Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2956

जावलीत दीपक पवार-अमित कदम यांच्यात संघर्ष उफाळणार | पुढारी

0


पाचगणी; इम्तियाज मुजावर :  राष्ट्रवादी पक्षात मोठ्या प्रमाणात दुफळी पडल्याने त्याचे पडसाद ग्रामीण भागात उमटत असून यामुळेे ग्रामिण भागातील राजकारण ढवळून निघाले आहे. पक्ष दुभंगल्याने गावागावात राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या जावलीत आता काही ठिकाणीच राष्ट्रवादीचे अस्तित्व उरल्याचे दिसत आहे. जावलीत आधिच राष्ट्रवादीची ताकद कमी आणि त्यात आणखी दुफळी यामुळे आगामी काळात दीपक पवार आणि अमित कदम यांच्यात संघर्ष उफळणार आहे.

जावलीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर आ. शिवेंद्रराजे भोसले दोनवेळा निवडून आले. नंतर ते भाजपात जावून निवडून आले. जावली तालुक्यात आपल्या डॅशिंग नेतृत्वाने त्यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष पूर्णतः कार्यकर्त्यांसह हायजॅक केला आहे. राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जावलीत दीपक पवार, अमित कदम यांनी राष्ट्रवादी काही प्रमाणात टिकवून ठेवली आहे. आता राष्ट्रवादी पक्षच दुभंगल्याने येथेही गावागावात शरद पवार व अजित पवार गट निर्माण झाले आहेत. अमित कदम हे अजित पवारांकडे तर दीपक पवार हे शरद पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. अमित कदम यांचे काही कार्यकर्ते शरद पवारांकडे गेले आहेत. जावलीत हाताच्या बोटावर शिल्लक असणार्‍या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्येही दुफळी निर्माण झाल्याने तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
जावलीतील राजकारणावर आ. शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाचा मोठा पगडा आहे. त्यामुळे गाव तसेच वाडी वस्तीवर आ. शिवेंद्रराजे हाच आमचा पक्ष अशी धारणा आहे.

काही महिन्यांपूर्वी एकत्रित आलेले अमित कदम, दीपक पवार, सदाभाऊ सपकाळ, आ. शशिकांत शिंदे हे मेढ्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवारांच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. मात्र, आता अजित पवारांनीच शरद पवारांना सोडून वेगळी चूल मांडल्याने कोणाचा झेंडा घेऊ हाती, अशी परिस्थिती येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आहे.

राष्ट्रवादी पक्षात राहून आ. शिवेंद्रराजे गटाशी काही प्रमाणात टक्कर देणारांची या दुफळीमुळे चांगलीच गोची झाली आहे. कारण अजित पवार यांचा गट हा पूर्णतः भाजप सेना युतीच्या सत्तेत सामील झाल्याने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यार्ंना आ. शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखालीच आता पुढील वाटचाल करावी लागेल. शरद पवार यांच्या गटात गेलेल्या कार्यकर्त्यार्ंना मात्र, पुढे काय? हाच प्रश्न सतावत आहे.

दरम्यान आगामी काळात होणार्‍या निवडणुकांत कोणत्या राष्ट्रवादीला मतदान करायचे? या संभ्रमात जनता राहील. याचा फायदा आ. शिवेंद्रराजे गटाला नक्कीच होईल.

आ. शिवेंद्रराजे भाजपात गेल्याने राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते येथे एकाकी पडले. आता तर पक्षातच दोन गट पडल्याने तालुक्यात आपले अस्तित्व टिकवताना या कार्यकर्त्यार्ंना तसेच त्यांच्या नेत्यांना कसरत करावी लागणार हे निश्चित. येथे त्यांना आ. शिवेंद्रराजेंशी जुळवून घ्यावं लागणार आहे. तरच अमित कदम अर्थात अजित पवारांचा राष्ट्रवादी गट हा तालुक्यात यशस्वी होईल, असा सूर सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून उमटू लागला आहे. कदाचीत अमित कदम भविष्यात आ. शिवेंद्रराजेंकडे येतील असेही बोलले जात आहे.

दीपक पवार – आ. शिवेंद्रराजे यांच्यात संघर्ष ठरलेलाच….

पारंपरिक विरोधक असणारे दीपक पवार व आ. शिवेंद्रराजे यांच्यात आगामी काळातही संघर्ष होणारच यात शंका नाही. दीपक पवार, सदाभाऊ सपकाळ, आ. शशिकांत शिंदे असा राष्ट्रवादीचा शरद पवार गट जावलीत निर्माण होईल आणि तोच भाजपा विरोधक राहील.

आ. शशिकांत शिंदे, सदाभाऊ सपकाळ असे आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहोत. तालुक्यात शरद पवारांचा गट मजबूत आहे, कार्यकर्त्यांची फळीदेखील आता ताकतीने उभी राहिली आहे.
– दीपक पवार

जावलीत जर अजित पवारांनी शिवेंद्रराजेशी जुळवून घ्या, असे सांगितले तर नक्कीच कार्यकर्त्यांचा विचार घेऊन जुळवून घेतले जाईल.
– अमित कदम



Source link

सातारा : दोन्ही गटांना करावी लागणार पुनर्बांधणी;राजकीय रस्सीखेच होणार तीव्र | पुढारी

0









खेड; अजय कदम :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडत अजितदादांनी केलेले बंड व शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सातारा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दोन्ही गट सातारा तालुक्यात कमकुवत आहे. त्यामुळे गटाची पुनर्बांधणी करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे दोन्ही गटात राजकीय रस्सीखेच होणार आहे. अजितदादांचा हा निर्णय आ. शिवेंद्रराजेंच्या पथ्यावर पडणार की त्यांचीही समीकरणे बिघडवणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आता खा. शरद पवार व ना. अजित पवार या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. 1999 पासून या तालुक्याने शरद पवार यांना साथ दिली. परंतु 2019 मध्ये आ. शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला. महाविकास आघाडी काळात उपमुख्यमंत्री असताना ना. अजित पवार यांनी आ. शिवेंद्रराजेंना मोठा निधी दिला. तसेच शिवेंद्रराजे व अजितदादांचे संबध सलोख्यााचे आहेत. शिवेंद्रराजे राष्ट्रवादीतून गेल्यानंतर सातारा तालुक्यात राष्ट्रवादी औषधालाही शिल्लक राहिली नव्हती. सातार्‍यात अजितदादा व शरद पवार या दोन्ही गटाचे जेमतेम कार्यकर्ते आहेत.

त्यामुळे दोन्ही गटाकडून आपला गट मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. सातारा तालुक्यात अजितदादांना मानणारे कार्यकर्ते आहेत. तर शरद पवारांची बाजू घेणार्‍या पदाधिकार्‍यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पुनर्बांधणीसाठी दोन्ही गटांना खूप संघर्ष करावा लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या तालुक्यात शरद पवार यांना मानणार्‍या गटामध्ये द्धिधा मनस्थिती निर्माण झाली आहे. शरद पवार यांच्याविषयी प्रेम तर अजितदादा करत असलेली कामे, यामुळे प्रेम की जनतेची कामे याच ओझं कार्यकर्त्यांवर येऊन पडलं आहे. तालुक्यातील कोरेगाव मतदारसंघात विभागलेल्या 36 गावांवर आ. शिवेंद्रराजे, आ. शशिकांत शिंदे व आ. महेश शिंदे यांचा पगडा आहे. या ठिकाणी शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अजितदादांना नवीन कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागणार आहे. अजितदादा कामे वेगाने करत असल्याने बहुतांश पदाधिकार्‍यांची पहिली पसंती अजितदादाच आहेत. त्यामुळे शरद पवारांचा गट वाढवण्यासाठी शशिकांत शिंदेंना जीवाचे रान करावे लागणार आहे.

या भागात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष उफाळून येणार असून शरद पवार गटाच्या आ. शशिकांत शिंदे व कार्यकर्त्यांची पक्षसंघटनात्मक बांधणीसाठी कसोटी लागणार आहे. भविष्यात या भागातील आणखी कोण कोण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणार याचीही उत्सुकता आहे. त्यामुळे या 36 गावांमध्ये राजकीय वणवा पेटणार असल्याचे चित्र आहे.

संघर्ष जाणार विकोपाला

अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटातील राजकीय संघर्ष आगामी काळात विकोपाला जाणार आहे. दोन्ही नेते पदाधिकार्‍यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील. या परिस्थितीत राष्ट्रवादीतील ही फूट कुणाच्या पथ्यावर पडणार? हे निकालानंतरच समोर येणार आहे. असे असले तरी दोन्ही गटांना आपला गट मजबूत करण्यासाठी नवीन आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.











Source link

Mayank Dixit: सलमान खानसोबक काम केलेल्या कास्टिंग दिग्दर्शकाला भर रस्त्यात मारहाण

0
Mayank Dixit: सलमान खानसोबक काम केलेल्या कास्टिंग दिग्दर्शकाला भर रस्त्यात मारहाण


मयंकच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याने युवराज चित्रपटासाठी काम केले आहे. हा चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खान, जायदा खान, अनिल कपूर आणि कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर मयंकने २०२० साली प्रदर्शित झालेल्या तोरबाज सिनेमासाठी काम केले.



Source link

Saira Banu Post: दिलीप कुमार यांच्यासाठी सायरा बानोंची भावनिक पोस्ट, ‘अजूनही ते माझ्याच सोबत…’

0
Saira Banu Post: दिलीप कुमार यांच्यासाठी सायरा बानोंची भावनिक पोस्ट, ‘अजूनही ते माझ्याच सोबत…’


भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे ७ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आज जरी दिलीप कुमार या जगात नसले तरी, चाहत्यांच्या मनात मात्र ते अजरामर आहेत. दिलीप कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची पत्नी, अभिनेत्री सायरा बानो यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.



Source link

Kartik Aryan: कार्तिक आर्यनने जुहूमध्ये खरेदी केले आलिशान घर, किंमत ऐकून बसेल धक्का

0
Kartik Aryan: कार्तिक आर्यनने जुहूमध्ये खरेदी केले आलिशान घर, किंमत ऐकून बसेल धक्का


समोर आलेल्या माहितीनुसार, जुहूमधील प्रेसीडेंसी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या सिद्धीविनायक बिल्डींगमध्ये कार्तिकने १९१६ क्वेअर फूट अपार्टमेंट खरेदी केली आहे. या अपार्टेमेंटची किंमत १७.५० कोटी रुपये आहे. ३० जून रोजी कार्तिकची आई माला तिवारीने घराचा व्यवहार केल्याचे म्हटले जात आहे.



Source link

सातारा : भांबवलीचा हंगाम आजपासून सुरू | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  देशातील सर्वात उंच असलेला भांबवली- वजराई धबधबा फेसाळू लागला आहे. हा धबधबा पर्यटकांना पाहण्यासाठी आजपासून खुला होत आहे. भांबवली, वजराई हा परिसर डोंगराळ असून घनदाट झाडीचा आहे. त्यामुळे पर्यटकांना धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी जांभ्या दगडाची पायवाट करण्यात आली आहे.

पर्यटकांना हिरव्यागर्द झाडीतील धुवांधार पावसाचा व धबधब्याचा थ्रीलींग अनुभव घ्यायचा असेल तर जुलै व ऑगस्ट महिन्यांत भांबवली वजराई धबधब्याला भेट दिली पाहिजे. भांबवलीतील आताचे वातावरण मनोरम आहे, धुवांधार पावसाच्या सरी, गार-गार वारा, रानकिड्यांचे आवाज, हिरवी गर्द झाडी, धबधब्याच्या पाण्याचा प्रचंड प्रपात, निसर्गाचा खुललेला नजारा पाहून मन प्रफुल्लीत होते.

भांबवली वजराई धबधब्याला दि. 5 जानेवारी 2018 रोजी क वर्ग पर्यटन म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर धबधब्याच्या विकासाचे काम चालु झाले. घनदाट जंगल व दुर्गम डोंगरातून जाताना पर्यटकांना कसरत करावी लागते. ही कसरत पहिल्या टप्यातील पायर्‍या व रेलिंग केल्याने दुर झाली आहे. दुसर्‍या टप्यात वॉच टॉवर व पॅगोडाचे काम झाले असून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो. तिसर्‍या टप्यातील बाम्बु (गेस्ट) हाऊसचे काम चालु असून लवकरच पुर्णत्वास जाईल व पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळेल.

पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्याची पर्वणी ठरणारा हा मौसम आहे. निसर्गाचा अमूल्य ठेवा असलेला हा परिसर पर्यटन विकासामुळे खुलायला लागला असून पर्यटकांना खुणावत आहे. भांबवली हे अलिकडेच प्रसिध्दीस आलेले एक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ आहे. भांबवली वजराई धबधबा व भांबवली पठार ही येथील प्रमुख प्रेक्षणिय स्थळे आहेत. हा संपुर्ण परिसर दाट जंगल व विपुल निसर्ग संपदेने नटलेला आहे. आगामी काळात मंगळावरील अनुभवासारखा भास होणार्‍या भांबवली पठाराचा सुध्दा जागतिक पातळीवर लौकिक होईल व पूर्ण परिसाचा पर्यटन विकास होईल, अशी आशा स्थानिकांना लागून राहिली आहे.











Source link

सातार्‍यात कस्तुरींसोबत रंगणार स्टार प्रवाहचा हळदी-कुंकू सोहळा | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व स्टार प्रवाह यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 9 जुलै रोजी दुपारी 3 वा. सैनिक स्कूल सभागृह, सदरबझार, सातारा येथे हळदी-कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी धम्माल गेम शो, लकी ड्रॉ व हमखास गिफ्ट कूपन्सचा वर्षाव होणार आहे.

कस्तुरी क्लब नेहमीच महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. याचाच एक भाग म्हणजे दै.‘पुढारी’ कस्तुरी क्लब आयोजित आणि स्टार प्रवाह प्रस्तुत हा रंगतदार कार्यक्रम होत असून कस्तुरी सदस्यांसाठी धम्माल वन मिनिट गेम शो होणार आहे. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ यातील मुख्य कलाकार सायली व कल्पना हे कस्तुरींशी या मालिकेबद्दल दिलखुलास संवाद साधणार आहेत. धम्माल मनोरंजनाबरोबरच बक्षीसांची लयलूट करण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तसेच तनिष फार्मिंग ज्वेलरीकडून प्रथम येणार्‍या 500 महिलांना हमखास गिफ्ट कूपन दिले जाणार आहे.

लकी ड्रॉमध्ये शिंदे स्टील फर्निचर- ड्रेसिंग टेबल, गणेश गोल्ड ज्वेलर्स-2 चांदीचे पैंजन, तनिष फर्मिंग ज्वेलरी-2 गंठन दिली जाणार आहेत. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी खुला असून महिलांनी याचा लाभ घ्यावा. महिलांनी येताना केशरी, लाल व निळा या रंगातीलच साडी किंवा ड्रेस परिधान करावा. अधिक माहितीसाठी 8104322958 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.

कोण होणार स्टार प्रवाहची महाराणी?

कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे स्टार प्रवाहची महाराणी ही स्पर्धा आहे. स्पर्धेतील अंतिम विजेत्यांना स्टार प्रवाहची महाराणी किताब पटकावण्याची संधी मिळणार आहे. हा किताब पटकावणार्‍या महिलेस क्राऊन आणि आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे.











Source link

Gnelia Deshmukh: ‘ट्रायल पीरियड’वरील बाबा, जिनिलीयाच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

0
Gnelia Deshmukh: ‘ट्रायल पीरियड’वरील बाबा, जिनिलीयाच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित



Trial Period Trailer : मुलाच्या मागणीवर आईने वापरलेल्या भन्नाट कल्पनेची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या चर्चेत आहे.



Source link

Neetu Kapoor: ऐन लग्नात नीतू कपूर पडल्या होत्या बेशुद्ध, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं

0
Neetu Kapoor: ऐन लग्नात नीतू कपूर पडल्या होत्या बेशुद्ध, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं


२२ जानेवारी १९८० साली नितू आणि ऋषी यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्वजण आले होते. मात्र भर लग्नाच्या मांडवात बेशुद्ध होण्यावर नीतू कपूर म्हणाल्या, “आमच्याच लग्नात आम्ही बेशुद्ध पडलो होतो. खरं तर बेशुद्ध पडण्यामागचे कारण दोघांचेही वेगवेगळे होते. मी लग्नात जो लेहंगा परिधान केला होता तो प्रंचड जड होता. त्यामुळे मला त्रास होत होता आणि तो सांभाळत असतानाच मी बेशुद्ध पडले. तर ऋषी यांचे बेशुद्ध पडण्यामागचे कारण वेगळे होते. लग्नात बरेच पाहुणे आले होते. फार गर्दी झाली होती. कदाचित ही गर्दी पाहूनच त्यांना चक्कर आली असावी. परंतु आम्हा दोघांनाही बरे वाटायला लागल्यानंतर आमचे लग्न सुरळीतपणे पार पडले.”



Source link

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री थरार ! दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार, एक पोलिस जखमी

0
Pune Crime : पुण्यात मध्यरात्री थरार ! दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार, एक पोलिस जखमी


पुणे : पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही. पुणे पोलिस गुरुवारी कोम्बिंग ऑपेरेशन करत असताना एटीएम लुटल्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीवर कारवाईच्या दरम्यान, दरोडे खोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. या घटनेत एक पोलिस कर्मचारी हा जखमी झाला आहे. पोलिसांनी देखील बचावासाठी गोळीबार केला. या थरारावेळी एका आरोपीने धारदार शस्त्र फेकून मारले. ही घटना वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत एसबीआय बँकेच्या एटीएम जवळ घडली. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.



Source link