Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2988

संपादकीय: रशियामधील उठाव हा जगासाठी एक मोठा धडा

0
संपादकीय: रशियामधील उठाव हा जगासाठी एक मोठा धडा


छत्रपती संभाजीनगर5 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

कोणतीही मोठी जीवित हानी न होता रशियामधील उठाव काही काळासाठी टळला आणि प्रिगोझिनच्या नेतृत्वाखालील बंडखोर वॅग्नर सैन्य (भाडोत्री) मॉस्कोपासून २०० किमीवरून परत गेले. सुरुवातीला सरकारने बंडखोरांवर पूर्ण शक्तीने हवाई हल्ले केले, परंतु यामुळे सहा हेलिकॉप्टर आणि रशियन सैन्याचे एक जहाज पाडले गेले. यातील पाच हेलिकॉप्टर नि:शस्त्र असल्याचे अवशेषांतून समोर आले आहे. दक्षिण रशियातील सर्वात मोठे शहर रोस्तोव्हमध्ये बंडखोरांच्या जस्टिस मार्चला लष्कर किंवा जनतेने विरोध का केला नाही, याचा विचार राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना करावा लागेल. रोस्तोव हे सैन्याचे मुख्यालयही आहे. भाडोत्री सैनिकांना रोखण्याची क्षमताही रशियन सैन्यात नाही, हे जगाला कळून चुकले. १६ महिन्यांपासून सुरू असलेल्या युक्रेन युद्धात पुतीन यांची त्यांच्या जनरल्सवरील पकड सैल झाल्याचेही उघड झाले आणि जनताही संतप्त झाली आहे. एवढ्या मोठ्या शक्तीची ही दुर्दशा का झाली याचा अभ्यास जगातील राजकीय शास्त्रज्ञ आणि संरक्षणतज्ज्ञ करत आहेत.

चीनचे नेते शी जिनपिंग यांच्याप्रमाणेच पुतीन यांनीही संविधानाला मुरड घालून पदावर राहण्यासाठी सर्व विरोध मोडीत काढला. पण, असे लोक खऱ्या ज्ञानाच्या खिडक्या सवयीने बंद करतात आणि चमच्यांनी घेरले जातात. युक्रेनबरोबरचे युद्ध हे एका उन्मत्त हत्तीचे वेड होते. रशिया सामरिक-आर्थिक-सामाजिकदृष्ट्या गरीब झाला. पुतीन हे विसरले की, चीनमध्ये ७४ वर्षांत प्रथमच नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांचे मार्गदर्शक हुकूमशहा जिनपिंग यांच्याविरोधात प्रचंड जनसमुदाय समोर आला होता. सरकारला नमते घ्यावे लागले. चीन आणि रशियाप्रमाणे लोकशाहीच्या वेशात असले तरी हे हुकूमशाहीचे युग नाही, हे प्रत्येक राज्यकर्त्याने समजून घेतले पाहिजे.



Source link

सातारा : जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायती होणार पेपरलेस | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने महा ई- ग्राम संगणक प्रणाली विकसित केली आहेे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे निवड केलेल्या ग्रामपंचायती पेपरलेस होणार असून यासाठी कालबध्द कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सातारा तालुक्यातील 10, कोरेगाव 10, खटाव 10, माण 10, फलटण 10, खंडाळा 10, वाई 10, जावली 10, महाबळेश्वर 10, कराड 10 व पाटण तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ही संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामसेवकांचे कामकाज हे ऑनलाईन होणार आहे. तसेच कार्यालयांमधील कागदपत्रांचा ढीग कमी होणार आहे. यामुळे कर्मचारी व नागरिकांचा पैसा व वेळेत बचत होणार आहे.

महा-ई ग्राम ही प्रणाली राबवण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यासाठी तालुका स्तरावर समन्वय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेळापत्रकाप्रमाणे दिलेल्या कार्यक्रमाची जबाबदारी ग्रामपंचायतीचे केंद्रचालक, ग्रामसेवक व संबंधित विस्तार अधिकार्‍यांची राहणार आहे. निवड केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यवाही पूर्ण केल्यानंतर या ग्रामपंचायती दि. 2 ऑक्टोबर रोजी पेपरलेस ग्रामपंचायती म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली.

या मिळणार सुविधा
निवड केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये संगणक प्रणालीमध्ये ग्रामपंचायतीकडील 1 ते 33 नमुने संगणीकृत करणे, स्वयंघोषणापत्रे व 1 ते 7 प्रकारचे दाखले देणे, मासिक प्रगती अहवाल, मुलभूत माहिती इत्यादी सुविधा प्रामुख्याने उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संगणक प्रणालीचा वापर सर्व ग्रामपंचायतीमध्ये सुरू करावयाचा आहे. सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, केंद्र चालक, विस्तार अधिकारी पंचायत यांचे प्रशिक्षण त्या त्या तालुक्यात घेण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीमध्ये महा ई-ग्राम संगणक प्रणालीच्या कार्यक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. यामध्ये हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरूद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.
– ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी



Source link

एसटी प्रवासासाठी आता ई पेमेंट; लालपरीत येणार अँड्राईड तिकीट मशिन | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  एसटीच्या इटीआयएम मशिनमध्ये वारंवार होणारे बिघाड, सुटया पैशावरून प्रवाशी व वाहकांमध्ये होणारे वाद याला आळा घालण्यासाठी लालपरीमध्ये महामंडळामार्फत आता अँड्राईड तिकीट मशिन देण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहक आता स्मार्ट होणार असून खिशात रोख पैसै नसतानाही एसटीतील प्रवाशांना आता आपल्या मोबाईलवरील गुगल -पे, फोन पे, कार्ड पेमेंटच्या माध्यमातून डिजिटल तिकीट काढता येणार आहे.

सदोष मशिनमुळे अनेकदा एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी असताना कोर्‍या कागदावर तिकीट लिहून देण्याची वेळ वाहकांवर येते. त्यामुळे महामंडळानेही वाहकांच्या डोक्याला तापदायक ठरलेल्या जुन्या तिकीट इश्यू मशीन हद्दपार करून त्या जागी आता नवीन इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे.

आधुनिक अँड्राईड ई- तिकीट मशिनमुळे लालपरीचे वाहक आता हायटेक झाले आहेत. एसटीमधील गर्दी लक्षात घेता प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळणार आहेत. सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव खंडाळा, फलटण, कोरेगाव, दहिवडी, वडूज, मेढा या 11 आगारातील वाहकांना याबाबत संबंधित कंपनी व एसटी प्रशासनामार्फत लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याबाबतचे नियोजन आगार स्तरावर सुरू आहे.

1702 अँड्राईड ई -तिकीट मशिन

जिल्ह्याला 1 हजार 702 आधुनिक अँड्राईड ई- तिकीट मशिन मिळाल्या आहेत. याबाबत आगार स्तरावर संबंधित कंपनी व प्रशासनामार्फत सर्वच वाहकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवीन अँड्राईड ई -तिकीट मशिन, चार्जर व मशीन कव्हर संहित वाहक व चालक तथा वाहकांच्या नावावर नोंद होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र रजिस्टर तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहकाला काळजीपूर्वक मशिन हाताळावे लागणार आहे. अँड्राईड ई तिकीट मशिन व चॉर्जर डॅमेज, गहाळ किंवा चोरी झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी वाहकांची राहणार आहे.

आधुनिक अँड्राईड ई तिकीट मशिनमुळे व्यवहार सुटसुटीत होणार आहेत. प्रवाशांचे वाहकांशी सुटटया पैशावरून नेहमी होणारे वादविवाद मिटणार आहेत. सर्वच आगारातील वाहकांना या मशिन देण्यात येणार आहेत.
रोहन पलंगे
विभाग नियंत्रक, सातारा



Source link

Satara Waterfall : कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, ओझर्डे धबधबा प्रवाहित : ABP Majha

0



<p>&nbsp;सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय, गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे ओझर्डे धबधबा प्रवाहित&nbsp;</p>



Source link

Chotya Bayochi Motthi Swapna: ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’मध्ये अनूची एण्ट्री, मालिका रंजक वळणावर

0
Chotya Bayochi Motthi Swapna: ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’मध्ये अनूची एण्ट्री, मालिका रंजक वळणावर



Chotya Bayochi Motthi Swapna Serial Update: अभिनेत्री सुरुची अडारकर ही अनूच्या भूमिकेत दिसणार आहे.



Source link

Prashant Damle: मनोरंजनाची मेजवानी! प्रशांत दामले आणि समीर चौघुलेच्या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

0
Prashant Damle: मनोरंजनाची मेजवानी! प्रशांत दामले आणि समीर चौघुलेच्या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित


प्रसिध्द मराठी कलाकार प्रशांत दामले हे या सीरिजमध्ये प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत. एका काळेचे मणी या सीरिजमध्ये पिढ्यांमधील संघर्षा बरोबरच परंपरागत मध्यमवर्गीय मुल्यांचा अंगिकार करणारे पालक, मुलांची जीवनशैली आणि त्यांचे अपरंपरागत मार्ग चोखाळणे यांच्यातील संघर्ष अधोरेखित करण्यात आला आहे. अतूल केळकर यांनी दिग्दर्शित करण्यात आलेल्या या सीरिजची निर्मिती महेश मांजरेकर, ऋतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर यांनी केली आहे. यामध्ये पौर्णिमा मनोहर, ऋता दुर्गुळे, समीर चौघले आणि विशाखा सुभेदार महत्त्वपूर्ण भुमिकेत आपल्याला दिसणार आहेत.



Source link

Bastar: एक असे सत्य जे तुमची झोप उडवणार; ‘द केरळ स्टोरी’नंतर ‘बस्तर’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Bastar: एक असे सत्य जे तुमची झोप उडवणार; ‘द केरळ स्टोरी’नंतर ‘बस्तर’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला


विपुल शाह यांचा ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र, प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने जगभरात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. आता विपुल शाह यांच्या ‘बस्तर’ या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.



Source link

Aai Kuthe Kay Karte: आशुतोषच्या आनंदच्या क्षणी अरुंधती गैरहजर, वीणाने साधली संधी

0
Aai Kuthe Kay Karte: आशुतोषच्या आनंदच्या क्षणी अरुंधती गैरहजर, वीणाने साधली संधी



Aai Kuthe Kay Karte Serial Update: आशुतोषच्या आनंदाच्या क्षणी अरुंधती नसल्यामुळे वीणा चिडते. ती अरुंधतीला खूप सुनावते.



Source link

Shantabai Kopargaonkar: लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकरांच्या व्हायरल व्हिडीओनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय!

0
Shantabai Kopargaonkar: लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकरांच्या व्हायरल व्हिडीओनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय!


कोपरगावच्या तहसीलदारांनी शांताबाईंना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपये मिळणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांचे रेशनकार्ड पुन्हा ऑनलाईन अपडेट करून अंत्योदय योजनेसह केंद्राकडून कलाकारांना सुविधा व योजनांचा लाभ देण्याची प्रक्रियाही लवकरात लवकर दिली जाईल, असे देखील म्हटले आहे. तसेच, कोपरगाव महापालिका आयुक्तांना घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. शांताबाई यांच्या वैद्यकीय उपचारासाठी सर्वतोपरी मदत करू, असे जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ यांनी सांगितले आहे. शांताबाई कोपरगावकर ७०वर्षांच्या असून, त्यांनी कधीकाळी आपल्या लावणीने लोककला जपली होती.



Source link

सातारच्या मेडिकल कॉलेजसाठी निधी कमी पडू देणार नाही : चंद्रकांत पाटील | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कॉलेज व हॉस्टेलची एकत्र सुविधा मिळावी, अशी मागणी आ. शिवेंद्रराजेंनी केली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बंद खोल्यांच्या डागडुजीसाठी १ कोटींचा निधी दिला जाईल. तसेच साताऱ्याचे मेडिकल कॉलेज सर्वोत्तम होण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कृष्णानगर येथील मेडिकल कॉलेजची पाहणी मंत्री चंद्रकांत पाटील, आ. प्रवीण दरेकर यांनी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पाटील यांनी कॉलेजचे काम गतीने व्हावे यासाठी सूचना केल्या. ठेकेदारांनी कोणत्याही परिस्थितीत काम बंद पाडू नये. स्वतःची बांधकामासाठीची गुंतवणूक वाढवावी. शासन योग्य ती मदत करेल. तसेच कॉलेजच्या भंगार चोरीबाबत चौकशी करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, माजी जि.प. सदस्य संदिप शिंदे, खेडच्या सरपंच लता फरांदे, उपसरपंच चंद्रभागा माने, यांच्यासह खेड ग्रामपंचायतीचे सदस्य, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :











Source link