Saturday, August 15, 2026
Homeसातारासातारा : शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी आ.सुमनताई पाटील, आ.अरुण लाड, आ.मानसिंगराव नाईक...

सातारा : शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी आ.सुमनताई पाटील, आ.अरुण लाड, आ.मानसिंगराव नाईक कराडात दाखल | पुढारी

सातारा : शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी आ.सुमनताई पाटील, आ.अरुण लाड, आ.मानसिंगराव नाईक कराडात दाखल | पुढारी

[ad_1]








कराड : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीतले अनेक दिग्गज नेते राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले असून, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कराड दौऱ्यावरती येत आहेत. त्यामुळे शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी व आम्ही तुमच्याच बरोबर आहे हे सांगण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक दिग्गज नेते कराडमध्ये दाखल होत आहेत.

त्याच पार्श्वभूमीवरती राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी कालच आपली भूमिका स्पष्ट केली असून, जी शरद पवारांची भूमिका तीच माझी भूमिका राहील असे त्‍यांनी सांगितले आहे. त्यानंतर आज शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक दिग्गज नेते कराडत दाखल होत आहेत. त्यामध्ये तासगावच्या आमदार सुमनताई पाटील, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक तसेच आमदार अरुण लाड हे कराड येथे दाखल झाले असून, सर्किट हाऊस मध्ये शरद पवार यांची येण्याची प्रतीक्षा करत आहेत.

हेही वाचा ;  









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments