Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2943

‘साहेब… महिला अत्याचारावर अधिवेशनात चर्चा करा’; तरुणानं स्वतःच्या रक्तानं लिहिलं पत्र

0
‘साहेब… महिला अत्याचारावर अधिवेशनात चर्चा करा’; तरुणानं स्वतःच्या रक्तानं लिहिलं पत्र


Aurangabad News : येणाऱ्या 17 जुलैपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहेत. या अधिवेशनात मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या महिला अत्याचार संबंधित घटनांवर चर्चा करावी, अशी विनंती करणारे रक्ताने लिहलेले पत्र तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) पाठवले आहे. दीपेश पाटील असे या तरुणाचे नाव आहे. तर या पत्राची दखल घेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आगामी अधिवेशनात नक्कीच हा प्रश्न मांडला जाईल, असे तरुणांला आश्वासन दिले आहेत.

मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांना लिहिलेल्या पत्रात तरुणाने म्हटले आहे की, “आपण बघत असाल की, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यांमध्ये महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहेत. विशेष बाब म्हणजे सदरील सर्व घटना प्रेम प्रकरणातून घडलेले आहेत. मुलींना एकतर्फी प्रेमातून विहिरीत, नाल्यात मारून फेकून दिले जात आहेत. खरंतर आपल्याकडे राजकीय अस्थिरतेतीच जास्त चर्चा केली जात आहेत, परंतु महिलांच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी आपणास विनंती करतो की, सबब घडणाऱ्या घटनांवर अंकुश कसा लावता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या. नाहीतर आगामी काळात महिलांवरील या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यानंतर आपल्या सर्वांच्या हातून ही परिस्थिती बाहेर जाईल. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात यावर गंभीर चर्चा करावी,” अशी विनंती तरुणाने केली आहेत.

या पत्राला आपल्या सोशल मीडियावर शेअर करत दानवे यांनी, तरुणाला असे रक्ताने पत्र लिहू नये अशी विनंती केलेली आहेत. आपले विनंतीची नक्कीच दखल घेण्यात येईल, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

यंदाच्या अधिवेशनात मुद्दा मांडणार…

दरम्यान तरुणाने रक्ताने लिहिलेल्या पत्रावर दानवे यांनी प्रतिकिया दिली असून, महाराष्ट्राचा सुजाण नागरिक दीपेश पाटील याने मुलींवर होणाऱ्या हल्ल्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. मी शब्द देतो की यंदाच्या अधिवेशनात हा विषय नक्की माझ्याकडून मांडला जाईल. लोकांना माझी विनंतीही राहील की अशा पद्धतीने पत्र लिहून स्वतःला त्रास करून घेऊ नका. आपली तळमळ माझ्याकडून नक्की ऐकली जाईल, अशी प्रतिकिया दानवे यांनी दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर; जोरदार घोषणाबाजीही केली





Source link

Mouni Roy: मौनी रॉय पासपोर्ट न घेताच पोहोचली एअरपोर्टला अन्… Video viral

0
Mouni Roy: मौनी रॉय पासपोर्ट न घेताच पोहोचली एअरपोर्टला अन्… Video viral


मौनी रॉय नुकताच मुंबई एअरपोर्टवर दिसली होती. त्यावळी तिने लांब पँट, शर्ट आणि त्याच्या आत क्रॉप टॉप घातला होता. या लूकमध्ये मौनी अतिशय सुंदर दिसत होती. त्यावर तिने केस मोकळे ठेवले होते आणि काळा गॉगल लावला. एअरपोर्टवर एण्ट्री करण्याआधी मौनी फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देते. नंतर ती एण्ट्री करताना पासपोर्ट विचारण्यात येतो.



Source link

Subhedar: रायबाच्या लग्नाच्या तयारीत गुंतले मालुसरे कुटुंबीय, ‘सुभेदार’चे नवे पोस्टर प्रदर्शित

0
Subhedar: रायबाच्या लग्नाच्या तयारीत गुंतले मालुसरे कुटुंबीय, ‘सुभेदार’चे नवे पोस्टर प्रदर्शित



Subhedar Poster: दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.



Source link

RBI कडून २ बँकांचा परवाना रद्द, एक महाराष्ट्रातील, ठेवीदारांच्या पैशांचे काय होणार? | पुढारी

0









पुढारी ऑनलाईन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मंगळवारी दोन सहकारी बँकांचा परवाना रद्द केला आहे. यात कर्नाटकातील तुमकूर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक (Sri Sharada Mahila Co-operative Bank, Tumkur, Karnataka) आणि महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेचा (Harihareshwar Sahakari Bank, Wai, Satara) समावेश आहे. या बँकांकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याने त्यांचा परवाना रद्द केल्याचे आरबीआयने म्हटले आहे. वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेने ११ जुलै २०२३ पासून बँकिंग व्यवसाय करणे बंद केले आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने निवेदनात नमूद केले आहे.

हरिहरेश्वर सहकारी बँकेचे सुमारे ९९.९६ टक्के ठेवीदार त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून मिळण्यास पात्र आहेत. तर श्री शारदा महिला सहकारी बँकेच्या बाबतीत सुमारे ९७.८२ टक्के ठेवीदार त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळवण्यास पात्र आहेत. लिक्विडेशननंतर प्रत्येक ठेवीदार त्यांच्या ठेवींची ५ लाखांपर्यंतची ठेव विमा दाव्याची रक्कम DICGC कडून मिळवण्यास पात्र असतील.

या बँकांचे परवाने रद्द केल्यामुळे या बँकांना ‘बँकिंग’चा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे; ज्यात ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे यासह इतर गोष्टींचा समावेश आहे.

तसेच सध्याची आर्थिक स्थिती पाहाता या बँका त्यांच्या सध्याच्या ठेवीदारांना संपूर्ण पैसे देऊ शकणार नाहीत, असेही आरबीआयने (RBI) नमूद केले आहे. ८ मार्च २०२३ पर्यंत DICGC ने बँकेच्या एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी ५७.२४ कोटी रुपये आधीच दिली आहे. १२ जून २०१३ पर्यंत, DICGC ने श्री शारदा महिला सहकारी बँकेच्या ठेवीदारांना एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी १५.०६ कोटी रुपये आधीच दिले आहेत.

सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांनादेखील सदर बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे, असे आरबीआयने पुढे नमूद केले आहे.

हे ही वाचा :











Source link

Hema Malini: हेमा मालिनी पती धर्मेंद्र यांच्याबरोबर का राहत नाहीत? कारण आले समोर

0
Hema Malini: हेमा मालिनी पती धर्मेंद्र यांच्याबरोबर का राहत नाहीत? कारण आले समोर


हेमा मालिनी यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, “अशाप्रकारे जगायला कुणालाच आवडत नाही पण होते. आपल्या जीवनात कधी कधी अनपेक्षित वळणे येतात आणि आपल्याला त्यांचा स्वीकार करावा लागतो. याचबरोबर आपण त्यांच्याशी जुळवून घेतले पाहिजे. धर्मेंद्र नेहमी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी भक्कमपणे उभे असतात. आपल्या पती आणि मुलांबरोबर एक सामान्य परिवार असावा अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण कधी कधी परिस्थिती आपल्याला वेगळ्याच मार्गावर घेऊन जाते.”



Source link

Jawan Starcast Fees: शाहरुख खान ते नयनतारा, जवानसाठी कलाकारांनी किती घेतले मानधन? जाणून घ्या…

0
Jawan Starcast Fees: शाहरुख खान ते नयनतारा, जवानसाठी कलाकारांनी किती घेतले मानधन? जाणून घ्या…


‘जवान’ चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख खान पहिल्यांदाच दिग्दर्शक अॅटलीसोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटातून नयनतारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिनेता विजय सेतुपती ‘जवान’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, सान्या मल्होत्राही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘जवान’ हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.



Source link

Bhandara Flood : मुसळदार पावसामुळं भंडाऱ्यात पूरस्थिती, आवळी गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला

0
Bhandara Flood : मुसळदार पावसामुळं भंडाऱ्यात पूरस्थिती, आवळी गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला


Bhandara Rain and Flood Update : गेल्या तीन दिवसांपासून कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता पावसाने विदर्भात आपला मोर्चा वळवला आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. परिणामी विदर्भातील अनेक नद्यांना पूर आला असून भंडाऱ्यात तर पूरस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीपासून होत असलेल्या पावसाने भंडाऱ्यातील बहुतेक तालुक्यांत ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. त्यानंतर आता लाखांदूर तालुक्यातील आवळी या गावाला चारही बाजूंनी पुराच्या पाण्याने घेरलं आहे, त्यामुळं आवळी गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.



Source link

Mahesh Babu Daughter: महेश बाबूची लेक झळकली टाइम्स स्क्वेअरवर, वयाच्या ११व्या वर्षी घेतले इतके मानधन

0
Mahesh Babu Daughter: महेश बाबूची लेक झळकली टाइम्स स्क्वेअरवर, वयाच्या ११व्या वर्षी घेतले इतके मानधन


सिताराने तिच्या पदार्पणाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. टाईम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर आपल्या मुलीच्या पदार्पणाबद्दल महेश बाबूलाही खूप आनंद झाला आहे. अभिनेत्याने मुलीच्या एवढ्या मोठी कामगिरीची पोस्ट देखील शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी, सिताराने देखील तिच्या पदार्पणाची माहिती देत शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘टाईम्स स्क्वेअर…. मी यापेक्षा अधिक आनंदी कधीच होऊ शकले नसते… पीएमजे ज्वेलरी तुमच्याशिवाय मी हे करूच शकले नसते.’ महेश बाबूनेही तिची पोस्ट शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘टाईम्स स्क्वेअरवर… खूप अभिमान आहे आम्हाला तुझा… अशीच चमकत राहा’.



Source link

Amit Bhanushali: मर्डर मिस्ट्री उलगडणार? ‘ठरलं तर मग’नंतर अमित भानुशाली ‘फेसबुक गेम’ करणार!

0
Amit Bhanushali: मर्डर मिस्ट्री उलगडणार? ‘ठरलं तर मग’नंतर अमित भानुशाली ‘फेसबुक गेम’ करणार!


‘फेसबुक गेम’ या चित्रपटाची निर्मिती मानसी मापुस्कर, रुद्राश पवार यांनी केली असून चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि निर्माता अशी तिहेरी धुरा समीर पवार यांनी सांभाळली आहे. येत्या २३ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज होणार आहे. ‘फेसबुक गेम’ची ही मर्डर मिस्ट्री पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.



Source link

Tarun Bharat on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कर्तवशून्य फेसबूक मुख्यमंत्री, तरुण भारतमधून निशाणा

0
Tarun Bharat on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कर्तवशून्य फेसबूक मुख्यमंत्री, तरुण भारतमधून निशाणा



Tarun Bharat on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कर्तवशून्य फेसबूक मुख्यमंत्री, तरुण भारतमधून निशाणा

कलंकवादावरून उद्धव ठाकरेंवर तरुण भारतच्या अग्रलेखातून टीकेची झोड. उद्धव ठाकरे कर्तव्यशून्य फेसबुक मुख्यमंत्री, शिल्लक गटाचे प्रमुख, अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून कुख्यात, असा अग्रलेखात उल्लेख. 



Source link