Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2974

अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील पक्षीय बलाबलही बदललं; कोणाचे किती आमदार?

0
अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील पक्षीय बलाबलही बदललं; कोणाचे किती आमदार?


Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करत भाजपची (BJP) कास धरली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) वरच्या फळीत सामील होणारे अजित पवार काल (रविवारी) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील झाले. त्यामुळे आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. तसेच, राज्याचा गाडा आता शिंदे-फडणवीस-पवार सरकार हाकणार आहे. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर 8 आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. 

शपथविधीनंतर अजित पवारांनी दावा करत म्हटलं की, आम्हाला पक्षाचाही पाठींबा आहे. तसेच, पक्षाचं नाव, पक्षचिन्हही आमच्याकडेच आहे, तसेच आम्ही याच नावावर आणि चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केला की, राष्ट्रवादीतील 53 पैकी 40 आमदारांचा राज्य सरकारला पाठींबा आहे. दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील पक्षीय बलाबलही बदललं आहे. आधी एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर अजित पवारांचं राष्ट्रवादीतील बंड यामुळे भाजप-शिवसेना (शिंदे गट)- अजित पवार (राष्ट्रवादी गट) यांना पाठींबा असणाऱ्या आमदारांची संख्या आणि शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना पाठींबा असलेल्या आमदारांची संख्या किती ते पाहुयात… 

महाराष्ट्राच्या विधानसभेतील जागांचं गणित 

महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत. यामध्ये कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी 145 आमदारांची गरज आहे. जागांच्या संख्येबद्दल बोलायचं झालं तर भाजपचे 106 आमदार आहेत. तर गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून 40 आमदारांसह ठाकरेंपासून फारकत घेतली होती. त्यांनी भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता शिंदे गटाच्या एकूण 44 आमदारांचा सरकारला पाठिंबा आहे. तसेच, राज्यात राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत. आता अजित पवारांसह 40 आमदारांनी सरकारला पाठिंबा दिल्याचा दावा केला जात आहे. यासोबतच इतर 21 आमदारांचाही सरकारला पाठिंबा आहे. त्यात 12 अपक्ष आमदारही आहेत.

विरोधी पक्षांची परिस्थिती काय? 

विरोधी पक्षाबाबत बोलायचं झालं तर, महाराष्ट्रात काँग्रेसचे 44 आमदार आहेत. तर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 12 आमदार आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट) 13, समाजवादी पार्टी 2 आमदार, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा एक, स्वाभिमानी पक्षाचा एक आणि पीजेंट्स एंड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचा एक आमदार आहे. यासोबतच एक अपक्ष आमदार विरोधी पक्षात आहे. तर AIMIM चे 2 आमदार तटस्थ आहेत.

राज्य सरकारला कोणाचं समर्थन? 

भाजप : 106
शिवसेना (शिंदे गट) : 44
NCP (अजित पवार गट) : 40 
इतर : 21

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या विरोधात 

कांग्रेस : 44 
शिवसेना (उद्धव गट) : 12 Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray)
एनसीपी (शरद पवार गट) : 13 
अन्य : 8

शपथ घेण्यापूर्वी अजित पवार काय म्हणाले? 

पक्षाचे नाव आणि चिन्हही माझ्याकडेच राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. मी उर्वरित आमदारांशीही संपर्क साधला असून आज संध्याकाळपर्यंत अनेक आमदार येथे पोहोचतील. यापुढे कोणतीही निवडणूक मग ती जिल्हा परिषद असो वा अन्य पंचायत निवडणूक, पक्षाच्या (NCP) चिन्हावरच लढू, असं त्यांनी स्पष्टपणं सांगितलं. नागालँडमध्येही राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले आणि त्यांनी विकासासाठी भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं तुम्हाला आठवत असेल, असंही अजित पवार म्हणाले. 

अजित पवारांसोबत मंत्रीपदाची शपथ कोणी घेतली?

राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. मात्र, आज अजित पवारांव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यात धर्मराव आत्राम, सुनील वलसाडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री राजभवनात उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल देखील राजभवनात उपस्थित होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra NCP Crisis: महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार, जयंत पाटलांचा दावा कितीपत खरा? अजित पवारांच्या बंडामुळे 2024 पूर्वी भाजपसाठी ‘गूड न्यूज’



Source link

सातार्‍यातील आमदारांचे तळ्यात मळ्यात; देवगिरीवर पोहचल्यावरच दादांच्या बंडाची माहिती | पुढारी

0









सातारा / खटाव; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी दुपारपूर्वी केलेल्या बहुचर्चित राजकीय बंडाची कल्पना बालेकिल्ला असणार्‍या सातारा जिल्ह्यातील आमदारांना सकाळपर्यंत नव्हती. शनिवारी रात्री अजित पवारांबरोबर जेवायला असणार्‍या आमदारांनाही याची कुणकुण लागली नव्हती. शनिवारी रात्री अजित पवारांनी उद्या सकाळी लवकर बंगल्यावर या, मिटींग आहे इतकाच निरोप आमदारांना दिला होता. रविवारी सकाळी बंडाचा विषय आणि निर्णय घेण्याची वेळ अचानक आल्याने सातार्‍याच्या आमदारांची अवस्था तळ्यात- मळ्यात अशी झाली.

रविवारी अजित पवारांनी राज्याला हादरवणारा निर्णय घेत राष्ट्रवादीविरोधात बंड केले. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची तयारी अनेक महिने सुरु होती. त्यावेळी बंड करणारे आमदार एकत्र येवून राज्याबाहेर गेले होते. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर राज्यपालांना सरकार स्थापनेचे पत्र देवून शिंदे – फडणवीस सरकार अस्तित्वात आले होते. मात्र, अजित पवारांनी केलेले बंड आणि घेतलेला निर्णय खूप झटपट होता. अगदी शनिवारी रात्रीपर्यंत राष्ट्रवादीच्या आमदारांना याविषयी कल्पना नव्हती.

राष्ट्रवादीच्या दृष्टीने पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील काही आमदार शनिवारी रात्री अजित पवारांसमवेत जेवायला एकत्र होते. तिथेही त्यांना या बंडाची कुणकुण लागली नव्हती. अजित पवारांनी त्यावेळी आमदारांना उद्या सकाळी बंगल्यावर या. महत्वाची मिटींग आहे इतकाच संदेश दिला होता.

अजित पवारांचे फर्मान असल्याने रविवारी सकाळी जिल्ह्यातील आमदार देवगिरीवर गेले आणि तिथे गेल्यावर त्यांना अजित पवार करत असलेल्या बंडाची माहिती मिळाली. शरद पवार यांना सोडून अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यासाठी काहींनी अजित पवारांकडे वेळ मागितला. अगदी मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे, असे सांगूनही जिल्ह्यातील आमदारांनी वेळ मागून घेतल्याचे समजत आहे. आपापल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेतो असे सांगून जिल्ह्यातील आमदार परतले आहेत. खा. शरद पवार जिल्ह्यात आल्यावर त्यांच्या बरोबर कोण कोण कराडमध्ये हजर राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.











Source link

सातारा : दूध भेसळप्रकरणी 9 जणांना अटक; केमिकलसह वाहने जप्त | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  कराड तालुक्यातील मसूर परिसरामध्ये नवीन कवठे, हेळगाव, खराडे, केंजळ या गावामध्ये काहीजण दूधामध्ये केमिकल, पावडर, तेल याची भेसळ केल्याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. संशयितांमध्ये सातारा जिल्ह्यासह उत्तरप्रदेशातील काही जणांचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी केमिकलसह वाहने जप्त केली आहेत.

बजरंग पांडूरंग जाधव (रा.खराडे ता.कराड), गणेश सुनिल पनासे (रा. हेळगांव ता.कराड), सोमनाथ रंगराव कदम (रा. गायकवाडवाडी ता.कराड), शरद वामन घार्गे, सचिन शंकर यादव, गणेश सुभाष मसुगडे (सर्व रा. नवीन कवठे ता.कराड जि.सातारा) अर्जुन कुमार श्रीकांत गौतम, विवेककुमार श्रीरामचंद्र गौतम, अजयकुमार गौतम (सर्व रा. उत्तरप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व अन्न सुरक्षा विभागाने धाडी टाकून दूध भेसळीचा पर्दाफाश केला. घटनास्थळी छापे टाकून 9 हजार लिटर भेसळयुक्त दूध, केमिकल, पावडर, तेल व 5 दूध वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेण्यात आली. नागरीकांना भेसळयुक्त दुधाची विक्री करुन त्यांच्या जिवाशी खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दि.1 जुलै रोजी सायंकाळी नवीन कवठे, हेळगाव, खराडे, केंजळ येथे धाडसत्र राबवण्यात आले. दूध भेसळीमध्ये वापरली जाणारे व्हाईट लिक्वीड, सोडीयम बायकार्बोनेट, पिरॅमिट पावडर, रिफाइंड सोयाबीन तेल असे साहित्य होते. यावेळी पोलिसांनी 5 दूध वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोनि अरुण देवकर, सपोनि संतोष पवार, रविंद्र भोरे, फौजदार अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, पोलिस विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, हसन तडवी, राकेश खांडके, विशाल पवार, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, प्रविण कांबळे, रोहित निकम, सचिन ससाणे, केतन शिंदे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, पंकज बेसके यांनी कारवाईत सहभाग घेतला.



Source link

शरद पवार पुन्हा रान उठवणार, आज कराडचा दौरा, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेणार

0


Sharad Pawar Satara Visit : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) 2 जुलै 2023 रोजी आणखी एक बंड पाहायला मिळालं. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा रान उठवणार आहे. शरद पवार आज साताऱ्याच्या (Satara) दौऱ्यावर जाणार आहेत. कराडमध्ये यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचा आशीर्वाद घेऊन लढाईचं रणशिंग फुंकणार आहेत. स्वत: शरद पवार यांनी या दौऱ्याची माहिती काल झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.

शरद पवार काय म्हणाले होते?

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यात घडलेल्या या राजकीय घडामोडींवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं. यावेळी शरद पवार म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. जो प्रकार घडलाय त्याची मला चिंता नाही. उद्या सकाळी मी बाहेर पडेन. कराडला जाऊन यशवंतरावांच्या समाधीचं दर्शन घेईन आणि उद्या दलित समाजाचा एक मेळावा आहे, त्याला मी उपस्थिती लावेन. त्यानंतर राज्यात आणि देशात जेवढं जातं येईल, जेवढं फिरता येईल, जेवढा लोकांशी संपर्क वाढवता येईल, तेवढं करेन, हाच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करेन. हेच धोरण आहे.”

गेलेल्यांच्या राजकीय भविष्याची मला चिंता

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, “एकेकाळी माझ्यासोबत 56 आमदार होते. त्यापैकी 50 जण मला सोडून गेले. एका क्षणात मी फक्त सहा आमदारांचा नेता झालो. त्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचलो, माझी भमिका मांडली. त्यानंतरच्या निवडणुकीत सोडून गेलेल्या 50 पैकी चार ते पाच जणच निवडून आले, बाकी सगळे पडले. आताही मला सोडून गेलेल्यांची मला चिंता नाही. जे सोडून गेलेत त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे.”

शरद पवार यांचा सातारा दौरा

सकाळी 8 वाजता : पुण्याहून निघणार
सकाळी 11 वाजता : साताऱ्यातील कराडमध्ये आगमन
सकाळी 11 ते 11.30 वाजता : यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचं दर्शन

सकाळी 11.15 वाजता : कराडहून निघणार
दुपारी 12 वाजता : साताऱ्याला पोहोचणार

दुपारी 12 ते 1 वाजता: रयत शिक्षण संस्थेची बैठक
दुपारी 1 ते 1.45 वाजता: विश्राम
दुपारी 2 वाजता : पश्चिम महाराष्ट्र मातंग परिषदेला उपस्थिती

दुपारी 3.30 वाजता: साताऱ्याहून निघणार
रात्री 8.30 वाजता: मुंबईत आगमन

हेही वाचा



Source link

Supriya Sule Full PC : रात्री 12 वा. पत्रकार परिषद, लाडक्या दादाला सुप्रिया सुळे काय काय म्हणाल्या?

0
Supriya Sule Full PC : रात्री 12 वा. पत्रकार परिषद, लाडक्या दादाला सुप्रिया सुळे काय काय म्हणाल्या?



<div id="title" class="style-scope ytd-watch-metadata">
<p class="style-scope ytd-watch-metadata">Supriya Sule Full PC : रात्री 12 वा. पत्रकार परिषद, लाडक्या दादाला सुप्रिया सुळे काय काय म्हणाल्या?</p>
</div>
<div id="top-row" class="style-scope ytd-watch-metadata">
<div id="owner" class="item style-scope ytd-watch-metadata">&nbsp;</div>
</div>



Source link

अजित पवारांसह नऊ जणांची पक्षविरोधी कारवाई, त्यांना अपात्र ठरवणार; जयंत पाटलांची मोठी घोषणा

0
अजित पवारांसह नऊ जणांची पक्षविरोधी कारवाई, त्यांना अपात्र ठरवणार; जयंत पाटलांची मोठी घोषणा


Jayant Patil On Ajit Pawar Disqualification : राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ जणांची शपथविधी ही बेकायदेशीर असून त्यांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची महत्वपूर्ण माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची कृती बेकायदेशीर आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेऊन केलेली कृती आहे. एका सदस्याने याची तक्रार केली असून ती शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहे. 

जयंत पाटील म्हणाले की, आज आम्ही सर्व माहिती घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. नऊ जण म्हणजे पक्ष नव्हे. त्यामुळे या नऊ जणांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पक्षविरोधात कारवाई केल्याने या नऊ जणांवर कारवाई करण्यात येणार आहे. पक्षाच्या अध्यक्षाला न सांगता केलेली ही कृती होती. यासंबंधित आता विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना मेल केला असून त्यांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं. या 9 जणांच्या विरोधातच ही कारवाई असेल. पक्षात असून त्यांनी पक्ष विरोधी कारवाई केली आहे. 

Jayant Patil On Sharad Pawar : 5 जुलैला पाहा, महाराष्ट्र कसा पवार साहेबांच्या मागे राहतो

जयंत पाटील म्हणाले की, “जनमत हे पवार साहेबांच्या सोबत आहे. येत्या 5 जुलै रोजी पाहा, पवारा साहेबांच्या पाठिमागे महाराष्ट्र कसा उभा राहतो ते. यातील अनेक आमदार हे परत येणार आहेत. त्यांना आपल्या मतदारांना तोंड कसं दाखवायचं असा प्रश्न पडला आहे. त्यांना या गोष्टीही माहिती नव्हत्या. जे परत येतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही, पण जे परत येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.”

Jayant Patil On Ajit Pawar Disqualification : जितेंद्र आव्हाडांचा व्हिप सर्वांना लागू 

जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देऊन सांगितलं की, पक्षाने ठरवलेला व्हिप हा अंतिम असतो, आणि जितेंद्र आव्हाड हेच राष्ट्रवादीचे व्हिप असतील. मी त्यांना जो आदेश देईन आणि ते जे सांगतील ते सर्व आमदारांना लागू होईल. 

ज्या वेळी या नऊ जणांनी शपथ घेतली त्याच वेळी ते अपात्र ठरले असून यासंबंधित पत्र आम्ही निवडणूक आयोगाला दिले असल्याचं जयंत पाटील म्हणाले. 

महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते तोडफोडीचं राजकारण सुरू आहे, महाराष्ट्रात या आधी असं कधीही झालं नव्हतं. या आधी शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादीवर हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. 

ही बातमी वाचा: 



Source link

Nagpur : तळ्याकाठी पार्टी करायला गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू, पोहण्याचा मोह जीवावर बेतला

0
Nagpur : तळ्याकाठी पार्टी करायला गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू, पोहण्याचा मोह जीवावर बेतला


Nagpur news : रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. मोहगाव झिल्पी तलावात सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.



Source link

“मनी लाँड्रींग ऐकलं होतं, पण ही मिनिस्टर लाँड्रींग, जनता माफ करणार नाही” पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

0
“मनी लाँड्रींग ऐकलं होतं, पण ही मिनिस्टर लाँड्रींग, जनता माफ करणार नाही” पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल


मी मनी लाँड्रींग ऐकलं होतं, पण ही मिनिस्टर लाँड्रींग आहे, महाराष्ट्राची जनता ह्याला कधीही माफ करणार नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले..



Source link

रेल्वे रुळावर बेशुद्ध होऊन पडली महिला अन् अंगावरून गेली मालगाडी, पाहा VIDEO

0
रेल्वे रुळावर बेशुद्ध होऊन पडली महिला अन् अंगावरून गेली मालगाडी, पाहा VIDEO


जीआरपी कोतवाली प्रभारी सुशील कुमार यांनी सांगितले की, शहरातील सहावर गेट क्रासिंगवर एक महिला बेशुद्ध होऊन रुळावर पडली होती. त्याचवेळी मालगाड़ी ट्रॅकवरून आली. मालगाडी महिलेच्या अंगावरून गेली. या घटनेत महिलेला कोणतीही दुखापत झालेली नाही. नातवाईकांनी सांगितले की, महिला मानसिक रोगी आहे. ती घरात कोणालाही न सांगता बाजारात आली होती.



Source link

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट! शरद पवार आणि अजित पवारांच्या पाठिशी कोण कोणते आमदार?

0
राष्ट्रवादीमध्ये उभी फूट! शरद पवार आणि अजित पवारांच्या पाठिशी कोण कोणते आमदार?


Maharashtra NCP Political Crisis : एकनाथ शिंदेंच्या बंडाला वर्ष झाल्यानंतर राज्यात आणखी एक राजकीय भूकंप झालाय. अजित पवारांनी काही आमदारांना हाताशी घेत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार आणि आठ आमदारांनी राजभवनावर आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी या पाठिंब्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचे निश्चित झाले. राष्ट्रवादीचा पक्ष शरद पवार आणि  अजित पवार या काका-पुतण्यामध्ये विभागला गेल्याचं स्पष्ट झाले. बहुतांश आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे समोर आलेय. शरद पवार यांनीही याविरोधात दंड ठोठावत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे कोण कोणते आमदार आणि खासदार आहेत, याबाबत सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. पाहूयात कोणत्या आमदारांनी कुणाला पाठिंबा दिला आहे… 

अजित पवारांसोबत असलेले आमदार 
1. छगन भुजबळ  
2. दिलीप वळसे पाटील  
3. हसन मुश्रीफ  
4. धनंजय मुंडे  
5. आदिती तटकरे  
6. संजय बनसोडे  
7. अनिल पाटील  
8.धर्मरावबाबा आत्राम 
9.किरण लहमाटे
10. निलेश लंके
11. दौलत दरोडा
12. मकरंद पाटील
13. अतुल बेनके
14. सुनिल टिंगरे
15. इंद्रनील नाईक
16. अशोक पवार
17. अण्णा बनसोडे
18. सरोज अहिरे
29. बबनदादा शिंदे
20. यशवंत माने
21. नरहरी झिरवळ
22. दत्ता भरणे
23. शेखर निकम
24. दीपक चव्हाण
25. राजेंद्र कारेमोरे
26. नितीन पवार
27. मनोहर चंद्रिकापुरे
28. संग्राम जगताप
29. राजेश पाटील
30. सुनील शेळके
31. दिलीप मोहिते

विधानपरिषदेचे आमदार कोणते ?

1. रामराजे निंबाळकर
2. अमोल मिटकरी
3. शशिकांत शिंदे
4. अनिकेत तटकरे
5. विक्रम काळे
6. सतिश चव्हाण

अजित पवारांसोबत खासदार कोणते ?

1. सुनिल तटकरे
2. अमोल कोल्हे 
3. प्रफुल्ल पटेल (राज्यसभा)

शरद पवारांसोबत कोणते आमदार ?

1. जयंत पाटील
2. जितेंद्र आव्हाड
3. रोहित पवार
4.राजेश टोपे
5.प्राजक्त तनपुरे
6.अनिल देशमुख
7. सुनिल भुसारा
8. सुमनताई पाटील
09. संदीप क्षीरसागर
10. बाळासाहेब पाटील
11. चेतन तुपे
12. मानसिंगराव नाईक

पवारांसोबत खासदार कोणते ?

1.सुप्रिया सुळे
2. श्रीनिवास पाटील
3. वंदना चव्हाण (राज्यसभा)
4. फौजिया खान (राज्यसभा)

विधानपरिषद आमदार कोणते ?
1.अरुण अण्णा लाड
2. एकनाथ खडसे
3. बाबाजानी दुर्राणी

यांची भूमिका अद्याप अस्पष्ट –

नवाब मलिक
प्रकाश सोळंखे
बाळासाहेब आजबे
आशुतोष काळे
दिलीप बनकर
माणिकराव कोकाटे
चंद्रकांत नवघरे
राजेंद्र शिंगणे (कुटुंबियांसह सहलीला गेले आहेत)

 



Source link