Sunday, August 16, 2026
Homeसातारासातारा : वाईत पर्यटकांच्या बसवर दगडफेक; तीन जखमी | पुढारी

सातारा : वाईत पर्यटकांच्या बसवर दगडफेक; तीन जखमी | पुढारी

सातारा : वाईत पर्यटकांच्या बसवर दगडफेक; तीन जखमी | पुढारी

[ad_1]








वाई; पुढारी वृत्तसेवा : वाई शहरात महागणपतीच्या दर्शनाला आलेले पर्यटक व स्थानिक यांच्यात पार्किंगवरून वाद झाला. त्यातून परिसरातील काही युवकांनी बसवर दगडफेक केली. त्यामुळे महागणपती पुलावर नाना-नानी पार्कजवळ रस्त्यावर बसच्या काचांचा खच पडला होता. या दगडफेकीमध्ये तीन पर्यटक जखमी झाले.

पालघर तालुक्यातील एडवन गावातील ग्रामस्थ आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन मांढरदेव येथे दर्शनासाठी निघाले होते. यावेळी वाईत महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी ते थांबले. यावेळी बसचा चालक गणपती पुलाजवळ बस पार्क करत असतानाच तेथे झोपडपट्टीतील मुलांबरोबर बस लावण्याच्या जागेवरून किरकोळ बचाबाची झाली. त्याचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. या हाणामारीची माहिती जवळच असलेल्या झोपडपट्टीत समजल्यानंतर अनेक तरुण, महिलाही गणपती पुलावर पोहोचल्या. जमावाने बसवर हल्ला चढवला. यात बसच्या काचा फुटल्या. त्यामध्ये जितेंद्र प्रभाकर तरे (वय 40), मोहन हरिचंद्र तरे (वय 62), प्रतीक दिलीप तरे (वय 21) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वाई पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. काही महिलाही किरकोळ जखमी झाल्या आहेत.

सपोनि आशिष कांबळे, उपनिरिक्षक सुधीर वाळुंज, श्रावण राठोड, प्रेमजीत शिर्के, उमेश गहीण व इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबतची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments