Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2928

Vijay Sethupathi: साऊथ स्टार विजय सेतुपतीनं का स्वीकारला शाहरुख खानचा ‘जवान’? कारण ऐकाच…

0
Vijay Sethupathi: साऊथ स्टार विजय सेतुपतीनं का स्वीकारला शाहरुख खानचा ‘जवान’? कारण ऐकाच…


‘जवान’ या चित्रपटात अभिनेता विजय सेतुपती महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. त्याने या चित्रपटात काम करण्यास का होकार दिला, या मागचे कारण नेमके काय होते याचा खुलासा विजयने नुकत्याच एका मुलाखतीत केला आहे. या चित्रपटात काम करण्यामागे शाहरुख खानही कारणीभूत असल्याचे त्याने म्हटले आहे. केवळ शाहरुख खान या चित्रपटात काम करत असल्यामुळेच आपण हा चित्रपट लगेच स्वीकारला, असे विजय सेतुपतीने म्हटले आहे.



Source link

Zarina Wahab Birthday: सावळ्या रंगामुळे जरीना वहाबला बॉलिवूडमध्ये काम मिळणे झाले होते कठीण! वाचा..

0
Zarina Wahab Birthday: सावळ्या रंगामुळे जरीना वहाबला बॉलिवूडमध्ये काम मिळणे झाले होते कठीण! वाचा..


जरीना वहाबचा जन्म १७ जुलै १९५९ रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झाला. केवळ हिंदीच नव्हे, तर जरीना वहाबने इंग्रजी, उर्दू आणि तेलुगूसह अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जरीना वहाबने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथून चित्रपटाचे आणि अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. मात्र, या अभ्यासानंतरही इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला होता. जरीना वहाब बॉलिवूडमध्ये खूप संघर्ष करत होती. आत्र, केवळ सावळ्या रंगामुळे तिला सतत नकार ऐकून घ्यावा लागत होता.



Source link

UP Politics : गुंड मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास एनडीएमध्ये दाखल! हेटस्पीच प्रकरणी कासगंज तुरुंगात भोगतोय शिक्षा

0
UP Politics : गुंड मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास एनडीएमध्ये दाखल! हेटस्पीच प्रकरणी कासगंज तुरुंगात भोगतोय शिक्षा


लखनौ : योगी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी गाझीपूरच्या प्रभावशाली अन्सारी कुटुंबावर कारवाई करण्यास सुरू केली होती. सध्या मुख्तार अन्सारी, त्याचा भाऊ अफजल अन्सारी आणि मुलगा अब्बास अन्सारी हे तिघेही तुरुंगात आहेत. शनिवारीच अब्बास अन्सारी यांना हेटस्पीच प्रकरणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. होते. मात्र, अब्बास अन्सारी याने आता भाजपच्या गोटात प्रवेश केल्याने भाजपच्या धोरणावर टीका होऊ लागली आहे.



Source link

Sanjay Narvekar Birthday: चित्रपटात आले नसते तर संजय नार्वेकर दिसले असते ‘या’ क्षेत्रात! वाचा अभिनेत्याबद्दल…

0
Sanjay Narvekar Birthday: चित्रपटात आले नसते तर संजय नार्वेकर दिसले असते ‘या’ क्षेत्रात! वाचा अभिनेत्याबद्दल…


संजय नार्वेकर यांनी ‘खबरदार’, ‘चेकमेट’, ‘चष्मे बहाद्दर’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘जबरदस्त’, ‘अगबाई अरेच्चा’ अशा मराठी चित्रपटांमध्ये तर, ‘हंगामा’, ‘हथीयार’, ‘प्यासा’, ‘बस इतनासा ख्वाब है’, ‘फिझा’, ‘वास्तव’ अशा हिंदी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या आहेत.



Source link

Maharashtra Assembly Session LIVE : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडणार

0
Maharashtra Assembly Session LIVE : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडणार


Opposition Parties Meeting: 24 पक्ष, 6 अजेंडे… आज विरोधी पक्षांची दुसरी महाबैठक; डिनरसाठी शरद पवार- ममता बॅनर्जी मात्र अनुपस्थित



Source link

Bachu Kadu : ‘प्रहार जनाशक्ती पक्ष’ एनडीएचा घटक नाही, अनिल गोवंडेंची ‘माझा’ला माहिती

0
Bachu Kadu : ‘प्रहार जनाशक्ती पक्ष’ एनडीएचा घटक नाही, अनिल गोवंडेंची ‘माझा’ला माहिती



<p>’प्रहार जनाशक्ती पक्ष’ एनडीएचा घटक नाही’ … प्रदेशाध्यक्ष अनिल गोवंडेंची माझाला माहिती .. 18 जुलैच्या एनडीएच्या बैठकीचं निमंत्रण..&nbsp;</p>



Source link

Jaykumar Gore Statement : जयकुमार गोरेंच्या विधानाचा अर्थ काय?, सरकारचं हायकमांड फडणवीस?

0
Jaykumar Gore Statement : जयकुमार गोरेंच्या विधानाचा अर्थ काय?, सरकारचं हायकमांड फडणवीस?


Washim News: ‘सर आली धावून, पूल गेला वाहून’, वाशिममधील मनोरा तालुक्याच्या गावातील मुख्य पुलाची दुरावस्था



Source link

रविवार ठरला ‘घात’वार.. वर्षा पर्यटन बेतलं जीवावर, राज्यात आठ जणांचा बुडून मृत्यू

0
रविवार ठरला ‘घात’वार.. वर्षा पर्यटन बेतलं जीवावर, राज्यात आठ जणांचा बुडून मृत्यू


मार्वे बीचवर तीन मुलांचा बुडून मृत्यू –

मुंबईजवळील मालाड मार्वे बीचवर तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी मालवणी येथील समुद्रात पोहायला गेलेली पाच पैकी ३ मुलं बुडाली. मालवणी परिसरांमधून पाच मुलांचा ग्रुप पोहोयला समुद्रावर गेला होता, यातील तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला तर दोन जण सुखरुप बाहेर आली.



Source link

विठ्ठला सांभाळून घे.. शरद पवारांसमोर जाताच छगन भुजबळांचे उद्भार, पायाही पडले

0
विठ्ठला सांभाळून घे.. शरद पवारांसमोर जाताच छगन भुजबळांचे उद्भार, पायाही पडले


अजित पवार गटातील सर्वच मुख्य नेते वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आले. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ पवारांच्या समोर आले आणि म्हणाले विठ्ठला सांभाळून घे आम्हाला असं म्हणून पवारांच्या पाया पडले. त्यांच्या पाठोपाठ सर्वच नेते शरद पवारांच्या पाया पडले. यावेळी अजित पवार गटातील नेत्यांनी खंत व्यक्त केली, सर्वांना एकसंघ राहिलं पाहिजे. आम्हाला आर्शिर्वाद द्या, अशी मागणी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. यावेळी पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.



Source link

घरकुल योजनेचा लाभ दुसऱ्याच्या खात्यात, वाशीममधील प्रशासकीय यंत्रेणाचा अजब कारभार उघडकीस

0
घरकुल योजनेचा लाभ दुसऱ्याच्या खात्यात, वाशीममधील प्रशासकीय यंत्रेणाचा अजब कारभार उघडकीस


Washim News: वाशिममध्ये (Washim) सरकारी योजनेच्या अनुदानाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाशिममधील मोहजा गावात एकाच नावाचे दोन व्यक्ती आहेत. त्यामुळे सरकारी योजनेच्या अनुदानाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा झाल्याने प्रशासकीय यंत्रणांचा नाहक त्रास लाभार्थ्यांना सहन करावा लागल्याचा चित्र आहे. 

गरजू लोकांना स्वस्तात घरं मिळण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात केली. त्याअंतर्गत वाशिमधील मौजा गावातील दिनकर भास्करराव सरनाईक यांना 2021- 22 या वर्षांमध्ये घरकुल मंजूर झालं होतं. त्याचप्रमाणे त्यांना जानेवारी 2023 मध्ये घरकुल सुरु करण्यासाठी पत्रही मिळालं होतं. मात्र त्यांना पहिला हफ्ता मिळाल्यानंतर दुसऱ्या हफ्त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे त्यांचे घर देखील अपूर्ण राहिले आहे. 

याबाबत त्यांनी वाशिमच्या पंचायत समितीला विचारणा केली. तेव्हा त्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम ही दुसऱ्याच्या खात्यात गेल्याचं सांगण्यात आलं. दुसरा हफ्ता खात्यात जमा न झाल्याने त्यांच्या घराचे कामही अपूर्णच आहे. त्यातच त्यांना त्यांच्या घराचे लवकर पूर्ण झाले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पत्र मिळालं आहे. त्यामुळे सरनाईक यांची चांगलीच कोंडी झाल्याचं चित्र सध्या आहे. 

दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जर खात्यात जमा नाही झाली तर घरकुल कसं पूर्ण होणार ही चिंता सध्या त्यांना लागून राहिली आहे. वाशिमच्या पंचायत समितीने ज्या व्यक्तीच्या खात्यात सरनाईक यांची रक्कम जमा झाली आहे त्याला नोटीस देखील पाठवली आहे. पण त्या व्यक्तीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचं सरनाईक यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढील चौकशीसाठी सरनाईक यांनी वाशिम ग्रामीण पोलिसांकडे देखील पत्र दिल्याचं सांगण्यात येत आहे. 

गावत एकाच नावाची दुसरी व्यक्ती असल्याने मूळ व्यक्ती योजनेच्या लाभापासून वंचित झाल्याचं चित्र सध्या वाशिममध्ये आहे. तसेच प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे त्यांच्या घरालाही फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आधार कार्ड, बँकेच्या खात्याची माहिती यांसारख्या कागदपत्रांची पुरवणी देखील सरनाईक यांनी केली होती.

पण तरीही त्यांच्या वाट्याची रक्कम ही दुसऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर सरनाईक यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात यावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. पण प्रशासन आता यावर कोणती कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हे ही वाचा :



Source link