Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2989

Aanibaani: मनोरंजनासाठी ‘आणीबाणी’चं फर्मान, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

0
Aanibaani: मनोरंजनासाठी ‘आणीबाणी’चं फर्मान, काय आहे प्रकरण? जाणून घ्या


आपल्याकडे कधी काय घडेल याचा नेम नसतो. आता हेच बघा ना आपल्या प्रत्येकाला ‘आणीबाणी’साठी सज्ज होण्याचं फर्मान काढलं आहे. २८ जुलैपासून ही ‘आणीबाणी’ लागू होणार आहे आणि विशेष म्हणजे या ‘आणीबाणी’ला मराठीतल्या काही कलाकारांनी जाहीर पाठींबा दिला आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग असणार आहे.



Source link

Malaika Arora: अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीत मलायकाचा ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर डान्स Video Viral

0
Malaika Arora: अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीत मलायकाचा ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर डान्स Video Viral


अर्जुन आणि मलायका गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीला त्यांनी प्रेमाची कबूली देण्यास नकार दिला होता. मात्र, हळूहळू त्यांचे सतत भेटणे, एकत्र फिरण्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांनी प्रेमाची कबूली दिली आहे. ते लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.



Source link

Avadhoot Gupte: राजसाहेबांनी आता भावाकडे जायला हवं; अवधूत गुप्तेने सांगितली मन की बात

0
Avadhoot Gupte: राजसाहेबांनी आता भावाकडे जायला हवं; अवधूत गुप्तेने सांगितली मन की बात


पुढे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव घेण्यात आले. त्यावर अवधूतने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. ‘मला राज साहेबांचं असं खुपतय, खरं तर मलाच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला खुपतय, माझं त्यांच्यावरचं प्रेम सिद्ध झालय आता त्यामुळे मी थेट सांगू शकतो की महाराष्ट्राला त्यांचं काय खुपतय. जे झालं ते झालं पण आता भावाची समजूत काढायला हरकत नाही. भावाजवळ जायला पाहिजे.प्रेम यात्रा आणि एकत्र यायला पाहिजे दोन भावांनी हे मला खुपतय’ असे अवधूत गुप्ते म्हणाला.



Source link

Suraj Kumar: अभिनेत्याने भीषण अपघातात गमावला उजवा पाय

0
Suraj Kumar: अभिनेत्याने भीषण अपघातात गमावला उजवा पाय


सुरज कुमार हा डॉ. राजकुमार यांच्या पत्नी श्रीमती पर्वतम्मा यांचे पुतणे आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, या अपघातात सूरजच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांना त्याचा उजवा पाय कापावा लागला आहे. अद्याप सुरजची प्रकृती गंभीर आहे. चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.



Source link

Kareena Kapoor: तुझा आणि करीना कपूरचा संबंध काय?; अवधूत गुप्तेने दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

0
Kareena Kapoor: तुझा आणि करीना कपूरचा संबंध काय?; अवधूत गुप्तेने दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष


करीनाला समोर पाहिल्यावर अवधूतला कसे वाटयाचे हे देखील त्याने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. “त्या सर्व पेपरांमध्ये मी नापास व्हायचो. मी पेपर लिहित असताना शेजारच्या बाकावर ती बसली असेल तर काय होणार. त्यावेळी करीना खूप ढोबळी (जाड या अर्थाने) होती. एका बाकड्यावर एकटी जेमतेम मावायची. बाजूच्याला जागाच मिळायची नाही, एवढी ढोबळी होती ती. पण तिचा तो चेहरा, ग्लो, तिचे घारे डोळे आणि एवढ्या मोठ्या गाडीतून ती उतरली की सगळे जण ‘कोण आलं, कोण आलं’ असे म्हणत तिला बघायला थांबायचे” असे अवधूत म्हणाला.



Source link

खोक्यांच्या भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण; खा. संजय राऊत यांचा घणाघात | पुढारी

0









पुढारी ऑनलाईन डेस्क : बाळासाहेब देसाई यांची महाराष्ट्राला लोकनेता म्हणून ओळख होती. मात्र शंभूराज देसाई यांना कधीच लोकनेता होता येणार नाही. ते फेक नेते आहेत, अशी जहरी टीका करत खोक्याचा जो भूकंप झाला त्याचा केंद्रबिंदू पाटण आहे, असा घणाघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केला.

मल्हारपेठ (ता. पाटण) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे- आदींची प्रमुख उपस्थिती होती.

खा. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राला बाळासाहेब देसाई यांची ओळख लोकनेते म्हणून होती आणि राहील. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचा अत्यंत घरोबा होता. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब देसाई हे खंबीरपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले होते. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांची संघटना, मराठी अस्मितेसाठी काम करणारी शिवसेना, मुंबई राहायला पाहिजे, वाढायला पाहिजे. सातारा, पाटण भागातला तिकडे काम करणारा कष्टकरी मराठी माणूस आहे.

मराठी माणूस मुंबईत टिकला पाहिजे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. आपण शिवसेनेच्या मागे उभे राहिला पाहिजे. मात्र शंभूराज देसाईंना कधीच लोकनेता होता येणार नाही.

खोक्याचा जो भूकंप झाला त्याचा केंद्रबिंदू पाटण आहे. महाराष्ट्रात भूकंप झाला की अगोदर पाटणला केंद्रबिंदू शोधला जातो आणि त्याचे केंद्र पाटणच्या आसपासच असते. अनेक धक्के पचवत पाटण, सातारा उभा राहिला आहे. त्यामुळे येथील जनतेला धक्क्याचे फार काही वाटत नाही. हा कसला धक्का आहे. त्याच्यापेक्षा आमच्या मुंबईतील भाऊचा धक्का चांगला आहे. २०२४ ला सर्व हिशोब पूर्ण केला जाईल.











Source link

Bigg Boss OTT 2: जिया शंकरसोबत झाला वाद! ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून बाहेर पडणार आलिया सिद्दिकी?

0
Bigg Boss OTT 2: जिया शंकरसोबत झाला वाद! ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून बाहेर पडणार आलिया सिद्दिकी?


स्पर्धक पुनीत सुपरस्टार आणि पलक पुरस्वानी हे दोघेही ‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरातून अवघ्या एका आठवड्यातच बेघर झाले आहेत. अविनाश सचदेव, बाबिका धुर्वे, जिया शंकर, आलिया सिद्दीकी, फलक नाझ, आकांक्षा पुरी, जेडी हदीद, सायरस ब्रोचा, मनीषा राणी, अभिषेक मल्हान आणि पूजा भट्ट हे ११ स्पर्धक अद्याप ‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरात कैद आहेत.



Source link

सातारा : चार मृत महिलांवर एकत्रितपणे अंत्यसंस्कार; अखेरच्या श्वासापर्यंत जपला पैरा | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  कारंडवाडीतील चार महिलांवर शनिवारी सायंकाळी काळाने घाला घातला. शेतात पैर्‍यावर कामासाठी गेलेल्या वृद्ध महिलांचा कालव्यात ट्रॉली पलटी झाल्याने मृत्यू झाला. या घटनेने शोकसागरात बुडालेली कारंडवाडी अद्यापही सावरलेली नाही. मृत चारही महिलांवर रविवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नेहमी शेतात पैरा पद्धतीने काम करणार्‍या या चौघींनी अखेरच्या श्वासापर्यंत हा पैरा जपला.

कारंडवाडी हे सातारा शहरापासून अवघ्या 8 ते 10 कि.मी. वर असलेले गाव. सुमारे 900 उंबरठा असलेल्या या गावची लोकसंख्या साडेतीन हजाराच्या आसपास आहे. शेती व एमआयडीसी हे येथील लोकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन. या गावासाठी शनिवार हा घातवार ठरला. अरूणा शंकर साळुंखे (वय 58), लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय 60), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय 65) व उल्का भरत माने (वय 55) या चौघींजणी अन्य सहकारी महिलांसोबत शनिवारी शेतात कामाला गेल्या होत्या. सायंकाळी पावसाने जोर धरल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीमधून त्या घरी परत येत होत्या. त्यावेळी महाडिक कॉलनीजवळ ट्रॉली कालव्यात पलटी झाली अन् या चारही महिलांना काळाने हिरावून नेले.

या घटनेची माहिती कळताच आख्खं गाव घटनास्थळी लोटलं. या महिलांचे मृतदेह पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारे येत होते. कुटुंबिय व नातेवाईकांचे अश्रू काहीकेल्या थांबत नव्हते. अवघी कारंडवाडी शोकसागरात बुडाली. रविवारीही गावात निरव शांतता पसरली होती. शोकाकूल वातावरणातच मृत चारही महिलांवर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चौघींनाही एकाचवेळी अशा पद्धतीने अखेरचा निरोप देण्याची वेळ आल्याने अनेकांना हुंदका आवरत नव्हता.

सकाळी शेतात जाताना…

शेतात पैरा पद्धतीने काम करत एकमेकींसोबत राहण्याची त्यांची नित्याचीच सवय होती. मात्र, शनिवारी त्यांचा पैरा अखेरचा ठरला. सकाळी शेतात जाताना त्यांना माहितही नव्हते की आज पैर्‍याचा अखेरचा दिवस असेल. एका दुर्घटनेने त्यांना एकाचवेळी कायमचे हिरावून नेले.











Source link

Ajay Devgn: ‘जंगली रम्मी खेळून किती पैसे कमावलेत?’; नांदेडच्या तरुणाचं थेट अजय देवगणला पत्र!

0
Ajay Devgn: ‘जंगली रम्मी खेळून किती पैसे कमावलेत?’; नांदेडच्या तरुणाचं थेट अजय देवगणला पत्र!


नवतरूणांना हे जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत. याच गेमला काही राज्यात बंदी आहे, आपण मात्र बिनधास्त जाहिरात करता. महाराष्ट्रातील तरूणांना हा जंगली रम्मी गेम किती फायद्याचा आहे, हे पण आपण सांगितले पाहिजे. आणि हाच गेम तुमच्या आजुबाजूचे किती मान्यवर खेळतात, हे पण आपण पाहीले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील नवतरूणांना चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही अशा जाहिराती करून नवतरूणांना काय संदेश देत आहात, हे पण सांगितले पाहिजे. फक्त जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश असेल, तर हाच उद्देश किती योग्य आहे? या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा व आपण ही जाहिरात बंद करावी. तसेच नवतरूणांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावे ही विनंती.’



Source link

गद्दारीचे खरे कारण खोकेच : संजय राऊत | पुढारी

0









ढेबेवाडी; पुढारी वृत्तसेवा :  जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त करत आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ; पण फौजदाराचा हवालदार म्हणून नाही. अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह गद्दार आमदारांनी गद्दारीचे खरे कारण अजूनही सांगितले नसून, केवळ खोक्यांसाठी शिवसेनेसोबत त्या सर्वांनी गद्दारी केल्याचा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

गुढे (तळमावले, ता. पाटण) येथील गणेश मंगल कार्यालयात पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षल कदम, सचिन मोहिते, तालुकाध्यक्ष सचिन आचरे यांच्या उपस्थितीत खासदार संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.

खासदार संजय राऊत यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार, भाजपाचे नेते यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यात पंढरपूरला एक आणि मुंबईत मातोश्रीमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने दोन विठ्ठल आहेत. 40 गद्दार आमदारांपैकी एकही विधानसभा निवडणुकीत विजयी होणार नाही. शंभूराज देसाई यांना लाल दिवा प्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी तर दुसर्‍यांदा उद्धव ठाकरे यांनी दिला. मात्र त्यानंतरही गद्दारी करून सरकार पाडल्याने त्यांना शिवसेनेत कधीही थारा मिळणार नाही.

गद्दारांचे सरकार आल्यापासून राज्यातील उद्योग गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रापेक्षा गुजरातचेच हित अधिक पाहिले जात आहे. शिवसेना 40 गद्दारांना देण्याचे पाप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. मात्र बचेंगे तो और भी लढेंगे असे सांगत आम्ही केवळ लढणार नाही, तर तुम्हाला खतम करून जिंकणार हा शिवसेनेचा इतिहास आहे, हे लक्षात ठेवा असा इशाराही खा. राऊत यांनी यावेळी दिला.

स्व. लोकनेेते बाळासाहेब देसाई यांनी शिवसेना स्थापनेपासून शिवसेनेला सहकार्य केले. त्यांनी कधीही गद्दारी केली नाही आणि आयुष्यभर निष्ठा जोपासली. मात्र त्यांच्याच घराण्यात शिवसेना फोडणारा गद्दार आहे, हे पाटण तालुक्याचे दुर्दैव आहे. विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिक त्यांचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी नितीन बानुगडे-पाटील, हर्षल कदम यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले.











Source link