Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2972

Jawan: ‘मिशन इम्पॉसिबल ७’ पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार सरप्राईज! ‘जवान’चा ट्रेलर होणार रिलीज

0
Jawan: ‘मिशन इम्पॉसिबल ७’ पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार सरप्राईज! ‘जवान’चा ट्रेलर होणार रिलीज


‘जवान’च्या ट्रेलर रिलीजची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण, ‘मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग’ भारतात १२ जुलै रोजी रिलीज होत आहे. त्याच दिवशी ‘जवान’चा ट्रेलरही लाँच होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार ‘जवान’चा ट्रेलर ‘मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग’सह चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता ‘मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग’ बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांना शाहरुख खानचं हे सरप्राईज बघायला मिळणार आहे.



Source link

कशी राजकारणाने थट्टा आज मांडली… अजित पवारांनंतर नेटकऱ्यांचा मजेशीर शपथविधी

0
कशी राजकारणाने थट्टा आज मांडली… अजित पवारांनंतर नेटकऱ्यांचा मजेशीर शपथविधी


Maharashtra Politics: महाराष्ट्रातील राजकारणाने एकदम फिल्मी रुप घेतलं आहे. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही म्हणतात ना, ते खरंच. महाराष्ट्रातील जनतेनं मत द्यावं तरी कोणाला? हा एक प्रश्नच आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा समजला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना, पण याच शिवसेनेत एक वर्षापूर्वी फूट पडली आणि गुवाहाटीपर्यंत घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. ते प्रकरण अद्याप सावरलेलं नाही, तर नुकतीच राष्ट्रवादी पक्षातही फूट पडली. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीच्या (NCP) कट्टर मतदारांनी मत द्यायचं तरी कुणाला? हा प्रश्न सध्या महाराष्ट्रासमोर आहे. कारण, कुठल्याही पक्षाला मतदान केलं तरी तो शेवटी भाजपमध्येच (BJP) जातो. मग आतापासून थेट भाजपलाच मतदान करायचं का? तर अशा अनेक प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या नेटकऱ्यांनी मात्र आता एक अनोखा शपथविधी पार पाडला आहे. 

सोशल मीडियावरील क्रिएटर हेरंब कुलकर्णी याने एक मजेशीर शपथविधी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे अपलोड केला आहे. राजकारणात नक्की काय चालतं? याचं उघड चित्र जनतेला दिसत नाही. पक्षात वरुन कितीही तटातूट दिसली तरी आतून सर्व आलबेल असल्याचं चित्रही अनेकदा समोर येतं. त्यामुळे ही राजकीय खेळी की खरी पक्षफूट? असा प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात येतो. राजकारण्यांप्रमाणेच आपणही वागावं का? याच वाक्याला अनुसरुन सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला शपथविधी पाहा…

‘सोशल मिडिया’चा शपथविधी

मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की,

झुकेबर्गद्वारा स्थापित सोशल मिडियावर इथून पुढे मी कोणत्याही पक्षाला कोणतेही प्रमाणपत्र देणार नाही किंवा दोषारोप करणार नाही. कोणत्याही नेत्याला ध्येयवादी समजून स्वतः तोंडघशी पडणार नाही. उगाच कोणाची तळी उचलून मी कोणालाही ट्रोल करणार नाही किंवा ट्रोल होणार नाही.

कोणत्याही नेत्याच्या अश्रूंना किंवा संतापाला अभिनय म्हणूनच समजून घेत स्वतः ची भावनिक गुंतवणूक करणार नाही. मी पुन्हा शपथ घेतो की, नेते जसे एकमेकांशी वरून भांडताना आतून मधुर संबंध ठेवतात, त्याप्रमाणे मी उघडपणे सर्व मित्र (Friends), फॉलोअर्स (Followers) किंवा पेड ट्रोलशी प्रेमपूर्वक संबंध ठेवेल आणि कोणालाही ब्लॉक करणार नाही.

राजकारणातून लोककल्याण होईल, अशी वेडी आशा ठेवून वेळ बरबाद न करता मी माझा व्यवसाय, कर्तव्य याकडे लक्ष केंद्रित करेन. नेटफ्लिक्सच्या वेब सिरीजसारखे राजकारणाचे एपिसोड मनोरंजन म्हणून बघत राजकारणाकडे गांभीर्याने बघणार नाही, अशी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ajit Pawar: खासदार, आमदार ते पाचवेळा उपमुख्यमंत्री; पाहा अजितदादांचा 41 वर्षांचा राजकीय प्रवास…



Source link

Samrudhi marg Accident : समृद्धी महामार्गावर अपघातसत्र सुरूच; भरधाव वेगातील कार ३० फुट खोल कोसळली; चालक ठार

0
Samrudhi marg Accident : समृद्धी महामार्गावर अपघातसत्र सुरूच; भरधाव वेगातील कार ३० फुट खोल कोसळली; चालक ठार


घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघात ग्रस्त कार बाहेर काढण्यात आली. बुलडाणा येथील भीषण बस अपघातानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे.



Source link

कराडात शरद पवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन | पुढारी

0









कराड : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आज (सोमवार) कराड दौऱ्यावर आले आहेत. कालच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील काही दिग्गज नेत्यांना बरोबर घेऊन सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आज शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेते कराडमध्ये दाखल झाले आहेत.

त्यांच्या बरोबरच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांसह नेते पदाधिकारी यांनी प्रीतीसंगमावर शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटी नंतर शरद पवारांनी आज दुसऱ्याच दिवशी कराडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी शरद पवारांना भेटण्यासाठी व पाठिंबा दर्शवण्यासाठी कार्यकर्त्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती.

कार्यकर्त्यांना आवरणे पोलीस व सुरक्षा रक्षकांना अवघड झाले होते. राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले असले तरी आलेला प्रत्येक जण साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत होता. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी प्रीतीसंगम घाटाचा परिसर दणाणून गेला.

हेही वाचा : 











Source link

सातारा : शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी आ.सुमनताई पाटील, आ.अरुण लाड, आ.मानसिंगराव नाईक कराडात दाखल | पुढारी

0









कराड : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीतले अनेक दिग्गज नेते राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले असून, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कराड दौऱ्यावरती येत आहेत. त्यामुळे शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी व आम्ही तुमच्याच बरोबर आहे हे सांगण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक दिग्गज नेते कराडमध्ये दाखल होत आहेत.

त्याच पार्श्वभूमीवरती राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी कालच आपली भूमिका स्पष्ट केली असून, जी शरद पवारांची भूमिका तीच माझी भूमिका राहील असे त्‍यांनी सांगितले आहे. त्यानंतर आज शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक दिग्गज नेते कराडत दाखल होत आहेत. त्यामध्ये तासगावच्या आमदार सुमनताई पाटील, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक तसेच आमदार अरुण लाड हे कराड येथे दाखल झाले असून, सर्किट हाऊस मध्ये शरद पवार यांची येण्याची प्रतीक्षा करत आहेत.

हेही वाचा ;  











Source link

Lohagadh fort : लोहगडावर पर्यटकांची तोबा गर्दी; चेंगराचेंगरी होता होता वाचली, चार तास गडावर गोंधळ

0
Lohagadh fort : लोहगडावर पर्यटकांची तोबा गर्दी; चेंगराचेंगरी होता होता वाचली, चार तास गडावर गोंधळ


अखेर सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधत यातून मार्ग काढत पर्यटक गडाच्या खाली उतरले. यामुळे गडावर मोठी दुर्घटना होता होता टळली. दरम्यान, या घटनेमुळे या ठिकाणी नियोजन तसेच समन्वय असल्याचा अभाव प्रकर्षाने जाणवला. दरम्यान, पर्यटकांनी अशा ठिकाणी जातांना काळजी घ्यावी तसेच पोलिसांनी देखील पर्यटन स्थळावर गर्दीचे नियोजन करण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Saisha Bhoir: आई-वडिलांची चूक मुलीच्या करिअरवर पडली भारी; ‘नवा गडी नवं राज्य’मधून साईशा भोईर बाहेर!

0
Saisha Bhoir: आई-वडिलांची चूक मुलीच्या करिअरवर पडली भारी; ‘नवा गडी नवं राज्य’मधून साईशा भोईर बाहेर!


Saisha Bhoir Exit From Serial: ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत साईशा भोईरच्या जागी आता आरोही सांबरे ‘चिंगी’च्या भूमिकेत दिसणार आहे.



Source link

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर | पुढारी

0









सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज (सोमवार) प्रथमच सातारा जिल्ह्यात येत आहेत. कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधी स्थळी जाऊन ते अभिवादन करणार असून, त्यानंतर साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.

शरद पवार यांच्या आगमनाची मोठी उत्सुकता कार्यकर्त्यांना असून, त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. शरद पवारांसोबत पक्षाचे नेते, आमदार, खासदार असणार आहेत. त्यामुळे पवारांसोबत आज कोण कोण आहे आणि अजित पवारांसोबत कोण कोण आहे हे आजच्या शक्तीप्रदर्शनातून दिसून येणार आहे.

दुपारी साताऱ्यात होणाऱ्या मातंग परिषदेला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांचे आज सातारा जिल्ह्यात डॅमेज कंट्रोल दिसणार असून, पवारांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते जमा होतील असे नियोजन राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : 











Source link

मी पवारसाहेबांसोबत होतो, आहे, राहिन; ते ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण : श्रीनिवास पाटील

0


Shriniwas Patil On Sharad Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप घडवत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांना 40 हून अधिक आमदार शरद पवार यांना पाठिंबा दर्शवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यातच आता साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांची देखील राष्ट्रवादीमधील घडामोडींवर प्रतिक्रिया समोर आली आहे. “मी पवारसाहेबांसोबत होतो, आहे आणि राहिन.  ते ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण,” अशा शब्दात साताऱ्याच्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. श्रीनिवास पाटील एबीपी माझाशी बोलत होते.

‘माझ्या मित्राबरोबर मी कायम राहिन’ 

“मी पवारसाहेबांसोबत होतो, आहे आणि राहिन. प्रीतीसंगमावर आमचे गुरु विसावले आहेत. त्यांच्या दर्शनासाठी आमचे साहेब येत आहेत. ते ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. त्यांच्याबरोबर सतत आमच्यासारखे समाजकारण, निवडणुकीपुरतं राजकारण. यापलिकडे ज्यांनी आयुष्यभर स्वर्गीय यशवंतरावांची साथ दिली. पुरोगामी धोरण स्वीकारलं. गोरगरिबांना न्याय दिला त्याच माझ्या मित्राबरोबर मी कायम राहिन, असं श्रीनिवास पाटील यांनी म्हटलं.

साहेब ठरवतील ते धोरण, त्यांच्यासोबत जायचं

अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत विचारलं असता श्रीनिवास पाटील म्हणाले की, “काही गोष्टी अपेक्षित होत्या, त्या झाल्या. पण समर्थपणे उभा राहणारा नेता हा परिस्थिती पालटतो. आमच्या गुरुंनीही केल्या एकेकाळी, ते आपण पाहिलं. त्यामुळे त्यांचा शिष्यही करेल असं मला वाटतं. छोट्यांना मदत करणं त्यांचं काम आहे. आयुष्यभर त्यांनी तेच केलं यापुढेही तेच करतील. जनतेच्या दारापुढे उभं राहून त्यांच्यासाठीच काही करायचं हीच त्यांची, घराण्याची परंपरा आहे. साहेब ठरवतील ते धोरण, त्यांच्यासोबत जायचं.”

श्रीनिवास पाटील यांच्यासाठी भरपावसात सभा

दरम्यान 2019 मध्ये उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेली भरपावसातील सभा विशेष गाजली. या सभेमुळे निवडणुकीचा निकाल पालटल्याचं म्हटलं गेलं. शरद पवार साताऱ्यात असताना, श्रीनिवास पाटील यांच्या प्रचाराच्या भाषणावेळी धोधो पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यावेळीही शरद पवारांनी पावसाचा विचार न करता, आपल्या मित्रासाठी चक्क पावसात भाषण केलं आणि सभा गाजवली. शरद पवारांचा पावसातील फोटो आणि व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. एका क्षणात ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली आणि शरद पवारांचे फोटो अनेकांच्य व्हॉट्सअॅप स्टेटसवर झळकले. त्याचा परिणाम असा झाला की उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला आणि श्रीनिवास पाटील खासदार झाले. 

 

हेही पाहा

 



Source link

Sanjay Raut Full PC : भाजप आणि अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठीचा करार : संजय राऊत

0
Sanjay Raut Full PC : भाजप आणि अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठीचा करार : संजय राऊत


NCP Political Crisis: काका की पुतण्या? अजितदादांनी मुंबईत बोलावलं तर पवार-सुप्रिया यांचे फोन, घरच्या गोंधळात राज्यातील कार्यकर्ते संभ्रमात



Source link