
‘डेट भेट’ चित्रपटाची निर्मिती शिवांशु पांडे, हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन, तबरेज पटेल, प्रशांत शर्मा, हनी शर्मा यांनी सह निर्मिती केली आहे. तसेच, प्रशांत शेळके हे असोसिएट निर्माते आहेत.

‘डेट भेट’ चित्रपटाची निर्मिती शिवांशु पांडे, हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन, तबरेज पटेल, प्रशांत शर्मा, हनी शर्मा यांनी सह निर्मिती केली आहे. तसेच, प्रशांत शेळके हे असोसिएट निर्माते आहेत.

‘सिंटा’ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हरीश मेगन यांना श्रद्धांजली वाहताना लिहिले की, ‘CINTAA हरीश मेगन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे.’ यासोबतच त्यांनी हरीश मेगन यांना श्रद्धांजली वाहणारे पोस्टर देखील शेअर केले आहे. हरीश मेगनच्या इतर चित्रपटांमध्ये ‘चुपके चुपके’, ‘खुशबू’, ‘इंकार’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘शहेनशाह’ यांचा समावेश आहे. अभिनेते हरीश मेगन मुंबईतील जुहू परिसरात ‘हरीश मेगन अॅक्टिंग इन्स्टिट्यूट’ नावाची एक अभिनय संस्था चालवत होते. तर, रोशन तनेजा अॅक्टिंग स्कूलमध्ये ते प्रशिक्षकही होते.
<p>Sharad Pawar Karad : शरद पवार कराडच्या दिशेने रवाना झालेत ते यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान स्मृतीस्थळाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी</p>
<p> </p>
Source link

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी या लोकप्रिय जोडीला लियाना आणि दिविशा या दोन मुली आहेत. अभिनेत्रीने तिची मोठी मुलगी लियाना चौधरीला वयाच्या अवघ्या१४ महिन्यांपासूनच प्लेस्कूलमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे. याबद्दल लोक तिला ट्रोल करता तिच्यावर टीका करत आहेत. देबिनाच्या या कृत्यावर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. आपण असे का करत आहोत, याबद्दल आता देबिनाने तिच्या व्लॉगमध्ये खुलासा केला आहे.
Maharashtra NCP Crisis: “शिंद्यांची भाकरी करपली, आता नवी चूल, नवा तवा”; सामना अग्रलेखातून मोदी, शहांवर थेट ताशेरे, तर अजित पवारांनाही टोला

नवरोज अशर नावाच्या या इमारतीमध्ये अनेक अपार्टमेंट आहेत ज्यात द स्वीट्स, द पेंटहाऊस, स्काय व्हिला आणि मॅन्शन यांचा समावेश आहे. या बिल्डींगच्या आत एक आलिशान पूल, जिम आणि सुंदर लाउंज देखील असल्याची माहिती या बिल्डींगच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कॉम्प्लेक्समधील सर्वात स्वस्त फ्लॅटची किंमत तब्बल १२ कोटी रुपये आहे. जॅकलिनच्या नवीन अपार्टमेंटची किंमत किती आहे आणि ती तिथे राहायला गेली आहे की, नाही हे अद्याप समोर आलेले नाही.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते अजित पवार यांनी भाजपसोबत व सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, अमित कदम यांच्यासह अनेकांनी अजित पवारांंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक खा. शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या जिल्ह्याच्या संघटनेतही अनेक ठिकाणी फुटाफुटी झाल्या आहेत.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर शरद पवार व अजित पवार यांचा पगडा राहिला आहे. अजित पवार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री राहिल्याने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण वर्गावर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक अस्वस्थतेचे वातावरण सातारा जिल्ह्यात आहे. शरद पवार यांचा सातारा हा लाडका जिल्हा. पक्षाच्या स्थापनेवेळी 9 आमदार व 2 खासदार या जिल्ह्याने दिले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्याने भरभरून मतदान केले आहे. त्याच शरद पवार व अजित पवार यांच्यात फाटाफूट झाल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली आहे.
अजित पवार सरकारमध्ये सामील झाले तेव्हाच्या शपथविधीला विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण स्वत: उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्येही या तिघांची नावे दिसत होती. आ. मकरंद पाटील यांचे नाव तर मंत्रिपदाच्या यादीत घेतले जात होते. या उलट आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांचे मित्र खा. श्रीनिवास पाटील यांनीही खा. शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे.
सातारा जिल्ह्यात शरद पवार व अजित पवार यांना मानणारे स्वतंत्र गट आहेत. मध्यंतरीच्या काळात अजितदादांनी अनेक
जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र दौरे करून चाचपणी केली होती. या चाचपणीला आता अर्थ प्राप्त झाला आहे. अजित पवारांनी या दौर्यात भविष्यात आपण तरूण व नव्या चेहर्यांना संधी देणार असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी अजित पवारांंच्या बंडाची कल्पना आली होती. आता या बंडाला सातारा जिल्ह्यातून त्यांना किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

कधीकाळी दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणारी भारती आज आपल्या मेहनतीने एका मोठ्या स्थानावर पोहोचली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारती सिंहची एकूण संपत्ती २२ कोटी रुपये आहे. ती एका एपिसोडसाठी ७ ते ८ लाख रुपये मानधन घेते. त्यानुसार भारती एका महिन्यात जवळपास ३०-३५ लाख रुपये कमावते. खडतर आयुष्य पाहिलेली भारती आता अतिशय विलासी जीवन जगते. मुंबईत तिचे स्वतःचे आलिशान घर आहे. सोबतच तिच्याकडे अनेक महागड्या लक्झरी गाड्या देखील आहेत.

मुंबई, पुणे, नाशिक कोल्हापूरसह राज्यभरात रविवारी संततधार पाहायला मिळाली. हवामान विभागाने आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात असून या भागात मुसळधार पाऊल पडण्याचा अंदाज आहे.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सातारा जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गलबला झाला. कुणी म्हणतयं आम्ही पवार साहेबांसोबत तर कुणी म्हणतंय आम्ही दादांसोबत. त्याचबरोबर काही जणांनी पक्षासोबत राहणार असल्याचा नारा देत फाटाफूटीवर नाराजी व्यक्त केली. काही पदाधिकार्यांनी फोनही उचलले नाहीत. निष्ठावंत मात्र आपआपल्या नेत्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनीही अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा समिंद्रा जाधव, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष वैभव कळसे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते नितीन बाळासाहेब भिलारे व माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांनी आ. मकरंद पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत रहावे, असे म्हटले आहे. तर जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, महाबळेश्वरचे माजी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, ज्येष्ठ नेते बाबुराव सपकाळ यांनी आ. मकरंद पाटील यांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे. तालुक्यातील बहुतांश पदाधिकार्यांनी पक्षात फुट असू नये असे म्हटले आहे.
वाई तालुक्यातून किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, माजी उपसभापती महादेव मस्कर, सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, माजी सभापती दिलीपबाबा पिसाळ, माजी उपसभापती मदनअप्पा भोसले यांनी या संदर्भात आ. मकरंद आबा सोमवारी कारखानास्थळावर बैठक घेणार असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांना विचारात घेवून आ. मकरंद पाटील भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याचवेळी आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे या पदाधिकार्यांनी म्हटले आहे.
माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, तालुकाध्यक्ष भास्कर कदम यांनी आ. शशिकांत शिंदे घेतील त्या निर्णयाशी सोबत राहणार असल्याचे सांगितले. खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजी क्षीरसागर यांचा संपर्क होवू शकला नाही. माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर यांनी दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
फलटण तालुक्यात शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, माजी सभापती रेश्मा भोसले यांनी रामराजेंच्या भूमिकेसोबत ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांनी दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सोशल मीडिया अध्यक्ष फिरोज बागवान यांनी तालुक्यात आ. रामराजे आणि राज्यात खा. शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले.
सातारा तालुक्यातील पदाधिकार्यांमध्येही फुटीचे बीज पेरले आहे. सेवादल प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र लांवघरे, सेवादल प्रदेश संघटिका सौ. सीमा जाधव, किसनवीरचे संचालक सचिन जाधव, जिल्हा सरचिटणीस युवराज पवार, माजी सभापती धर्मराज घोरपडे, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शशिकांत वाईकर यांनी शरद पवारांसोबत असल्याचे जाहीर केले. तर तालुकाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी पक्षाबरोबर असल्याचे म्हटले आहे. माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील कुटूंब व कार्यकर्त्यांशी बोलून ठरवू असे म्हणत आहे. माजी जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले.
जावलीतील जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव धनावडे, युवा तालुकाध्यक्ष आतिष कदम यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे.
खंडाळा तालुक्यातील अनेक पदाधिकारी मात्र अजित पवार यांच्या पाठिशी असल्याचे चित्र आहे. खंडाळा तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, माजी सभापती राजेंद्र तांबे, अजय भोसले, लोणंद शहर युवक अध्यक्ष सागर शेळके यांनी आ. मकरंद पाटील घेतील त्या निर्णयासोबत असल्याचे म्हटले आहे. तर माजी कृषी सभापती मनोज पवार आणि लोणंदचे डॉ. नितीन सावंत यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
माणचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी सध्या आम्ही खा. शरद पवार यांच्यासोबत असून कराडमध्ये त्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. मनोज पोळ यांची भूमिका स्पष्ट नाही. म्हसवडचे माजी उपनगराध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले. तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, युवक अध्यक्ष विक्रम शिंगाडे व विधानसभा अध्यक्ष प्रशांत वीरकर यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर कराड येथे शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
खटाव तालुक्यात तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी पदाधिकार्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असून युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
The post सातारा राष्ट्रवादीत गलबला… कोण काय म्हणाला… appeared first on पुढारी.