Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2927

Allu Arjun: अल्लू अर्जुनची चिमुकली लेकही चित्रपटात झळकणार! ‘या’ साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार

0
Allu Arjun: अल्लू अर्जुनची चिमुकली लेकही चित्रपटात झळकणार! ‘या’ साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार


‘देवरा’चे शूटिंग सुरू झाल्यापासून ज्युनियर एनटीआरचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. ‘देवरा’ हा ज्युनियर एनटीआरच्या करिअरमधील ३०वा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर दिग्दर्शक कोरटाला शिवासोबत काम करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्हा या चित्रपटात झळकणार आहे.



Source link

Maharashtra Assembly Monsoon Session : विधानभवनात कॉंग्रेस आमदारांची थोड्याच वेळात बैठक : ABP Majha

0
Maharashtra Assembly Monsoon Session :  विधानभवनात कॉंग्रेस आमदारांची थोड्याच वेळात बैठक : ABP Majha



<p>दरम्यान 9.30 वाजता होणाऱ्या बैठकीत विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात निर्णय होईल अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीये&nbsp;</p>



Source link

सातारा : मारहाणीतील युवकाच्या मृतदेहासह रुग्णवाहिका पोलिस मुख्यालयासमोर | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पांगारे, ता. सातारा येथील राहुल शिवाजी पवार (वय 30) या तरुणाचा मृतदेह ग्रामस्थांनी रविवारी दुपारी 1 वाजता रुग्णवाहिकेसह पोलिस मुख्यालयासमोर आणला. त्यामुळे मुख्यालयासमोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पसार असलेल्या संशयितांना अटक करून त्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणी करत ग्रामस्थांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी संशयितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ठेवलेली रुग्णवाहिका ग्रामस्थांनी पांगारेकडे नेली.

सातारा तालुक्यामध्ये परळी खोर्‍यात पांगारे आणि राजापुरी ही दोन गावे शेजारी-शेजारी आहेत. 5 मे रोजी एका अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीवरून वाद झाला होता. यातूनच राजापुरीमधील 30 हून अधिक तरूण काठ्या, लोखंडी रॉड घेऊन मध्यरात्री पांगारेत पोहोचले. त्यांनी राहुल पवार आणि नयन पवार यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. राहुलला घराबाहेर बोलावून संशयितांनी जबर मारहाण केली होती. यामध्ये राहुल गंभीर जखमी झाल्याने त्याला पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यातील सर्व संशयितांना पोलिसांनी अटक न केल्याने पांगारेचे ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

शनिवारी राहुलचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी सकाळी त्याचा मृतदेह पोलिस मुख्यालयासमोर आणण्यात आला. यावेळी पांगारेतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी ग्रामस्थांनी राहुलवर हल्ला करणार्‍यांमध्ये पोलिस व राजकारण्यांची मुले आहेत. त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करावे तसेच सर्व संशयितांना अटक करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तो बंदोबस्त पोलिसांनी केला होता.

ग्रामस्थांच्या या जमावाला सातार्‍याचे पोनि हेमंतकुमार शहा व शाहूपुरीचे पोनि धनंजय फडतरे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव आक्रमक होत संशयितांना अटक झाल्याशिवाय इथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. संयमाने अधिकार्‍यांनी जमावाला कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. या प्रकरणात जी नावे येतील त्यातील कोणाचीही गय केली जाणार नाही. संशयितांच्या शोधासाठी 4 पथके रवाना केली आहे. संशयितांना अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच ग्रामस्थांनी रूग्णवाहिका पांगारेकडे नेली.











Source link

सातारा : वाईत पर्यटकांच्या बसवर दगडफेक; तीन जखमी | पुढारी

0









वाई; पुढारी वृत्तसेवा : वाई शहरात महागणपतीच्या दर्शनाला आलेले पर्यटक व स्थानिक यांच्यात पार्किंगवरून वाद झाला. त्यातून परिसरातील काही युवकांनी बसवर दगडफेक केली. त्यामुळे महागणपती पुलावर नाना-नानी पार्कजवळ रस्त्यावर बसच्या काचांचा खच पडला होता. या दगडफेकीमध्ये तीन पर्यटक जखमी झाले.

पालघर तालुक्यातील एडवन गावातील ग्रामस्थ आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन मांढरदेव येथे दर्शनासाठी निघाले होते. यावेळी वाईत महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी ते थांबले. यावेळी बसचा चालक गणपती पुलाजवळ बस पार्क करत असतानाच तेथे झोपडपट्टीतील मुलांबरोबर बस लावण्याच्या जागेवरून किरकोळ बचाबाची झाली. त्याचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. या हाणामारीची माहिती जवळच असलेल्या झोपडपट्टीत समजल्यानंतर अनेक तरुण, महिलाही गणपती पुलावर पोहोचल्या. जमावाने बसवर हल्ला चढवला. यात बसच्या काचा फुटल्या. त्यामध्ये जितेंद्र प्रभाकर तरे (वय 40), मोहन हरिचंद्र तरे (वय 62), प्रतीक दिलीप तरे (वय 21) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वाई पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. काही महिलाही किरकोळ जखमी झाल्या आहेत.

सपोनि आशिष कांबळे, उपनिरिक्षक सुधीर वाळुंज, श्रावण राठोड, प्रेमजीत शिर्के, उमेश गहीण व इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबतची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.











Source link

सातारा : ठोसेघर, सज्जनगड, केळवली हाऊसफुल! | पुढारी

0


परळी; पुढारी वृत्तसेवा :  विकेंड अन् आखाडीची सांगता यामुळे रविवारी सातार्‍याच्या पश्चिमेला पर्यटकांची मांदियाळी झाली. ठोसेघर धबधबा, केळवली धबधबा, सज्जनगडावर वाहनांच्या रांगा लागल्या. ठोसेघर धबधब्यावरील पायरी मार्गावर पर्यटकांची गर्दी झाली होती.
रिमझिम पाऊस, हिरवेगार डोंगर अन् त्यातून फेसाळणारे धबधबे असं अल्हाददायक वातावरण ठोसेघर परिसरात निर्माण झाले आहेत. सातार्‍याच्या पश्चिमेला म्हणजेच ठोसेघर, चाळकेवाडी, सज्जनगड, केळवली, भांबवली आणि कास पठार या हिरव्यागार डोंगररांगात रविवारी दिवसभर मान्सून पर्यटकांचा जणू पाऊस वाहत होता.

ठोसेघर, सज्जनगड परिसरात वाहनांच्या दोन-दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. सध्या मान्सून पर्यटन बहरले आहे. त्यातच शनिवार रविवारची सुट्टी आणि आखाडीची सांगता यामुळे पर्यटनासाठी सहकुटुंब तसेच मित्र परिवारांसह अनेकजण या परिसरात दाखल झाले होते. बाईक रॅली आणि चार चाकी गाड्यांची जणू रॅली निघाल्याप्रमाणे वातावरण होते.

 

The post सातारा : ठोसेघर, सज्जनगड, केळवली हाऊसफुल! appeared first on पुढारी.



Source link

टीका करणार्‍यांनी आत्मपरीक्षण करावे : खा. उदयनराजे | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  एखाद्या माणसाने केलेल्या विकासकामांवरून त्याची राजकीय उंची ठरवली जाते. गेल्या तीन दशकाच्या राजकारणात सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासकामे केली. उदयनराजे केवळ तोंडाच्या वाफा सोडणारा माणूस नाही. जे विकास कामांवर टीका करतात त्यांनी आपण स्वतः काय केले याचे आत्मपरीक्षण करावे, अशी टिका खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रराजे यांच्यावर केली.

सातारा विकास आघाडी सुसंवाद अभियानांतर्गत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, किशोर शिंदे, निशांत पाटील, वसंत लेवे, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, संग्राम बर्गे, संजय पाटील, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, अनिता घोरपडे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खा. उदयनराजे म्हणाले, एखादा जो कोणी पदावर बसतो आणि कामे करत नाही त्याची त्या पदावर बसण्याची लायकी नसते. उदयनराजे मात्र विकास कामे करताना तोंडाच्या वाफा सोडत नाही . एखाद्याची पत ही त्याने केलेल्या विकास कामावरून ठरवली जाते. वीस वर्षांपूर्वी सातार्‍यात आलो तेव्हा मूलभूत सुविधांची प्रचंड अडचण होती मात्र आज सातारा विविध विकासकामांनी युक्त आहे. जे नावे ठेवतात त्यांनी ती जरूर ठेवावी. मात्र, स्वतःला अगोदर विचारावे आपण काय काम केलं. उगाच नुसतं हे केलं ते केलं असं सांगण्यापेक्षा मूलभूत विकास कामे आपण त्यावेळी का केली नाही ? याची उत्तरे द्यावी, असा टोलाही उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना लगावला.

खा. उदयनराजे पुढे म्हणाले, सातारा एमआयडीसीची स्थापना होऊन इतकी वर्ष झाली त्याचा विकास का झाला नाही? छत्रपती शाहू स्टेडियम सातार्‍यात असतानाही येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने भरू शकत नाही, ही शोकांतिका आहे. सातार्‍याला उन्नत दर्जा देण्याकरता मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मी कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी युवा उद्योजक संग्राम बर्गे यांनी विलासपूर सारख्या भागात साडे पाच कोटींची विकासकामे मंजूर केली आहे. आम्ही सर्व उदयनराजेंच्या पाठिशी आहोत, असे सांगितले. दरम्यान, या मेळाव्यात जलमंदिर येथे सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी मांडल्या. त्यावर याबाबत स्पष्टपणे सूचना करावी त्या पध्दतीची व्यवस्था करायला सांगतो. उगाच बिनबुडाचे आरोप करू नका त्याला काहीतरी बेस ठेवा, अशी कानउघडणी उदयनराजेंनी केली.



Source link

सातारा : बाटेवाडी, मसुगडेवाडी भूस्खलनाच्या छायेतच | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांपूर्वी पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, कामरगाव यासह काही गावांमधील घरांवर दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. अशीच भयावह परिस्थिती चाफळ खोर्‍यातील बाटेवाडी, मसुगडेवाडीत पहावयास मिळते. या गावचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचा शेरा भूवैज्ञानिकांकडून यापूर्वीच देण्यात आला आहे. मात्र पुनर्वसनाबाबत ठोस कार्यवाही न झाल्याने आजही जीव मुठीत धरूनच भूस्खलनाच्या छायेतच येथील ग्रामस्थांना धोकादायक घरांमध्ये राहावे लागत आहे.

चाफळच्या पश्चिमेस केळोली गावालगतच्या डोंगर कपारीत दुर्गम अशा ठिकाणी वसलेलं बाटेवाडी हे छोटसं गाव आहे. सुमारे तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्येचे हे गाव. तसेच पाडळोशीनजीक असलेल्या मसुगडेवाडी येथे अतिवृष्टीमुळे दोन वर्षापूर्वी डोंगर खचला होता. दोन वर्षापूर्वी मसुगडेवाडी येथे व बाटेवाडी येथील दोन घरे तीन ते चार फूट सरकली होती. दरवर्षी पावसाळा आला की येथील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन आपले जीवन जगत आहेत. मोठा पाऊस झाला की घरात पाणी घुसणे नित्याचेच झाले आहे. शासनाच्या भूजल विभाग तसेच भू वैज्ञानिक विभागाने या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, असा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतर गेल्या दहा ते अकरा वषार्ंत अनेक वेळा प्रस्ताव देऊनही या गावांचे आजपर्यंत पुनर्वसन होऊ शकले नाही, ही एक शोकांतिकाच आहे.

मागील वर्षीच्या पावसातही या गावाशेजारी दरड कोसळली होती. यावेळी प्रशासनाने तात्पुरते निवारा शेड उभारण्यास निधी मंजूर केला. या निवारा शेडसाठी जागा मोजून काही ठिकाणी पायी भरणी झाली आहे. तर काही ठिकाणी थोड्या प्रमाणावर कामही झाले आहे. मात्र, सर्व निवारा शेडचे काम पूर्ण होऊच शकले नाही.

मागील वर्षी पाडळोशीनजीक डोंगराचा काही भाग कोसळून सुमारे दहा शेतकर्‍यांच्या भात शेतीचे तसेच आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. भैरेवाडी येथे देखील दहा ते बारा किलोमीटर जमीन खचल्याने काही घरांना धोका निर्माण झाल्याने घरातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. बाटेवाडी व विरेवाडी येथे देखील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. तर डोंगराचा काही भाग कोसळून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावेळी ग्रामस्थांना लहान मुलांना घेऊन भीतीच्या छायेखाली भर पावसात रात्र रात्र जागून काढली होती. आता या वर्षीच्या पावसाला नुकतीच सुरुवात झाली असून यापूर्वीच्या भयावह आठवणींमुळे ग्रामस्थ दहशतीखालीच जीवन जगत आहेत.

पावसाळ्यात घ्यावा लागतो पाहुण्यांकडे आसरा…

दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेत बाटेवाडीतील लोक पाहुण्यांकडे वास्तव्यास निघून गेले होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत निवारा शेडसाठी निधी मंजूर करून आणला होता. त्यानुसार बाटेेवाडी, मसुगडेवाडी, भैरेवाडी या गावांसाठी निवारा शेड बांधण्यात आली आहेत. मात्र सध्या या निवारा शेडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.











Source link

सातारा : कस्तुरी क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त जल्लोष | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा :  हाऊसफुल्ल हॉल आणि जल्लोषाचा माहौल, जयदीप आणि गौरी सोबत धमाल आणि डान्स अशा उत्साही वातावरणात दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबचा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा झाला. यावेळी कस्तुरी क्लब सभासदांनी आणि त्यांच्या मुलांनी कला कौशल्य दाखवत वेगवेगळी नृत्ये सादर केली. तसेच महिलांनी विविध गेम शोमध्ये भाग घेत बक्षिसे पटकावली. यावेळी झालेल्या गेम शोमध्ये भारती जमदाडे यांचा प्रथम तर श्रद्धा शहा आणि निशा जाधव यांचा द्वितीय आणि तृतीय क्रमांक आला.

या कार्यक्रमाच्या वेळी सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांनी महिलांना विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेत धमाल केली. त्यांच्याशी गप्पा मारत असताना महिलांनी देखील त्यांना विविध मिश्कील प्रश्न विचारले आणि तेवढीच मिश्कील उत्तरे जयदीप आणि गौरी यांनी दिली.

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब सभासद असलेल्या प्रज्ञा मराठे यांनी सर्व मालिकांची नावे एका कवितेत गुंफून ती कविता जयदीप आणि गौरी यांना ऐकवली. कार्यक्रमाला महिलांनी तुफान गर्दी केली होती. कार्यक्रमात डी ट्रेजर डान्स ग्रुप कराड यांच्या सहभागाने नावीन्यपूर्ण डान्सचे प्रकार पाहता आले. निवेदक अजीम कागदी यांच्या खुमासदार निवेदनाने रंगत आणली. प्रथम येणार्‍या तीनशे महिलांना तनिष फॉर्मिंग ज्वेलरी यांच्याकडून हमखास गिफ्ट कूपन देण्यात आले. हे कुपन सर्वच 300 महिलांनी तनिष फॉर्मिंग ज्वेलरीच्या दुकानात जाऊन हमखास गिफ्ट घेतले.

कार्यक्रमात कलागुणांचे दर्शन घडवणार्‍या सर्व पुढारी कस्तुरी क्लब महिला आणि त्यांच्या मुलांचा पुढारी कस्तुरी क्लब तर्फे गौरव करण्यात आला. त्याचबरोबर माहेर फॉर्मिंग ज्वेलरी यांच्याकडून वनग्राम ज्वेलरीमधील एक गंठण, ठुशी, कर्णफुले आणि अंगठी हे सर्व दागिने असलेले दोन सेट लकी ड्रॉ मधून नाव आलेल्या महिलांना देण्यात आले.

‘कस्तुरी क्लब’च्या नोंदणीसाठी उत्साह

यावेळी पुढारी कस्तुरी क्लब मेंबर नसलेल्या महिला देखील कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमामधील धमाल मस्ती पाहून आम्हाला देखील पुढारी कस्तुरी क्लबचे सभासद व्हायचे आहे, असे म्हणत अनेक महिलांनी नवीन वर्षाच्या सभासद नोंदणीबद्दल चौकशी केली व आम्ही नक्की पुढारी कस्तुरी क्लबचा भाग होऊ, असे सांगितले.











Source link

Vicky Kaushal: भर समुद्रात विकी कौशल झाला रोमँटिक; कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाला…

0
Vicky Kaushal: भर समुद्रात विकी कौशल झाला रोमँटिक; कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाला…


बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भूमी पेडणेकर, झोया अख्तर आणि सनी कौशल यांनी पोस्टवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत. या पोस्टवर एका चाहत्याने लिहिले, ‘हॅपी बर्थडे क्वीन कतरिना!’ तर, आणखी एकाने लिहिले की, ‘हॅपी बर्थडे सेलिब्रिटी सुपरस्टार. तुझं व्यक्तिमत्व आणि अभिनय कौशल्यं आम्हाला खूप आवडतं.



Source link

Akash Choudhary: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकने दिली जोरदार धडक

0
Akash Choudhary: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकने दिली जोरदार धडक


मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘भाग्यलक्ष्मी’ फेम अभिनेत्याशी माध्यमांनी नुकताच संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अभिनेत्याने या भीषण अपघाताविषयी सांगितले. आकाश म्हणाला की, ‘ट्रक माझ्या गाडीवर कधी आदळला, ते मला कळलेच नाही. या अपघातात मला दुखापत झाली नाही. पण, या अपघाताने आम्हाला हादरवून सोडले आहे. माझी झोप अक्षरशः उडाली आहे. अपघातानंतर मी सुट्टीवर होतो. पण रात्री अजिबात झोप येत नव्हती. रात्रभर मी त्या अपघाताचा विचार करत राहिलो. या अपघातात मला काही झालं असतं तर.. हाच विचार सतत माझ्या मनात येतोय.’



Source link