे सरकार व स्थानिक राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा ठाकरे स्टाईल खरपूस राजकीय समाचार घेतला. ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसलाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकीय कानमंत्र, ऊर्जा देण्याचा प्रयत्न केल्यामुळे महाविकास आघाडीच्या दृष्टीने खा. राऊत यांचा दौरा फायदेशीर ठरणार का, हे पाहणे उचित ठरेल.

शिवसेना, राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीच्या राजवटीत पाटण तालुक्यात प्रामुख्याने राष्ट्रवादीसह काँग्रेस व निष्ठावंत ठाकरे गटाच्या मुळच्या शिवसैनिकांची राजकीय गोची पहायला मिळत होती. मात्र एक वर्षापूर्वी शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर मात्र तालुक्यातील राष्ट्रवादी, ठाकरे गटासह काँग्रेसलाही चांगलीच राजकीय पालवी फुटली. मुळातच माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर व ना.देसाई या दोनच गटात विखुरलेल्या पाटण तालुक्यात नेहमीच अन्य पक्ष, संघटनांना त्या तुलनेत महत्व कमी असते. मात्र गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील एकजूट निश्चितच भविष्यातील सकारात्मक नांदी मानली जात आहे. राजकीय व शासकीय, प्रशासकीय सत्तास्थाने असलेल्या ना. देसाईंच्या राजकीय ताकतीला रोखायचे असेल तर महाविकास आघाडीतील सर्व पक्ष व मित्र पक्षांनी एकत्रितपणे सामना करणे सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे. तसे न झाल्यास भविष्यात याचा यातील सर्वांनाच राजकीय फटका बसणार आहे. Sajay Raut

राज्यात भलेही शिवसेनेसोबत भाजपाही सत्तेत असली तरी पाटण तालुक्यात मात्र भाजपाची अवस्था तितकीशी प्रभावी नाही याची प्रचिती नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍यातही आली. तालुक्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अपेक्षित ताकद, न्याय व सत्तेतील वाटा मिळत मिळत नसल्याच्या कुरबुरी आहेत.

खा. संजय राऊत यांना भलेही शिवसेना शिंदे गट व भाजपा नेते सकाळचा भोंगा म्हणून हिनवत असले तरी देखील खा.राऊत यांचे सातारा जिल्ह्यातील मिळावे, बैठका व पत्रकार परिषदेतही त्यांनी शिंदे सरकारसह ना. देसाई यांच्या गद्दारीचा खरपूस समाचार घेतला आहे. गद्दारी, खोके, निष्ठा यामुळे लावलेला राजकीय बट्टा यासह पालक, बालक, चालक, मालक अशा पद्धतीने पालकमंत्री पदाची उडवलेल्या खिल्लीमुळे येथे राजकीय घमासान होणार हे नक्कीच. Sajay Raut

याशिवाय मल्हारपेठ येथे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या ठाकरे व राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाची एकत्रित असलेली मल्हारपेठ ग्रामपंचायतीची सत्ता, त्याचा संपत आलेला कार्यकाळ व त्याच निमित्ताने महाविकास आघाडीचे भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर व खा. संजय राऊत यांच्या एकत्रित व्यासपीठावर दोन्ही नेत्यांकडून ना. देसाई यांच्यावरील शिरसंधान लक्षात घेता महाविकास आघाडीला बळकटी मिळत असल्याचे राजकीय चित्र पहायला मिळत आहे.

यावर शांत बसतील ते ना.शंभूराज देसाई कसले. त्यामुळे तेही याचा कडाडून राजकीय समाचार घेतील. यामध्ये खा.राऊतांसह महाविकास आघाडी, त्यांचे स्थानिक नेते यांचाही राजकीय समाचार घेतल्याशिवाय ना. देसाई शांत बसणार नाहीत. निश्चितच पाटण तालुक्यात सध्या एका बाजूला ना. देसाई यांच्या राजकीय, शासकीय व प्रशासकीय दबदबा वाढत असतानाच त्याला खा . संजय राऊतांच्या दौर्‍याने काहीसा छेद देण्याचा राजकीय प्रयत्न झाला आहे. हा प्रयत्न भविष्यकाळात महाविकास आघाडीसाठी कितपत फायदेशीर ठरणार याकडे सार्वत्रिक नजरा लागल्या आहेत.

Sajay Raut : मल्हारपेठ ग्रा.पं. राजकीय केंद्रबिंदू ठरणार

ना. शंभूराज देसाईंचा मल्हारपेठ हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र मल्हारपेठ ग्रामपंचायतीत राजकीय स्थित्यंतरे पहायला मिळतात. कित्येकदा पाटणकर गटाकडे या ग्रामपंचायतीची सत्ता राहिली आहे. सध्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांच्या पत्नी सौ. धनश्री कदम या सरपंच तर पाटणकर गटाकडे उपसरपंच पदासह बहुमत आहे.त्यामुळे यावेळी ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध देसाई गट अशी दुरंगीच होईल. या विभागात मल्हारपेठ ग्रामपंचायत राजकीय केंद्रबिंदू ठरणार हे निश्चित.



Source link

Devraj Patel: व्हायरल बॉय देवराज पटेलच्या निधनाने चाहते हळहळले!

0
Devraj Patel: व्हायरल बॉय देवराज पटेलच्या निधनाने चाहते हळहळले!


मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर देवराजचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी लिहिले की, ‘दिल से बुरा लगता है म्हणून करोडो लोकांमध्ये आपले स्थान निर्माण करणारे देवराज पटेल आज आपल्यला सोडून गेले. या तरुण वयात अशी प्रतिभा गमावणे खूप दुःखदायक आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती:’



Source link

R. D. Burman Birth Anniversary: असे जुळले होते आर डी बर्मन अन् आशा भोसलेंचे सूर! फिल्मी लव्हस्टोरी माहितीये?

0
R. D. Burman Birth Anniversary: असे जुळले होते आर डी बर्मन अन् आशा भोसलेंचे सूर! फिल्मी लव्हस्टोरी माहितीये?


‘तीसरी मंझिल’ चित्रपटानंतर आशा भोसले यांनी आरडी बर्मन यांच्यासाठी गाणे सुरू केले. आरडींनी संगीत दिलेल्या चित्रपटात आशा भोसले यांचा आवाज नक्कीच असायचा. दोघांनी ७०च्या दशकापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. याच काळात आरडी बर्मन आणि आशा भोसले या दोघांचे लग्न मोडले होते. आरडी बर्मन त्यांची पत्नी रिता पटेल यांच्यापासून विभक्त झाले होते. तर, आशा यांनी पती गणपतराव भोंसले यांचे घर सोडले होते. दोघेही आयुष्याच्या प्रवासात एकटे पडले होते. एकत्र काम करताना त्यांना एकमेकांची साथ मिळू लागली.



Source link