Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2931

Katrina Kaif Birthday: कशी झाली होती अभिनेत्री कतरिना कैफच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात? वाचा…

0
Katrina Kaif Birthday: कशी झाली होती अभिनेत्री कतरिना कैफच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात? वाचा…


कतरिना कैफने २००३मध्ये ‘बूम’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. कतरिना कैफने पहिल्याच चित्रपटात खूप बोल्ड सीन्स दिले होते. ‘बूम’ चित्रपटाची निर्मिती टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांनी कतरिनाला एका फॅशन शोमध्ये पाहिले जोते. यानंतर तिला ‘बूम’ या चित्रपटात कास्ट करण्यात आले. मात्र, कतरिनाला खरी ओळख सलमान खानच्या ‘मैने प्यार क्यूं किया’ या चित्रपटातून ओळख मिळाली.



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: उच्चायुक्त म्हणाले… ‘रफी साहेबांसाठी दूतावास कधीही बंद होऊ शकत नाही’

0
माझ्या हिश्श्याचे किस्से: उच्चायुक्त म्हणाले… ‘रफी साहेबांसाठी दूतावास कधीही बंद होऊ शकत नाही’


  • Marathi News
  • Opinion
  • Rumi Jafri Divya Marathi Special Article | High Commissioner Said Embassy Can Never Be Closed For Rafi Saheb’

रूमी जाफरीएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

मोहम्मद रफी यांनी ‘शरारत’मधील ‘अजब है दास्तां तेरी ए जिंदगी’ या गाण्याला आवाज दिला आहे. विशेष म्हणजे, या गाण्यात किशोरकुमार यांनी अभिनय केला आहे.

ध्वजवंदन झाले, राष्ट्रगीत गायले गेले. सगळा कार्यक्रम झाल्यावर उच्चायुक्तांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालय उघडण्यास सांगितले. ते फरहानाला घेऊन गेले आणि भारताचा व्हिसा बनवून दिला. मग पासपोर्ट दाखवला आणि म्हणाले, ‘हे बघ फरहाना, हा एकमेव असा पासपोर्ट आहे, ज्याला १५ ऑगस्टला व्हिसा मिळाला आहे.’

मित्रांनो, रफी साहेबांविषयीच्या जीवनाशी संबंधित, त्यांच्या चांगुलपणाच्या, दयाळूपणाच्या, चांगल्या कामाच्या अनेक गोष्टी तुम्ही वाचल्या-ऐकल्या असतील. या गोष्टी आपल्यासाठी त्यांच्या अविस्मरणीय कहाण्या ठरल्या आहेत. पूर्वजांच्या कर्माचे फळ पुढच्या पिढ्यांना मिळते, असे म्हणतात ते खोटं नाही. रफी साहेबांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या चांगुलपणाचे फळ त्यांच्या कुटुंबाला लाभले. आज मी अशीच एक घटना तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

यास्मिन हमीद रफी आणि फौजिया हमीद रफी या रफी साहेबांच्या सुना. त्या सलीम खान साहेबांच्या मोठ्या बहिणीच्या मुली आहेत. दोघीही लंडनमध्ये राहतात, इंग्लंडच्या नागरिक आहेत. काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मित्र संजीव सरन यांच्या घरी गेलो होतो, तेव्हा मला यास्मिन रफी भेटल्या. त्यांना सर्व जण डॉली बाजी म्हणत होते आणि त्यांची मुलगी फरहानाही तिथे होती. आपण आपल्या आयुष्यात सासरे रफी साहेब यांच्यापेक्षा जास्त धार्मिक आणि उदात्त व्यक्ती कधीही पाहिली नाही, असे डॉली बाजी यांनी मला सांगितले. जगात रफी साहेबांविषयी किती आदर आहे, याचे एक उदाहरण त्यांनी मला सांगितले.

त्या म्हणाल्या, ‘मी भारतात येण्याचा बेत आखला होता. माझी मुलगी फरहानालाही सोबत चल असं म्हणाले तेव्हा तिने नकार दिला. माझा भारताचा व्हिसाही बनवला होता. पण, माझ्या फ्लाइटच्या एक दिवस आधी फरहानाने, आपल्यालाही मुंबईला यायचंय, असं सांगितलं. मी म्हणाले की, आता उद्या रात्रीची फ्लाईट आहे, भारताचा व्हिसा एका दिवसांत कसा मिळणार? तर ती म्हणाली, की उद्या सकाळी मी दूतावासात जाईन, उच्चायुक्तांना भेटेन आणि व्हिसा बनवून घेईन. फ्लाइट तर उद्याची आहे.’

डॉली बाजी सांगत होत्या.. ‘दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून फरहानाने दूतावासात धाव घेतली. तिथे गेल्यावर दूतावासाच्या बाहेर कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचे तिला दिसले. बरेच लोक येऊन बसले होते. ती पुढे गेली आणि आपल्याला उच्चायुक्तांना भेटायचे आहे, असे सांगितले. तर आज १५ ऑगस्ट असल्यामुळे दूतावास बंद असल्याचे तिला सांगण्यात आले. उच्चायुक्त येतील, ध्वजवंदन आणि नंतर गेट-टूगेदर होईल, मग ते निघून जातील. त्यामुळे आज भेट होणे अशक्य आहे. व्हिसा तर अजिबात बनू शकणार नाही.. हे ऐकून फरहाना निराश झाली. ध्वजवंदनासाठी जे भारतीय आले होते, त्यांच्यासोबत तीही तेथे बसली.’

‘उच्चायुक्त आले आणि थेट ध्वजवंदनासाठी ध्वजाच्या दिशेने निघाले. फरहानाही पुढे गेली आणि उच्चायुक्तांना म्हणाली ‘माफ करा सर, मला आज भारतात जायचे आहे. मला व्हिसा मिळाला तर बरं होईल.’ त्यावर उच्चायुक्त म्हणाले, ‘तुम्ही भारतीय असाल, तर तुम्हाला आज स्वातंत्र्यदिन आहे, हे कळायला हवे. आम्ही येथे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आलो आहोत. आज ऑफिसचे काम होणार नाही, आज सुटी आहे..’ एवढं बोलून ते पुढे निघून गेले. मग फरहाना म्हणाली, “सर, मी कोण आहे, हे तुम्हाला सांगायचंय…’

उच्चायुक्त तिला चिडवत म्हणाले, ‘सांग बरं तू कोण आहेस..?’ यावर फरहाना म्हणाली, ‘मी मोहम्मद रफी यांची नात आहे.’ हे ऐकून उच्चायुक्त आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, ‘कोण मोहम्मद रफी, महान गायक?’ फरहानाने उत्तर दिले, ‘हो.’ उच्चायुक्त चालत जवळ आले आणि फरहानाचा हात हाती घेत म्हणाले, ‘तू अशा व्यक्तीचे नाव घेतले आहे, ज्यांच्यासाठी भारतीय दूतावास कधीही बंद राहू शकत नाही..’

त्यानंतर प्रथम ध्वजवंदन झाले, राष्ट्रगीत गायले गेले. सगळा कार्यक्रम झाल्यावर उच्चायुक्तांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालय उघडण्यास सांगितले. ते फरहानाला घेऊन गेले आणि भारताचा व्हिसा बनवून दिला. मग पासपोर्ट दाखवला आणि म्हणाले, ‘हे बघ फरहाना, हा एकमेव पासपोर्ट आहे, ज्याला १५ ऑगस्टला व्हिसा मिळाला आहे.’ मी तुम्हाला आणखी एक घटना सांगतो जी अमिताभ बच्चन यांनी माझ्यासोबत शेअर केली. हा किस्सा त्यांच्याच शब्दांत ऐका…

“आम्ही कलकत्त्याला शो करायला गेलो होतो. एके दिवशी आमचा रफीसाहेबांसोबत शो होता. दुसऱ्या दिवशी किशोरकुमार साहेबांसोबत शो होता. रफी साहेबांसोबतचा आमचा शो खूप यशस्वी झाला. रफीसाहेब दुसऱ्या दिवशी विमानतळाकडे रवाना झाले. त्या दिवशीचा शो किशोरकुमार साहेबांसोबत होता आणि अचानक मुंबईहून बातमी आली की, त्यांची फ्लाइट चुकली आहे, आता ते येऊ शकत नाहीत. त्या काळात फक्त दोनच उड्डाणे व्हायची. आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो की, शोमध्ये गायक नसेल, तर शो कसा होणार? रफी साहेब विमानतळावर गेले होते. आम्ही लगेच गाडीत बसून एअर पोर्टकडे धावलो. तोपर्यंत रफीसाहेब फ्लाइटमध्ये बसलेही होते. त्या काळात सुरक्षेचा इतका त्रास नव्हता. त्यामुळे मी ताबडतोब फ्लाइटच्या आत गेलो आणि रफीसाहेबांना सगळा प्रकार सांगितला. त्यांना विनंती केली की, आता ही वेळ फक्त तुम्हीच सांभाळून घेऊ शकता. कृपा करुन तुम्ही थांबा! रफीसाहेबांनी क्षणभरही विचार केला नाही. ते लगेच विमानातून उतरले.

असं म्हणतात की, माणूस निघून गेला तरी त्याचे शब्द मागे राहतात. रफी साहेबांसाठी एक प्रसिद्ध शेर आहे… चाल वो चल कि पस-ए-मर्ग तुझे याद करें,

काम वो कर कि ज़माने में तेरा नाम रहे।
तुम्हाला जगात कलाकारांचे चाहते आढळतील, पण रफी साहेबांचे फक्त भक्तच सापडतील. रफी साहेबांनी त्या काळातील प्रत्येक अभिनेत्याला आपला आवाज दिला. पण, अशाच एका अभिनेत्यालाही त्यांनी आपला आवाज दिला, जो स्वतः एक उत्तम गायक होता. ते होते किशोरकुमार. चित्रपटाचे नाव ‘शरारत’ आणि गाणे आहे…
अजब है दास्तां तेरी ए जिंदगी…
स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.

रूमी जाफरी
बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक



Source link

नेटस्ट्रीम: निमोना, डिलिट अन् सार्जंट!

0
नेटस्ट्रीम: निमोना, डिलिट अन् सार्जंट!


  • Marathi News
  • Opinion
  • Nimona, Delete And Sargent | Netstream Sameer Gaikwad, Divya Marathi Special Article  

समीर गायकवाड4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘निमोना’ हा एक अॅनिमेटेड साय-फाय कॉमेडी चित्रपट आहे, ज्याची कथा ग्लोरेथ नावाच्या डिस्टोपियन जगामध्ये सेट केली गेलीय. हा सिनेमा २०१५ च्या ‘निमोना क्रॉनिकल्स’ या ग्राफिक कादंबरीवर बेतलेला आहे. कादंबरीत डिस्टोपियन जगातही जातीवाद आणि वर्णद्वेष कसा अस्तित्वात आहे, यावरचे भाष्य आहे. सुदैवाने हे विश्व लैंगिकतेपासून मुक्त असते आणि सर्व प्रकारच्या नात्यांना मान्यता देते. उडत्या कार, मनोरंजक होर्डिंग तसेच जागतिक दर्जाच्या सुरक्षा प्रणालींसह डिजिटल तंत्रज्ञानाचे जग ‘निमोना’ नेमकेपणाने दाखवतो.

ग्लोरेथ हे एका महान सम्राज्ञीचे नाव असते, जिने एका विशालकाय क्रूर राक्षसाविरूद्धची लढाई जिंकून स्वतःचे राज्य निर्माण केलेले असते. ग्लोरेथ हे संपूर्ण तटबंदी असलेले नगर. त्यावर राज्य करणाऱ्या प्रत्येक वारसाने त्याचे रक्षण केले आहे. पुढे जाऊन शासनकर्त्यांची नवी पिढी राज्यात अधिक समानता आणण्यासाठी एक प्रयोग करते. सर्व वर्गातील लोकांना संधी देण्यासाठी एक संस्था उघडण्यात येते. त्यांच्यातून भविष्यातील श्रेष्ठ राजा किंवा राणी मिळवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाते. यातूनच निवड झालेला नवा राजा बॅलिस्टर बोल्डहार्टला (रिझ अहमद) राज्याभिषेक होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच पलायन करावे लागते, कारण राणीचा मारेकरी म्हणून त्याच्यावर आळ घेतलेला असतो. चंचल स्वभावाची, आकार बदलणारी, अक्राळविक्राळ शक्ती म्हणून ओळखली जाणारी निमोना (क्लो ग्रेस मोरेट्झ) दुर्दैवी बॅलिस्टरला मदतीचा हात देते. ग्लोरेथच्या सर्व लोकांना सत्य उमगावे म्हणून निमोना आणि बॅलिस्टर अगदी साहसपूर्ण संघर्ष करतात. अशी ही साधी-सरळ कथा आहे.

निक ब्रुनो आणि ट्रॉय क्वेन दिग्दर्शित ‘निमोना’ची सिनेमॅटोग्राफी अफलातून आहे. मानव सध्या ज्या अवकाशीय गोष्टींचे भाकीत करत आहे, त्या सर्व गोष्टींसह भविष्यातील जगाची भव्य कल्पना अद्भूतपणे चितारली असल्याने हा चित्रपट प्रेक्षणीय झाला आहे. काल्पनिक आदर्श जगाच्या संस्कृतीच्या गाभ्याला हात न लावता भेदाभेद करण्यावर भाष्य करताना चित्रपटाचा फॉर्म बिघडू दिलेला नाही. रॉबर्ट एल. बेअर्ड आणि लॉयड टेलर यांची पटकथा अत्यंत बांधेसूद, रंजक अन् गंमतीदार आहे. या जॉनरमधील चित्रपटांना हवे असणारे सर्व घटक यात ठासून भरले आहेत. चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो आणि सतत येणारे अनिश्चित ट्विस्ट घेत राहतो. निमोना आणि बॅलिस्टरची अनोळखी-बेस्ट बडीज म्हणून केमिस्ट्री हे देखील चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. कथा जसजशी पुढे सरकत जाते, तसतसे प्रत्येक जण त्यांच्या विरोधात असलेल्या घटकांशी मिळतेजुळते घेत परस्परांचे सांत्वन करत शांतता प्रस्थापित करताना दिसतात. चांगले विरुद्ध वाईट या जुन्याच संकल्पनेवर आधारित असा हा चित्रपट आहे. डिस्टोपियन जगाची ही कथा टवटवीत तर आहेच; शिवाय मनोरंजक, आनंदी दृश्ये आणि साहसांनी भरलेली आहे. प्रेक्षकांच्या वेळेचा पुरेपूर मोबदला देणारा चित्रपट असं त्याला म्हणता येईल!

आता थोडंसं ‘डिलिट’ या मालिकेबद्दल. अलीकडे रिलीज झालेली थाई मालिका ‘डिलिट’ हा एक शो आहे जो ‘ब्लॅक मिरर’च्या प्रत्येक चाहत्याला आनंद देईल. ही मालिका एका विवाहबाह्य संबंधात असलेल्या जोडप्याबद्दल आहे, ज्यांना एक असा फोन सापडतो जो लोकांना हटवू शकतो. त्यांना अशा निवडी कराव्याच लागतात, ज्यामुळे ते दुसऱ्या दिवशी हटवले जाऊ शकतात किंवा मृत वा जिवंत होऊ शकतात. गाजलेल्या ‘ब्लॅक मिरर’ची ही थाई आवृत्ती असली, तरी याचं वेगळेपण त्यातील मांडणीत आहे. सामान्य कथासूत्र तेच असले, तरी मुख्य कल्पना अगदी रंजक आहे.

मोबाइलद्वारे माणसं डिलिट करण्याची कल्पना भन्नाटच आहे. या कल्पनेला भावनांच्या विविध छटा बहाल केल्यामुळे तिला जे स्वरूप प्राप्त झाले आहे, त्यातून अक्षरशः नवरसांची अनुभूती येते! मालिकेची नायिका असणाऱ्या लिलीला एक फोन गवसतो, जो लोकांना गायब करवतो. तिचे विवाहबाह्य संबंध असतात आणि तिला घटस्फोट घ्यायचा असतो. त्या दरम्यानच हे घडतं, कधी इच्छेने, तर कधी अनिच्छेने घडतं! यातून आणखीनच गुंतागुंत वाढणार आहे, याची तिला काहीच कल्पना नसते. पहिले दोन्ही भाग रहस्यमय आहेत, तर नंतरच्या भागांमध्ये इमोशनल गुंतागुंत वाढत जाते. सुरूवातच अगदी सॉलिड आहे. पार्श्वसंगीत नि छायाचित्रण अत्यंत जोरकस आहे. देखणा अभिनेता नॅट किचरिट याचा स्क्रीनवरचा प्रेझेन्स सतत लक्ष वेधून घेण्यासाठीच आहे की काय, असे वाटण्याइतका तो लोभस दिसतो! त्याच्यावरून नजर हटत नाही. लिलीच्या भूमिकेतील अभिनेत्री सारिका हिचा वावर पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत निखळ आनंद देणारा आहे. तिच्यात एक लडिवाळ भोळेपणा दिसतो. थाई अभिनेत्यांचे आकर्षण असणाऱ्यांसाठी ही सिरीज एक पर्वणी आहे.​​​​​​​

जिओ सिनेमावर रिलीज झालेला ‘सार्जंट’ हा रणदीप हुड्डाचा सिनेमा कमालीचा निराशाजनक आहे. निखिल शर्मा या तपास अधिकाऱ्याची ही कथा आहे. ड्रग सप्लाय आणि मर्डर मिस्ट्रीच्या केसमध्ये तो सपशेल अपयशी ठरतो, आपल्यावरील कलंक दूर करण्यासाठीचा त्याचा संघर्ष म्हणजे सार्जंट! कमालीची संथ कथा, अत्यंत ढिसाळ पटकथा, अनेक वेस्टर्न वेब सिरीजचा मसाला ढापलेली मांडणी, नावीन्याचा अभाव असणारे दिग्दर्शन आणि यांच्या भरीस भर म्हणजे विलक्षण कृत्रिम अभिनय.. सिनेमा कसा नसावा, याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरावे!

समीर गायकवाड
sameerbapu@gmail.com
संपर्क : 9766833283



Source link

गोष्ट सांगतो ऐका…: जेवण झालं का?

0
गोष्ट सांगतो ऐका…: जेवण झालं का?


अरविंद जगताप7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

जयंती मानवची वाट बघून कंटाळली. तिनं सहज त्याचं व्हाट्स अॅप बघायला सुरूवात केली. त्यात एक नंबर ‘जेवण झालं का?’ नावानं सेव्ह केलेला होता. उत्सुकता म्हणून ती चॅट बघू लागली. हिंदीत गप्पा होत्या. मानवने लिहिलं होतं, ‘कब आओगी? इधर मेरी जान जा रही हैं यार..’ त्यावर तिचा रिप्लाय होता, ‘आ रही हूं बाबा.. दस मिनिट..’ हे वाचून जयंतीला जरा धक्काच बसला…

मानव आणि जयंतीची ओळख होऊन वर्ष झालं आणि त्याच दिवशी मानवने तिला प्रपोज केलं. जयंतीने नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. खरं तर प्रपोज ही फक्त औपचारिकता होती. दोघांना एकमेकांच्या मनाचा अंदाज खूप दिवसापासून होता. एकाच कंपनीत असल्याने रोज सोबत असायची. मानव पुण्यात एकटाच राहायचा. घरचे संगमनेरला होते. त्यांना पुण्यात यायची इच्छा नव्हती. जयंती मुळची पुण्यातली. दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला, तरी घरच्यांना पण सगळं माहीत होतं. त्यांची तक्रार नव्हती. मुळात मानव अतिशय मनमिळावू. दिसायलाही देखणा. जयंतीचा स्वभाव पण प्रेमळ. दोन्ही घरच्यांनी तयारी सुरू केली. एरवी लग्नात मुलीकडचे किती खर्च करणार आणि मुलाकडचे किती खर्च करणार, असा प्रश्न असतो. पण इथे प्रकार वेगळा होता. दोन्ही घरचे लोक, सगळा खर्च आम्हीच करणार, म्हणून अडून बसले होते. मानव आणि जयंती दोघेही उत्साहाने लग्नाचा हॉल, लग्नपत्रिकेचं डिझाइन, पाहुण्यांची यादी या सगळ्या गोष्टी करत होते. हळूहळू कंपनीतल्या कामापेक्षा दोघं लग्नाच्या कामात जास्त अडकत चालले होते. रोज संध्याकाळी त्यांच्या आवडत्या कॅफेत सगळी चर्चा आणि नियोजन चालायचं.

आजही मानव आणि जयंती कॅफेत बसले होते. मानवने एक नवीनच डिझाइन बघितलं होतं लग्नपत्रिकेचं. ते तो जयंतीला मोबाइलवर दाखवत होता. एवढ्यात मानवचे कॉलेजमधले प्राध्यापक तिथे आले. मानव धावतच त्यांच्याकडे गेला. पाया पडला. प्राध्यापक मानवला भेटून खूश झाले. चौकशी सुरू झाली. कॉलेजच्या काळातल्या आठवणी निघाल्या. मानव त्यांची जयंतीशी ओळख करून द्यायला उत्सुक होता. पण, अचानक प्राध्यापकांनी विषय काढला. ‘तू त्या अबोलीशीच लग्न केलंस का मग?’ मानव लाजला. म्हणाला, ‘सर, ती पोरांनी उठवलेली अफवा होती. आमची फक्त ओळख होती. खरं तर भांडणच होतं..’ प्राध्यापक हसले. आता मानवला कळेना की काय बोलायचं? आणि अशावेळी जयंतीशी ओळख करून देणं अजूनच रिस्की होतं. दोघे कॉलेजच्या काळातल्या गप्पा मारत बसले.

इकडं जयंती मानवची वाट बघून कंटाळली. तिनं सहज त्याचं व्हाट्स अॅप बघायला सुरूवात केली. त्यात एक नंबर ‘जेवण झालं का?’ नावानं सेव्ह केलेला होता. उत्सुकता म्हणून ती चॅट बघू लागली. हिंदीत गप्पा होत्या. मानवने लिहिलं होतं, ‘कब आओगी? इधर मेरी जान जा रही हैं यार..’ त्यावर तिचा रिप्लाय होता, ‘आ रही हूं बाबा.. दस मिनिट..’ जयंतीला जरा धक्काच बसला. प्रोफाइल फोटो एका मुलीचा होता, जिचं नाव मानवने ‘जेवण झालं का?’ असं सेव्ह केलं होतं. जयंतीने पुढं वाचायला सुरूवात केली. मानवने लिहिलं होतं, ‘फ्रीजमें पिझ्झा रखा हैं तुम्हारे लिये. यादसे खा लेना..’ एक मेसेज होता, ‘आज लेट होगा. पापा आये हैं घर पर..’ मग एके ठिकाणी मानवने त्या मुलीला लिहिलं होतं, ‘कल दिल खुश हो गया.. कमाल हो तुम!’ जयंतीचा संताप वाढत चालला होता. तिला वाटत होतं आताच्या आता मोबाइल फोडून टाकावा. पण, तिनं मोबाइल तसाच ठेऊन दिला. पुढं वाचायची तिची इच्छाच नव्हती. एक व्हॉइस मेसेज होता. जयंतीने आवाज कमी करून ऐकला.. त्यात ती मुलगी म्हणत होती.. ‘सॉरी. आज नहीं आ सकती?’ आता जयंतीच्या डोळ्यात अश्रू आले. ती काही वेळ बघत राहिली. खाना खाया? खाना हो गया? आज क्या बनाया? असे कितीतरी मेसेज दिसू लागले. डोळ्यातल्या पाण्यामुळे ते सगळे मेसेज धूसर होत गेले. आता आपण मोठमोठ्याने रडू असं तिला वाटू लागलं. तिनं मानवचा मोबाइल तसाच ठेवला आणि निघून गेली. मानव पाठमोरा असल्यानं त्याच्या लक्षातही आलं नाही. तो प्राध्यापकांशी बोलत राहिला. पाच मिनिटाने त्याने वळून बघितलं, तर जयंती तिथे नव्हती.

त्याला वाटलं वॉशरुममध्ये असेल. तो एकटाच बसून राहिला. मध्येच त्याला फोन आला. आई होती. आईने विचारलं, ‘काय झालं?’ मानव म्हणाला, ‘कुठं काय झालं?’ आईने त्याला सांगितलं की, जयंतीच्या घरून लग्न मोडल्याचा मेसेज आलाय… मानव हादरून गेला. तो म्हणाला, ‘जयंती माझ्यासोबत आहे. ते गंमत करत असतील. थांब, मी तुला फोन करतो..’ मानव काही वेळ वाट बघत राहिला. वॉशरुमकडे गेला. पण तिथं कुणीच नव्हतं. त्यानं जयंतीला फोन केला. पण, तिनं फोन बंद केला होता. आता मानव खूप अस्वस्थ झाला. बाहेर पडला. जयंती कुठं दिसत नव्हती. तो चालू लागला. जयंती आसपास कुठंच नव्हती. त्यानं तिच्या घरी फोन केला. जयंतीच्या आईने अतिशय रागात बोलायला सुरूवात केली. मानवला काहीच कळत नव्हतं. फक्त एवढं लक्षात आलं की, जयंतीने घरी फोन करून सांगितलंय की, मला मानवशी लग्न करायचं नाही. त्याचं कुठल्या तरी मुलीबरोबर अफेअर आहे. मानव हैराण झाला. विचार करत राहिला. जयंतीने प्राध्यापकासोबतच्या गप्पा ऐकल्या असतील का? का प्राध्यापकांनी तिला आधीच सांगितलं? त्यांची तिची आधीची ओळख तर नाही? त्याने काही अंतरावर एका टेबलपाशी कॉफी घेत असलेल्या प्राध्यापकांकडे पाहिलं. ते त्याच्याकडं बघून हसत होते. मानवला मनातून संताप आला. पण, त्यानं आधी जयंतीशी बोलायचं ठरवलं.

जयंतीने खूप विनवण्या केल्यावर मानवशी बोलायचं ठरवलं. ती तिच्या रूममधून बाहेर आली. मानवला शांतपणे म्हणाली, ‘तुझ्या व्हाट्स अॅपमध्ये ‘जेवण झालं का?’ नावाने कुणाचा नंबर सेव्ह केलाय? ती कोण आहे? मी तुमच्या सगळ्या गप्पा वाचल्या..’ एवढा वेळ भयंकर अस्वस्थ असलेला मानव हसू लागला. जयंतीच्या आई-वडिलांना हे अजिबात आवडलं नाही. ते ओरडले. पण, मानवचं हसू काही केल्या थांबत नव्हतं. जयंती आता आणखी भडकली. रडू लागली. मानव कसाबसा स्वतःला सावरत तिला म्हणाला, ‘आधी तिच्याशी बोल..’ मानवने नेहाला फोन लावला. नेहाने फोन उचलला.

‘हॅलो’ म्हणाली. मानव म्हणाला,“तुम्हारी भाभीसे बात करो. उनको बताओ, तुम मुझे खाना खाया क्या, क्यों पूछती हो?’ नेहा बोलू लागली.. ‘भाभी मैं रोज खाना बनाती हूं. मगर रोज खाना बचता है. आप जल्दी आ जाओ. फिर देखते हैं खाना कैसे बचता हैं?’ मानव म्हणाला, ‘तुम क्या करती हो ये तो बताओ?’ नेहा म्हणाली, ‘मैं खाना बनाने का काम करती हूं..’ मानवने बाकी काही बोलून फोन कट केला. जयंतीच्या लक्षात आलं की, आपण किती मूर्खपणा केलाय. स्वतःच्या वेडेपणाचं आता तिला हसू येऊ लागलं. जयंती मानवजवळ बसून त्याला ‘सॉरी’ म्हणाली. आई-बाबा आपल्या कामाला लागले. जयंती पुन्हा मानवला म्हणाली, ‘ते काहीही असलं, तरी माझ्याशिवाय कुणाशीही एवढ्या लाडात बोलायची गरज नाही.’ मानवने हसत हसत तिला जवळ घेतलं. हळूच काहीतरी आठवल्यासारखं जयंती म्हणाली.. ‘जेवण झालं का?’

गोष्ट सांगतो ऐका
अरविंद जगताप

jarvindas30@gmail.com



Source link

रसिक स्पेशल: रोबोट माणसाची ‘स्पेस’ घेईल?

0
रसिक स्पेशल: रोबोट माणसाची ‘स्पेस’ घेईल?


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Robots Will Take The Space Of Humans Pratik Koske 

प्रतिक कोसके14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एखादी भावना माणसाच्या मनात तयार होत असताना नक्की कोणती रासायनिक प्रक्रिया घडते आणि त्या प्रक्रियेचे फलित काय असते, याची माहिती रोबोटना दिली जाऊ शकते. परंतु, त्यांच्याकडून तशा उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, ही ‘एआय’ची मर्यादा आहे.
एखादी दु:खद घटना घडली, तर रोबोटलाही दुःख वाटेल, तो प्रत्यक्ष अश्रू ढाळेल, असे प्रोग्रामिंग त्यात करता येईल. पण, हास्य, आनंद, राग, भीती यांसारख्या उत्स्फूर्त मानवी भावना ‘जशाच्या तशा’ रोबोट व्यक्त करू शकत नाहीत, हे तितकंच खरं.

स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे नुकतीच नऊ मानवसदृश रोबोट्सनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांच्या प्रश्नांना थेट उत्तरं दिली. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या पुढाकारातून ‘AI For Good’ या थीमवर जगभरातील रोबोट्सची कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. हवामान बदल, भूक आणि अन्नधान्य उत्पादन, सामाजिक सुरक्षा यांसारख्या जागतिक समस्या सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence – AI) वापर कसा करता येईल, यावर विचारमंथन करण्यासाठी घेतलेल्या या कॉन्फरन्समध्ये तीन हजार तज्ज्ञांसह ५१ रोबोट सहभागी झाले होते. या कॉन्फरन्सला जोडूनच ही एआय संचालित रोबोट्सची इतिहासातील पहिलीच पत्रकार परिषद झाली. ही परिषद पार पडते न पडते, तोच पुन्हा एकदा मानव आणि रोबोट्स, मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील परस्परसंबंधांची, त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानामुळे भविष्यात येऊ घातलेल्या आव्हानांची चर्चा जगभर सुरू झाली.

मानसिक, सामाजिक परिणामांचे आव्हान :
कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेच्या मर्यादा ओलांडून पुढे जाणार का? रोबोट्स जर मानवी भावना शिकू लागले आणि त्यातून त्यांचा भावनिक बुद्ध्यांकही (Emotional Quotient) विकसित झाला तर काय होईल? माणसातील परस्परसंबंधांवर याचे काय परिणाम होतील, असे एक ना अनेक प्रश्न! एक गोष्ट सर्वप्रथम लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे या प्रश्नांच्या मुळाशी औत्सुक्य आणि भीती या दोन भावना आहेत. भावनांची ‘स्पेस’ काबीज करीत रोबोट मानवाची जागा घेणार का, ही भीती अलीकडे प्रकर्षाने व्यक्त केली जात आहे. एवढेच काय, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा अफाट वेग पाहता, भविष्यात माणसाच्या जोडीदाराची जागा रोबोट घेईल का, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करणारे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू, ब्रिटिश नागरिक डेव्हिड लेव्ही यांनी अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे रोबोट आणि एआयच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाचे मानसिक, सामाजिक परिणाम काय होऊ शकतात, त्याच्याशी माणसाने कसं जुळवून घ्यावं, यावर विचार होणं आवश्यक आहे.

मानवी भावनांचे विकसन अन् हेलकावे :
रोबोट्सनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ज्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं दिली, त्यातून हे दिसून येतं की, माणसाची विचार करण्याची पद्धत, त्यामागच्या भावना, कार्यकारणभाव यांचा अंदाज घेऊन रोबोट प्रश्नांची उत्तरे देत आहेत. भावनिक विकास झालेला रोबो आपण याआधी रजनीकांत यांच्या ‘रोबोट’ या गाजलेल्या चित्रपटात पाहिला आहे. ज्या माणसाने तो ‘चिट्टी’ नावाचा रोबो बनवलेला असतो ,त्याच्याच आयुष्यात हा चिट्टी भावनिक पातळीवर सक्षम झाल्यानंतर कसा धुमाकूळ घालतो, हे या चित्रपटाने प्रभावीपणे दाखवले. ‘एआय’च्या मदतीने असे रोबोट प्रत्यक्षात येऊ शकतात का? या प्रश्नाचं ठाम उत्तर काळच देईल. पण, रोबोटच्या आणि मानवी भावनांच्या विकासाचा तुलनात्मक विचार केला, तर ‘एआय’च्या काही मर्यादा समोर येतात. मुळात मानवी भावना ही कोणत्याही परिस्थितीला दिलेली जैविक प्रतिक्रिया असते. भावनेची ठोस अशी मानववंशशास्त्रीय मुळे असतात. ती आपल्या पूर्वजांच्या जीवनसंघर्षातून, त्यांचे लढे, त्यांचे जय-पराजय, आनंदाचे क्षण, संकटांच्या परिस्थिती या सगळ्यातून तयार झालेली असतात. म्हणूनच मानवी उत्क्रांतीचा आणि मानवाच्या भावनिक विकासाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. शतकानुशतके झालेल्या मेंदूच्या विकासामुळे आणि विचारांच्या गुंतागुंतीमुळे प्रत्येक भावनेचे अचूक कारण सांगणं शक्य नाही, परंतु या सर्व भावना मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत झालेल्या बोधात्मक क्रांतीशी (Cognitive Revolution) संबंधित आहेत. रोबोटच्या विचार केला, तर त्यांना अशा उत्क्रांतीचा कोणताही इतिहास नाही. मानवी मेंदूच्या जवळपास जाणारे रोबोट आपण तयार करण्यात यशस्वी झालो असलो, तरी त्यात संपूर्णपणे मानवी भावभावनांशी साधर्म्य असलेली भावनिक बुद्धिमत्ता विकसित झालेली नाही, ती यामुळेच. रोबोटच्या विकासात ‘एआय’ नावाचे जे तंत्रज्ञान वापरले जाते, त्याला माहिती पुरवण्याचे काम मानवच करत असतो. त्यातून मशीन लर्निंगच्या प्रक्रियेद्वारे रोबोट आपली बुद्धिमत्ता विकसित करतात. एखादी भावना माणसाच्या मनात तयार होत असताना नक्की कोणती रासायनिक प्रक्रिया घडते आणि त्या प्रक्रियेचे फलित काय असते, याची माहिती रोबोटना दिली जाऊ शकते. परंतु, त्यांच्याकडून तशा उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, ही या तंत्रज्ञानाची मर्यादा आहे. एखादी दु:खद घटना घडली, तर रोबोटलाही दुःख वाटेल अशा प्रकारचे प्रोग्रामिंग त्यात करता येईल. तो प्रत्यक्ष अश्रू ढाळेल, अशी सोयही उपलब्ध करून दिली जाऊ शकते. पण, हास्य, आनंद, राग, भीती यांसारख्या उत्स्फूर्त मानवी भावना ‘जशाच्या तशा’ रोबोट व्यक्त करू शकत नाहीत, हे तितकंच खरं.

रोबोटचा विधायक वापर महत्त्वाचा :
या मर्यादांच्या कक्षेत रोबोटचा आजवर झालेला विकासही मानवासाठी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरतोय, हे नाकारता येणार नाही. मानवाच्या मनात नैसर्गिकपणे भावना येत असतात. त्यामुळे यंत्रमानवाला आपले सहकारी म्हणून निवडायचे झाल्यास त्यांच्यात आणि आपल्यात काही साम्य असावे, अशी आपली अपेक्षा असणार. मानवी रोबो म्हणजे मानवाप्रमाणे दिसणारे, हालचाल करू शकणारे, निर्णय घेण्याची क्षमता असलेले रोबो! अशा रोबोमध्ये असलेल्या सेन्सर्सच्या आधारे त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेता येतो, तर अॅक्चुएटर्सच्या साह्याने ते हालचाली करू शकतात. असे रोबो आणीबाणीच्या प्रसंगांत मानवासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. ते शाळेतील विद्यार्थ्यांशी छान संवाद साधू शकतात. हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि विशेष मुलांशीही संवाद साधू शकतात. आरोग्यसेवेसाठी विकसित केलेले मानवी रोबो डॉक्टर आणि रुग्णांना उपचारादरम्यान मदत करत आहेत. फक्त आरोग्यच नव्हे, तर मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात रोबोटचा, एआय तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर करता येऊ शकतो. किंबहुना त्याची सुरूवात केव्हाच झाली आहे.

मतमतांतरे अन् अनिश्चितता :
या विधायकतेला दुसरी एक बाजू आहे, तीही दुर्लक्षून चालणार नाही. हिरोशिमा आणि नागासाकीचा विद्ध्वंस पाहिल्यावर अणुबॉम्ब बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने, आपण हा शोधच लावला नसता तर किती बरे झाले असते, असे उद्गार काढले होते. यंत्रमानवाला मानवी बुद्धिमत्ता दिली गेली, तर ते आपल्याला अपेक्षित कामे करतीलच, शिवाय आपल्याला नको असलेली कामेही करू शकतील, हे स्पष्ट आहे. म्हणूनच ‘एआय’बाबत सध्या चालू असलेलं संशोधन रोखलं पाहिजे, असे ठामपणे सांगणारा संशोधकांचा एक गट आहे. तर, मानवी बुद्धीची झेप म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, त्याचा मानवी जीवनाला कसलाच धोका नाही, असे सांगणारा दुसरा गट आहे. अर्थात त्यातून पुढे नेमके काय होईल, याविषयी आज तरी कोणीही छातीठोकपणे भाकीत करू शकत नाही.
सध्या स्मार्टफोन, संगणक या साधनांमुळे व्यक्तींमधील संबंधांत दुरावा वाढला आहे. अशा यंत्रमानवांमुळे तो आणखी वाढेल. मानवी मेंदूची प्रचंड सर्जनशीलता आणि तर्क बांधण्याची क्षमताही इथे थिटी पडते आहे. त्यामुळे भविष्याच्या पोटातील हे ज्ञान अद्याप मानवी बुद्धिमत्तेसाठी अगम्यच आहे. तंत्रज्ञान विकासाच्या अव्याहतपणे सुरू असलेल्या या प्रक्रियेत जे आपल्यासमोर येतंय त्यावर डोळसपणे विचार करून, त्याच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करून ते स्वीकारणे आणि त्याचा वापर करताना सजग राहणे हा सध्या तरी तंत्रज्ञानाच्या वापरातील धोके टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. हा मार्ग प्रत्येकाने अवलंबल्यास आपण झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर मानवाच्या भल्यासाठी करू शकू.

प्रतिक कोसके
pratikkoske@gmail.com



Source link

रसिक स्पेशल: समान नागरी कायदा आणि राजकारण

0
रसिक स्पेशल: समान नागरी कायदा आणि राजकारण


डॉ. प्रकाश पवार17 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

समान नागरी कायद्याचा मुद्दा केवळ घटनात्मक तत्त्वांशी संबंधित राहिलेला नाही, तर तो राजकारणकेंद्रित झाला आहे. प्रत्यक्षात हा कायदा कसा असेल, तो कुणावर, काय परिणाम घडवेल आणि तो नेमका कधी येईल, याबाबत अनिश्चितता असली, तरी या मुद्द्यामुळे राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. येत्या काळात निवडणुकीच्या राजकारणालाही हा मुद्दा इंधन देणार, हे स्पष्ट दिसत असल्यानेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षही त्याबाबतीत ‘सक्रिय’ झाले आहेत.

सध्या ‘समान नागरी कायद्या’चा (यूसीसी) मुद्दा राजकीय संघर्षाच्या मैदानात वेगवेगळ्या भूमिका घेऊन उतरल्याचे दिसत आहे. एकीकडे या कायद्याच्या राजकारणाची व्याप्ती हिंदुत्ववादी पक्ष, संघटना, विचार, मध्यमवर्गाने वाढवत आहेत, तर दुसरीकडे आदिवासींचा विरोध, बहुलतावादी विचारांचा विरोधही सातत्याने वाढत चालला आहे. सहमती आणि संघर्ष अशा दोन्ही गोष्टींना समान नागरी कायद्याने जन्म दिला आहे. विशेषतः या कायद्याच्या प्रश्नावरून मध्यमवर्ग विरोधी आदिवासी असे चित्र निर्माण होऊ लागल्याने राजकीय पेचप्रसंगही वाढत चालला आहे. थोडक्यात, समान नागरी कायद्यासंदर्भात आपल्या राजकारणाची स्थिती ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी झाली आहे. ही द्विधा अवस्था तात्त्विक राजकारणाच्या संदर्भातही झाली आहे.

घटनात्मक तत्त्व आणि राजकारण
भारतीय राजकारणात घटनात्मक तत्त्व आणि राजकारण असा एक पेचप्रसंग समान नागरी कायद्यामुळे उभा राहिला आहे. भारतीय संविधानाने समान नागरी कायदा हा समता, न्याय, बंधुभावाच्या उद्देशाने करावा, अशी भूमिका मांडली होती. परंतु, हा तात्त्विक विचार बाजूला पडत आहे. त्या जागी सत्तासंघर्ष आणि सत्तास्पर्धेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. म्हणजेच, समान नागरी कायद्यातून मूल्यांचे राजकारण होईल, ही आशा सोडून द्यावी लागण्याची चिन्हे आहेत. हा कायदा राजकीय पक्षांसाठी संघटन करेल, असा मुद्दा पुढे आणला गेला. अशाच पद्धतीच्या काही उलटसुलट घडामोडी या कायद्याच्या बाबतीत घडत आहेत. घटनात्मक तत्त्वाचे राजकारण हा मुद्दा एकूणच मध्यमवर्गाने बाजूला ठेवला आहे. या प्रक्रियेमधून समान नागरी कायद्याच्या संदर्भातील सत्तास्पर्धा आणि पेचप्रसंग हा नवाच मुद्दा निर्माण झाला आहे. समान नागरी कायदा हा मध्यमवर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मध्यमवर्ग या कायद्याच्या अवतीभवती त्यांची राजकीय मते निश्चित करतो. भारतात सध्या मध्यमवर्गाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे हा वर्गच राजकीय पक्षांचा मतदार मानला जातो. विशेषतः गेल्या दहा वर्षात मध्यमवर्ग हा भाजपचा हक्काचा मतदार झाला आहे. मध्यमवर्ग आणि भारतातील मुस्लिम वर्ग यांच्यामध्ये एक प्रकारचा राजकीय संघर्ष आहे. मध्यमवर्गाला आकर्षित करण्यासाठी समान नागरी कायद्याचा मुद्दा चर्चाविश्वात अनेक दिवस होता. आता मध्यमवर्ग आणि मुस्लिम वर्ग या संरचनात्मक वादामुळे हा राजकीय अवकाश निर्माण झाला आहे.

मध्यमवर्ग आणि आदिवासी
एका बाजूला मध्यमवर्ग आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी अशी समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर वादाची संरचना उदयास आली आहे. कारण ईशान्य भारतातील तीन राज्यांत आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे. या तीन राज्यांसह देशभरात १५ कोटी आदिवासी आहेत. त्यांचा समान नागरी कायद्याला विरोध आहे. म्हणजेच मध्यमवर्गाला किंवा हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारांना हा कायदा महत्त्वाचा वाटतो, तर आदिवासी समूहाला तो त्यांचे अस्तित्व नष्ट करणारा वाटतो. या कायद्याच्या मुद्द्यावर आदिवासी आणि मध्यमवर्ग यांच्यामध्ये एकमत निर्माण करण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपने जाेरदार प्रयत्न सुरू केले आहेत. समान नागरी कायद्यामुळे आदिवासींच्या मुख्य सामाजिक आणि आर्थिक अशा दोन गोष्टींवर दूरगामी परिणाम होतील, अशी चर्चा भारतीय राजकारणात ऐरणीवर आली आहे. हे दोन्ही मुद्दे संघटना आणि नागरी समाजातील बुद्धिजीवी वर्ग मांडत आहे. एक, आदिवासींवर पहिला परिणाम सामाजिक होईल. समान नागरी कायद्यामुळे आदिवासींच्या प्रथा, परंपरा, चालीरीती, संस्कृती धोक्यात येण्याची शक्यता आहे, अशी भीती देशातील जवळपास तीस आदिवासी संघटनांनी व्यक्त केली आहे. दोन, आदिवासींवर दुसरा परिणाम आर्थिक स्वरूपाचा होईल. या संदर्भातील उदाहरणे छोटा नागपूर आणि संथाळ परगण्याच्या बाबतीत नोंदवली गेली आहेत. उदाहरणार्थ, छोटा नागपूर भाडेकरू कायदा आणि संथाळ परगणा भाडेकरार कायद्यावर समान नागरी कायद्याचा विपरीत परिणाम होईल, असे या तीस संघटनांना वाटते.

आदिवासींच्या जमिनींचे रक्षण करण्यासाठी हे दोन कायदे अतिशय महत्त्वाचे आहेत, असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्यामुळे एका बाजूला देशातील मध्यमवर्ग आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी वर्ग अशा प्रकारचा राजकीय संघर्ष उभा राहतो आहे. त्यातूनच प्रस्तावित समान नागरी कायद्याला गंभीरपणे विरोध केला जात आहे. आदिवासी बहुल मेघालय, नागालँड, मिझोराम ही राज्ये समान नागरी कायद्याला उघडपणे विरोध करीत आहेत. मिझोरामच्या विधानसभेने या कायद्याच्या विरोधातील प्रस्ताव मंजूर केला आहे. या कायद्यामुळे देशाचे विघटन होईल, अशी प्रतिक्रिया मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी दिली होती. ‘एनडीए’ची सत्ता असलेल्या राज्यांमधून समान नागरी कायद्याच्या विरोधात येणाऱ्या प्रतिक्रियांची गंभीर दखल मोदी सरकारने घेतली आहे. आदिवासींना समान नागरी कायदा लागू करण्यात येऊ नये, अशी भूमिका मांडत संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष सुशील मोदी यांनी विरोधकांचा राग कमी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आठ महिने आधीच या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मोदी सरकार काहीसे अडचणीत आले. आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या कारवाईस चौहान यांनी विरोध केला होता. थोडक्यात, मध्यमवर्ग आणि आदिवासी यांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत. मध्यमवर्गाचे हितसंबंध जपले, तर आदिवासी विरोधात जातात. आदिवासींचे हितसंबंध जपले, तर मध्यमवर्ग विरोधात जातो, अशी परिस्थिती सध्या भाजपच्या पुढे उभे राहिली आहे.

‘मध्यम’मार्गाची कसरत
मध्यमवर्ग आणि मुस्लिम, मध्यमवर्ग आणि आदिवासी अशा प्रकारचा राजकीय अवकाश भाजपने निर्माण केला आहे. भाजप या दोन पैकी मध्यमवर्ग आणि आदिवासी यांच्यातील वाद मिटवण्याची राजकीय प्रक्रिया सध्या राबवत आहे. म्हणजेच, आदिवासी समूहाला समान नागरी कायद्यापासून बाजूला ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न चालू आहेत. ईशान्य भारतातच नव्हे, तर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र अशा राज्यांमध्येही आदिवासी समूह राजकीयदृष्ट्या प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण आणि समान नागरी कायदा यांच्या संदर्भात भाजप नव्याने पुनर्विचार करत आहे. भाजपला मध्यमवर्ग आणि आदिवासी यांच्यामध्ये समझोता घडवून आणत मधला मार्ग काढायचा आहे. ही प्रक्रिया भारतीय राजकारणातील आंतर विसंगतीने भरलेली आहे. आणि हेच आजच्या भारतीय राजकारणाचे एक वैशिष्ट्य आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये पक्षीय पातळीवर राजकीय संघर्ष घडत आहे. आदिवासींचा पाठिंबा काँग्रेस पक्षाकडे सरकण्याची प्रक्रिया यातून घडू शकते. तसेच काँग्रेस आणि आदिवासी बहुल राज्यांतील प्रादेशिक पक्ष यांच्यातही आघाडी होण्यासाठी वातावरण तयार होत आहे.

एकूणच, समान नागरी कायद्याचा मुद्दा आरंभी नोंदवल्याप्रमाणे केवळ घटनात्मक तत्त्वांशी संबंधित राहिलेला नाही. तो राजकारणकेंद्रित झाला आहे. प्रत्यक्षात हा कायदा कसा असेल, तो कुणावर, काय परिणाम घडवेल आणि तो नेमका कधी येईल, याबाबत सध्या अनिश्चितता असली, तरी या मुद्द्यामुळे राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. येत्या काळात निवडणुकीच्या राजकारणालाही हा मुद्दा इंधन देणार, हे स्पष्ट दिसत असल्यानेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षही त्याबाबतीत ‘सक्रिय’ झाले आहेत.

डॉ. प्रकाश पवार
prpawar90@gmail.com
संपर्क : ७७७४८६०४९५



Source link

Erandol Jalgaon : वादग्रस्त धार्मिक स्थळावर प्रवेशबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय वादात

0
Erandol Jalgaon : वादग्रस्त धार्मिक स्थळावर प्रवेशबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय वादात



Erandol News Marathi : एरंडोलमधील धार्मिक स्थळावर प्रवेशबंदीचे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी काढले आहे. त्यानंतर आता हे प्रकरण हायकोर्टापर्यंत पोहचलं आहे.



Source link

पुढील चार दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

0
पुढील चार दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा


Maharashtra Rain : राज्यात तुरळक ठिकाणीच पाऊस (Rain) पडत आहे. राज्यातील बहुतांश भागात  पाऊस (Rain) नसल्या,नं बळीराजा चिंतेत आहे. पावसाळा सुरु होऊन दीड महिना झालं तरी समाधनाकारक पाऊस पडला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत असून, अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, तिथं दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे. दरम्यान, राज्यातील मुंबईसह उपनगर, ठाणे परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर पाळगर, परभणी या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावलीय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, येत्या 4 दिवसात म्हणजे 16 ते 19 जुलै दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

हवामान विभागाचा अंदाज 

राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान आजपासून चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भाच्या काही भागातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

परभणीत जोरदार पाऊस

अनेक दिवसांच्या खंडानंतर परभणी शहरात जवळपास एक तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं शहरातील वसमत रस्ता शिवाजी चौक गांधी पार्क आदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. अनेक दिवसानंतर झालेल्या या जोरदार पावसामुळं परभणीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात मात्र हा पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भाग कोरडा ठेवून शहरात हा पाऊस झाला आहे. त्यामुळं अजूनही जिल्ह्याला सर्वदूर पावसाची आवश्यकता आहे.

पालघर जिल्ह्यात भात लावणीच्या कामाला वेग

पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चांगला पाऊस होत आहे. त्यामुळं जिल्ह्यातील भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात 75 हजार हेक्टरवरती भात शेती केली जाते. सध्या हळव्या भात लावण्या सुरू असून त्या 50 टक्के पूर्ण झाल्या आहेत. तर गरव्या भाताच्या लावण्याही शेतकऱ्यांनी सुरू केल्या आहेत. 

शेतकरी चिंतेत

यावर्षी जुलै महिना अर्धा संपला  पाहिजे  असा पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतेत सापडलेला आहे. कारण पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीच्या फक्त पंधरा ते सोळा टक्के इतकाच पाऊस झाल्याने शेतातील पिके संकटात सापडली आहेत. पाण्याअभावी उभी पिके सुकत आहे तर ही पिके वाचवण्यासाठी बळीराजा स्पिंकलरच्या साह्याने या पिकांना पाणी देत आहे. अपेक्षीत असा पाऊस न झाल्याने पिकांची वाढसुद्धा खुंटली आहे. तर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 60 टक्के इतक्याच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा संकट ओढवले आहे.  यंदा पाऊस नसल्याने मराठवाड्यात अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुर्ण जुन महिना गेला. जुलै अर्धा लोटला तरी पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळं मराठवाड्यात तब्बल 44 टक्के पेरण्या बाकी आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्या देखील पावसाअभावी हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : कधी पडणार पाऊस? बळीराजाचे डोळे आभाळाकडे, मराठवाड्यात तब्बल 44  टक्के पेरण्या बाकी



Source link

अभिमानास्पद! चंद्रयान ३ मध्ये सांगलीचाही खारीचा वाटा.. ‘या’ कंपनीत पार पडलं रॉकेटच्या कोटिंगचं काम

0
अभिमानास्पद! चंद्रयान ३ मध्ये सांगलीचाही खारीचा वाटा.. ‘या’ कंपनीत पार पडलं रॉकेटच्या कोटिंगचं काम


Chandrayan 3 : श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून शुक्रवारी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या दिशेनं यशस्वीपणे झेपावलं. विशेष म्हणजे ह्या GSLV MK III रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम  सांगलीत करण्यात आले आहे.



Source link