Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2930

Atul Parchure: ‘त्या चुकीच्या उपचारांमुळे त्रास आणखी वाढला’; कॅन्सरविषयी पहिल्यांदाच बोलले अतुल परचुरे

0
Atul Parchure: ‘त्या चुकीच्या उपचारांमुळे त्रास आणखी वाढला’; कॅन्सरविषयी पहिल्यांदाच बोलले अतुल परचुरे


‘माझ्या पहिल्या उपचार प्रक्रियेत चूक झाली. याचा माझ्या स्वादुपिंडावर परिणाम झाला आणि मला अधिक त्रास होऊ लागला. चुकीच्या उपचाराने प्रकृती बिघडली होती. मला चालताही येत नव्हते. बोलत असताना देखील मी थकून जायचो. अशा स्थितीत डॉक्टरांनी दीड महिना वाट पाहण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, जर आता शस्त्रक्रिया केली तर, मला दीर्घकाळ कावीळीचा सामना करावा लागेल आणि माझ्या यकृतात पाणी भरेल. यामुळे मी फारकाळ जगू शकणार नाही. पण, नंतर मी डॉक्टर बदलले, योग्य औषधे आणि केमोथेरपी घेतली’, असे देखील अतुल परचुरे म्हणाले.



Source link

Sitara: व्वा! शाब्बास पोरी! महेश बाबूची लेक सितारा आयुष्यातील पहिल्या कमाईचं काय करणार? ऐकाच…

0
Sitara: व्वा! शाब्बास पोरी! महेश बाबूची लेक सितारा आयुष्यातील पहिल्या कमाईचं काय करणार? ऐकाच…


महेश बाबूची मुलगी सितारा घट्टामनेनी हिने तिला या जाहिरातीतून मिळालेला पहिला पगार एका धर्मादाय संस्थेला दान केला आहे. सिताराने हैदराबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिची आई नम्रता शिरोडकर हिच्यासोबत तिच्या नावाचे एक लूक बुकही लाँच केले आहे. यावेळी सितारा म्हणाली की, मला चित्रपट बघायला आवडतात आणि त्यात अभिनय करण्याची खूप आवड आहे. हा आत्मविश्वास तिला तिच्या आईकडून मिळाला. यावेळी तिने आवर्जून सांगितले की, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये सिग्नेचर ज्वेलरी कलेक्शन लाँच होताना पाहून, तिचे वडील खूप आनंदी झाले होते आणि जाहिरातीचा व्हिडीओ पाहून भावूकही झाले.



Source link

Saamana on Devendra Fadnavis: ‘कलंक’ वादावरून रोखठोकमधून पुन्हा फडणवीसांवर निशाणा

0
Saamana on Devendra Fadnavis: ‘कलंक’ वादावरून रोखठोकमधून पुन्हा फडणवीसांवर निशाणा


Maharashtra Local Body Polls : स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या सुनावणीसाठी तारीख निश्चित, तब्बल दोन महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टात 18 जुलैला सुनावणी



Source link

The Trial : ‘द ट्रायल’साठी काजोलने मोडला स्वतःचाच नियम! ३१ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केलं ‘हे’ काम

0
The Trial : ‘द ट्रायल’साठी काजोलने मोडला स्वतःचाच नियम! ३१ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केलं ‘हे’ काम


The Trial Kajol: गेली ३१ वर्ष काजोलने एक नियम पाळला होता. मात्र, ‘द ट्रायल’साठी तिने स्वतःचा हा नियम मोडला आहे.



Source link

Jailer: रजनीकांतच्या ‘हुकुम’ गाण्याचा टीझर पाहून चाहते म्हणाले ‘एक नंबर…नादखुळा’! तुम्ही पाहिलात का?

0
Jailer: रजनीकांतच्या ‘हुकुम’ गाण्याचा टीझर पाहून चाहते म्हणाले ‘एक नंबर…नादखुळा’! तुम्ही पाहिलात का?


रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसं चित्रपटाचं प्रमोशनही जोरात सुरू आहे. नुकतेच त्यांच्या जेलर चित्रपटातील ‘कावाला’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. आता ‘हुकुम’ या नव्या गाण्याचा टीझर रिलीज झाला असून, संपूर्ण गाणे देखील लवकरच रिलीज होणार आहे. या गाण्याच्या टीझर व्हिडीओमध्ये रजनीकांत तुरुंगातून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांच्याभोवती बंदूक आणि रिव्हॉल्व्हर ठेवलेल्या दिसत आहेत. हे गाणे अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केले आहे.



Source link

APMC Market Mumbai : महागड्या टोमॅटोवर चोरट्यांचा डल्ला; एपीएमसी मार्केटमधील घटना सीसीटीव्हीत कैद

0
APMC Market Mumbai : महागड्या टोमॅटोवर चोरट्यांचा डल्ला; एपीएमसी मार्केटमधील घटना सीसीटीव्हीत कैद



APMC Market Crime News : चोरट्यांनी मार्केटमध्ये ठेवलेल्या कॅरेटमधून टोमॅटोची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.



Source link

सातारा : उदयनराजे अजितदादांना भेटणार | पुढारी

0









सातारा, पुढारी वृत्तसेवा : भाजप, शिवसेना (शिंदे गट) युती सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सहभागी झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘पुढारी’ने महाराष्ट्रातील दोन अँग्री यंग मॅन एकत्र येणार हे वृत्त प्रसिद्ध करून भविष्यातील संकेत दिले होते. उदयनराजेंनीही मागील सर्व मनभेद विसरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या त्यांची धावपळ सुरू असल्याने प्रत्यक्ष भेटूनही शुभेच्छा देणार असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांना सांगितले.

सातारा शहरास पाणीपुरवठा करणार्‍या कास धरणापासून शहरापर्यंत सुमारे 29 कि.मी. लांबीची नवीन जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी तसेच वीज निर्मिती केंद्राच्या कामाचे भूमिपूजन खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले असून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना शुभेच्छा देणार का? असे यावेळी विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, त्यांचा माझा फोन झाला आहे. सध्या त्यांची धावपळ सुरू असून सर्व विषय मार्गी लावल्यानंतर आपण भेटून चर्चा करू असे सांगितले. त्यानुसार त्यांची भेट घेणार असून त्यांना शुभेच्छा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यातील मतभेद संपूर्ण राज्याने पाहिला आहे. मात्र, खा. उदयनराजेंनी ना. अजितदादांना दिलेल्या शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

गेल्याच आठवड्यात ‘पुढारी’ने या संदर्भात ‘महाराष्ट्राचे दोन अँग्री यंग मॅन येणार एकत्र’ हे वृत्त प्रसिद्ध करून अजितदादा व उदयनराजे एकत्र येणार असल्याचे संकेत दिले होते. उदयनराजे यांनी एक प्रकारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रालाही या दोघांच्या एकत्र येण्याची उत्सुकता आहे.











Source link

पांगारे येथील मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू | पुढारी

0









सातारा, पुढारी वृत्तसेवा : बहिणीची छेड काढू नकोस, असे समजावून सांगणार्‍या पांगारे (ता. सातारा) येथील युवकाच्या घरावर मे महिन्यात रात्री राजापुरी गावच्या 30 हून अधिक युवकांनी हल्ला केला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राहुल शिवाजी पवार (वय 28) या युवकाचा शनिवारी मृत्यू झाला.

याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी आकाश आत्माराम मोरे, सुयोग जयसिंग गुरव, यश दीपक निकम, गजानन आनंदराव मोरे, तुषार शंकर साळुंखे, गणेश तात्याबा मोरे, जगदीश शंकर साळुंखे, प्रथमेश भाऊसो साळुंखे, प्रतीक सतीश साळुंखे, गणेश युवराज मोरे, संकल्प संजय साळुंखे, आविष्कार संजय साळुंखे (सर्व रा. राजापुरी, ता. सातारा) यांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, पांगारे गावातील मुलगी ही राजापुरी शाळेतील इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. तिची राजापुरी गावातील गणेश युवराज मोरे वारंवार छेड काढत होता. यामुळे तिने भावाला याची कल्पना दिली. तेव्हा त्याने गणेश मोरे याला दोन वेळा समजावून सांगितले होते. मात्र, त्यावर गणेश मोरे आणि त्याच्या मित्रांनी पुन्हा धमक्या देणे सुरु केले. यावरूनच दि. 5 मे रोजी वाद झाला. त्या दिवशी मध्यरात्री 30 पेक्षा अधिक युवकांनी घरात घुसून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने राहुल पवार व नयन पवार यांना मारहाण केली. या हल्ल्यात राहुल पवार गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर पुण्यात उपचार सुरु असताना त्याचा शनिवारी मृत्यू झाला.











Source link

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरला बसला दिल्लीच्या पुराचा मोठा फटका! नेमकं काय झालं?

0
Janhvi Kapoor: जान्हवी कपूरला बसला दिल्लीच्या पुराचा मोठा फटका! नेमकं काय झालं?


Janhvi Kapoor Delhi Flood: दिल्लीत आलेल्या पुरामुळे बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिला देखील नुकसान झाले आहे.



Source link

अपघातातील दुचाकीस्वाराकडे आढळला गावठी कट्टा, काडतुसे | पुढारी

0









खंडाळा, पुढारी वृत्तसेवा : खंडाळा गावाच्या हद्दीत शुक्रवारी रात्री कृष्णा गॅरेजजवळ एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. परंतु, या दुचाकी चालकाकडे गावठी कट्टा आढळून आल्यामुळे खंडाळ्यात खळबळ उडाली आहे. अजित बापुराव पवार (रा. शेडगेवाडी, ता. खंडाळा) असे या दुचाकीस्वाराचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः संशयित अजित पवार हा दुचाकीवरून जात असताना गॅरेजजवळ आल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात तो किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

यावेळी घटनास्थळी नागरिकांना गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयिताकडील गावठी कट्टा, काडतुसे, दोन मोबाईल आणि दुचाकी असा 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यगरग अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, संशयिताकडे हा गावठी कट्टा कुठून व कसा आला? याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.











Source link