Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2954

Kajol Devgan: “कमी शिकलेल्या राजकीय नेत्यांमुळे देशाची प्रगती मंदावली”, काजोलचे वक्तव्य चर्चेत

0
Kajol Devgan: “कमी शिकलेल्या राजकीय नेत्यांमुळे देशाची प्रगती मंदावली”, काजोलचे वक्तव्य चर्चेत

काजोलनं आपल्याकडील राजकारण्यांचं कमी शिक्षण आणि त्यांच्या दूरदृष्टीवर सवाल उपस्थित केले होते. तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, “बदल, विशेषतः आपल्या भारतासारख्या देशात खूपच हळूवारपणे सुरु आहे. खूप हळू हळू बदल घडतोय. कारण आपण आपल्या परंपरा आणि विचार करण्याच्या प्रक्रियेत अडकून पडलो आहोत. याचे कारण शिक्षणही आहे. आपल्याजवळ असे राजकीय नेते आहेत ज्यांना चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. यांपैकी अनेक नेत्यांजवळ तर दूरदृष्टीचे नाही, मला वाटते ही दूरदृष्टी तुमच्यात शिक्षणामुळे येते. शिक्षणच तुम्हाला विविध परिप्रेक्षातून पाहण्याची संधी देते.”

Source link

Sangeeta Bijlani: संगीता बिजलानी आणि सलमान खानचे का मोडले लग्न? जाणून घ्या कारण

0
Sangeeta Bijlani: संगीता बिजलानी आणि सलमान खानचे का मोडले लग्न? जाणून घ्या कारण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, “सलमान खान आणि संगीता बिजलानी हे दोघेही लग्न करणार होते. मात्र एक दिवस अचानक संगीता बिजलानीला सलमानच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी सलमान हा सोमी अलीला डेट करत होता, असे म्हटले जाते. संगीताला सोमी अली आणि सलमानच्या अफेअरबद्दल समजताच तिने त्याच्याबरोबरचे संबंध तोडून टाकले. त्याबरोबरच तिने लग्न करण्यासाठीही नकार दिला.”

Source link

Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरची कारला धडक; एक ठार, तिघे जखमी

0
Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरची कारला धडक; एक ठार, तिघे जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा नजिक खडवली फाट्याजवळ एक भरधाव कंटेनर जात असतांना यावेळी चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. यावेळी या कंटेनरने एका कारला पाठीमागून जोरदार धडक देत काही अंतरापर्यंत फरफट नेले. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका एका आईस्क्रीमच्या टेम्पोला देखील जोरदार धडक देत दोन ते तीन दुचाकींना चिरडले. दरम्यान, आइसक्रीम खात असलेले दोन ते तीन जण कंटेनर खाली आले. यातील एकाच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. गंभीर जखमींना येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला होता. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

Source link

अभिनेते, दिग्दर्शक गुरुदत्त यांचा जन्म, मुंबई शेअर बाजाराची सुरुवात; आज इतिहासात

0
अभिनेते, दिग्दर्शक गुरुदत्त यांचा जन्म, मुंबई शेअर बाजाराची सुरुवात; आज इतिहासात

9th July In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. त्या-त्या दिवशी घडलेल्या घटना महत्त्वाच्या असतात. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराची वडाच्या झाडाखाली सुरुवात झाली. आजच्या दिवशी प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा असलेली विंबल्डन चॅम्पियनशिप सुरू झाली. तर, आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीवर छाप सोडणारे गुरुदत्त यांचा जन्म झाला.

1875: मुंबई शेअर बाजाराची सुरुवात

व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांनी 9 जुलै 1875 साली मुंबई शेअर बाजाराची स्थापना केली. टाऊन हाॅलसमोरील वडाच्या झाडाखाली हे सर्व दलाल लोक एकत्र येऊन व्यवहार करत असे.  1980 मध्ये बीएसईचे कार्यालय पीजे टॉवर्समध्ये हलवण्यात आले. 9 जुलै, 1875 रोजी दलालांनी द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन या नावाने कामाला सुरुवात केली. ऑगस्ट 1957 मध्ये बीएसई सिक्योरिटीज कॉन्ट्रक्टस रेग्युलेशन अॅक्टअतंरग्त भारत सरकारने मान्यता दिली. सरकारने मान्यता दिलेला हा पहिला स्टॉक एक्सचेज आहे. त्यानंतर 1986 मध्ये देशातील पहिला इक्विटी इंडेक्स, S&P BSE SENSEX, 1978-79 मध्ये सुरु झाले. त्याचा बेस पॉईंट 1000 ठेवण्यात आला होता.

वडाच्या झाडाखाली सुरू झालेल्या मुंबई शेअर बाजाराने आपल्या व्यवहाराचा वटवृक्ष वाढवला आहे. जगातील प्रमुख 10 शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा समावेश होतो. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल सध्या 300 लाख कोटींच्या आसपास आहे.

1877: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरू झाली

द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची स्पर्धा आहे. युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही स्पर्धा 1877 सालापासुन खेळवली जात आहे. चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सर्वात जुनी व अजुनही गवतापासुन बनवलेले कोर्ट (ग्रासकोर्ट) वापरणारी एकमेव स्पर्धा आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी ह्या पाच प्रमुख स्पर्धा विंबल्डन दरम्यान भरवल्या जातात.

1921: रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म

रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ऊर्फ रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि पक्षाचे विधानसभेतील पहिले आमदार होते. ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. जनता पार्टीचे खासदार म्हणून 1977 साली आणि 1980 साली ते ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून गेले होते.

1925: अभिनेते, दिग्दर्शक गुरुदत्त यांचा जन्म

वसंत कुमार शिवशंकर पादुकोण अर्थात गुरुदत्त यांचा आज जन्मदिन. गुरुदत्त हे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते होते. गुरुदत्त यांनी आपल्या अल्पकालीन चित्रपट कारकिर्दीत स्वतंत्र छाप सोडली होती. 1950 आणि 1960 च्या दशकात प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम आणि चौधविन का चांद यांसारखे अनेक क्लासिक चित्रपट केले. उल्लेखनीय म्हणजे, प्यासा आणि कागज के फूल यांचा टाईम मासिकाच्या 100 सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. गुरुदत्त यांच्या चित्रपट परदेशातही झळकले. तेथील प्रेक्षकांनीदेखील त्याचे कौतुक केले.

गुरु दत्त यांना प्रभात फिल्म कंपनीने कोरिओग्राफर म्हणून नियुक्त केले होते परंतु लवकरच त्यांना अभिनेता म्हणून काम करण्यास भाग पाडले गेले. इतकंच नाही तर सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली. प्रभातमध्ये काम करत असताना त्याचे देव आनंद आणि रहमान यांच्याशी संबंध निर्माण झाले, ते दोघेही नंतर चांगले स्टार बनले. या दोघांच्या मैत्रीमुळे गुरू दत्त यांना फिल्मी दुनियेत स्थान निर्माण करण्यात खूप मदत झाली. प्रभात बंद पडल्यावर गुरुदत्त मुंबईत आले. देव आनंद यांनी गुरुदत्त यांना बाजी या आपल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली होती. 1951 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर मात्र, गुरुदत्त यांना चित्रपटसृष्टीत यश मिळाले.

इतर महत्त्वाच्या घटना:

1819 : साली शिलाई मशीनचा शोध लावणारे अमेरिकन संशोधक एलिआस हॉवे (Elias Howe) यांचा जन्मदिन.
1856: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो यांचे निधन.
1900 : साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी आणि माजी संसदीय कार्यमंत्री तसचं, मध्यप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल सत्य नारायण सिन्हा यांचा जन्मदिन.
1951 : भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
1969: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.
2011: सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक

राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.

काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.

मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

Source link

Notice to Shivsena – Thackeray Group सेना, ठाकरे गटाच्या एकूण 54 आमदारांना नोटीस, 7 दिवसांचा कालावधी

0
Notice to Shivsena – Thackeray Group सेना, ठाकरे गटाच्या एकूण 54 आमदारांना नोटीस, 7 दिवसांचा कालावधी

शिवसेनेचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणण मांडण्यासाठी नोटीस. विधिमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी ७ दिवसांची मुदत. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना पुरावे सादर करावे लागणार.

Source link

Chhagan Bhujbal: अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांनी सभेसाठी येवला का निवडलं? भुजबळ म्हणाले…

0
Chhagan Bhujbal: अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांनी सभेसाठी येवला का निवडलं? भुजबळ म्हणाले…

राष्ट्रलवादीच्या पक्षफुटीनंतर शरद पवार यांची नुकतीच येवला येथे पहिली सभा झाली. यावेळी शरद पवारांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, शरद पवारांनी सभेसाठी येवला हे ठिकाण का निवडले? असा प्रश्न छगन भुजबळ यांना केला असता ते म्हणाले की, “पहिले म्हणजे पवारांचे माझ्यावर अतोनात प्रेम आहे. दुसरे असे आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्यावेळी पक्ष वाढवण्यासाठी राज्यभर फिरणारा पहिला नेता छगन भुजबळच होता. त्यानंतरच बाकीचे लोक पक्षात आले. मी त्यांच्यासोबत पहिल्यापासून असल्यानेच माझा पहिला नंबर लागतो”, असे छगन भुजबळ म्हणाले.

Source link

Sharad Pawar: काही नेत्यांबाबत माझा अंदाज चुकला; शरद पवारांनी मागितली येवल्यातील नागरिकांची माफी!

0
Sharad Pawar: काही नेत्यांबाबत माझा अंदाज चुकला; शरद पवारांनी मागितली येवल्यातील नागरिकांची माफी!

Sharad Pawar yeola Meeting after NCP rebellion: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांची नाशिकच्या येवल्यात आज सभा पार पडली. यावेळी शरद पवार गटाचे येवल्यात जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. दरम्यान, शरद पवारांसह खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांचे येवल्यात जंगी स्वागत करण्यात आले. येवल्यातील सभेत शरद पवारांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. मी येथे कोणावर टीका करण्यासाठी नाहीतर, काही नेत्यांबाबत माझा अंदाज चुकाला, यासाठी माफी मागायला आलो आहे, असे शरद पवार म्हणाले.

Source link

हॉटेल चालक म्हणावं की गुंड…; पोलिसांच्या कारवाईत चक्क गावठी कट्टा व कोयता लागला हाती

0
हॉटेल चालक म्हणावं की गुंड…; पोलिसांच्या कारवाईत चक्क गावठी कट्टा व कोयता लागला हाती

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) ग्रामीण पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत हॉटेल चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. एकोड पाचोड रोड वरती खडी क्रेशरच्या पुढे असलेल्या हॉटेल जंगदवाचा मालक सुनिल वैजिनाथ्ज्ञ चंदने (वय 27 वर्षे रा. आपतगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर) हा स्वतः कडे एक गावठी कट्टा बेकायदेशिर व अवैधरित्या बाळगत असल्याची माहिती खांडेकर यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या हॉटेल चालकाला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे चिकलठाणा पोलिसांनी एकोड पाचोड रोडवरती खडी क्रॅशरच्या पुढे असलेल्या हॉटेल जंगदबा येथे सापळा लावला होता. यावेळी हॉटेल मालक सुनिल वैजिनाथ चंदने हा हॉटेलमध्येच असताना पथकांने त्याच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन होते. त्यानंतर त्याच्यावर अचानक झडप घालुन त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याला अनाधिकृतपणे स्वतःजवळ बाळगत असलेल्या गावठी कट्टया बाबत विचारपुस केली असता, त्याने पोलीसांना सहकार्य न करता उडवा उडवीची उत्तरे दिली. यावरून त्याचेवर अधिक संशय बळावल्याने त्याला विश्वासात घेऊन कसोशिने विचारपुस करताच त्यांने त्याच्या हॉटेल जंगदवाच्या पत्र्याचे शेडच्या पाठीमागे जमिनीत खड्डा करून त्यात पुरुण लपवुन ठेवलेला गावढी कट्टा व एक कोयता हा पोलीसांना काढुन दिला आहे.

हॉटेल चालक आरोपीला अटक…

अवैधरित्या विनापरवाना स्वतः जवळ बाळगत असलेला गावठी कट्टा व कोयता हा पोलीसांनी जप्त करून आरोपी नामे सुनिल वैजिनाथ चंदने याच्याविरूध्द पोलीस ठाणे चिकलठाणा येथे गुन्हा दाखल केला आहे. भारतीय हत्यार कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच चंदनेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, रवि साळवे, दिपक देशमुख, अजित शेकडे, सतिष देतकर, भारती राठोड, गणेश कोरडे यांनी केली आहे.

हॉटेलात जेवण करणाऱ्यावर शस्त्राने वार

दुसऱ्या एका घटनेत हॉटेलात जेवण करत असलेल्या एकाला तुझी गाडी आम्ही आणली आहे आमच्या सोबत चल असे म्हणत सोबत नेऊन शस्त्राने वार करून जखमी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हि घटना 5 जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास हर्सूल भागात घडली. समाधान विश्वनाथ तायडे (वय 41, रा. मयुरपार्क, ऑडिटर सोसायटी) हे एका हॉटेलात जेवण करीत होते. तेव्हा आरोपी राहुल बाबासाहेब सोनवणे, सुनील केंद्रे आणि आणखी एकजण तिथे आले. त्यांनी तुझी गाडी आम्ही आणली आहे. सोबत चल तुला दाखवतो असे म्हणत शिविगाळ करून मारहाण केली. तसेच शस्त्राने डाव्या-उजव्या दंडावर, डोळ्याच्या खाली, छातीवर मारून जखमी केले. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Chhatrapati Sambhaji Nagar : संशयास्पद कॉलनंतर राज्यभरातील रेल्वे स्थानकांवर ‘हाय अलर्ट’; मेसेज पाठवणाऱ्याला गोव्यातून घेतलं ताब्यात

Source link

Nashik: नाशकात भक्ताकडून मांत्रिक महिलेची हत्या, परिसरात खळबळ

0
Nashik: नाशकात भक्ताकडून मांत्रिक महिलेची हत्या, परिसरात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, जनाबाई भिवाजी बर्डे (वय, ४५) असे हत्या झालेल्या महिला मांत्रिकाचे नाव आहे. तर, निकेश दादाजी पवार (वय, ४१) असे हत्या करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. निकेश हा देखील दोन वर्षांपासून त्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी जनाबाई यांच्याकडे ये-जा करीत होता. परंतु, जनाबाई यांनी सांगितलेल्या तोडग्याचा निकेशला काहीही फायदा झाला नाही, याचा राग त्याच्या डोक्यात होता. याच रागातून निकेशने शुक्रवारी दुपारी जनाबाईच्या घरी गेला आणि धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर आणि पोटावर वार केले. यानंतर निकेशने घटनास्थळावरून पळ काढला.

Source link