Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2947

बाप-लेकाला हिरावले; माय-लेकीचे अवसान गळाले .. आता जगायचं तरी कुणासाठी? | पुढारी

0


फलटण; पोपट मिंड :  नव्याने लागलेली नोकरी, सुनबाई आणण्याची गोड स्वप्नं, रुळावर आलेले अर्थकारण अशा आनंदी व खेळकर कुटुंबातील जीवाभावाची माणसं एका रात्रीच्या काळोखात गुडूप झाली. पोतेकर कुटुंबाचा पहाडासाखा आधार असलेल्या बाप -लेकाला नियतीने हिरावून नेल्याने कुटुंबाची वाताहत झाली. गोडधोड पुरण पोळीच्या जेवणानंतर घेतलेला घरगुती काढा या कुटुंबाच्या विनाशाला कारणीभूत ठरल्याचेच प्रथमदर्शनी समोर आले आहे. या कुटुंबातील उरलेली माय-लेक अवसान गाळून बसली आहे. आता जगायचं तरी कशासाठी अन् कुणासाठी? या त्यांच्या प्रश्नाने सार्‍यांच्याच काळजाचा ठाव चुकत आहे.

फलटण येथील गजानन चौकात हनुमंतराव पोतेकर यांच्या छोटेखानी कुटुंबात पत्नी, मुलगा अमित, मुलगी श्रद्धा असे हे चौकोनी कुटुंब सुखा समाधानाने नांदत होते. हनुमंतराव पोतेकर भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते. तर बीएसस्सी झालेला त्यांचा मुलगा अमित पुणे येथील ए. व्ही. फायनान्स कंपनीत सहा महिन्यापूर्वीच नोकरीस लागला होता. बहिण श्रद्धा हिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे भागीदारीतील पोकलेन मशिनही होते. सर्व काही सुरळीत सुरू होते. सुनबाई आणण्याची गोड स्वप्नं कुटुंबीय पहात होते. सुट्टी असल्याने अमित शनिवारी पुण्याहून आला होता. त्याच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यादिवशी दुपारी त्याने मांसाहार केला होता. वडिलांचा उपवास होता. मुलगा अमित पुण्याहून आल्याने व शनिवारी उपवासाचा दिवस असल्याने रात्रीच्या जेवणासाठी पुरण पोळीचा बेत केला होता. अमित अत्यंत मनमिळावू व लाघवी होता. मित्र परिवारात तो प्रिय होता. घरी आल्यानंतर तो अनेक मित्रांशी गप्पा गोष्टी करत वेळ व्यतीत करत असे. शनिवारी रात्री दहा-साडेदहापर्यंत आपल्या मित्र परिवारात गप्पा मारत तो थांबला होता. त्याला घरच्यांनी जेवणासाठी वारंवार बोलवलं त्यावेळी तुम्ही जेऊन घ्या मी नंतर जेवतो असे त्याने सांगितले. अकरा वाजता घरी जाऊन त्याने जेवण केले. जेवणानंतर गुळ, लवंग, मिरी, दालचिनी, आले, गुळवेल आदी मिश्रणाच्या काढ्यात मध घालून अमित, वडील हनुमंतराव व बहिण श्रद्धा यांनी काढा प्यायला. काढा कडू लागल्याने व थोडा प्यायल्यावर श्रद्धाला उलटी झाल्याने तिने पूर्ण काढा पिला नाही. रात्री बारा- साडेबाराच्या दरम्यान पिता-पुत्रांना मळमळ, चक्कर उलट्याचा त्रास होऊ लागला. शेजार्‍यांनी अमितला खासगी रुग्णालयात नेले.

त्यानंतर हनुमंतराव पोतेकर यांनाही तेथेच उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी असलेल्या शिकाऊ डॉक्टरने उपचार केले, सलाईन लावले. उपचाराने त्रास कमी झाला नाही. पेशंटकडे लक्ष द्या, अशी कुटुंबीयांनी डॉक्टरांना विनवणी केली. रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर उशिरापर्यंत आलेच नाहीत, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. उपचार सुरू असताना अमितने आपल्या वडिलांना विचारले ‘पप्पा, तुम्हाला बरं वाटतंय का? वडील म्हणाले, मला बरं वाटतंय. तुला बरं वाटतंय का? अशी एकमेकांची दोघांनी विचारपूस केली. त्या पिता-पुत्रांना काय माहित की ही आपली शेवटचीच विचारपूस ठरेल. साधारण साडेपाच-सहाच्या दरम्यान मुख्य डॉक्टर आले. तपासणी करून वडिलांना इंजेक्शन दिले. तरीही वडील उपचारास पुरेसा प्रतिसाद देत नव्हते. त्यांचा बीपी कमी झाला. पुन्हा डॉक्टर आले, त्यांनी तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले. नंतर अमितकडे डॉक्टरांनी मोर्चा वळवला, तो थोडाफार उपचाराला प्रतिसाद देत होता. सर्व काही ठीक होते. अमितला काही होणार नाही, असा आशावाद डॉक्टरांनी दिला होता. मात्र पंधरा मिनिटांत अमितचीही तब्येत खालावली आणि त्याचाही मृत्यू झाला. पिता-पुत्र पंधरा मिनिटांच्या अंतराने मृत्यू पावले. हसतं-खेळतं असणारे हे चौकोनी कुटुंब बघता बघता उद्ध्वस्त झाले.

अहवाल आल्यानंतरच कारण होणार स्पष्ट

अमितने मांसाहार व नंतर पुरण पोळीचे जेवण केले. नंतर काढा प्यायल्यामुळे अन्न विषबाधा झाली असे म्हणावे तर वडिलांनी मांसाहार केला नव्हता मग त्यांच्यावरही अशीच परिस्थिती का ओढवली. काढ्यामध्ये काही गफलत झाली होती का? हे कुटुंबीय काढा तर नेहमीच घेत होते. अन्नामधून विषबाधा झाली की अन्य कोणत्या कारणाने या दोघांवर विपरीत परिणाम झाला. याचे उत्तर दोघांच्याही मृत्यूचा व्हीसेरा अहवाल आल्यानंतरच समजणार आहे.



Source link

सातारा जिल्ह्यात मंत्रिपदांच्या नावांचा धुमाकूळ; उदयनराजे, शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे, मकरंद पाटील यांची हवा | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्रिमंडळाचा होऊ घातलेला विस्तार, राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार होणार याची नुसती वार्ता उठताच सातारा जिल्ह्यात मंत्रिपदांच्या नावांचा नुसता धुमाकूळ सुरू आहे. कोण म्हणतो उदयनराजे केंद्रात मंत्री होणार, कोण म्हणतो शिवेंद्रराजे राज्यात मंत्री होणार, कोण म्हणतो जयकुमार गोरे मंत्री होणार तर काहीजण मकरंद पाटील मंत्री होणार असे म्हणत आहेत. त्यामुळे या चौघांच्या नावांची सध्या जोरदार हवा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात व सोशल मीडियावरही सुरू आहे. त्यामुळे या चौघांच्या विरोधकांना मात्र भलतेच कापरे भरले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होत असल्याची चर्चा आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजप काही मंत्र्यांना डच्चू देणार असून त्यांच्या जागी उदयनराजेंचा समावेश होईल, अशा जोरदार चर्चा सुरू आहेत. अलिकडच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व खा. उदयनराजेंचे संबंध स्नेहाचे झाले आहेत. त्यामुळे उदयनराजेंना संधी मिळण्याची शक्यता सातारकरांना वाटू लागली आहे. उदयनराजेंच्या चाहत्यांनी नेहमी प्रमाणेच ‘हवा हवाई’ वातावरण तयार केले आहे. सोशल मीडियावर लाल दिव्याचा फोटो टाकून उदयनराजेंंच्या रिल्स केल्या जात आहेत. स्वत: राजे मात्र सातार्‍यात नाहीत तरीही त्यांची हवा मात्र जोरात वाहते आहे.

राज्यमंत्रिमंडळाचाही विस्तार होणार आहे. अजितदादांनी भाजपशी सोबत केल्याने शिवसेना शिंदे गट व भाजपची मंत्रिपदे जवळपास संपली आहेत. तरीही राज्यमंत्रीपदे शिल्लक असल्याने सातार्‍याला संधी मिळण्याची शक्यता वाटू लागली आहे. भाजपमधून आ. शिवेेंद्रराजे भोसले हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. शरद पवार यांना सोडून ते भाजपमध्ये आल्याने त्यांच्या मंत्रीपदाविषयी सातारकरांना व शिवेंद्रराजेंच्या चाहत्यांना अपेक्षा लागून आहेत. सोशल मीडियावर त्यांच्याही मंत्रीपदाचा धुमाकूळ सुरू आहे. आ. जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनाही भाऊ मंत्री व्हावे, असे वाटत आहे. आ. जयकुमार गोरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दहिवडीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा घेवून भाजपचे वातावरण तयार केले. फडणवीस यांनीही या सभेचे कौतुक केले. भाजपची संघटना वाढवण्यात आ. गोरे यांनी घेतलेले कष्ट लक्षात घेता त्यांनाही मंत्रीपद मिळू शकेल अर्थात आ. शिवेंद्रराजे अथवा आ. जयकुमार गोरे दोघेही राज्यमंत्रीपद स्वीकारतात का? हे पाहणेही औत्सुक्याचे आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातून आता असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांना डच्चू मिळाला तर दोघांपैकी एकाला कॅबिनेट मंत्रीपदही मिळू शकते.

‘कानामागून येऊन तिखट झाली’ अशी म्हण आपल्याकडे आहे. गेले वर्षभर मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या आ. शिवेंद्रराजे व आ. जयकुमार गोरे यांच्यामागून सत्तापक्षात प्रवेेश केलेल्या आ. मकरंद पाटील यांच्या मंत्रीपदाची सर्वांत जास्त हवा सध्या जिल्ह्यात आहे. मुळातच ज्या दिवशी अजितदादा सत्तेत गेले त्याच दिवशी आ. मकरंद पाटील मंत्रीपदाची शपथ घेणार होते. मात्र, भावनिक राजकारणामुळे त्यांनी मागचा पाय घेतला त्यातून त्यादिवशीची संधी हुकली. मात्र, पुन्हा आ. मकरंद पाटील यांनी व्यवहारिक निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उरलेल्या एका कॅबिनेट मंत्रीपदावर त्यांच्याच नावाची मोहर उमटली जाणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या सातारा जिल्ह्यात सर्वांत जास्त हवा त्यामुळेच आ. मकरंद पाटील यांच्या मंत्रीपदाची आहे.

ज्यांची नावे मंत्रीपदांसाठी घेतली जात आहेत त्यांच्या विरोधकांना मात्र दिवसेंदिवस कापरे भरू लागले आहेत. काही झाले तरी ‘हा’ मंत्री नाही झाला पाहिजे म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. मात्र, दोन-तीन दिवसात यासंदर्भातला निकाल लागणार असल्याने सातारा जिल्ह्याची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे.











Source link

सातारा : ऊस उत्पादकांना प्रति टन मिळणार 2900 दर | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी 3 हजार 150 ही एफआरपी निश्चित केली आहे. केवळ 100 रूपयांची वाढ केल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ही वाढ गतवर्षीच्या तुलनेत केवळ 3 टक्के असून खर्च मात्र 36 टक्क्यांने वाढला आहे. सातारा जिल्ह्याचा सरासरी उतारा हा 11.66 टक्के आहे. एफआरपी आणि साखर उतार्‍याची आकडेमोड केल्यास शेतकर्‍यांना 3 हजार 622 रूपये हा दर मिळणार आहे. यातून तोडणी व वाहतूक 725 रूपये वजा वजावट जाता शेतकर्‍यांना प्रतिटन अवघे 2900 रूपये हातात पडणार आहेत.

यंदाच्या हंगामासाठी केंद्र सरकारने 10.25 या बेसिक उतार्‍याला पूर्वीच्या एफआरपीत फक्त 100 रूपये वाढवून ही एफआरपी 3 हजार 150 रूपये केली आहे. तर पुढील प्रत्येक एक टक्का रिकव्हरीला 315 रूपये मिळणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये ऊस उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. खतांच्या वाढलेल्या किमती आणि सरकारने बंद केलेले अनुदान यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. ज्या तुलनेत खर्च वाढला आहे त्या तुलनेत मात्र एफआरपीत वाढ झालेली नाही. त्यामुळेच कृषी मूल्य आयोगाने नेमका कोेणता निकष लावून एफआरपीची ही वाढ प्रस्तावित केली? असा सवाल केला जात आहे. जिल्ह्यातील काही कारखान्यांचा उतारा 12.50 टक्क्याच्या पुढे आहे. तर काही कारखाने हे 10.50 टक्क्यांवरच अडकले आहे. त्यामुळे 11 टक्क्याच्या आत उतारा असणार्‍या कारखान्यांची एफआरपी ही आणखी कमी असणार आहे. एकंदरीतच एफआरपीमध्ये प्रत्यक्ष वाढ झाली असली तरी ती शेतकर्‍यांपर्यंत पोहचणारच नाही. गत हंगामातही अनेक कारखान्यांनी 2900 हून अधिक प्रतिटन दर दिला होता. त्यामुळे तोच दर यंदाही कायम राहिल.

एफआरपी वाढली की वाहतूक वाढतेय

यंदाचा हंगाम दिवाळीनंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. पावसाने मारलेल्या दडीमुळे उस पीक धोक्यात सापडले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून येणार्‍या ऊस तोड मजुरांची संख्या घटली आहे. या मजुरांची मजुरीही वाढली असल्याने शेतकर्‍याचा वाहतूक व तोडणीचा खर्च हा 750 रूपयांच्या घरात जाऊन पोहचला आहे. एफआरपी 100 रूपये वाढली असली तरी वाहतूक व तोडणीच्या खर्चातही वाढ झाल्याने ऊस उत्पादनाचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागत नाही.











Source link

केंद्राच्या पीजीआय अहवालात सातारा राज्यात अव्वल | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आलेखात (परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स) पीजीआय अहवालात महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याने 600 पैकी 430 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे राज्यात सातारा जिल्ह्याचा शैक्षणिक गुणवत्तेत पुन्हा एकदा डंका वाजला आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून प्रसिध्द केल्या जाणार्‍या पीजीआयमध्ये शालेय शिक्षण प्रणालीचे विविध मुद्यांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येते. या निकषामध्ये काही बदल करुन परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0 असे नामकरण करण्यात आले आहे. पीजीआयमध्ये देशातील 748 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार सुमारे 73 निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. हे निकष निष्पत्ती आणि प्रशासकीय व्यवस्थापनाशी निगडीत आहेत. सहा गटात 12 मुद्यांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, शाळा व शिक्षकांची उपलब्धता, वर्गातील प्रभावी अध्ययन, उपक्रम, पायाभूत सुविधा, शाळा व विद्यार्थ्यांची सुरक्षितता, डिजिटल अध्ययन आणि प्रशासकीय प्रक्रिया, निधीचा वापर, हजेरी नियंत्रण, यंत्रणा आणि शाळा नेतृत्व विकास, भौतिक सोयी सुविधा, शालेय नेतृत्व विकास आदी मुद्यांचा समावेश होता. या मूल्यमापनात श्रेणी निश्चित करण्यात आली.

सातारा जिल्ह्याला अध्ययन निष्पत्ती 171 गुण तर वर्ग आंतरक्रियामध्ये 86 गुण, भौतीक सोयी सुविधांमध्ये 46 गुण, शालेय सुरक्षा व विद्यार्थी सुरक्षिततांमध्ये 35 गुण तर डिजीटल अध्ययनमध्ये 24 गुण व प्रशासकीय प्रक्रियेमध्ये 68 गुण मिळाले आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा सलग तिसर्‍या पीजीआयमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. हा क्रमांक असाच कायम राखण्यासाठी शिक्षण व्यवस्थेमधील सर्व यंत्रणेने प्रयत्नांमध्ये नेहमीच सातत्य ठेवणे गरजेचे आहे.

अध्ययन निष्पत्ती या दर्शकामध्ये महाराष्ट्राला 240 पैकी 65.8 म्हणजेच 25 टक्के पेक्षाही कमी गुण मिळालेले आहेत. अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणेसाठी महाराष्ट्रात शिक्षक व पर्यवेक्षीय यंत्रणेला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.
– डॉ. विकास सलगर,
प्राचार्य, डायट फलटण











Source link

सातारा : एसटी विभागात 1702 अँड्राईड ई-तिकीट मशिन; फोन पे – गुगल पे वरून देता येणार तिकिटाचे पैसे | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा : सुट्ट्या पैशावरुन प्रवासी व वाहकांमध्ये होणारे वाद व ईटीआयएम मशिनमध्ये वारंवार होणारा बिघाड लक्षात घेता महामंडळाने अँड्राईड ई-तिकीट मशिन वापर करण्यास सुरुवात केली आहे. महामंडळाच्या सातारा विभागात सुमारे 1 हजार 702 अँड्राईड ई -तिकीट मशिन आले असून त्याचे वाटप सर्व आगारांना करण्यात आले आहे. त्यामुळे एसटीचे वाहक आता हायटेक झाले असून प्रवाशांना आता फोन पे, गुगल पे वरूनही तिकिटाचे पैसे देता येणार आहेत.

एसटी बसेसच्या वाहकांना प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी मशिन हँग होणे, बॅटरी प्राब्लेम, वजनाला जड, अशा अनेक अडचणी जुन्या मशिनमुळे निर्माण होत होत्या. त्यामुळे वाहकांना मनस्ताप होत होता. अँड्राईड ई- तिकीट मशिन वायफाय कनेक्ट, वापरायला सुलभ, वजनाला हलकी, बॅटरी बॅकअप चांगले आहे. त्यामध्ये ग्रुप तिकिटांची देखील सुविधा आहे. तसेच मशिनमध्ये ऑनलाईन पेमेंटची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या वाहकाच्या हाती आधुनिक अँड्राईड ई- तिकीट मशिन असल्याने व्यवहार सुटसुटीत होणार आहे. प्रवाशांचे वाहकांशी सुट्ट्या पैशावरुन नेहमी होणारे वादविवाद मिटणार आहेत.

सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, कोरेगाव, फलटण, पारगाव-खंडाळा, जावली, दहिवडी, वडूज या 11 आगारातील वाहकांना 1 हजार 702 अँड्राईड ई-तिकीट मशिनचे वाटप करण्यात आले आहे. या वाहकांना अँड्राईड ई-तिकीट मशिन वापरण्याबाबत प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

झटपट तिकिट बुकिंगमुळे प्रवाशी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एसटी वाहकाला अतिरिक्त वेळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे या अँड्राईड ई तिकीट मशिनमुळे मोबाईलप्रमाणे विविध सुविधा असल्यामुळे प्रवासी एटीएम व अन्य अ‍ॅपच्या माध्यमातून वाहकास तिकिटाचे पैसे देऊ शकतील.
– रोहन पलंगे, विभाग नियंत्रक



Source link

Jee Le Zara: ‘जी ले जरा’मध्ये प्रियांका चोप्राची जागा घेण्यास अनुष्का शर्माने दिला थेट नकार! नेमकं कारण काय?

0
Jee Le Zara: ‘जी ले जरा’मध्ये प्रियांका चोप्राची जागा घेण्यास अनुष्का शर्माने दिला थेट नकार! नेमकं कारण काय?


Jee Le Zara New Update: निर्माते प्रियांकाच्या भूमिकेसाठी अनुष्का शर्माकडे गेले होते. मात्र, आता अनुष्काने देखील या भूमिकेसाठी नकार दिल्याचे बोलले जात आहे.



Source link

Tuntun Birthday: गायिका ते बॉलिवूडची पहिली महिला कॉमेडियन टुनटुन! अभिनेत्रीबद्दल ‘हे’ माहितीये?

0
Tuntun Birthday: गायिका ते बॉलिवूडची पहिली महिला कॉमेडियन टुनटुन! अभिनेत्रीबद्दल ‘हे’ माहितीये?


टुनटुन पहिल्यांदा १९५०मध्ये ‘बाबुल’मध्ये दिसल्या होत्या. या विनोदी चित्रपटात त्यांना सहाय्यक भूमिका मिळाली होती. लठ्ठपणामुळे मुख्य अभिनेत्रीऐवजी टुनटून यांना चित्रपटात कॉमिक भूमिका ऑफर करण्यात आल्याचे बोलले जाते. चित्रपटातील त्यांची विनोदी भूमिका सगळ्यांनाच आवडली. इतकेच नाही, तर दोन-तीन चित्रपटांतून टुनटुन यांनी आपल्या लठ्ठपणाने आणि विनोदी शैलीने वेगळी ओळख निर्माण केली होती. अर्थात, चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा लहान असायची. पण, त्यांच्या मस्तीखोर, बेफिकीर पात्रांनी प्रेक्षकांना खूप हसवले. टुनटुन या भारतीय मनोरंजन विश्वातील पहिल्या महिला कॉमेडियन होत्या.



Source link

Chhagan Bhujbal Death Threat : छगन भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी, आरोपीला महाडमधून अटक

0
Chhagan Bhujbal Death Threat : छगन भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी, आरोपीला महाडमधून अटक


छगन भुजबळ यांची सुपारी मिळाली असून त्यांना ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली होती. या पूर्वी देखील छगन भुजबळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला होता. आरोपीच्या फोनचा माग काढत त्याला महाड मधून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपी प्रशांत पाटील हा दारू प्यायला होता. दारूच्या नशेत त्याने ही धमकी दिल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याला अटक केली असून पुढील कारवाईसाठी त्याला पुण्यात आणले जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.



Source link

Kumar Gaurav Birthday: पहिल्याच चित्रपटातून मिळालेलं स्टारडम सांभाळू शकला नाही कुमार गौरव! वाचा अभिनेत्याबद्दल…

0
Kumar Gaurav Birthday: पहिल्याच चित्रपटातून मिळालेलं स्टारडम सांभाळू शकला नाही कुमार गौरव! वाचा अभिनेत्याबद्दल…


‘राम तेरी गंगा मैली’ रिलीज झाला तेव्हा अभिनेत्री यास्मिन जोसेफची ‘मंदाकिनी’ झाली होती. राज कपूर यांनी यास्मिनचे नाव बदलून मंदाकिनी ठेवले होते. ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट हिट झाला आणि मंदाकिनी स्टार झाली. त्याकाळी अशी वेळ आली की, मंदाकिनी हा उगवता तारा होता आणि कुमार गौरवच्या करिअरला उतरती कळ लागली होती. नेहमी नव्या अभिनेत्रींना नकार देणाऱ्या कुमार गौरवसोबत काम करण्यास कोणतीही प्रसिद्ध अभिनेत्री तयार नव्हती. त्यानंतर कुमार गौरवने एका चित्रपटासाठी निर्मात्याला मंदाकिनीचे नाव सुचवले. निर्मात्याने मंदाकिनीशी बोलणेही केले. पण, जेव्हा तिला कळले की, चित्रपटाचा नायक कुमार गौरव आहे, तेव्हा मंदाकिनीने काम करण्यास नकार दिला. कुमार गौरवने त्या काळातील हिट अभिनेत्री पूनम ढिल्लन, रती अग्निहोत्री, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम केले होते. तरीही नंतर त्याला फारसे यश मिळू शकले नाही.



Source link

Chhagan Bhujbal Death Threat : छगन भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी, आरोपी अटकेत

0
Chhagan Bhujbal Death Threat : छगन भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी, आरोपी अटकेत


Death Threat To Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी

छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहकाऱ्याच्या मोबाईलवर फोन करून धमकी

छगन भुजबळ यांची सुपारी मिळाल्याची फोन करून दिली माहिती

छगन भुजबळ यांच्यावर शाईफेकनंतर आता जिवे मारण्याची धमकी

 

छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या सहकार्याच्या मोबाईलवर फोन करुन भुजबळांना जीवे  मारण्याची  धमकी देण्यात आली. 
धमकी देणाऱ्या व्यक्तीने प्रशांत पाटील असे नाव सांगितले.  त्यानंतर पुणे पोलीसांना याची  माहिती देण्यात आली.
 त्यानंतर मोबाईल नंबरच्या आधारे  प्रशांत पाटील या व्यक्तीला महाडमधून पुणे पोलीसांनी अटक केलीय. …
दारु पिउन प्रशांत पाटीलने भुजबळांना धमकी दिल्याच प्राथमिक तपासात निष्पन्नझालय.. प्रशांत पाटील मूळचा कोल्हापूरचा आहे.



Source link