Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2955

देशाला हुकुमशाहीपासून वाचवणे जनतेच्या हातात : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

0


कराड; पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेसमुक्त म्हणणे म्हणजे भाजपला विरोधी पक्ष नको आहे. छोटे पक्ष नको आहेत. एकाच पक्षाचे सरकार पाहिजे म्हणजेच हुकूमशाही पाहिजे. देशाला हुकुमशाहीपासून वाचवणे जनतेच्या हातात आहे अशी प्रतिक्रिया आज (दि. ८) माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मलकापूर (ता. कराड) येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे प्रमुख उपस्थित होते.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, निष्ठा हा ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याच्या चरित्राचा एक भाग आहे. आज एका महत्त्वाच्या पक्षामध्ये फूट पडलेली आहे. तशाच प्रकारची फूट यापूर्वी मी तीन वेळेला पाहिलेली आहे. छोट्या मोठ्या प्रमाणात माणसे येत जातात. त्यामुळे सत्तेचा गैरवापर, दबाव, दहशत, ईडी, सीबीआय याचा वापर करून काही नेते दहशतीखाली गेले असले तरी माणसे सोडून जाणार नाहीत. जे शिवसेनेच्या बाबतीत झाले. खासदार, आमदार सोडून गेले, मात्र माणसे गेली नाहीत. याही पक्षात नेते सोडून गेले असले तरी माणसे जाणार नाहीत, याचा प्रत्यय काही दिवसातच येईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या फुटीबाबत राष्ट्रवादीचे नाव न घेता व्यक्त केला.

 चव्हाण पुढे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांपुढे एकनाथ शिंदे गटाविरुद्ध पक्षांतर बंदीची कारवाई चालू झालेली आहे. त्यामुळे कोणाला नोटीस पाठवायचे, कोणाला साक्षी करता बोलवायचे हे ठरवून विधानसभा अध्यक्ष त्यांची कार्यवाही करतील‌. माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टाने 11 मे रोजी हा वाद विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे 90 दिवसांच्या आत त्यांना निवाडा द्यावा लागेल. म्हणजेच 10 ऑगस्टच्या सुमारास निलंबनाच्या बाबतींत विधानसभा अध्यक्षांना निवाडा द्यावा लागेल. विधानसभेचे अध्यक्ष हे घटनात्मक पदावरती बसलेले आहेत. त्यामुळे त्यांना घटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करावे लागणार आहे. ते विधी तज्ञ आहेत. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय अयोग्य आहे असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात जायचा मार्ग मोकळा आहे.

सध्या विरोधी पक्ष नेत्याचे चर्चा करण्याची गरज नाही, असे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, संसदेत परंपरा ठरलेली आहे. पार्लमेंटमध्ये, विधिमंडळामध्ये सत्ताधारी पक्षाचा मोठा गट असतो त्याचा नेता पंतप्रधान होतो. विरोधी पक्षाचा सर्वात मोठा गट असेल, गटबंधन आघाडी असेल तर सर्वात मोठ्या पक्षाचा नेता विरोधी पक्ष नेता बनतो. अजूनही विरोधी पक्षातील सर्वात मोठा गट कोण आहे, यामध्ये स्पष्टता नाही. ज्या दिवशी स्पष्टता येईल त्या दिवशी निर्णय होईल. त्यामुळे त्याबाबत आता चर्चा करण्याची गरज नाही.

काँग्रेसमधून आमदार फुटून जाणं शक्य नाही

पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे दोन तृतीयांश आमदारांना बाजूला जावे लागते. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये फुटीची शक्यता नाही. काँग्रेस पक्षामध्ये 45 आमदारांचा आमचा गट आहे. त्यातील 30-31 आमदार फुटून बाहेर जातील याची अजिबात शक्यता नाही. भाजपच्या गोटातून खोट्या अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी विविध पक्षांमधून भाजपमध्ये गेलेल्या लोकांच्या गर्दीमध्ये कोणाला काय पद मिळणार? हे बघूया. त्यांना साधे मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती करता येत नाही, हे वाटते तितके सोपे नाही, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

राजकीय अमिषांना बळी पडणारांची चिंता

सध्याच्या राजकारणाची परिस्थिती पाहता सामान्य माणसाचा स्वतःवरतीच विश्वास राहिला आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. यामध्ये फक्त राजकीय नेत्यांनाच दोष देऊन चालणार नाही. त्या राजकीय नेत्याला निवडून कोणी दिलं? अमिषांना कोण बळी पडले? हेही कोणालातरी विचारावे लागणार आहे.

काँग्रेसमुक्त म्हणजे भाजपला विरोधी पक्ष नको

भाजपला एका पक्षाची सत्ता किंवा एका पक्षाची हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे, हे मी गेली अनेक दिवसांपासून सांगत आलो आहे. काँग्रेस मुक्त असे कित्येक वेळेला अमित शहा यांनी म्हटले होते. काँग्रेसमुक्त म्हणणे म्हणजे तुम्हाला विरोधी पक्ष नको आहे. छोटे पक्ष नको आहेत. एकाच पक्षाचे सरकार पाहिजे आहे. हुकूमशाही पाहिजे. त्यामुळे देशात हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हुकुमशाहीच्या दिशेने देश नेण्याचे काम सुरू आहे. ते जाऊ द्यायचं की नाही हे जनतेच्या हातात आहे, असेही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा



Source link

Sushama Andhare: माझी जात बघून मला झुरळासारखं झटकलं होतं; सुषमा अंधारेंचे नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप

0
Sushama Andhare: माझी जात बघून मला झुरळासारखं झटकलं होतं; सुषमा अंधारेंचे नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप


“काही माणसं पदामुळे मोठी होतात…काही पद माणसांमुळे मोठे होतात…पण काही माणसं निव्वळ माणसांमुळे मोठे होतात. तुम्ही यातल्या पहिल्या प्रकारातल्या. तुमचे अनेक किस्से महिला पदाधिकारी सांगायचे तेव्हा मला त्यांचा राग यायचा. वाटायचं , एका विद्वान बाईला निष्कारण बदनाम केलं जातंय. लातूरच्या संघटिका चालक मामी दोन महिन्या पूर्वी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, निलम ताईने मला प्रेस मध्ये बसू दिले नाही. अपमानित केले. तर पुण्याच्या स्वाती ढमाले यांना तुम्ही गाडीत बसू दिले नाही. तर सोलापूरच्या संघटिकेला मुंबई बंगल्यावर वॉशरुम वापरण्यास मज्जाव केला”, असेही सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.



Source link

‘ना टायर हूँ, ना रिटायर हूँ’!वय झाल्याच्या टीकेला अटलजींच्या वाक्यातून शरद पवारांच प्रत्युत्तर

0
‘ना टायर हूँ, ना रिटायर हूँ’!वय झाल्याच्या टीकेला अटलजींच्या वाक्यातून शरद पवारांच प्रत्युत्तर


Sharad Pawar Nashik : ‘मी आजही धडधाकट असून आजही पक्ष सांभाळण्यास सक्षम आहे. जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला (Maharashtra NCP)  जनमानसात नेणार असल्याचे सांगत ‘ना टायर हूँ, ना रिटायर हूँ’ अशा शायराना अंदाजात वय झाल्याच्या टीकेला शरद पवार (Sharad Pawar)  यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाक्यातून शरद पवार यांनी टीकेला उत्तर दिले आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज नाशिक (Nashik) जिल्ह्यात असून येवला येथील सभेसाठी  (Yeola) ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. तत्पूर्वी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा वयाबाबत टीका करणाऱ्या लोकांना ठणकावलं आहे. ते म्हणाले की , आजही माझी तब्येत सक्षम असून पक्ष पुढे चालविण्यासाठी जोमाने काम करत राहणार आहे. जोपर्यंत आपल्यावर प्रेम करणारी माणसे जवळपास आहेत, तोपर्यंत हा पक्ष पुढे नेण्यांसाठी काम करत राहणार आहे. ‘ना टायर हू, ना रिटायर हू’ असं अटल बिहारी वाजपेयींच्या वाक्याचा दाखला देत त्यांनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

शरद पवार पुढे म्हणाले की, आज नाशिकच्या येवल्यात जाहीर सभा होत असून नाशिक का निवडला याचे कारणही त्यांनी दिले आहे. स्वातंत्र्यांनंतर काँग्रेसचा मोठे अधिवेशन येथे झालं. त्यामुळे नाशिकला मोठा इतिहास असल्यानं दौऱ्याची सुरुवात नाशिक येथून झाली आहे. तसेच नाशिककडे येताना लोकांचे चेहरे पाहून माझा आत्मविश्वास वाढला. तसेच छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर त्यांनी येवलामधून निवडणूक लढवावी अस सहकाऱ्यांनी सांगितलं आणि भुजबळ यांनी येवल्यातून निवडणूक लढवली. त्यांनतर नाशिकमध्ये मोठं यश याआधी आम्हाला मिळालं आहे. 

तसेच महाराष्ट्रमध्ये काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली, त्यात राष्ट्रवादी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहे. मला वैयक्तिक कुणावरही टीका करायची नाही. मात्र राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या सर्व बंडखोर आमदारांचा पराभव होणार आहे. प्रफुल्ल पटेल यांना दहा वर्ष मंत्रिपद दिल, लोकसभेत पराभव होऊनही पटेलांना राज्यसभेत पाठवलं, मात्र मनाविरुद्ध गोष्ट झाली. अनेकदा लोक म्हणायचे सुप्रिया सुळेवर तुम्ही अन्याय केला, सुप्रिया सुळे यांनी पक्षीय राजकारणात यावा, असा आग्रह कार्यकर्त्यानी केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत मोठ्या मतांनी त्या निवडून आल्याचे शरद पवार म्हणाले. 

आमदारांचा आकडा महत्वाचा नाही… 

माझ्यासोबत आमदारचा आकडा किती हे महत्वाचा नाही. 23 राज्याचे पदाधिकारी आमच्यासोबत असून ते कार्यकारिणी बैठकीत होते. नाशिक जिल्ह्याचा वैशिष्ट्य असा आहे की आमचे विचार पटणारे मतदार आहेत. लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष राहिले पाहिजे. मात्र विरोधी पक्ष राहिला नाही पाहिजे, असं भाजप करत आहे. कोणी फेरविचार करायचा असेल तर त्यांनी करावा, असा सल्लाही अजित पवार गटाला उद्देशून दिला आहे. तसेच राजकारणात मी कोणाला शत्रू मानत नाही, विचार वेगळे असतील..तसेच जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांनी पक्षासाठी मोठं काम केलं आहे. पक्षाची विचारधारेसोबत ते अनेक वर्षे राहिले, त्यामुळे ते अडसर ठरू शकत नसल्याचे शरद पवार म्हणाले. 

 



Source link

सातारा : महाबळेश्वरचा वेण्णा तलाव भरला; पावसाळी पर्यटनासाठी गर्दी | पुढारी

0









सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा पावसाचे माहेरघर, सर्वाधिक पावसाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या पंधरा वीस दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी अशी ओळख असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने आज (शनिवार) पहाटे भरला. यामुळे या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

महाबळेश्वर अन् पाऊस हे समीकरण किती घट्ट आहे, याचा प्रत्यय गेले काही दिवस धुवाधार बरसणाऱ्या पावसाने येत आहे. शहर व परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. कोसळणाऱ्या या पावसाने जनजीवन विस्खळीत झाले आहे. जून महिन्याच्या प्रारंभीपासूनच पावसाचे प्रमाण कमी होते. बिपर जॉय चक्रीवादळाचा काहीसा प्रभाव पाहावयास मिळाला, परंतु पुन्हा ऊन पावसाचा खेळ सुरू झाला. मात्र जून महिन्याच्या चौथ्या आठवड्यानंतर खऱ्याअर्थाने शहर परिसरात धुवाधार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. संपूर्ण जून महिन्यामध्ये एकूण तीस इंच पावसाची नोंद झाली होती.

गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पावसाची नोंद यंदाच्या जून महिन्यात झाल्याचे पाहावयास मिळाले. जुलै महिन्याच्या प्रारंभी पासूनच जोरदार वाऱ्यासह दाट धुके व पावसाची संततधार सुरु होती. महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पांचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला. आज शनिवारी पहाटे वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले. याच वेण्णा तलावातून महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. महाबळेश्वरात पावसाने पन्नास इंचाचा टप्पा गाठला की वेण्णा तलाव ओव्हरफ्लो होतो असा इतिहास आहे.

वेण्णालेक परिसरात पर्यटकांनी अशा धुंद वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी गर्दी केली होती. अनेकजण दाट धुक्यात सेल्फी घेताना पहावयास मिळाले, तर अनेक हौशी पर्यटकांनी घोडे सवारीचा आनंद घेतला. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत कपडे व्यावसायिक, चप्पल व्यापाऱ्यांनी ”सेल” लावल्याने ”सेल”साठी स्थानिकांसह पर्यटकांची मोठी गर्दी दिसत आहे. उबदार कपडे, शाल, मफलर, ब्लँकेट्स घेण्यासह रेनकोट छत्री दुकानांकडे देखील गर्दी होताना दिसत आहे. महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. ०१ जून ते ०८ जुलै सकाळी ८.३० वाजेपर्यंत १३०१.० मिमी (५१.२२ इंच) पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : 











Source link

Bharat Jadhav: भरत जाधव कोल्हापूरमध्ये स्थायिक का झाला? कारण आले समोर

0
Bharat Jadhav: भरत जाधव कोल्हापूरमध्ये स्थायिक का झाला? कारण आले समोर


पुढे त्याने कोल्हापूरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला याबद्दल बोलत “आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडे थांबणे, वेळ घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाने कोल्हापुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मला तिथे छान वाटते, तिथे ताजी हवा आहे. मला मुंबई खूप आवडते. पण तिथून काम करणे गरजेचे राहिलेले नाही. आता मी कोल्हापूरहून मुंबईला काम करण्यासाठी येतो, माझे काम झाले की कोल्हापूरला परत जातो” असे म्हटले.



Source link

Shahrukh Khan: शाहरुख खानला अभिनय येत नाही; अभिनेत्री साधला निशाणा

0
Shahrukh Khan: शाहरुख खानला अभिनय येत नाही; अभिनेत्री साधला निशाणा


पुढे ती म्हणाली, ‘मला असे वाटते की शाहरुखला अभिनय येत नाही. तो एक यशस्वी उद्योगपती आहे. त्याला माहिती आहे त्याचे मार्केट कसे उभे करायचे. अनेकांना माझे म्हणणे पटणार नाही. पण हरकत नाही. त्यांचे चांगले व्यक्तीमहत्त्व आहे. त्याच्यापेक्षाही इतर चांगले अभिनेते आहेत.’



Source link

सातारा : आ. मकरंद पाटील अजितदादांबरोबर जाणार | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  ‘मकरंद पाटील माघारी फिरा’ या ‘पुढारी’ने वाई-खंडाळा – महाबळेश्वर मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मागणीचा लेखाजोखा सादर केल्यानंतर आ. मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासंदर्भात किसनवीर कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक झाल्याचे समजते.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथी झाल्यानंतर आ. मकरंद पाटील यांनी ना. अजितदादा पवार यांच्यासोबत स्नेहभोजन घेतले होते. मात्र, दुसर्‍याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या सातारा दौर्‍यात आ. मकरंद पाटील कराडपासून सातारापर्यंत पूर्णवेळ दिसले होते. तत्पूर्वी वाईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील बदललेली परिस्थिती, किसनवीर कारखान्यावर असलेले आरिष्ट लक्षात घेवून पाच ते सहा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी ‘पुढारी’ने ‘मकरंद पाटील माघारी फिरा’ अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी दिवसभर आ. मकरंद पाटील यांना ‘पुढारी’च्या वृत्ताचा दाखला देवून आपल्याला शेतकर्‍यांच्या हितासाठी अजितदादांसोबत जावे लागेल, असा कौल दिल्याने आ. मकरंद पाटील यांची द्विधावस्था झाली.

याच कालावधीत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे ना. निंबाळकर व आ. मकरंद पाटील यांच्या अत्यंत जवळच्या मित्रांनी ‘निर्णय घ्यावा लागेल’, असे आ. मकरंद पाटील यांना सांगितल्यानंतर पाच-सहा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आ. मकरंद पाटील यांनी घेतला असल्याचे समजते. किसनवीर कारखाना कार्यस्थळावर ‘पुढारी’च्या वृत्ताचा हवाला देवून शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक झाली. ‘पुढारी’ने जे मांडले आहे ते कारखाना कार्यस्थळावरील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचे आहे. त्यामुळे मकरंदआबांनी निर्णय घ्यावा व अजितदादांसोबत जावे, असा ठराव करण्यात आला. रात्री उशीरा आ. मकरंद पाटील यांना याबाबतची कल्पना देण्यात आली. त्यामुळे आ. मकरंद पाटील हे अजितदादांसोबत जाणार असल्याचे जवळजवळ निश्चित असून ‘पुढारी’ने याप्रकरणी निर्णायक भूमिका घेतली असल्याची प्रतिक्रिया वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. आता ना. अजितदादा पवार हे आ. मकरंद पाटील यांना कोणते मंत्रीपद देतात?, आ. मकरंद पाटील खरोखरच ना. अजितदादा पवार यांना सोबत करणार का? याविषयी उत्सुकता आहे.











Source link

Pune Kundamala Incident : पोहायला गेला अन् धरणात वाहून गेला; बुडलेला तरुण २४ तासांनंतरही बेपत्ताच!

0
Pune Kundamala Incident : पोहायला गेला अन् धरणात वाहून गेला; बुडलेला तरुण २४ तासांनंतरही बेपत्ताच!


मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार गायकवाड हा तरुण त्याच्या मित्रांसोबत पुण्यातील मावळच्या कुंडमाळा बंधाऱ्यात पावसाचा आनंद घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी बंधाऱ्यावर चालत असताना त्याचा अचानक पाय घसरला. त्यानंतर तो बंधाऱ्यातील पाण्यात वाहून गेला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड करत केली, परंतु तोपर्यंत ओमकार दूरपर्यंत वाहून गेला. घटनेनंतर स्थानिक पोलीस, नागरिक आणि मावळ वन्यजीव रक्षक बचाव पथकाच्या सहाय्याने ओमकारचा शोध घेण्यात येत आहे. शुक्रवारपासून त्याला शोधण्यात येत आहे. परंतु अद्यापही तो सापडलेला नाही. शुक्रवारी संध्याकाळी शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. परंतु शनिवारी सकाळी पुन्हा ओमकारला शोधण्याचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.



Source link

72 Hoorain: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला सिनेमा, कमावले इतके कोटी

0
72 Hoorain: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला सिनेमा, कमावले इतके कोटी



72 Hoorain box office collection: ‘७२ हुरें’ हा चित्रपट पाहण्यासाठी शुक्रवारी थिएटर्समध्ये फक्त ७ टक्के प्रेक्षक आले होते.



Source link

Tuljabhavani Temple:तुळजाभवानीच्या अभिषेकासाठी 50 ऐवजी 500 रु. शुल्क,तुळजाभवानी मंदिर समितीचा निर्णय

0
Tuljabhavani Temple:तुळजाभवानीच्या अभिषेकासाठी 50 ऐवजी 500 रु. शुल्क,तुळजाभवानी मंदिर समितीचा निर्णय



<p>तुळजाभवानीच्या अभिषेकासाठी आता 50 ऐवजी 500 रु. शुल्क, तुळजाभवानी मंदिर समितीचा नवा निर्णय सोमवारपासून लागू</p>



Source link