Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2924

Rajesh Khanna Death Anniversary: सलग १७ ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना!

0
Rajesh Khanna Death Anniversary: सलग १७ ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना!

मनमोहन देसाईंच्या ‘सच्चा जूठा’मध्ये राजेश खन्ना यांनी गावकरी भोलाची भूमिका केली होती. तर, अभिनेत्री मुमताजने त्यांच्या प्रेयसीची भूमिका केली होती. राजेश खन्ना आजही मुकुल दत्त याच्या ‘आन मिलो सजना’मधील आशा पारेख सोबतच्या ‘अच्छा तो हम चलते हैं’ या गाण्यातील अभिनयासाठी लक्षात आहेत. याशिवाय ‘आनंद’, ‘अंदाज’, ‘हाथी मेरे साथी’, ‘बावर्ची’, ‘जोरू का गुलाम’ हे त्यांचे चित्रपट आजही खूप पसंत केले जातात. राजेश खन्ना यांचे १८ जुलै २०१२ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मात्र, तरीही ते आपल्या दमदार चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.

Source link

Bhumi Pednekar Birthday: एक-दोन नव्हे, तर भूमी पेडणेकर हिने नाकारले होते तब्बल २४ चित्रपट! वाचा…

0
Bhumi Pednekar Birthday: एक-दोन नव्हे, तर भूमी पेडणेकर हिने नाकारले होते तब्बल २४ चित्रपट! वाचा…

‘दम लगा के हईशा’पासून ते ‘बधाई दो’पर्यंत भूमीने नेहमीच वेगवेगळ्या आणि हटके विषयांवरील चित्रपट निवडले. ‘शुभ मंगल सावधान’, ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’, ‘बाला’, ‘लस्ट स्टोरीज’ अशा चित्रपटांचाही या यादीत समावेश आहे. ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटानंतर भूमी पेडणेकर हिला तब्बल २४ चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण, कथानक न आवडल्याने तिने हे २४ चित्रपट सलग नाकारले होते.

Source link

Priyanka Chopra Birthday: निक जोनाससोबत लग्नाआधी ‘या’ कलाकारांसोबत जोडलं गेलं प्रियांका चोप्राचं नाव!

0
Priyanka Chopra Birthday: निक जोनाससोबत लग्नाआधी ‘या’ कलाकारांसोबत जोडलं गेलं प्रियांका चोप्राचं नाव!

Happy Birthday Priyanka Chopra: हॉलिवूड स्टार निक जोनाससोबत लग्न करण्यापूर्वी प्रियांका चोप्राचे नाव इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेले होते.

Source link

शासकीय, खासगी कार्यालये तंबाखूमुक्त; धुम्रपान केल्यास 200 रुपयांचा दंड | पुढारी

0

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सर्व शासकीय कार्यालये व कार्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. कार्यालय परिसरात यापुढे सिगारेट,गुटखा, तंबाखू , पान अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे व्यसन करताना सापडल्यास त्याला 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे, धुम्रपानामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात. असंसर्गजन्य रोगामधील कर्करोग, हदयविकार, मानवी हदयाशी निगडित रोग, फुफुसांचा कर्करोग यासारखे गंभीर आजार होतात. भारतामध्ये दरवर्षी होणार्‍या मृत्यूमध्ये 8 ते 9 लाख मृत्यू हे तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यामुळे होत असतात. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यामुळे आणि थुंकल्यामुळे त्यामधून स्वाईन फ्ल्यू, क्षयरोग, निमोनिया आणि पोटांचे विकार आदी संसर्गजन्य आजार पसरतात. जन सामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आणि शासकीय इमारती स्वच्छ राहण्यासाठी स्वच्छ भारत स्वस्थ्य भारत या मोहिमेद्वारे शासकीय इमारतीची साफसफाई करून शासकीय कार्यालये व परिसर हा तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आला असून त्यांची अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी ज्यामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये, शासकीय संस्था, कार्यालयातील कामाची जागा, उपहारगृहे, शाळा व महाविद्यालये यांचा समावेश होत असून तेथे नागरिकांच्या संरक्षणाकरता सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य इतर उत्पादने प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने खाण्यास थुंकण्यास धुम्रपान करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शासकीय इमारतीच्या परिसरामध्ये धुम्रपान करणे आणि थुंकणार्‍यावर दंडात्मक गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईचा दंडूका उगारण्यात येणार आहे. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी खासगी कार्यालये, उपहारगृहे, शाळा व महाविद्यालये परिसरात जबाबदार व्यक्तींची नेमणूक करावी.

तालुकास्तरावर समिती…

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय समन्वय व सनियंत्रण समिती तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात येणार आहे. या समितीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव तर गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, प्राचार्य, स्थानिक तरूण मंडळ, सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक संस्थेचा प्रतिनिधी हे समितीचे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वावर पेटी

शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तंबाखूजन्य पदार्थ तसेच सिगारेट जमा करण्यासाठी पेटी ठेवली जाणार आहे. तसेच प्रत्येक मजल्यावर, लिफ्ट आदी ठिकाणी तंबाखू तसेच तंबाखू पदार्थामुळे होणार्‍या हानीबाबतचे फलक लावले जाणार आहेत. या फलकावरच सिगारेट अथवा तंबाखू विरोधी मोहिमेच्या अधिकार्‍यांचे नाव नंबर दिले जाणार आहेत. त्यांच्या माध्यमातून सरकारी कार्यालयामध्ये सिगारेट अथवा तंबाखूजन्य उत्पादने वापरल्यास 200 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

Source link

सातारा : एकीव धबधब्याजवळील दरीत ढकलून दिल्यानेच ‘त्‍या’ दोघांचा मृत्यू | पुढारी

0

बामणोली/मेढा; पुढारी वृत्तसेवा :  कास पठाराजवळील एकीव धबधब्याजवळ रविवारी सायंकाळी दरीत पडून दोघांचा मृत्यू झालेल्या घटनेचे गूढ उकलले आहे. अज्ञात संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दरीत ढकलल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी दोघा अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अक्षय शामराव अंबवले (वय 28, रा. बसप्पाचीवाडी, ता. सातारा) व गणेश अंकुश फडतरे (वय 35, रा. करंजे, सातारा) अशी दरीत ढकलून दिल्यामुळे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार दि. 16 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास एकीव धबधब्यापासून 150 ते 200 मीटर अंतरावर अक्षय अंबवले व गणेश फडतरे हे इतर दोन मित्र पंकज जयवंत शिंदे व समाधान सुदाम मोरे (रा. बसप्पाची वाडी, सातारा) यांच्याबरोबर एकीव धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते. एकीव धबधबा परिसरात अक्षय अंबवले व गणेश फडतरे यांची तेथील अनोळखी युवकांशी काही कारणावरुन वादावादी झाली. या वादावादीचे पर्यावसन मारामारीत झाले. त्या अज्ञात युवकांनी अक्षय अंबवले व गणेश फडतरे या दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जवळच असलेल्या एकीव धबधब्याच्या दरीत ढकलून दिले. सुमारे 400 ते 500 फूट खोल दरीत ते कोसळले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला पाचारण केले होते. शोधमोहीम सुरु झाल्यानंतर सोमवारी पहाटेपर्यंत दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. रात्रीचा अंधार, जोरदार पाऊस व घनदाट जंगलामुळे दुसर्‍या युवकास शोधणे अवघड बनले होते. मात्र अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.

ही रेस्क्यू मोहीम मेढा पोलिस, महाबळेश्वर ट्रेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम यांनी यशस्वी केली. यासाठी स्थानिक लोकांचीही मदत झाली. शोधकार्यानंतर दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत युवकांचा मित्र पंकज शिंदे याने याबाबतची फिर्याद मेढा पोलीस स्टेशनला दिली असून याप्रकरणी अज्ञात दोन व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि संतोष तासगावकर करत आहेत.

Source link

Maharashtra Assembly Session LIVE : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडणार

0
Maharashtra Assembly Session LIVE : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडणार

Maharashtra Assembly Monsoon Session : या महिन्याभरात बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. यामध्ये अजित पवारांचं (Ajit Pawar) बंड होऊन सरकारमध्ये येणं, नव्या मंत्र्यांना खातेवाटप व होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार न होणं…अशा एक ना अनेक घडामोडींवरुन महाराष्ट्राचं राजकारण चर्चेत राहिलं. पण आता ही सगळी मंडळी पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Session) निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

टोमॅटोचे वाढलेले भाव, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोविड घोटाळा, रस्ते घोटाळा, महिलांवरचे अत्याचार, अजित पवारांचं बंड, महायुतीतली धुसपूस, महाविकास आघाडीतली पडलेली फूट, अशा एक ना अनेक मुद्द्यांवरुन यंदाचं पावसाळी अधिवेशन गाजणार आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं तेव्हा सभागृहात फक्त गद्दार आणि खोके ऐकायला मिळायचे. यंदा त्याच घोषणा अजित पवारांच्या विरोधात ऐकायला मिळण्याची नाकारता येत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जरी संयमी भूमिका असली तरी काँग्रेस आणि ठाकरे गट मात्र आक्रमक असणार आहेत.

महाविकास आघाडीतील अजितदादा बाजूला झाले आहेत पण विरोधी आपली वज्रमूठ करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत तर सत्ताधारी विरोधकांना चितपट करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांचा धोधो पाऊस पडताना दिसेल.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै 2023 रोजी सुरू होणार आहे.

हे अधिवेशन 4 ऑगस्ट 2023 पर्यंत चालेल.

या 19 दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे 15 दिवस आहेत.

शनिवार आणि रविवार असे चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत

पंधरा दिवसांच्या या पावसाळी अधिवेशनात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

त्यातले अर्धे दिवस तर आरोप प्रत्यारोपांमुळे सभागृह बंद पाडण्यातच जातील.

यंदाच्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत विरोधकांची संख्या खूपच कमी असणार आहेयत्यामुळे विधीमंडळातील आसन व्यवस्था लक्षणीय असणार आहे, कारण आधी विरोधात बसणारे अजित दादा अँड टीम सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी-विरोधक कसे बसणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चर्चेत राहणार

अडीच वर्ष अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद साभांळताना सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे काम केलं होतं. मात्र आता अजित पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत विरोधातून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीकडे आता विरोधी पक्षनेताच नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा देखील मुद्दा या अधिवेशनात चर्चेत राहणार आहे.

पावसाळी अधिवेशन कमी विरोधकांमध्ये पार पडणार आहे. मात्र विरोधकांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरुन कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखलेली आहे. आपल्या पुरवणी मागण्यांबरोबरच सवाल सभागृहात विरोधक उपस्थित करताना पाहायला मिळतील त्यामुळे हे अधिवेशन पावसाळी की वादळी ठरतं हे पुढील काळात पाहणे महत्त्वाचे ठरेल

दरवर्षी अधिवेशन होतं, आरोप प्रत्यारोप होतात अधिवेशन संपताच सगळे आमदार मंत्री घरी जातात पण जनतेच्या प्रश्नाचे काय? कधी हिंदुत्वाचा मुद्दा, कधी मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा तर कधी वंदे मातरम् कर कधी भारतातल्या विविध मुद्द्यांवर खडाजंगी रंगलेली आपण अनेक वेळा पाहली आहे. त्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जनता खूश नाहीय त्यामुळे या अधिवेशनात महाराष्ट्राच्या हिताचे जनतेच्या हिताचे काहीतरी व्हावं ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक

राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.

काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.

मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

Source link

भाईंदर: मांडवी तलावात बुडून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू, अपघात की आत्महत्या?

0
भाईंदर: मांडवी तलावात बुडून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू, अपघात की आत्महत्या?

अमित दास (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमित भाईंदर पश्चिम येथील फाटक रोड जवळ असलेल्या एका इमारतीमध्ये रहात होता. अमितचा मृत्यू पोहत असताना झाला की त्याने आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले आहे. मांडवी तलाव पालिका कार्यालयाला लागून आहे. त्यामुळे त्याठिकाणी अशी घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Source link

Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह Video व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ, विरोधकांकडून चौकशीची मागणी

0
Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह Video व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ, विरोधकांकडून चौकशीची मागणी

हिसाब देना पडेगा –सचिन सावंत

किरीट सोमय्या यांच्याकडे राजकारणात गलिच्छ प्रवृत्ती म्हणून आम्ही पाहतो. सर्वांवर आरोप करतात, दुसऱ्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न करतात,चारित्र्यहानन करत असतात. सुपारी घेतल्याप्रमाणे त्यांचे वर्तन असावं का अशी शंका येते. अशा पध्दतीचं वर्तन त्यांच्याकडून येत तर ते अधिक अधोरेखित होते. ही एक विकृत प्रवृत्ती आहे. हिसाब देना पडेगा, चारित्र्यशुध्द व्यक्तिमत्व आहे की नाही हे जनता ऑडिट करेल,असे सचिन सावंतांनी म्हंटले आहे.

Source link

जेजुरीच्या सोमवती अमावस्येच्या यात्रेत ४ लाख भाविकांची उपस्थिती, चेंगराचेंगरीत पाच जण जखमी

0
जेजुरीच्या सोमवती अमावस्येच्या यात्रेत ४ लाख भाविकांची उपस्थिती, चेंगराचेंगरीत पाच जण जखमी

आज दुपारी दीड वाजता पालखी गडाजवळील यशवंतराव महाराज यांना भेटली, तिथून निघाल्यावर बानुबाई मंदिराकडे जाताना गणपती मंदिराच्या मागील कमानीजवळ भाविकांचा प्रचंड गर्दी आल्याने पालखी एका बाजूला सरकली,अचानक हा प्रकार झाल्याने पालखी समोर सनई वादन करीत असलेले घडशी समाजातील अनेक तरुण खाली कोसळले. प्रचंड चेंगराचेंगरी झाली, खंडोबाची पालखी अवजड असल्याने खांदेकर्‍यांनी मोठ्या कौशल्याने पालखी सावरली. पाण्याची बंद टाकीजवळ अनेक जण चेंगरले, घडशी समाजातील पाच सनई वादनकारांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या. अचानक झालेल्या या चेंगराचेंगरीमध्ये अनेक भाविक पण जखमी झाले. सर्वांना किरकोळ मार लावला असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

Source link