Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2990

सातारा : सकाळी जोरदार; दुपारनंतर भुरभुर | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातार्‍यात मान्सूनने एंट्री केली असली तरी दुसर्‍या दिवशी सकाळी कोसळलेल्या सरी दुपारनंतर गायब झाल्या. अधूनमधून भुरभुर राहिली. दरम्यान, शेतकरी दमदार पावसाची चातकासारखी वाट पाहत असून ढगांनी अच्छादलेले आभाळ धो धो कोसळेल व पाण्याची चिंता मिटेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहे.

सुमारे महिनाभर ओढ दिलेल्या पावसाने शनिवारी दुपारपासूनच जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. या पावसामुळे कमाल तापमानात घट झाली होती. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम होते. दुपारी पावसाच्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. त्यानंतर मात्र मोठ्या सरी आल्याच नाहीत. मात्र बाजाराचा दिवस असल्याने अधूनमधून पडणार्‍या पावसामुळे व्यापार्‍यासह नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्याच्या सातारा, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची रिमझिम सुरू होती. धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप होती.

महाबळेश्वरला जोर

महाबळेश्वरमध्ये पावसाचा काहीसा जोर पाहायला मिळाला. जिल्ह्यात रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पडलेल्या 24 तासांत महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 60.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 20.9 मि.मी., जावली 26.9 मि.मी., पाटण 14.3 मि.मी., कराड 5.1 मि.मी., कोरेगाव 25.8 मि.मी. खटाव 13.0 मि.मी., माण 24.1 मि.मी., फलटण 11.8 मि.मी., खंडाळा 19.5 मि.मी., वाई 17.1 मि.मी., अशी पावसाची नोंद झाली आहे.











Source link

Dha Lekacha: सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाल्याचा खडतर प्रवास; विठूरायाच्या चरणी ‘ढ लेकाचा’चे पोस्टर प्रदर्शन!

0
Dha Lekacha: सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाल्याचा खडतर प्रवास; विठूरायाच्या चरणी ‘ढ लेकाचा’चे पोस्टर प्रदर्शन!


Dha Lekacha Poster Launching: नवोदित बालकलाकार आयुष उलागड्डेच्या चेहऱ्यावरील विलक्षण भावमुद्राभिनय पाहून रसिक प्रेक्षकांना ‘ढ लेकाचा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे.



Source link

सातारा : ‘बांटा’ गोळी करतेय गुन्हेगारीकडे प्रवृत्त; नशेमुळे जीव घेण्यापर्यंत मजल | पुढारी

0









विठ्ठल हेंद्रे

सातारा :  अल्पवयीन मुले व गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक ‘बांटा’ ही गांजाची गोळी सेवन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गोळीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असून जीव घेण्यापर्यंत नशेबाजांची मजल जात असल्याने ही बाब चिंतेची आहे. 100 रु. पासून या गोळ्यांची किंमत असून त्या सातार्‍यासह अन्यत्रही चोरीचुपके उपलब्ध होत आहे.

सातार्‍यासह अनेक ठिकाणी छुप्या पध्दतीने गांजाची सर्रास विक्री होत असते. गुन्हेगारांकडून अमली पदार्थाचे सेवन केले जात असून गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी लागणारे डेअरिंग अमली पदार्थाचे सेवन केल्यावर येत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. व्हाईटनर, दारू यापेक्षा गांजाची ‘बांटा’ गोळी खाल्ल्यानंतर अधिक डेअरिंग येते, असा समज युवकांमध्ये वाढत आहे. त्यामुळे गांजाची बांटा गोळी सध्या सातार्‍यात तेजीत असल्याचे वास्तव आहे. ही गोळी खाल्यानंतर सुमारे तासाभरात संबंधिताची मती गुंग होते. ही गोळी खाणार्‍याला आपण काय करतो हे कळत नाही. गोळी खाल्ल्यानंतर येणार्‍या नशेतून गुन्हेगारीकडे कल वाढत असल्याचे समोर आले आहे.
गांजाची गोळी ऐवजी बांटा गोळी हा कोडवर्ड म्हणून वापरण्यास गुन्हेगारांना सोयीचा असल्याची चर्चा आहे. या गोळीबाबत अधिकृत काहीही माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे पोलिस यंत्रणेपुढेही आव्हान उभे राहिले आहे.

पोलिस तपासातही ‘मोडस’ ओपन..

सातारा शहरातील वाढत्या गुन्हेगारीला बांटा गोळीचा हातभार लागला आहे. गुन्हेगारी घटना घडल्यानंतर पोलिस बदमाशांना पकडत आहेत. संशयितांकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर बांटा गोळीच्या नशेमध्ये असल्याने त्यातून कृत्य केल्याची कबुली दिली जात आहे. नशेबाबत पोलिसांनी अधिक माहिती घेतल्यानंतर गांजाची बांटा गोळी घेतली गेली जात असल्याचेही समोर आले आहे. ही गोळी खाल्ल्यानंतर किमान 48 तास नशेचा प्रभाव राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, बांटा गोळीची बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथे क्रेझ असल्याची चर्चा आहे.

गांजापासून तयार होतेय गोळी…

बांटा गोळी ही केमिकल विरहीत असल्याचे गुन्हेगारी क्षेत्रातून सांगण्यात येतेे. ओल्या गांजाच्या पुडीपासून त्याचे मिश्रण बनवून बांटा गोळी तयार केली जात आहे. ही गोळी पाणी, दूध, ज्युस यामध्ये मिक्स करून तसेच जिभेच्या टाळ्याखाली ठेवूनही थेट घेतली जात आहे. या गोळ्या टपर्‍यांसह गुन्हेगारी वर्तुळात असणार्‍यांकडे उपलब्ध होत असल्याची माहिती मिळत आहे.











Source link

Shah Rukh Khan: शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये पूर्ण केली ३१ वर्ष! चाहत्यांनी विचारले भन्नाट प्रश्न…

0
Shah Rukh Khan: शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये पूर्ण केली ३१ वर्ष! चाहत्यांनी विचारले भन्नाट प्रश्न…


या खास प्रसंगी शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांसाठी ‘आस्क मी सेशन’चे आयोजन केले होते. यावेळी शाहरुख खानच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले, ज्याची उत्तरेही किंग खानने अतिशय मजेशीर दिली आहेत. आस्क मी सेशन सुरू करताना शाहरुखने लिहिले की, ‘वाह, दिवाना प्रदर्शित होऊन आज ३१ वर्षे पूर्ण झाली. खूप छान होता हा प्रवास… सर्वांचे आभार आणि आता आपण ३१ मिनिटांसाठी#AskSRK करूया?’



Source link

Mahesh Babu: साऊथ सुपरस्टार महेश बाबूने खरेदी केली आलिशान ‘सोनेरी’ कार; किंमत ऐकून व्हाल हैराण!

0
Mahesh Babu: साऊथ सुपरस्टार महेश बाबूने खरेदी केली आलिशान ‘सोनेरी’ कार; किंमत ऐकून व्हाल हैराण!


सध्या महेश बाबू त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. महेश बाबू दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्यासोबत ‘गुंटूर करम’ नावाच्या आगामी चित्रपटात काम करत आहेत. कलाकार, क्रू, क्रिएटिव्ह मतभेद आणि इतर अनेक कारणांमुळे हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री पूजा हेगडे आणि संगीतकार एस थमन यांनी या चित्रपटातून आता काढता पाय घेतला आहे. मात्र, अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शूटिंग, स्क्रिप्ट आणि बऱ्याच काही गोष्टी बदलल्यामुळे पूजा हेगडेने हा चित्रपट सोडल्याचे समोर येत आहे.आता या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून संयुक्ता आणि मीनाक्षी चौधरी यांच्या नावांचा विचार केला जात आहे.



Source link

Bal Gandharva Birth Anniversary: अवघ्या १८व्या वर्षी ‘शकुंतला’ बनून रंगमंच गाजवणारे बाल गंधर्व! वाचा…

0
Bal Gandharva Birth Anniversary: अवघ्या १८व्या वर्षी ‘शकुंतला’ बनून रंगमंच गाजवणारे बाल गंधर्व! वाचा…


१९०६मध्ये वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी ते आपल्या पहिल्याच नाटकात ‘शकुंतला’च्या रूपात रंगमंचावर पोहोचले, तेव्हा त्यांना पाहून सगळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. नाजूक हातांनी पदर ओढणे, चेहऱ्यावरील हावभाव आणि स्त्री सुलभ लज्जेचा भाव.. त्यांनी स्त्री पात्र इतक्या ताकदीने साकारले की, पाहणारा प्रत्येक व्यक्ती प्रथमदर्शनी फसला. ‘सौभद्रा’, ‘मान-अपमान’, ‘विद्याहरण’ आणि ‘स्वयंवर’ यांसारख्या डझनभर नाटकांमध्ये त्यांनी कधी नंदिनी, कधी सुभद्रा, भामिनी तर कधी देवयानी आणि रुक्मिणी बनून लोकांची मने जिंकली.



Source link

भाजपमध्ये सातारा जिल्हा जिंकण्याचा दम नाही : शशिकांत शिंदे | पुढारी

0


उंब्रज;  पुढारी वृत्तसेवा :  सातारा जिल्हा स्वाभिमानी आहे, व तो राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे. त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. दरम्यान, सातारा जिल्हा जिंकण्याचा दम भाजपमध्ये नाही असे सूचक विधान आ.शिंदे यांनी केले.

उंब्रज तालुका कराड येथे राष्ट्रवादीच्या बूथ कमिटी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील, आ. अरुण लाड, राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, तालुकाध्यक्ष देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, शहाजीराव क्षीरसागर, सौ.संगीता साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आ. शशिकांत शिंदे यांनी माण खटाव मतदार संघात भाजपच्या दिग्गजांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत, हिम्मत असेल तर भाजपने भाजपचा कार्यकर्ता असलेली व्यक्ती निवडणुकीसाठी उभी करावी. तसेच विदर्भ व मराठवाड्याचा अनुषेश भरून काढावा असे आवाहन केले. तसेच बूथ कमिटी कागदावर कार्यरत न राहता प्रत्यक्ष कार्यरत असण्यासाठी बूथ कमिटीची योग्य बांधणी करावी, असे सांगितले.

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात आंदोलन करण्यासाठी पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता रस्त्यावर उतरले पाहिजे. तसेच बूथ कमेटी स्थापन करताना कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून काम करणे गरजेचे आहे.
सारंग पाटील म्हणाले, बूथ कमिटीचे पदाधिकारी यांनी बूथमधील मतदारांच्या प्रत्यक्ष आकडेवारीचा अभ्यास केल्यास निवडणुकीतील विजय सोपा होणार आहे.

यावेळी आ. अरुण लाड, देवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कराड उत्तर मधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक देवराज पाटील यांनी केले. आभार माजी पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. प्रमोद पुजारी यांनी मानले.

हे कमिशन सरकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार हे कमिशन सरकार आहे. शासन आपल्या दारी या शासनाच्या योजनेतून सर्वसामान्य जनतेला काहीच मिळाले नसल्याची टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी केली.



Source link

Arjun Kapoor Birthday: मलायकाच नव्हे, बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं होतं अर्जुन कपूरचं नाव!

0
Arjun Kapoor Birthday: मलायकाच नव्हे, बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं होतं अर्जुन कपूरचं नाव!


अथिया शेट्टी

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची लेक अथिया शेट्टी हिच्यासोबत अर्जुन कपूर याचे नाव जोडले गेले होते. अर्जुनच्या पहिल्याच चित्रपटानंतर अथिया आणि अर्जुन एकत्र पार्टी करताना आणि धमाल करताना दिसले होते. यानंतर दोघांचे नाव एकमेकांशी जोडले जाऊ लागले. मात्र, अथिया ही आपल्या बहिणीची मैत्रीण असून, आमच्यात देखील मैत्रीपेक्षा अधिकचे नाते नाही, असे स्पष्टीकरण अर्जुन कपूर याने दिले होते.



Source link

मुख्यमंत्री शिंदेंसह सहकारी भाजपचे भाडोत्री सैन्य : संजय राऊत | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा :  रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर त्यांचे भाडोत्री वॅगनर सैन्य उलटले आहे. त्याचप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी म्हणजे भाजपचे भाडोत्री सैन्य आहे. भाडोत्री सैन्य कोणाचेच नसते. त्यामुळे हे भाडोत्री सैन्य भाजपवरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत आणि त्यानंतर गुढे येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.

आमचे शिवसैनिक बालकमंत्री म्हणून हिणवत असलेले सातार्‍याचे पालकमंत्री मालकमंत्र्यांप्रमाणे वागत आहेत. मीच मालक, मी म्हणेल तसेच होईल, अशी हुकूमशाही दिल्लीत चालली नाही, त्याचप्रमाणे गल्लीतही चालणार नाही, असे राऊत म्हणाले. शंभूराज देसाई हे आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे पराभूत होतील, असे भाकित त्यांनी केले.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. 40 गद्दार आमदारांपैकी एकही विधानसभा निवडणुकीत विजयी होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

जेसीबी देतो, औरंग्याची कबर उखडणार का?

हिंदुत्वाचे रखवालदार असणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यापूर्वी औरंग्याची कबर उखडून टाकतो असे म्हणाले होते. आता आम्ही जेसीबी देतो, औरंग्याची कबर उखडणार का? असा सवाल त्यांनी केला. औरंग्यासमोर कोणीही गुडघे टेकू नयेत, ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.











Source link

सातारा : मैत्रिणीला बंदूक दाखवताना मिस फायर | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : औद्योगिक वसाहत येथील समर्थनगर परिसरात मैत्रिणीला बंदूक दाखवताना बंदूक अचानक मिस फायर झाली. भरदिवसा घडलेल्‍या घटनेनंतर परिसर हादरुन गेला.

या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्‍याच्याकडून बंदूक व ४ जिवंत काडतुसे जप्‍त केली आहेत. दरम्‍यान, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याप्ररणी शहर पोलिसांनी प्रतापसिंहनगर येथील संशयिताला ताब्यात घेतले आहे. नेताजी तानाजी बोकेफोडे (वय २५, रा.प्रतापसिंहनगर) असे ताब्यात घेतलेल्‍या संशयित आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा;











Source link