Thursday, August 20, 2026
Homeसातारासातारा येथे ५४४ कोटींचा गुंतवणूक प्रकल्प | पुढारी

सातारा येथे ५४४ कोटींचा गुंतवणूक प्रकल्प | पुढारी

सातारा येथे ५४४ कोटींचा गुंतवणूक प्रकल्प | पुढारी

[ad_1]

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप होत असताना बुधवारी पार पडलेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत 40 हजार कोटी रुपयांच्या विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. हे प्रकल्प सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई या भागांत होणार आहेत. यामुळे सुमारे 1 लाख 20 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. विप्रो परी रोबोटिक्स कंपनीचा 544 कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प सातारा येथे होणार आहे.

या गुंतवणुकीत पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे देशातील पहिल्या सुमारे 12 हजार 482 कोटींच्या इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरीनिर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. नवी मुंबईच्या महापे येथे होणार्‍या जेम्स अँड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर दिली.

पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे गोगोरो इंडिया प्रा. लि. कंपनीमार्फत इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरीनिर्मिती तसेच स्वॅपिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करण्यात येणार आहे. हा देशातील पहिला प्रकल्प ठरणार असून, त्याला अतिविशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली. गोगोरो संपूर्ण महाराष्ट्रात आगामी काळात सुमारे 12 हजार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स स्थापन करणार आहे. त्यामुळे राज्यात इलेक्ट्रिक व्हेईकल पायाभूत सुविधा आणि ई.व्ही.च्या वापराला चालना मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे इलेक्ट्रिक व्हेईकल्स आणि बॅटरीनिर्मिती करणार्‍या इथर एनर्जी कंपनीद्वारे 865 कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. इथर एनर्जी ही भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांपैकी एक आहे. जी प्रगत आणि कनेक्टेड इलेक्ट्रिक दुचाकी बनवते. या प्रकल्पामुळे राज्यामध्ये पुरवठादार इको-सिस्टीम स्थापन होण्यास मदत होणार आहे.

पुणे येथे देशातील पहिल्या ई-बसनिर्मितीच्या 776 कोटी गुंतवणुकीच्या पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि. या घटकाच्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली. पुणे येथे पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स या घटकाकडून भारतातील तांत्रिकद़ृष्ट्या सर्वात प्रगत व्यावसायिक इलेक्ट्रिक आणि सदर हायड्रोजन इंधन-सेल वाहननिर्मिती सुविधा उभारण्यात येणार आहेत. इलेक्ट्रिक व्हेईकल आणि नवीन ऊर्जेवरील वाहने पुढील दशकात देशातील उत्पादन उद्योगात सर्वात मोठे योगदान देणार आहे. या घटकामार्फत उभारला जाणारा प्रकल्प पुणे येथे इलेक्ट्रिक व्हेईकल आणि हायड्रोजन हब बनू शकतो.

रायगड येथे परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीचा 2 हजार 700 कोटी गुंतवणूक प्रकल्प, 2 हजार 33 कोटी गुंतवणुकीच्या स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज कंपनीचा प्रकल्प रायगड येथे, जनरल पॉलिफिल्मस् कंपनीचा 500 कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प नंदुरबार येथे, विप्रो परी रोबोटिक्स कंपनीचा 544 कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प सातारा येथे, तर 110 कोटी गुंतवणुकीचा गणराज इस्पात कंपनीचा प्रकल्प अहमदनगर येथे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

जेम्स अँड ज्वेलरी आर्ट प्रमोशन कौन्सिलद्वारे नवी मुंबई येथील महापे येथे स्थापित होणार्‍या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्प म्हणून दर्जा देण्यात आला. सुमारे 21 एकर जागेवर इंडिया ज्वेलरी पार्क होणार आहे. 1 हजार 354 औद्योगिक आणि व्यापारी आस्थापना या ठिकाणी सुरू होतील.

जेम्स अँड ज्वेलरी उत्पादनांची निर्यातीला चालना

महाराष्ट्रात रत्ने आणि आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्यासाठी तसेच गुंतवणूक, उत्पादन, रोजगार, व्यापार आणि निर्यात यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण 20 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सुमारे 1 लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. यामुळे जागतिकस्तरावर जेम्स अँड ज्वेलरी उत्पादनांची निर्यात वाढण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून, प्रस्तावित इंडिया ज्वेलरी पार्क प्रकल्पांतर्गत जोड प्रकल्प म्हणून वेगाने विकसित होत असलेल्या लॅब ग्रोन डायमंड उद्योगावर विशेष भर देण्यात येणार आहे. त्याद्वारे मेगा पार्क फॉर लॅब ग्रोन डायमंडस् विकसित करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments