Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2971

त्यामुळे मी सातारा आणि कोल्हापूरची निवड करतो; शरद पवारांनी सांगितले कारण

0


Sharad Pawar: राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानतंर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही आता पक्षबांधणीसाठी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. पुण्यापासून ते प्रितीसंगमापर्यंत ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यामध्ये रविवारी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेले राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचाही समावेश आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील, तसेच त्यांच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार असणारे बालदोस्त सातारचे खासदार श्रीनिवास पाटील तसेच मतभेद असूनही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित होते. 

अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार यांनी (Sharad Pawar) सातारमध्ये येण्याचे कारणही सांगितले. कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल तर मी दोन शहर निवड करतो सातारा आणि कोल्हापूर. ते पुढे म्हणाले की, आज गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात जनमानस तयार करण्यासंबंधीचा निकाल काल आम्ही घेतला. याची सुरुवात करायची असेल तर स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीशिवाय दुसरे स्थळ नाही. तुमचे, माझे, सगळ्यांचे गुरु, या पदावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा अधिकार एकाच व्यक्तीला होता ती व्यक्ती म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब. त्यांच्या स्मृतिस्थळी याठिकाणी आपण प्रचंड संख्येने आलेत. या प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद देतो.

ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्र हा बंधुत्व, इमान राखणाऱ्यांचा सन्मान करणारे राज्य आहे. पण मध्यंतरीच्या कालखंडात याच महाराष्ट्रात कोल्हापूर, संगमनेर, अकोला अशा काही ठिकाणी पिढ्या न पिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात एक प्रकारची वैर भावना वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत.

आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्र हा बंधुत्व, इमान राखणाऱ्यांचा सन्मान करणारे राज्य आहे. पण मध्यंतरीच्या कालखंडात याच महाराष्ट्रात कोल्हापूर, संगमनेर, अकोला अशा काही ठिकाणी पिढ्या न पिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात एक प्रकारची वैर भावना वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नसल्याचे शरद पवार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Sharad Pawar : शरद पवारांकडून फास आवळण्यास सुरुवात, खासदार सुनिल तटकरे व प्रफुल्ल पटेल पक्षातून बडतर्फ

0
Sharad Pawar : शरद पवारांकडून फास आवळण्यास सुरुवात, खासदार सुनिल तटकरे व प्रफुल्ल पटेल पक्षातून बडतर्फ


सुप्रिया सुळे यांनी याबाबतचे पत्रपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना दिलं होतं. त्यामध्ये ही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शरद पवारांनी ही कारवाई केली आहे.



Source link

NCP Action On MLA : मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 जणांवर राष्ट्रवादी पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई

0
NCP Action On MLA : मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 जणांवर राष्ट्रवादी पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई



<p>जयंत पाटलांच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ जणांवर शिस्तभंगाची कारवाई , राष्ट्रवादी पक्षाकडून ९ जणांवर शिस्तभंगाची &nbsp;कारवाई</p>



Source link

प्रितीसंगमाने प्रथमच अनुभवला ‘साहेब प्रेमी’ अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; एनसीपीची तरुण फळी जमली!

0


Sharad Pawar: देशासह राज्यातील संसदीय राजकारणातील चालता बोलता इतिहास असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुतण्या अजित पवार यांनी केलेल्या बंडाळीनंतर कराडमध्ये समाजकारणाचे तीर्थक्षेत्र असलेल्य प्रितीसंगमावर पोहोचले. अजित पवार यांनी रविवारी दुपारी शपथविधी सोहळा केल्यानंतर काका शरद पवार पुण्यात होते. त्यामुळे पुण्यापासून ते प्रितीसंगमापर्यंत ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यामध्ये रविवारी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेले राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील उपस्थित होते. माजी मंत्री बाळासाहेब पाटील, तसेच त्यांच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार असणारे जवळचे मित्र सातारचे खासदार श्रीनिवास पाटील तसेच मतभेद असूनही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही संकटात दाखवलेली सोबत बरंच काही सांगून जाणारी होती. 

प्रितीसंगमाने अनुभवला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक

प्रितीसंगमावर जाणं हे शरद पवारांसाठी नवीन नसले, तरी आजच्या दौऱ्याला विशेष महत्व होते. बंडाळीनंतर प्रितीसंगमावर पवारांची कोण कोण भेट घेणार याचीच चर्चा रंगली होती. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता होती. त्यामुळे आजची सकाळी प्रितीसंगमावरील गर्दी तीच साक्ष देणारी होती. आजवर कधीच गर्दी अनुभवली नव्हती, तेवढी गर्दी प्रितीसंगमाने आज अनुभवली. जवळपास 25 हजारांवर लोकांनी त्याठिकाणी गर्दी केली होती. 

राष्ट्रवादीची तरुण फळीही प्रितीसंगमावर  

शरद पवार प्रितीसंगमाच्या दिशेने येत असताना त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार सोबत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षांतर्गत बाबी हाताळण्यासाठी मुंबईत पक्ष कार्यालयात ठाण मांडून असतानाच त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील समर्थकांसह कराडात आले होते. दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील सुद्धा मतदारसंघातील समर्थकांसह प्रितीसंगमावर शरद पवारांच्या स्वागतासाठी हजर होते. अजित पवारांच्या बंडाने पक्षावर काही फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

मतभेद असूनही पृथ्वीराज चव्हाण हजर 

विशेष करून काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यामध्ये काही बाबींवरून, तसेच धोरणांवरून मतभेद वारंवार दिसून आले आहेत. मात्र, चव्हाण आज प्रितीसंगमावर शरद पवारांसोबत होते. त्यामुळे पक्षावर संकट आले, तरी काँग्रेस सोबत असल्याचा संदेश त्यांनी कृतीतून दिला. प्रितीसंगमावर अभिवादन करताना शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना बोलवून घेतल्याने तो प्रसंगही लक्षवेधी ठरला. 

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Tu Chal Pudha: मयुरीच्या चुकीची शिक्षा अश्विनीला भोगायला लागणार? ‘तू चाल पुढं’ मालिका रंजक वळणावर!

0
Tu Chal Pudha: मयुरीच्या चुकीची शिक्षा अश्विनीला भोगायला लागणार? ‘तू चाल पुढं’ मालिका रंजक वळणावर!


Tu Chal Pudha Latest Episode: घरसंसार, सासऱ्यांचं आणि पतीचं आजारपण अन् पार्लरचा व्यवसाय सांभाळताना अश्विनीची तारेवरची कसरत होत आहे. यात आता तिच्या समोर नवं संकट उभं राहणार आहे.



Source link

प्रितीसंगमावरून आशीर्वाद घेताच शरद पवारांचा एल्गार; पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात

0


Sharad Pawar: अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सामाजिक तीर्थक्षेत्र असलेल्या प्रितीसंगमावर जाऊन पुन्हा एकदा लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांची पहिली सभा जुन्नरमध्ये होणार आहे. ही पहिली सभा अजित पवारांसोबत जाऊन धक्का दिलेल्या माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर बीडमधील परळीला मुंडेंच्या मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असल्यास संख्याबळाचा विचार करता तर उचित असल्याचेही ते म्हणाले. अजित पवार कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही मतभिन्नता असते. त्यामुळे त्यांच्याविषयी संशय व्यक्त करणार नाही, असेही पवार यांनी नमूद केले. 

कोणताही संभ्रम नको, जाहीरपणे पक्षबांधणीसाठी जात असल्याचे शरद पवार यांनी ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला, ज्यांच्याकडून संघटन मजबूत करावी अशी अपेक्षा होती. मात्र काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे नव्या पिढीतील कार्यकर्ता नाऊमेद होऊ नये म्हणून मी हा दौऱा सुरू केला आहे. कार्यकर्ते आणि त्यातीलही 70-80 टक्के तरूण आमच्या पाठीशी आहेत, हे चित्र आहे. आम्ही कष्ट केले, या तरूणांना दिशा दिल्यास मला खात्री आहे दोन ते तीन महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्रातील चित्र राष्ट्रवादीला अनुकुल होईल.  

अजित पवार कुणी परके नव्हते

शरद पवार म्हणाले की, एखादी महत्वाची मोहिम सुरू करण्यासाठी गुरूपौर्णिमा हा चांगला दिवस असतो. म्हणून आज यशवंतरावांच्या स्मृतींना वंदन करून मी ही मोहिम सुरू केली. भाजपच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नातून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता.  सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न ही आमची अपेक्षा होती. ज्या प्रवृत्तींशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत गेले. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. अजित पवार कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही मतभिन्नता असते. त्यामुळे त्यांच्याविषयी संशय व्यक्त करणार नाही. 

ज्यांना एवढं समजत नाही की मी जाहीरपणानं पक्षाच्या बांधणीसाठी निघालो आहे, त्यावरून संभ्रम निर्माण करू नका. महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादीनं ज्यांना पक्षाचं नेतृत्व दिलं ते जयंत पाटील आहेत. त्यामुळे नेत्यांनी एखादा निर्णय घेतला असले, पत्रव्यवहार केला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. अडीच वर्षं आम्ही शिवसेनेबरोबर काम केलं तेव्हा त्यांना वाटलं नाही की आम्ही काही चूक करत आहोत. 

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Ajit Pawar Latest News :अजित पवार पक्ष सोडून गेल्याने खूप वाईट वाटले : रोहित पवार | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात काल जे काही घडलं, त्यामुळे शरद पवार थांबलेले नाहीत. शरद पवार थांबणारा नेता नाही. शरद पवार यांनी कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. या ठिकाणी मोठा जनसमुदाय उसळला, हे लोकांचे प्रेम आहे. या ताकदीपेक्षा मोठी ताकद कुठलीही होऊ शकत नाही. पुढे आपण पाहाल साहेबांची आणि लोकांची ताकद केवढी मोठी आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. सातारा येथील विश्रामगृहात त्यांनी आज (दि. ३) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार यांना विनंती करू शकतो. त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, अशा परिस्थितीत मी त्यांना विनंतीशिवाय काही करू शकत नाही. ते पक्ष सोडून गेल्याने मनाला खूप वाईट वाटले, असे सांगून भाजपला आम्ही विरोध केला होता, आणि त्यांच्याबरोबरच जाणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. आज जसा जनसमुदाय उसळला तसाच जनसमुदाय शरद पवारांच्या मागे कायमस्वरूपी राहणार आहे. जे आमदार काल मुंबईमध्ये दिसले. त्यांना वेगळं काहीतरी सांगितलं गेलं होतं. अध्यक्षांच्या बाबतीत चर्चा करायचे आहे, असे सांगून सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावले होते. म्हणून त्या आमदारांनी विचार सोडले. असे आपल्याला म्हणता येणार नाही. ज्यांना लोकांमधून निवडून यायचे आहे, ते सर्व आमदार पुन्हा एकदा राष्ट्रवादीत माघारी येतील, असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

कोणत्याही आमदारांना फसवून नेले नव्हते. कारण देऊनच त्या ठिकाणी बोलावले होते. सह्या घेतल्यानंतर लगेचच राजभवनामध्ये नेण्यात आले. ज्यांना शरद पवारांनी विविध पदे दिली. त्यांना मोठे केले, हे सगळे भोगून आज पवारांना धोका देऊन सत्तेत गेले आहेत, असे पवार म्हणाले.

हेही वाचा











Source link

Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले; ‘अजित पवार परके नाहीत पण…’ | पुढारी

0


पुढारी ऑनलाईन डेस्क : sharad pawar vs ajit pawar : भारतीय जनता पक्षाकडून आज जाती-जातीत, समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. धार्मिक भेद निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवले जात आहे. या भाजप विरोधात आम्ही संघर्ष करत आहोत. पण आमचे सहकारीच त्यांच्यासोबत गेले, अशी खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. सातारा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्राचा पुन्हा झंझावाती दौरा करणार

शरद पवार पुढे म्हणाले की, कराडमधून आज मी पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. सातारा, कोल्हापूरने राष्ट्रवादीला नेहमीच बळ दिले आहे. नव्या पिढीला नाउमेद होऊ देणार नाही. त्यासाठी महाराष्ट्राचा पुन्हा झंझावाती दौरा करणार आहे. यापुढे नव्या कार्यकर्त्यांना संधी देणार असून येत्या काळात महाराष्ट्राचे चित्र पालटणार आहे,’ असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

नव्या दमाचे रक्त राज्याचे चित्र बदलवून टाकेल

ते पुढे म्हणाले, नव्या दमाचे रक्त राज्याचे चित्र बदलवून टाकेल हा विश्वास आहे. आज माझ्या स्वागतासाठी 70 ते 80 टक्के तरुणाई होती. आपण निवडलेले सहकारी सोडून जाणे हे माझ्यासाठी नवीन नाही. भाजप सोबत जे गेले आहेत त्यांच्या जाण्यामागे ईडीची कारवाई हे कारण नाही. मोदींचे आरोप वास्तवादी नाहीत, असेही शरद पवार म्हणाले. (sharad pawar vs ajit pawar)

अजित पवार म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे

अजित पवार म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला. पण अजित पवार हे कुणी परके नाहीत. त्यांच्याशी मतभिन्नता असू शकते, अशी सारवासारवही शरद पवारांनी केली.

काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होण्यास हरकत नाही

माझ्या माहिती प्रमाणे आता महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षांचा विचार केल्यास त्यात काँग्रेसकडे सर्वात जास्त सदस्य संख्या आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर म्हणून त्यांनी दावा केल्यास त्याला माझी हरकत नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा :





Source link

Maharashtra Politics: अनेक आमदारांना परत यायचे आहे; दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल: अनिल देशमुख | पुढारी

0









कराड: पुढारी वृत्तसेवा: अनेक आमदारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी आम्हाला परत यायचे आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे याबाबत एक दोन दिवसात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. अनेक आमदार परत राष्ट्रवादीमध्ये आलेले दिसतील, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कराड येथील सर्किट हाऊसवर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. (Maharashtra Politics)

अनिल देशमुख यांनी प्रीतीसंगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन खासदार शरद पवार यांच्याबरोबर घेतले. त्यानंतर त्यांनी कराड सर्किट हाऊस येथे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Maharashtra Politics)

अनिल देशमुख म्हणाले की, गुरुपौर्णिमेनिमित्त खासदार शरद पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर शरद पवार महाराष्ट्रभर दौरे करणार आहेत. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्रितच आहेत. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर माझी चर्चा झाली आहे. राज्यभर महाविकास आघाडीला वातावरण अतिशय चांगले आहे. पुढील सर्वच निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार आहोत.त्यामुळे वेगळे चित्र निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

ईडीच्या कारवाईबाबत विचारले असता आमदार अनिल देशमुख म्हणाले, महाराष्ट्राबरोबरच अनेक राज्यांमध्ये व एकूणच देशभर ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. अशा परिस्थितीमध्येही आम्ही सर्वजण एकत्र येऊन राष्ट्रवादी पक्षाला मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. मला खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यात आले होते. माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली आणि हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेले. त्यावेळी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, त्याचे कोणतेही पुरावे नाहीत, झालेले सर्व आरोप ऐकीव माहितीचे आहेत, असे प्रथम हाय कोर्टाने सांगितले. त्यावर नंतर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा 











Source link

लढवय्या योद्ध्याने पुन्हा रणशिंग फुंकले; महाराष्ट्राच्या राजकारणात प्रीतिसंगमाचं महत्त्व काय?

0


Pritisangam Karad: गेल्या तीन साडे तीन वर्षांपासून अस्थिरतेच्या लाटांवर स्वार असलेल्या महाराष्ट्र राजकारणाचा पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. आता यावेळच्या भूकंप राष्ट्रवादीचे मातब्बर नेते अजित पवार यांनी घडवून आणला आहे. त्यांनी नेमके किती आमदार फोडले हा आकडा अजूनही निश्चित नसला, तरी त्यांनी पक्षात फूट पाडून थेट पक्षावर दावा केला आहे. दुसरीकडे, नेहमीप्रमाणे त्यांचे काका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांनी बंड केल्याचे मान्य करत पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्या पद्धतीने त्यांनी 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेनेला प्रचार करून घाम फोडला होता आणि सातारमधील पावसातील सभा अविस्मरणीय झाली होती, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा सातारमधून राजकीय अन् सामाजिक उर्जा देणाऱ्या प्रितीसंगमावर आज शरद पवार पोहोचले.

शरद पवार यांचे स्वागत करण्यासाठी त्यांचा जिगरी दोस्त सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी लढवय्या नेत्याला पुन्हा बळ देण्यासाठी कराडमधील प्रितीसंगमावर हजेरी लावली. या प्रितीसंगमावरून पुन्हा एकदा शरद पवार यांनी रणशिंग फुंकल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रीतिसंगमाचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा अमृतकलश आणला ते यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ याच प्रितीसंगमावर आहे. 

यशवंतराव चव्हाण यांची समाधी याच प्रीतिसंगमावर 

कराडमध्ये कृष्णामाई अर्थातच कृष्णा नदी आणि कोयना नदीचा संगम झाला आहे. या ठिकाणास प्रीतिसंगम म्हटले जाते. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेलं कोयना धरणही याच कोयना नदीवर वसलेलं आहे. याठिकाणी कृष्णामाईचे मंदिर आहे. कराडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. विकसित महाराष्ट्राच्या शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असणाऱ्या यशवंतरावांची केंद्रीय मंत्रिपदाची व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द गाजली तितकीच यशस्वी ठरली. ज्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती अशा यशवंतराव चव्हाण यांची समाधी याच प्रीतिसंगमावर आहे.

कोयना आणि कृष्णेचा संगम असलेल्या प्रीतिसंगम हे यशवंतराव चव्हाणांच्या आयुष्यातील विरंगुळ्याचे स्थळ होते. या परिसरात वेगवेगळी देवालये आहेत. विधायक कार्याची सुरुवात करायची असल्यास तर इथे येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतले जाते. महाराष्ट्राच्या समाजकारणातील तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रीतिसंगमाकडे पाहिले जाते. असा देदीप्यमान वारसा असलेल्या प्रितीसंगमावर शरद पवार यांनी पुन्हा एकदा लढण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. 

अजित पवारांचा आत्मक्लेश

भाजपच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीत बंड केलेल्या अजित पवारांनी धरणातील पाण्यावरून अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात दहा वर्षांपूर्वी भाजपनेच रान उठवले होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यावेळी केली होती. अजित पवार यांनी दोनदा माफी मागितल्यानंतर याच प्रीतिसंगमावरून प्रायश्चित म्हणून आत्मक्लेश केला होता. आज राष्ट्रवादीत असणारे तत्कालिन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आत्मक्लेश म्हणजे नाटक असल्याची टीका केली होती. दुसरीकडे, अजित पवारांनी दोनदा माफी मागितल्यानं आता विषय संपला आहे, असं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यावेळी म्हटले होते. जेव्हा जेव्हा अजित पवार यांच्याकडून भाजवर टीका केली जाते तेव्हा तेव्हा त्यांना धरणातील वाक्याची आठवण करून दिली जाते. संजय राऊत यांनी केलेल्या थुकगिरीनंतर सुद्धा त्यांनी अजित पवारांना धरण आठवून दिले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या : 



Source link