Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2923

TMKOC: ‘या’ दिवशी दयाबेन मालिकेत परतणार, गोकुळधाम रहिवाशांचा आनंद गगनात मावेना

0
TMKOC: ‘या’ दिवशी दयाबेन मालिकेत परतणार, गोकुळधाम रहिवाशांचा आनंद गगनात मावेना


छोट्या पडद्यावरची ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या प्रवासात अनेक कलाकारांनी या मालिकेचा निरोप घेतला होता. मात्र, आता प्रेक्षकांची काही आवडती पात्र या मालिकेत परतून येत आहेत. मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर असताना प्रसूती रजेवर गेलेली ‘दयाबेन’ अर्थात अभिनेत्री दिशा वाकाणी पुन्हा या मालिकेत परतणार असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे. याबाबत दयाबेनच्या भावाने माहिती दिली आहे.



Source link

Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवण्यासाठी विधीमंडळात बैठक

0
Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवण्यासाठी विधीमंडळात बैठक



<p>Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवण्यासाठी विधीमंडळात बैठक</p>



Source link

Rajesh Khanna: अमिताभ बच्चन यांच्या एन्ट्रीमुळे राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीला लागली होती उतरती कळा!

0
Rajesh Khanna: अमिताभ बच्चन यांच्या एन्ट्रीमुळे राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीला लागली होती उतरती कळा!


राजेश खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. परंतु, काही काळानंतर त्यांच्या स्टारडमलाही उतरती कळा लागली होती. त्यांची लोकप्रियता कमी होत चालली होती. असे म्हटले जाते की, अमिताभ बच्चन यांनी जेव्हा फिल्मी दुनियेत प्रवेश केला, तेव्हा राजेश खन्ना नावाची जादू लोकांमधून ओसरू लागली. या मागचं मुख्य कारण होतं कारण होतं अॅक्शनपट… अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत अॅक्शनपटांची रांगच लावायला सुरुवात केली होती. तर, दुसरीकडे राजेश खन्ना यांची इमेज रोमँटिक हिरो अशीच बनून राहिली होती. यातून बाहेर पडणं त्यांच्यासाठी कठीण झालं होतं.



Source link

Baipan Bhaari Deva: बहिणींच्या मंगळागौरीची साऱ्यांनाच भुरळ; ‘बाईपण भारी देवा’ने गाठला ५० कोटींचा टप्पा!

0
Baipan Bhaari Deva: बहिणींच्या मंगळागौरीची साऱ्यांनाच भुरळ; ‘बाईपण भारी देवा’ने गाठला ५० कोटींचा टप्पा!


Baipan Bhaari Deva Box Office Collection: ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची पसंतीच मिळवलेली नाही, तर बॉक्स ऑफिसवरही धडाकेबाज कामगिरी केली आहे.



Source link

Kirit Somaiya Video : अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच किरीट सोमय्यांची धावाधाव, फडणवीसांना लिहिलं पत्र

0
Kirit Somaiya Video : अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच किरीट सोमय्यांची धावाधाव, फडणवीसांना लिहिलं पत्र


फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्यांनी म्हटलं की, सोमवारी सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लीप प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यानंतर मी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे, परंतु मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही. त्यामुळं आपण या व्हायरल व्हिडिओची आणि आरोप करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी विनंती किरीट सोमय्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. किरीट सोमय्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती.



Source link

सातारा : ‘कोयना’ 45 दिवसांत 263 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती  | पुढारी

0









गणेशचंद्र पिसाळ

पाटण :  कोयना धरण तांत्रिक जलवर्षाच्या पहिल्या  45 दिवसांत प्रचंड पाणीटंचाई व आपत्कालीन परिस्थितीवर मात करत तसेच अनेक दिवस तब्बल 1000 मेगॅवॅट क्षमतेचा कोयना चौथा जलविद्युत निर्मिती टप्पा बंद असतानादेखील आत्तापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत 13.536 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. पश्चिम वीजनिर्मिती 5.78 तर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या 2.77 अशा एकूण 8.55 टीएमसी पाण्यावर 263.188 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. पाणीटंचाईच्या काळात एकीकडे सिंचनासाठी काटकसरीने पाणीवापर करताना दुसरीकडे अशा आव्हानात्मक परिस्थितीतही वीजनिर्मितीची वाटचाल समाधानकारक आहे.

नव्याने सुरू झालेल्या या तांत्रिक जलवर्षात पहिल्या 45 दिवसांत कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे 5.78 टी.एम.सी. पाण्यावर 255.707 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली . गतवर्षी 5.27 टी. एम. सी. वर 236.808 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे 0.51 टी. एम. सी. पाणीवापर जास्त झाल्याने 18.899 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती जास्त झाली आहे. पूर्वेकडे सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. सिंचनासाठी सोडलेल्या 2.77 टी.एम.सी. पाण्यावर 7.481 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचनासाठी सोडलेल्या 4.26 टी.एम.सी. पाण्यावर 12.852 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती.  तुलनात्मक यावर्षी 1.49 टी. एम. सी. पाणीवापर कमी झाल्याने 5.371 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.

चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता आत्तापर्यंत एकूण 8.55 टी. एम. सी. पाण्यावर 263.188 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्याचवेळी गतवर्षी 9.53 टी.एम.सी. पाण्यावर 249.652 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकूण 0.98 टिएमसी पाणीवापर कमी झाला असला तरी  पश्चिमेकडे जादा पाणीवापर झाल्याने यातून 13.536 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. पश्चिम वीजनिर्मितीसाठी वर्षभरात 67.50 टीएमसी पाणी लवादाचा आरक्षित कोटा आहे. धरण निर्मितीनंतर पहिल्यांदाच 2021 मध्ये 82.64 टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी वापरले तर गतवर्षी सिंचनासाठी 36.05 टीएमसी पाणीवापर झाला.











Source link

सातारा : धबधबा परिसर पुन्हा धोकादायक | पुढारी

0


विशाल गुजर

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने निसर्ग सौंदर्य बहरू लागले आहे. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक गर्दी करु लागले आहेत. गटागटाने येणारे तरुण धबधब्याच्या ठिकाणी स्टंटबाजी करत असल्याने लाखमोलाचे जीव कस्पटासारखे जाऊ लागले आहेत. रविवारी कास पठाराजवळील एकीव धबधब्याजवळ झालेल्या घटनेने काळजाचा ठोका चुकला. दोघांना जीव गमवावा लागला असून, या घटनेपासून बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणचे धबधबा परिसर धोकादायक बनले आहेत. एकीव धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी असून, सुरक्षेच्या उपाययोजना केल्यास पर्यटकांना इथे आनंद लुटता येणार आहे.

ठोसेघर धबधब्याने घेतले 12 बळी

ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी आलेले काहीजण जीव धोक्यात घालत आहेत. हा धबधबा पाहताना दरीत कोसळून आतापर्यत 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याची खबरदारी घेत येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने धबधबा परिसरास रेलिंग करून घेत प्लेव्हर ब्लॉकही बसवले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र, अनेक हुल्लडबाज सुरक्षा कवच भेदत रेलिंगमधून पाणी पातळीत उतरण्याचा धोका पत्करत आहेत.

टोळक्यांचा धिंगाणा अन् पर्यटनाला बट्टा

पर्यटनस्थळी टोळक्यांचा धिंगाणा आता नवा राहिला नाही. पर्यटनाला म्हणून जायचे व दुसर्‍यांनाही त्रास द्यायचा असे उद्योग वाढले आहेत. धबधबा पाहण्यासाठी येणारे अन्य पर्यटक त्यामुळे त्रस्त होत असून टोळक्यांच्या भांडणतंट्यामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला बट्टा लागत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक

पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, सुरक्षा रक्षक उपलब्ध करणे, ठिकठिकाणी सूचनाफलक लावणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यास मनाई करणारे फलक लावणे, नदीकाठी फोटो काढण्यास मनाई असल्याचे फलक लावणे, अशा विविध उपाययोजनांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे आहेत. पावसाळ्यात या भागात ट्रेकिंग करण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फॉरेस्ट गार्ड व गावातील स्वयंसेवकांमार्फत गस्त घातली पाहिजे. धोकादायक ठिकाणांची माहितीही पर्यटकांना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आहे.

पर्यटन स्थळावर काचांचा ढीग…

पर्यटनस्थळी निसर्गाचा आनंद न लूटता मद्यप्राशन करणे हे एक फॅडच निर्माण झाले आहे. आडोसा किंवा वेगळा पॉईंट दिसला की मद्यप्राशन करायला बसलाच. सर्वच पर्यटन स्थळावर मद्याच्या बाटल्यांचा ढीग, सिगारेटची पोकिटे दिसत आहेत.

फलक लावून उपाययोजनांची गरज

निषिद्ध क्षेत्र, धोक्याची ठिकाणे, अशा प्रकारचे बोर्ड लावणे, बॅरिकेड्स् लावणे, धोक्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यासोबतच कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तीय हानी होणार नाही, असे नियोजन करून पर्यटनस्थळी उपाययोजना करण्याची गरज आहे.

धरणांवरही मद्य पिऊन राडा

धोम, कण्हेर, उरमोडी या धरणांवरही असे प्रकार सर्रास सुरू आहेत. एकीकडे धरणाचे पाणी तर सभोवती हिरवागार डोंगर त्यामुळे पर्यटकांसह मद्यपी याठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत ठिय्या मांडलेलेच आहेत. याठिकाणी अनेकजण मद्यप्राशन करून धिंगाणा घालताना दिसत आहेत.

हे कटाक्षाने टाळा !

प पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबा परिसर, दर्‍यांचे कठडे, धोकादायक वळणं अशा ठिकाणी सेल्फी काढणे किंवा कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे. प धबधब्यावर धोकादायक ठिकाणी जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहात उतरणे व पोहणे. प धबधब्यावर स्वत:सह इतरांना इजा पोहचेल असे कोणतेही कृत्य करणे. प पर्यटनस्थळी व धबधब्याच्या परिसरात मद्यपान, भांडण तंटा करणे. प वाहतुकीचे रस्ते आणि धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे.



Source link

Ananya Panday: हम दोनो दो प्रेमी… प्रेमात आकंठ बुडालेत आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे! समोर आले नवे फोटो

0
Ananya Panday: हम दोनो दो प्रेमी… प्रेमात आकंठ बुडालेत आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे! समोर आले नवे फोटो


या आधी देखील त्यांचे लिस्बनमधील अनेक फोटो व्हायरल झाले होते. यातील काही फोटोंमध्ये आदित्य अनन्याला मिठी मारताना दिसला होता. या फोटोंवरून दोघांनीही आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं असल्याचं म्हटलं आहे. यादरम्यान अनन्या पांडे निळ्या रंगाचा मॅक्सी ड्रेस परिधान केलेली दिसली होती. तर, आदित्य साधा टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसला होता.



Source link

Jawan: ‘वादळापूर्वी गडगडाट होणार!’; ‘जवान’मधील नयनताराच्या लूकने वाढवली चाहत्यांची उत्सुकता!

0
Jawan: ‘वादळापूर्वी गडगडाट होणार!’; ‘जवान’मधील नयनताराच्या लूकने वाढवली चाहत्यांची उत्सुकता!


Nayanthara Look In Jawan: सुपरस्टार शाहरुख खानने त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचा लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये ती फुल ऑन अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.



Source link

पशुधन जपण्यासाठी सरकार प्रयत्नशील, पशुखाद्य दर 25 टक्क्यांनी कमी करावेत; विखे पाटलांचं आवाहन

0
पशुधन जपण्यासाठी सरकार प्रयत्नशील, पशुखाद्य दर 25 टक्क्यांनी कमी करावेत; विखे पाटलांचं आवाहन


Radhakrishna Vikhe Patil : राज्यातील तीन कोटी पशुधन जपण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असल्याचे मत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केले. पशुखाद्य दर 25 टक्क्यांनी  कमी करावे, असे आवाहन देखील विखे पाटील यांनी पशुखाद्य उत्पादकांना केले. ‘पशुधन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य जपत शेतकरी, पशुपालकांसाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग काम करत असल्याचे ते म्हणाले.  

पशुपालन आणि दूध उत्पादन व्यवसायामध्ये पशुखाद्याची गुणवत्ता ही अतिशय महत्वाची बाब आहे. उत्पादित दुधाचे प्रमाण आणि त्याची गुणवत्ता, त्याचप्रमाणे पशुंचे आरोग्य आणि पुनरुत्पादन क्षमता ही पशुखाद्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यामुळं फुड्स सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्डस् ऑफ इंडिया या संस्थेच्या निर्देशानुसार राज्यात आयएसआय मार्क (बीआयएस प्रमाणकाप्रमाणे) पशुखाद्याचे उत्पादन व विक्री करणे बंधनकारक केले आहे. भारतीय मानक संस्थेच्या (बीआयएस) परवानाधारक पशुखाद्य उत्पादक संस्थांनीही भारतीय मानक संस्थेच्या प्रमाणकाप्रमाणेच पशुखाद्याचे उत्पादन करावे आणि पशुखाद्याच्या पॅकिंग बॅगवर पशुखाद्यातील अन्नघटकाचे प्रमाण (उदा. क्रुड प्रोटीन, क्रुड फॅट, क्रुड फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, ॲश, मॉइश्चर, इत्यादी) ठळकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे अन्नघटकांच्या प्रमाणकासोबत पॅकिंग बॅगवर उत्पादक संस्थेचे नाव व पत्ता, उत्पादक परवाना क्रमांक, पशुखाद्य उत्पादनाचा दिनांक व बॅच क्रमांक, सदर उत्पादन वापरण्याचा अंतिम दिनांक (बेस्ट बिफोर युज), निव्वळ वजन (नेट वेट), विपनण (मार्केटिंग) कंपनीचे नाव व पत्ता या बाबीही ठळकपणे नमुद कराव्यात, असे निर्देश देण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्यांची सर्वसमावेशक समिती स्थापन

पशु-पक्ष्यांना गुणवत्तापूर्ण खाद्य किफायतशीर दरात उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्यांची सर्वसमावेशक राज्यस्तरीय पशु-पक्षी खाद्य गुणवत्ता आणि दर समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला विशेष अधिकार देऊन धोरणात्मक उपाययोजनाबाबत शासनास शिफारसी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशा विविधांगी निर्णयामुळं महाराष्ट्र शासन हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे, पशुपालकांचे आणि पर्यायाने सामान्य, गोरगरिबांसाठी हितकारक पाऊल उचलत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर 34 रुपये दर

दुधाला किमान भाव, पशुधनास गुणवत्तापूर्ण पशुखाद्याची उपलब्धता, पशुखाद्य दर आणि गुणवत्तेसाठी समिती, दूध दर निश्चितीसाठी शासन निर्णयान्वये समिती असे एकाहून अधिक हितकारक महत्त्वपूर्ण निर्णय यापूर्वी राज्य शासनाने घेतले आहेत. राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपातहोऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर 34 रुपये किमान खरेदी दरास मान्यता देण्यात आल्याचे विखे पाटील म्हणाले. सहकारी आणि खासगी दुग्ध क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून समावेश असलेली समिती शासन निर्णयान्वये गठित करून दुधाला रास्त भाव मिळावा, यासोबतच देशातील स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर तीन महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करण्यात यावी. विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास, शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार तीन  महिन्यापूर्वीही समितीने दूध दराबाबत शासनास शिफारस करावी, किमान दूध दराची अंमलबजावणीबाबत जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्त यांचेमार्फत शासनास दरमहा अहवाल सादर करावा, असे निर्देश समितीला देण्यात आले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Cow Milk Price : दूध उत्पादकांना दिलासा! गायीच्या दुधाला मिळणार प्रतिलिटर 34 रूपयांचा दर, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

 



Source link