Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2953

नाशिकच्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन; शरद पवारांकडून श्रद्धांजली

0
नाशिकच्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन; शरद पवारांकडून श्रद्धांजली


Nashik News : शिक्षण महर्षी तथा गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी (Dr. M S Gosavi) यांचे आज पहाटेच्या दरम्यान निधन (Death) झाले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी देखील सकाळी कुटुंबीयांची भेट श्रद्धांजली वाहिली. वयाच्या 23 व्या वर्षी ते नाशिकच्या बीवायके कॉलेजचे (Nashik BYK Collage) प्राचार्य झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदाची धुरा त्यांनी सांभाळली. रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. मो. स. गोसावी यांच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्रातील महर्षी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून गोसावी सर यांची ओळख होती. डॉ. मो. स. गोसावी यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) उत्तीर्ण केल्यानंतर प्रसासकीय सेवेची निवड न करता शिक्षण क्षेत्राची निवड करून या क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविलेला होता. त्यांची वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील आदर्श शिक्षकाची भूमिका सर्वांना प्रभावित करणारी होती. सर्वात कमी वयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची आजही नोंद कायम आहे. गोसावी यांचा श्रीमद्भगवद्गीतावर नितांत श्रद्धा व प्रचंड असा अभ्यास होता. शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 

शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण व दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी गोखले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. ब त्यांच्या साठी शिक्षणाची कवाडे खुली केली होती. सामाजिक विकासासाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे, हा विश्वास ठेवून त्यांनी स्वतःला शिक्षणाच्या प्रचार – प्रसारासाठी आजीवन वाहून घेतले होते. सरांच्या प्राचार्य पदाचा प्रारंभ ज्या बी. वाय. के महाविद्यालयातून झाला. तिथे त्यांचे पार्थिव शरीर सकाळी 10 ते 05 या वेळेपर्यंत अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात येतील. शिक्षण क्षेत्रात स्वयं प्रकाशित, तेजस्वी ताऱ्या प्रमाणे आलोकित राहून समाजासाठी ही प्रकाश वाटा तयार करणाऱ्या ह्या ज्ञान सूर्याला विनम्र अभिवादन डॉ. मो. स. गोसावी यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

शरद पवारांकडून श्रद्धांजली 

शरद पवार यांनी आज सकाळी गोसावी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. गोसावी मूळचे पैठणचे होते, पण त्यांनी नाशिक कार्य क्षेत्र निवडले होते. महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या तज्ज्ञांची यादी मोठी आहे. त्यात डॉ. मो. स. गोसावी यांच्या नावाशिवाय शैक्षणिक क्षेत्र पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. मुंबई, नाशिक आणि पालघर येथे त्यांचे मोठे शैक्षणिक कार्य आहे. त्यांच्या संस्थेतून दर्जेदार शिक्षण देणे, हे त्यांचे काम, त्यात गोसावी यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रांत डॉ. गोसावी नावाचा लौकिक राहील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. 

आज सायंकाळी अंत्यसंस्कार 

शिक्षण महर्षी तथा गोखले एज्युकेशन सोसायटीचे (Gokhale Education Society) सचिव डॉ गोसावी यांचे आज पहाटेच्या दरम्यान काळाने निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदाची धुरा त्यांनी सांभाळली. त्यांच्या या योगदानामुळे येथे घडलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदांवर काम करत आहेत. तर काही जण उद्योजक आहेत. संस्थेच्या भरभराटीमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले, त्यांच्या पश्चात मुले शैलेश आणि कल्पेश आणि तर कन्या डॉ. दीप्ती देशपांडे असा परिवार आहे. त्यांचे अंतिम दर्शन बीवायके कॉलेज येथे सकाळी दहा ते चार या दरम्यान घेता येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज पाच वाजता काढण्यात येणार असून नाशिक शहरातील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



Source link

Lust Stories 2: मृणाल ठाकूरसोबतचा इंटिमेट सीन शूट करताना…; अंगद बेदीने सांगितला सेटवरचा अनुभव

0
Lust Stories 2: मृणाल ठाकूरसोबतचा इंटिमेट सीन शूट करताना…; अंगद बेदीने सांगितला सेटवरचा अनुभव



Lust Stories 2: काही दिवसांपूर्वी अंगद बेदीचा लस्ट स्टोरी २ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने इंटिमेट सीन दिले आहेत. त्याविषयी त्याने आता वक्तव्य केले आहे.



Source link

Karan Johar: तू गे आहेस का?, करण जोहरने दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

0
Karan Johar: तू गे आहेस का?, करण जोहरने दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष


नुकताच करणने ‘Ask Me Anything’च्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्याला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. दरम्यान गे आहेस का या प्रश्नावर करणने, ‘तू इच्छूक आहेस का?’ असे मजेशीर उत्तर दिले आहे. त्याच्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.



Source link

रसिक स्पेशल: आता लोकांनीच हाती घ्याव्या निवडणुका!

0
रसिक स्पेशल: आता लोकांनीच हाती घ्याव्या निवडणुका!




रसिक स्पेशल:आता लोकांनीच हाती घ्याव्या निवडणुका!



Source link

लोक – प्रशासन: आंदोलने, निवेदने अन् ‘रुजलेली’ लोकशाही

0
लोक – प्रशासन: आंदोलने, निवेदने अन् ‘रुजलेली’ लोकशाही




लोक – प्रशासन:आंदोलने, निवेदने अन् ‘रुजलेली’ लोकशाही



Source link

हलकंफुलकं: तुकड्यात बुडेल जग…

0
हलकंफुलकं: तुकड्यात बुडेल जग…


संजय कळमकर10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पृथ्वीवर प्रत्येकाच्या हाती आलेल्या ‘त्या’ तुकड्याची करामत ऐकल्यावर देवेंद्र ब्रह्मदेवांना म्हणाले, ‘प्रगतीच्या नादात आपण दिलेल्या घालून नियमांचे मनुष्य उल्लंघन करतो आहे. आता तर तो अवकाशात पोहचला आहे. काही दिवसांनी मनुष्य सदेह स्वर्गात पोहचेल, अशी भीती वाटू लागली आहे. त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील. मानवाचा आत्ताच बंदोबस्त करा. न पेक्षा सरळ जगबुडी करून टाका..!’

देवेद्रांनी ब्रह्मदेवाला विचारले, ‘पृथ्वीवर निर्माण केलेल्या मानवाला तुम्ही प्रगतीचे वरदान दिले. त्याला मुखपोकळी देवून त्यातून भाषा निर्माण होईल अशी सोय केली. बोलल्यामुळे माणसे एकमेकांचे विचार समजावून घेवू लागले. त्यातून त्यांचा सुसंवाद घडून माणूस माणसाच्या जवळ आला. त्यातून मानवजातीचा विकास झाला. परंतु, आजकाल आम्ही पाहतो, माणसे माणसांशी बोलतच नाहीत. कुठला तरी चपटा तुकडा खेळत बसतात. भाषा आखूड झाल्याने माणसांमधला सहसंबंध हरवत चालला आहे. बंधुभावाचे रुपांतर विसंवादात होवू लागले आहे. त्या चपट्या तुकड्यात अशी काय जादू आहे की माणूस त्यात हरवून मुका झाला आहे. स्वत:लाही विसरत चालला आहे..?’ यावर ब्रह्मदेव विषादाने म्हणाले, ‘त्या चपट्या तुकड्याला मोबाइल असे म्हणतात महाराज. तो मानवी बुद्धीचा आविष्कार आहे. पृथ्वीवर काही माणसे अक्कल वापरून काही साधने तयार करतात आणि बाकीची माणसे त्या साधनात आपली सारी अक्कल हरवून बसतात. त्या चपट्या तुकड्याने माणसे मुकी होवून आभासी जगात जगू लागली आहेत.’ देवेद्रांनी विचारले, ‘त्यात एवढे आहे तरी काय?’ ब्रह्मदेव उत्तरले, ‘काय नाही ते विचारा महाराज! सांगायचंच झालं, तर त्यात ट्विटर नावाचा एक प्रकार आहे. बहुतेक थोर, बुद्धिजीवी माणसे त्याचा वापर करतात. काही मोठ्या लोकांना असे वाटले की, समाजाचे, मीडियाचे आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे, तर ते हेतुपुरस्पर काहीतरी खळबळजनक ट्विट करतात. त्यावरून वादळ उठते आणि ती थोर व्यक्ती अजून हयात असल्याचे सर्वांना समजते. काही ट्विटने मात्र चांगले संदेश जातात आणि समस्याही सुटतात. अनेक शहाणी माणसे यावर रोज टिटवीसारखी टीवटीव करत असतात. या ट्विटर नावाच्या प्रांतात टाइमपास करणाऱ्या लोकांची संख्या व्हाट्स अॅप, फेसबुकपेक्षा कमी असते. फेसबुकची तर वेगळीच गंमत आहे. गल्लीत मित्र नसलेला माणूसही यावर पाच हजार मित्र जोडू शकतो. यावर काही माणसे खरे रूप लपवून आपली खोटी प्रतिमा तयार करतात. एखादा सुंदर चेहरा स्वतःचा म्हणून दाखवतात. त्यामुळे त्याला फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात. त्याला प्रत्यक्ष पाहिल्यावर मात्र शुद्ध हरपायची वेळ येते. यावर बहुतेक लोक आपले वाढदिवस जोरात साजरे करून घेतात. पूर्वी काही कर्तृत्व असलेल्या लोकांचेच वाढदिवस व्हायचे. आता सरसकट साऱ्यांचेच वाढदिवस कम्पलसरी साजरे होतात. लोक गुंड, समाजकंटकांनाही भरपूर शुभेच्छा देतात. काही लोकांना तर फेसबुक म्हणजे आपल्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक विचारांच्या प्रसारासाठी निर्माण झालेला दैवी चमत्कारच वाटतो. पण, त्यामुळे समाजात कलह निर्माण होवू शकतो. कायम चॅटिंगची सवय असलेली दोन माणसे प्रत्यक्ष भेटली तरी बावरून जातात. डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत त्यांच्यात राहत नाही. फेसबुकच्या माध्यमाने दोन संसार उभे राहिले तरी चार मोडलेही आहेत. अनेकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. अर्थात हे माध्यम विवेकाने वापरले तर त्याचे अनेक फायदे आहेत, पण माणसाला टरबूजाबरोबर बिया गिळण्याची वाईट सवय आहे. त्याला आपण काय करणार?’

यापेक्षा व्हाट्स अ‌ॅप हा प्रकार माणसात फारच लोकप्रिय आहे, याकडे लक्ष वेधून ब्रह्मदेव म्हणाले, ‘लोकलच्या डब्यासारखी व्हाट्स अ‌ॅपवर माणसांची गर्दी असते, तेवढाच कोलाहलही असतो. प्रत्येकाची व्यक्त होण्याची नुसती धांदल उडालेली असते. माणसे रात्री-बेरात्री, मनात येईल तेव्हा काहीही आणि कसेही व्यक्त होतात. ग्रुपचे नाव, डीपी आणि स्टेटसवरून ज्या-त्या माणसाची एकंदर योग्यता लक्षात येते. काही माणसे रोज स्वतःचे वेगवेगळे फोटो डीपीवर लावतात. ती अखंड स्वतःच्या प्रेमात बुडालेली आहेत, असे समजावे. रोज डीपी बदलणारी माणसे चंचल स्वभावाची, विनोद टाकणारे आनंदी, नकारात्मक पोस्ट टाकणारे दु:खी, प्रत्येकाच्या पोस्टला आडवे चालणारे अडेलतट्टू, कायम अपघात, घातपात आणि अशाच अप्रिय बातम्या टाकणारे असमाधानी, वाद घालणारे भांडकुदळ, इतरांच्या पोस्टला प्रतिक्रिया न देणारे स्वमग्न, कुणाच्या तरी लांबलचक पोस्ट फोरवर्ड करून, पोस्टमनगिरी करणारे परावलंबी; कविता, लघुकथा टाकणारे रसिक किंवा नवकवी, कायम व्हाट्स अ‌ॅ​​​​​​​पवर मुक्कामी असणारे अस्वस्थ मनोवृत्तीचे… थोडक्यात काय, तर सार्वजनिक नळाप्रमाणे व्हाट्स अ‌ॅ​​​​​​​पवर अशी गर्दी जमून ती अविरत कलकल करीत असते. काहींचे अख्खे आयुष्य व्हाट्स अ‌ॅ​​​​​​​पमय झाले असून, हा छंद आता आजारात बदलत चालला आहे, महाराज.. अर्थात योग्य वापर केला तर व्हाट्स अ‌ॅ​​​​​​​पही उत्तम माध्यम ठरू शकते. ठरवले तर, चांगल्या कामाला निधी जमा होतो, हरवलेल्या व्यक्ती सापडतात, एकमेकांशी सुसंवाद घडतो, नातलग सुरक्षित अंतरावरून का होईना, परस्परांशी जोडून राहतात. इन्स्टाग्रामवर तर रील नावाच्या छोट्या व्हिडिओंनी निव्वळ धुमाकूळ घातला आहे. यावर पोरं-पोरी स्वतःचीच लग्न जमवतात आणि पळून जातात.’ ‘यापेक्षा गुगल आणि यूट्युब हे प्रकार म्हणजे अलीबाबाची गुहाच! गुगलवर पाहिजे ती माहिती मिळते. जणू आपल्या स्वर्गातला कल्पवृक्षच!’ असे सांगून ब्रह्मदेव अधिक माहिती देऊ लागले.. ‘यूट्युब आणखी वेगळं आहे. माणसं त्यावर स्वतः केलेल्या करामती टाकतात, त्या जगाला माहीत होतात. यूट्युबमुळे उपेक्षित कलाकारांना चांगले दिवस आले आहेत. परंतु, मनावर नियंत्रण नसलेली माणसं यावर हरवून जातात आणि नको ते पाहत बसतात. त्याचा वाईट परिणाम कोवळ्या मुलांवरही होतो. परिणामी समाजात काही अघटित प्रकार घडू लागले आहेत. काही मुलांची गेमच्या आहारी जावून वाताहत झाली आहे. काही मुला-मुलींनी तर गेममध्ये सांगितलं म्हणून आत्महत्या केल्या. माणसाच्या अन्न, वस्र, निवारा या गरजा बदलून आता त्या टीव्ही, मोबाइल, इंटरनेट अशा झाल्या आहेत. पृथ्वीवर प्रत्येकाच्या हाती आलेल्या ‘त्या’ तुकड्याची करामत ऐकल्यावर देवेंद्र ब्रह्मदेवांना म्हणाले, ‘प्रगतीच्या नादात आपण दिलेल्या घालून नियमांचे मनुष्य उल्लंघन करतो आहे. आता तर तो अवकाशात पोहचला आहे. वेगवेगळ्या ग्रहांजवळ घिरट्या घालतो आहे. काही दिवसांनी मनुष्य सदेह स्वर्गात पोहचेल, अशी भीती वाटू लागली आहे. त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील. मानवाचा आत्ताच बंदोबस्त करा. न पेक्षा सरळ जगबुडी करून टाका..!’ यावर ब्रह्मदेव हसत म्हणाले, ‘निर्माण करतो त्याच्याजवळ विनाशाचे शस्रही तयार असते, महाराज. हे जग आकाराला यायला कित्येक युगे गेली. आता ते असेच सावकाशपणे संपेल. आपण जगबुडी करायची गरज नाही. नवीन जग निर्माण करण्याच्या नादात माणूस स्वतःचे जग आपोआप बुडवू लागला आहे. एक दिवस इंटरनेट सेवा बंद राहिली, तर आताच कोट्यवधी लोक अस्वस्थ होतात. ते आणखी बंद राहिलं तर भविष्यात हे लोक वेडेपिसे होतील, कित्येक धाय मोकलून रडतील, अनेकांचं जगणं नीरस होईल, त्यांना असलं आयुष्य नकोसं वाटू लागेल.. आता तर कृत्रिम प्रज्ञा आणि चॅट जीपीटीसारख्या गोष्टींतून माणसाने आपले अस्तित्व धोक्यात आणणारे पुढचे पाऊल टाकले आहे. आपण निश्चिंत असावे, महाराज. येतो आम्ही..’ देवेंद्र हळू आवाजात म्हणाले, ‘थांबा! तेवढे यमाला सांगून पृथ्वीवरून आमच्यासाठी एखादा मोबाइल उपलब्ध करा.. त्या चपट्या तुकड्याविषयी आम्हाला भलतेच आकर्षण निर्माण झाले आहे..’ देवेंद्रांसमोर तोंडदेखलं ‘हो’ म्हणत ब्रह्मदेव मनाशी पुटपुटले, ‘…म्हणजे स्वर्गाचा विनाशही समीपच आहे म्हणायचा..!’

संपर्क : ८८८८२२९९४४

sanjaykalamkar009@gmail.com



Source link

पुस्तकामागच्या गोष्टी: असंबद्धाचा उद्गाता

0
पुस्तकामागच्या गोष्टी: असंबद्धाचा उद्गाता




पुस्तकामागच्या गोष्टी:असंबद्धाचा उद्गाता



Source link

समकाल: खोटं गावभर हिंडून येतं

0
समकाल: खोटं गावभर हिंडून येतं


महेंद्र कदम17 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

वेदपूर्व प्राचीन भारतीय आर्य आणि गण समाज दोन्हीही इहलोकवादी होते. त्यांचा इहलोकवाद नैसर्गिक आणि वास्तव जगण्याला महत्त्व देणारा होता. नंतरच्या काळात गणसमाज पराभूत होत जाताना वैदिक समाज सत्तेत आला आणि धर्माला अध्यात्माचे रूप आले. वर्चस्ववादी समाज नेहमीच आपल्या सोयीचे तत्त्वज्ञान जन्माला घालून शोषणाची व्यवस्था बळकट करत असतो. अशा वर्गीय हितसंबंधांमध्ये बौद्धिक कामाला महत्त्व येते, तर कष्टकरी समाज तुच्छ मानला जातो. कष्टकरी समाजावर सत्ता गाजवण्यासाठी नैसर्गिक धर्माचं आध्यात्मिक धर्मात रूपांतर करून तो शोषणाला जोडला जातो. भारतही याला अपवाद नाही.

रामायण- महाभारतातील कथा या राजकीय लढाई होत्या. हे ग्रंथ कित्येक वर्षे लिहिले जात होते. जय, भारत आणि महाभारत अशी तीन टप्प्यांत महाभारताची निर्मिती झाली आहे. त्यामुळे त्यातील युद्ध आणि गीता यांचा संबंध कसा जोडायचा, हा प्रश्न आहे. गीतेचं तत्त्वज्ञान लवचिक आहे. विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्या संघर्षात ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या सरमिसळीची कथा आहे. अशीच सरमिसळ वैश्य आणि शूद्रातही होत होती. त्यामुळे ज्यांच्या पायावर हिंदुत्वाची मांडणी केली जाते, ते मूळ हिंदुत्व सर्वांना सामावून घेणारं आहे. ज्यात वैदिक, गण, तंत्र, लोकायत, जैन, बौद्ध, सांख्य, शैव, शाक्त, वैष्णव, मुस्लिम, नाथ आदी अनेक संप्रदायांचा समावेश आहे. तो धर्मापेक्षा अधिक जीवनशैली म्हणून अस्तित्वात आहे. हीच हिंदू असण्याची खरी ओळख आहे.

द्वेषाने द्वेष आणि प्रेमाने प्रेम वाढते, असे सांगणाऱ्या बुद्ध, जैन जीवनशैलीने भारतात हजारेक वर्षे समतेची मांडणी केली आहे. मुस्लिम राजवटीत अनेक चांगल्या गोष्टी भारतात घडल्या. शाहीर अमर शेख यांच्या आई मुनेरबी यांच्या कविता बहिणाबाई चौधरींच्या कवितेइतक्या हिंदू आहेत. बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेचे संवाद राही मासूम रजा यांनी लिहिले आहेत. आपल्या एका कवितेत ते म्हणतात, ‘मेरा नाम मुसलमान जैसा है, कत्ल करो और मेरे घरमें आग लगा दो, लेकिन मेरी रग-रग में गंगा का पानी दौड रहा है.’ संगीत, चित्रपटाच्या क्षेत्रात या समाजाचं योगदान मोठं आहे. सुफी संतांपासून हमीद दलवाई, फ. ह. बेन्नूर, फ. म. शहाजिंदे, समर खडस, शफाअत खान, रफिक सूरज अशी मोठी परंपरा आपल्याकडे आहे. ती नीट समजावून घेतली पाहिजे.

धर्मांधता सगळ्याच धर्मात असते. एखाद्या धर्मातच ती आहे म्हणून द्वेष पसरवून चालणार नाही. त्यामुळे विशिष्ट रंगात भारताचे चित्र उभा करण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे. वाळवंटी प्रदेशात वाढलेल्या मुस्लिम समाजाला हिरवळीच्या रूपानं दिसणारा हिरवा ओॲसिस जगण्याला प्रेरक वाटला म्हणून त्यांनी तो रंग स्वीकारला. आग ओकणारा सूर्य त्यांचा देव होऊ शकत नव्हता, म्हणून शीतल चंद्र स्वीकारला. या प्रतिमा त्यांनी भारतात आल्यावर विरोधी म्हणून स्वीकारल्या नाहीत. आपला पाच हजार वर्षांचा भारत द्वेषपूर्ण नाही. तो बहुसांस्कृतिक आहे. ही ओळख पुसून आपण महासत्ता होऊ शकणार नाही. ज्या कोल्हापुरात आरक्षणासह सामाजिक समतेचा जन्म झाला, तेथे दंगल होणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. समाजातील सर्वांमध्येच ‘आपला तो बाळ्या अन् लोकांचं ते कार्ट,’ ही प्रवृत्ती बळावली आहे. चुकीला चूक म्हणण्याची धमक कमी होत आहे. मला काय त्याचं? असं मानणारा वर्ग द्वेष पसरवणाऱ्या वर्गापेक्षा धोकादायक असतो. तुम्ही खऱ्याची चप्पलही घालायला तयार नाही, म्हणून खोटं गावभर हिंडू लागलं आहे.

सोलापूरच्या माढा तालुक्यातील माझ्या वडशिंगेचे ग्रामदैवत रामसिद्धबुवा (पीर) आहे. त्याचा पुजारी मुस्लिम आहे. सगळं गाव या दैवताची यात्रा करतं. मोहरमचे डोले बसवायला गावातला सगळा बालचमू गोळा व्हायचा. गाव तो उत्सव करायचा. लाखाच्या वर इनाम देणाऱ्या कुस्त्याच्या फडाची सुरुवात शंकर गोसावी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने होते. हा सलोखा हरवून आपण काय मिळवणार आहोत? ते गाव मला पुन्हा खुणावतं आहे. त्या गावात आजही खोटं चप्पल घालून फिरत नाही. खऱ्याचा हा धाक वाढायला हवा.

संपर्क : ९०११२०७०१४

mahendrakadam27@gmail.com



Source link

काळ सूड उगवतो तेव्हा: पवारांचा कथित ‘खंजीर’ 45 वर्षांनी बूमरँग, वाचा अजितदादांच्या बंडावर शैलेंद्र परांजपे यांचे सडेतोड विश्लेषण!

0
काळ सूड उगवतो तेव्हा: पवारांचा कथित ‘खंजीर’ 45 वर्षांनी बूमरँग, वाचा अजितदादांच्या बंडावर शैलेंद्र परांजपे यांचे सडेतोड विश्लेषण!


शैलेंद्र परांजपे20 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

राजकारणात वेळ साधणे महत्त्वाचे असते. सध्या तरी ती अजित पवारांनी साधली आहे. इथं कुणावर कधी काय वेळ येईल, हे सांगता येत नाही आणि तशीच अनाकलनीय वेळ शरद पवारांवर आली आहे. प्रतिकूल परिस्थितीत पवार अधिक प्रखरपणे लढतात, हा इतिहास आहे. पण, वय आणि निसर्ग यांना पर्याय नसतो, हे त्यांच्यासारख्या ‘जाणत्या’ म्हणवल्या जाणाऱ्या नेत्याला का मान्य होत नाही, हा प्रश्न आजही कायम आहे. कदाचित त्यामुळेच पवारांचा कथित ‘खंजीर’ ४५ वर्षांनी बूमरँगसारखा उलटला आहे. राजकारणात काळ कधीतरी सूड उगवतो, असे म्हणतात ते अशा गोष्टींमुळेच…

महाविद्यालयीन जीवनापासून राजकारणात रस घेत शरद पवार या क्षेत्रात आले आणि १९६७ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकले. भारतीय राजकारणात जवळपास सहा दशके (अचूक सांगायचं तर ५६ वर्षे) निवडणूक जिंकून लोकप्रतिनिधी राहिलेले ते कदाचित एकमेव नेते असावेत. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषवून आणि तीन वेळा केंद्र सरकारमधील मंत्रिपदावर राहूनही शरद पवारांवर आज ही वेळ का आली असावी..? शरद पवारांनी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले तेव्हा, पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, हा शब्दप्रयोग महाराष्ट्रात खूप गाजला. पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या निधनानंतर, ‘आपण चव्हाणसाहेबांच्या फोनवरून आलेल्या आदेशानुसार वसंतदादांचे सरकार पाडले,’ असा खुलासा केला होता. सामान्यतः शरद पवार हयात नसलेल्या व्यक्तींचे दाखले पुरावे म्हणून देताना दिसतात. पण, त्यांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनात पहिल्यांदाच ते एक्स्पोज झाले आहेत, तेही त्यांच्या पुतण्याकडून.

पवारांचे १९७८ चे पुलोद सरकार १९८० च्या लाटेत पुन्हा निवडून आलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी बरखास्त केले. त्यावेळी इंदिरा गांधींनी पवारांना, पुन्हा काँग्रेसमधे आलात तर सरकार राखू शकाल, हा पर्याय दिला होता. पण, स्वतःचे सरकार वाचवण्यासाठी पवार इंदिरा गांधींबरोबर गेले नाहीत. तेव्हा पवार चाळीस वर्षांचे होते. तेच आता अजित पवार यांनी केले आहे. फक्त इंदिरा गांधींची जागा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली असल्याचे चित्र दिसते आहे. शरद पवारांनी १९८० मध्ये केलेली ती चूक अजित पवार सुधारत आहेत का, हे काळच ठरवेल. पवारांनी तेव्हा भीष्मप्रतिज्ञा केली की, आयुष्यात पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही आणि काही दिवसांत, १९८६ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमधे परतले. १९६७ च्या पहिल्या विधानसभा विजयानंतर त्यांनी ११ वर्षांनी पवारांनी पहिले बंड करीत खंजीर प्रयोग केला. तेव्हा ते आठ-नऊ वर्षांसाठी काँग्रेसबाहेर गेले. १९८६ ला काँग्रेसमध्ये परतले, पण केवळ १२ वर्षांसाठी आणि काँग्रेसमधे काढलेल्या या बारा वर्षात ते तीनदा मुख्यमंत्री झाले. तरीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतःचा नवा पक्ष काढला. त्यामुळे कोण गद्दार, कोण खुद्दार आणि कोण वफादार, हे कोण ठरवणार..? महाराष्ट्राला हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

पवार ५७ वर्षांच्या या कारकिर्दीत २१ वर्षे काँग्रेसबाहेरच होते. स्वातंत्र्योत्तर काळात वारसा हक्काने मिळालेली सत्ता गेली की काँग्रेस पक्षाचे नेते तळमळू लागतात. ते सत्तेबाहेर राहू शकत नाहीत. शरद पवारांचा डीएनए काँग्रेसचाच आहे. अर्थात, त्यांच्या मातोश्री शेकापच्या होत्या, पण ते स्वतः विद्यार्थिदशेपासून काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे पवारांचे राजकारण हे कायमच सत्ताकारण राहिले आहे. काँग्रेसबाहेर गेल्यानंतरही त्यांची स्वतःची अशी काहीही विचारधारा नव्हती. सत्तेत राहिलो तरच भले करू शकतो, यावरच त्यांची निष्ठा आहे. तीच निष्ठा त्यांच्यासमोरून खंजीर चालवलेल्या अजित पवारांनी परवा आपल्या समर्थकांसमोर स्पष्टपणे बोलून दाखवली.

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा भाजपचे १२२, तर शिवसेनेचे ६३ आमदार विजयी झाले होते. काँग्रेसचे ४२ आणि राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. देवेंद्र फडणवीसांचा भाजपमधील नऊ सहकाऱ्यांसह ३१ ऑक्टोबर २०१४ ला वानखेडे स्टेडियमवर शपथविधी झाला, तेव्हा अजित पवारांसह बाकी नेत्यांना त्याठिकाणी उपस्थित राहण्याचे आदेश शरद पवारांनी दिले होते. शिवसेना सत्तेत सहभागी व्हायला तयार नव्हती, त्यामुळे प्रफुल्ल पटेलांनी ट्विट करून, प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देईल, पण सरकार पडू देणार नाही, हे स्पष्ट केले होते. राज्याला निवडणुका परवडणार नाहीत, यासाठी आपण भाजपने मागितला नसताना बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे पवारांनी त्यावेळी सांगितले होते. पण, दोन वर्षांनी शिवसेना सरकारमध्ये राहूनही रोजच्या रोज भाजपवर टीका करू लागली, तेव्हा भाजपने आमचा पाठिंबा गृहीत धरू नये, असे विधान करून पवारांनी घूमजाव केले होते. फडणवीसांच्या सरकारमध्ये जाण्यासाठी पवार उतावीळ झाले होते आणि तशी तयारीही त्यांनी दाखवली होती. पण, ऐनवेळी त्यांनी पवित्रा बदलला आणि शिवसेना हा जातीयवादी पक्ष आहे, अशी भूमिका घेतल्याचा आरोप आता अजित पवारांनीच केला आहे. तसेच, २०१७ मध्ये या राजकीय घडामोडींच्या वेळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार केले गेले होते आणि त्याची प्रत आपल्याकडे आजही आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यभर गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीसाठी आपल्याला शरद पवारांनीच पाठवले होते आणि तसे पाठवण्याआधी फडणवीसांसोबत बैठका होऊन मंत्रिमंडळातील सदस्यांची नावेही ठरली होती, या अजित पवारांच्या आरोपालाही शरद पवार उत्तर देऊ शकले नाहीत. पवार विरुद्ध पवार या संघर्षात मोठी ठिणगी पडली, ती सुप्रिया सुळेंना शरद पवारांनी कार्यकारी अध्यक्ष केल्यावर. अजित पवारांचे कर्तृत्व सुप्रिया यांच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे, हे राष्ट्रवादीशी संबंध नसलेलेही सांगू शकतील. पण, बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच पवारांसाठीही अपत्यप्रेम कर्तृत्वापेक्षा महत्त्वाचे ठरले. पवारांच्या आजच्या स्थितीला हेही महत्त्वाचे कारण आहे. बाकी, सध्याच्या राजकारणात साधनशुचिता, वैचारिकता यापेक्षा ‘व्यवहार’ महत्त्वाचा झाला आहे आणि अजित पवारांना तो जास्त नीटपणे कळतो, असे म्हणावे लागेल. अर्थात, शरद पवार सत्तेसाठी काहीही करू शकतात, हे शिवसेनेला सत्तेवर बसवताना, प्रसंगी सोनिया गांधींचे मन वळवताना त्यांनी दाखवून दिले होते. पण, तो देवेंद्र फडणवीसांशी असलेल्या अहंकाराच्या लढाईचा भाग होता, हे आता सिद्ध होत आहे. समृद्धी महामार्गावर प्राण गमावणाऱ्यांबद्दल ‘देवेंद्रवासी’ असा शब्दप्रयोग करणे, हे पवारांच्या प्रतिमेला तडा जाणारे होते आणि त्यातूनही व्यक्तिद्वेषच अधिक प्रतीत होत होता. त्यामुळे अलीकडे पवारांचे असे काय आणि का होते आहे, हे त्यांच्या जवळच्यांनाही समजेनासे झाले होते. राजकीय विचारसरणी, पक्षीय राजकारण आणि व्यक्तिगत संबंधांमध्ये असे अनाकलनीय हेलकावे खाणाऱ्या त्यांच्या भूमिकेमुळेही राष्ट्रवादीच्या फुटीला बळ मिळाले असण्याची शक्यता आहे.

अजित पवार भारी आहेत, पण ते ऐनवेळी कच खातात, असे गेली तीन वर्षे म्हणणाऱ्यांना खरे तर शरद पवारांनीच वेळोवेळी कच खाल्ली होती, हे अजित पवारांनी साधार सांगितले आहे. एकाच वेळी भाजपबरोबर सत्तेत जायचे आणि तरीही आपले तथाकथित पुरोगामीपण सांभाळायचे, या दुटप्पीपणात शरद पवारांनी अंतिम निर्णयाच्या वेळी कायम कच खाल्ली. राजकारणात वेळ साधणे महत्त्वाचे असते. सध्या तरी ती अजित पवारांनी साधली आहे. इथं कुणावर कधी काय वेळ येईल, हे सांगता येत नाही आणि तशीच अनाकलनीय वेळ शरद पवारांवर आली आहे. प्रतिकूल परिस्थितीत पवार अधिक प्रखरपणे लढतात, हा इतिहास आहे. पण, वय आणि निसर्ग यांना पर्याय नसतो, हे त्यांच्यासारख्या ‘जाणत्या’ म्हणवल्या जाणाऱ्या नेत्याला का मान्य होत नाही, हा प्रश्न आजही कायम आहे. कदाचित त्यामुळेच पवारांचा कथित ‘खंजीर’ ४५ वर्षांनी बूमरँगसारखा उलटला आहे. राजकारणात काळ कधीतरी सूड उगवतो, असे म्हणतात ते अशा गोष्टींमुळेच…

संपर्क : ९९७५७९२४६४

shailendra.paranjpe@gmail.com



Source link

Sanjeev Kumar : संजीव कुमारला करायचे होते हेमा मालिनीशी लग्न, या कारणामुळे झाला ब्रेकअप

0
Sanjeev Kumar : संजीव कुमारला करायचे होते हेमा मालिनीशी लग्न, या कारणामुळे झाला ब्रेकअप


लेखक हनीफ जावेरी आणि सुमंत बत्रा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दल लिहिलेलं आहे. हे प्रसिद्ध कपल कोणत्या कारणामुळे दुरावले याचेही कारण त्यात देण्यात आले आहेत. त्यात लिहिलेले आहे की ‘संजीव आणि हेमा मालिनी एका चित्रपटात गाण्याची शूटिंग करत होते. तेव्हा अचानक अपघात झाला आणि दोघांनाही जखमा झाल्या होत्या. त्यावेळीच ते दोघे एकत्र आले. दोघांना एकमेकांसोबत खुश पाहुन संजीव यांच्या आईने दोघांच्या लग्नासाठी मंजूरीही दिली होती. हेमा मालिनीही या संजीव यांच्या आईंचा फार आदर करायच्या. परंतु १९९१ मध्ये दिलेल्या एका मुलखातील हेमा मालिनी यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी म्हटले होते की ‘संजीव यांना आईची सेवा करणारी एक विनम्र असलेली पत्नी हवी होती जी मी कधीही असू शकणार नाही, त्यांना माझ्याशी लग्न करायचे होते.’



Source link