
Satvya Mulichi Satavi Mulgi Latest Update: अद्वैत-नेत्राचं लग्न रहस्यमय वळणावर आलं असून, अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाचं रहस्य काय असणार आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Satvya Mulichi Satavi Mulgi Latest Update: अद्वैत-नेत्राचं लग्न रहस्यमय वळणावर आलं असून, अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाचं रहस्य काय असणार आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेता प्रभास याने ‘राघव’ ही भूमिका साकारली आहे. तर, अभिनेत्री क्रिती सेनन ‘माता जानकी’, अभिनेता सनी सिंह ‘लक्ष्मण’ आणि देवदत्त नागे ‘हनुमान’ ही पात्र साकारली आहेत. सैफ अली खान यात ‘लंकेश’ अर्थात रावणाच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले आहे.

बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. यामुळेच चित्रपटाच्या म्युझिक राईट्सनी भरपूर कमाई केली आहे. बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार, दिग्दर्शक अॅटली कुमार आणि शाहरुख खान लवकरच सोशल मीडियावर या बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपटाचा टीझर रिलीज करणार आहेत. मात्र, याच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृत्तानुसार, जवानचा टीझर ७ जुलै किंवा १५ जुलै रोजी रिलीज होऊ शकतो.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : छातीत दुखत असेल तर हृदय शल्य विशारद ‘इको टुडी’ काढून दुखर्या हृदयावर निदान करतात. सातारा जिल्ह्याचेही तसेच घडले आहे. विकासाच्या प्रक्रियेपासून सातारा जिल्हा अन्य प्रगत जिल्ह्यांच्या तुलनेत मागे आहे. उपक्रमशील, संवेदनशील व नावीन्याचा ध्यास असलेले आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून त्यामुळेच सातारा जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहेत. शनिवारी त्यांची विकासासंदर्भात पत्रकार परिषदही होत आहे. हेच डुडी सातारा जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासाचा काढतील का इको टुडी? असा सवाल जिल्हावासियांनी विचारला आहे.
सातारा जिल्हाधिकार्यांची मोठी परंपरा आहे. या जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात विकासकामे राबवताना आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवला आहे. त्यांनी केलेली कामे आजही जिल्हावासियांच्या स्मरणात आहेत. जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीत अलिकडच्या काळात राबवलेल्या योजना, प्रकल्प व इतर इतर विकासकामांना गती देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पाणीप्रकल्प असले तरी कालव्यांची कामे रखडल्याने हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाविना आहे. तांत्रिक बाबींमुळे अडकलेली कामे सुरू होणे आवश्यक आहे. पाणीप्रकल्पांच्या अनुषंगाने जिल्ह्यात पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्याने राज्यात चमकदार कामगिरी केली होती.
आता ही योजना राज्य सरकारने पुन्हा सुरू केली असून 200 हून अधिक गावांमध्ये हे अभियान पुन्हा राबवण्यात येणार आहे. ही योजना पूर्वी प्रमाणेच ताकदीने राबवणे आवश्यक आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण शेंद्रेपासून रखडलेले आहे. याच अनुषंगाने खांबाटकी बोगद्याच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. पालखी महामार्गालगत वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष झाले आहे. अशी परिस्थिती इतर महामार्गाबाबतही आहे. नियोजित ग्रीन फील्ड महामार्गाचे काम सुरू होणार असल्याने त्यानुषंगाने निर्माण होणार्या समस्या आणि उपायांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
जिल्ह्यातील विविधतेचा विचार करून पर्यटनाला चालना देणे आवश्यक आहे. कोयना बॅक वॉटरवर नियोजित जलपर्यटन आराखड्याला मंजुरी देत राज्य शासनाने 50 कोटी निधींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. हा प्रकल्प झाल्यास बामणोली परिसरात पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना उद्योग, व्यवसाय उपलब्ध होणार आहे. महाबळेश्वर बाजारपेठेसाठीही सुमारे 50 कोटींचा निधी मंजूर झाला. बाजारपेठेच्या विकासाच्या अनुषंगाने कामे सुरू आहेत.
जिल्ह्याला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा आहे. या जिल्ह्यात किल्ले, राजवाडे, प्राचीन मंदिरे, लेणी आहेत. हा ऐतिहासिक ऐवज जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रतापगड किल्ल्याचा 200 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. किल्ल्यांच्या विकासाच्या अनुषंगाने दुर्लक्ष झाले आहे. इतर ऐतिहासिक वास्तूंना झळाळी देणे गरजेचे आहे. मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले असले तरी कामास अपेक्षित गती नाही.
जिल्ह्यात महामार्ग, रस्ते यांचे जाळे असले तरी अपेक्षेप्रमाणे औद्योगिक वसाहतींचा विकास झालेला नाही. नव्या एमआयडींसींची उभारणी आवश्यक आहे. जिल्ह्यात येणार्या जिल्हाधिकार्यांनी स्वत:च्या कल्पकतेतून, दूरदृष्टी ठेवून जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडेही हे गुण आहेत. त्यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवे प्रयोग राबवले आणि ते यशस्वीही करून दाखवले. त्यांनी राबवलेल्या मॉडेल स्कूल, स्मार्ट पीएचसी (प्राथमिक आरोग्य केंद्र), अंकुर अंगणवाडी या उपक्रमांची दखल शासनानेही घेतली. सांगलीत त्यांनी राबवलेले प्रयोग सातार्यातही राबवणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात 2 हजार 710 प्राथमिक शाळा आणि 84 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार्या या सरकारी शाळांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू लागल्याने त्यामध्ये नाविण्यपूर्ण बदल घडवण्याची आवश्यकता आहे. सातारा जिल्हा गुणवंत विद्यार्थ्यांची खाण आहे. मात्र करिअरच्यादृष्टीने जिल्ह्यात तितकीशी साधने नाहीत. स्पर्धा परीक्षेकडे जिल्ह्यातील मुलामुलींचा ओढा आहे. दरवर्षी युपीएससी, एमपीएससीमध्ये विद्यार्थी चमकतात. घरच्या गरीबीमुळे बर्याचजणांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अर्ध्यावरच सोडावा लागतो. स्पर्धा परीक्षेचे सर्व टप्पे पार करून मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्याला शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळावी, यादृष्टीने मदत व्हावे, अशीही मागणी आहे. जिल्ह्यात अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
कांदाटी खोर्यातील 16 गावांचा विकास होणे आवश्यक आहे. कोयना बॅक वॉटरवर तापोळा परिसरात उभारण्यात येणारा पूल हा पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. या पुलाच्या कामामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार आहे. या कामाला गती देणे आवश्यक आहे. महाबळेश्वर तालुक्यातील नियोजित सोळशी धरणाचा प्राथमिक सर्व्हे सुरू आहे. हे सर्व प्रकल्प मुख्यमंत्र्यांचे महत्त्वांकाक्षी प्रकल्प आहेत. कांदाटी खोर्याच्या विकासाच्यादृष्टीने असलेले मागासलेपण दूर करणे आवश्यक आहे.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली.”
परळी; पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वांत उंच असलेला भांबवली धबधबा फेसाळू लागला आहे. हा धबधबा तीन टप्प्यात पडत असून, पर्यटकांची या धबधब्याकडे पावले वळू लागली आहेत. घनदाट जंगल व धुक्याच्या दुलईतून पर्यटक वाट काढत पांढरा शुभ्र फेसाळणार्या भांबवली धबधब्याला पाहण्याचा आनंद लूटत आहेत. गेल्या काही वर्षांपासून भांबवली धबधबा हा पर्यटकांना आकर्षित करत आहे.
विशेष म्हणजे हा धबधबा काही वर्षांपूर्वी जास्त चर्चेत नव्हता, कारण या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी सुरक्षित मार्ग नव्हता. अलीकडे वन विभाग आणि स्थानिक भांबवली वन समिती यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हा धबधबा पाहण्यासाठी जांभ्या दगडाचा पायरी मार्ग तसेच धबधबा पाहण्यासाठी सुरक्षित जागा केल्यामुळे हा धबधबा पावसाळी पर्यटनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण ठरले आहे. या ठिकाणची घनदाट, झाडी पक्ष्यांचा किलबिलाट, वन्यप्राण्यांचा वावर यासह येथील अल्लाददायक वातावरण म्हणजेच सतत पाऊस आणि दाट धुके त्यामुळे या परिसरात जायचे म्हणजे पावसात भिजण्याची मनोमन तयारी असायलाच हवी. सातारा शहरातून कास पठार व तिथून पुढे गेल्यावर कास तलावच्या पुढे तांबी हे गाव लागते. तांबी गावातून खाली दोन किलोमीटर अंतरावर भांबवली हे गाव आहे. या ठिकाणी वाहन तळावर वाहने लावून पर्यटकांना पायी भांबवली धबधब्या पर्यंत पोहोचता येते.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील टंचाईसदृश तालुक्यांतील 210 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान 0.2 राबवण्यात येणार आहे. अटल भूजल योजनेतील 70 गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. जिल्हा मृद व जलसंधारण विभागाकडून राबवण्यात येणार्या या अभियानाद्वारे शिवार फेर्या घेण्यात आल्या आहेत. लवकरच जलसंधारण कामांना सुरूवात करण्यात येणार आहे.
पावसाची अनियमितता व पावसातील खंड, त्यामुळे पाणीटंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होतो. त्यातच सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची व्याप्ती, हलक्या जमिनीचे जादा प्रमाण यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या प्रमुख बाबींचा विचार करून टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी 2015 ते 2019 यादरम्यान राज्य शासनाने जलयक्त शिवार अभियान राबवले. या अभियानाची सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. या अभियानामुळे बहुतांश गावे जलस्वयंपूर्ण झाली. हे अभियान यशस्वी करण्यात त्या-त्या काळातील जिल्हाधिकार्यांनी मोठे योगदान दिले. जिल्हा प्रशासनाने हिरिरीने सहभाग घेतल्याने जलयुक्त शिवार अभियान ही लोकचळवळ बनवली.
या अभियानाचे चांगले परिणाम दिसून येत असले तरी झालेल्या कामांची देखभाल करणेही आवश्यक आहे. त्यादृष्टी राज्य शासनाने पुन्हा राबवलेले जलयुक्त शिवार अभियान 2.0 हे महत्त्वाचे ठरणारे आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाच्या सर्व योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांमध्ये झालेल्या कामांची देखभाल व दुरुस्ती करणे, मूलस्थानी जलसंधारणाचे उपचार राबवणे, सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढवणे, पाण्याच्या ताळेबंदाच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढवणे अशा उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. त्याशिवाय पाणी अडवून भूजल पातळी संरक्षित करणे, विकेंद्रित जलसाठे निर्माण करणे, पिकांसाठी संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे, जुन्या जलस्रोतांची साठवण व देखभाल करणे आदि कामे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 130 गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र अटल भूजल योजनेतील 70 गावांचाही या अभियानात समावेश करण्यात आला आहे. या अभियानात समाविष्ट गावांमध्ये शिवार फेर्या झाल्या असून तंत्रशुद्ध आराखडे तयार करण्यात येत आहेत. काम मंजुरीसाठी आवश्यक प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली असून कामांना लवकरच सुरुवात केली जाणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानातून केल्या जाणार्या कामांचा आढावा, नियंत्रण व अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुकास्तरावर प्रांताधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी हे सहअध्यक्ष असतील. जिल्हा जल व मृद संधारण अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. उपवनसंरक्षक, उपजिल्हाधिकारी (रोहयो), कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा), वरिष्ठ भूवैज्ञानिक (भूजल सर्वेक्षण), विभागीय वन अधिकारी, कार्यकारी अभियंता (जलसंपदा), कार्यकारी अभियंता (लपा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तज्ज्ञ व्यक्ती किंवा संस्थेचे प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून समावेश असेल. कामांची गुणवत्ता व पारदर्शकता राखणे ही जबाबदारी या समित्यांवर राहणार आहे.

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात नुकतीच आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये जिल्ह्यात 130 शिक्षक दाखल झाले होते. यामधील 41 गुरुजींना समानीकरणाने शाळा दिल्या होत्या. मात्र, याबाबत आदेश नव्हते. शुक्रवारी या गुरुजींना शाळा देण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून काढण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मे महिन्यात आंतरजिल्हा बदलीने सुमारे 130 शिक्षक दाखल झाले होते. त्यापैकी 41 शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी समानीकरणाने शाळा दिल्या होत्या. या शिक्षकांना शुक्रवारी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बदली आदेश देण्यात आले आहे. शाळेवर हजर राहून त्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे पाठवण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकार्यांना दिल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली. दरम्यान, आंतरजिल्हा बदलीने आलेले सुमारे 89 शिक्षक अद्यापही पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत.

त्यानंतर एक गाणे अमिताभ बच्चन स्वतः गाणार होते. पण, ते ऐब्वेली सुदेश भोसले यांच्याकडून रेकॉर्ड करून घेण्यात आले. जेव्हा त्यांनी गाणे गायले, तेव्हा अनेक लोकांना आश्चर्य वाटले. हे गाणे अमिताभ बच्चन नव्हे, तर दुसऱ्याने गायले आहे, यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. सुदेश भोसले आणि अमिताभचा आवाज इतका जुळत होता की, लोकांना वाटले हे गाणे स्वतः अमिताभ यांनी गायले आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वतः जया बच्चन यांना वाटले की, हे गाणे अमिताभ यांनीच गायले आहे. अशाप्रकारे पुढे सुदेश भोसले अमिताभ बच्चन यांचा आवाज बनले.

अपघातग्रस्त बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर पहाटे १.३० वाजताच्या सुमारास बसला अपघात झाला. सर्वात प्रथम बस लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर काही अंतरावर जाऊन पलटी झाली. टायर फुटल्याने बसमध्ये आग लागली. याननंतर डिझेल टाकीला आग लागल्याने बसने पेट घेतला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ३ मुले असून उर्वरित प्रौढ आहेत, अशी माहिती समोर आली आहे.