Friday, July 10, 2026
Home Blog Page 2925

World Emoji Day 2023: जागतिक इमोजी दिवसानिमित्त शिल्पा शेट्टीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

0
World Emoji Day 2023: जागतिक इमोजी दिवसानिमित्त शिल्पा शेट्टीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ


व्हिडीओमध्ये शिल्पा आकर्षक हिरवा रंगाच्या गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या हास्याने आणि सहजतेने तिने या विविध इमोजींना जिवंत केले आहे. शिल्पाने इमोजी दिनानिमित्त शूट केलेला व्हिडीओ शेअर करत, “आज कुछ अलग करते हैं! मुखआसान… कारण हर एक भावना जरूरी है. स्वस्थ रहो, मस्त रहो… एक्सप्रेस करते रहो!” या आशयाचे तिने कॅप्शन दिले आहे.



Source link

सातारा : मारहाणीत जखमी झालेल्या ‘त्या’ युवकाचा मृत्यू; मृतदेह थेट एसपी ऑफिसमध्ये आणला

0


Satara Crime: सुमारे एक महिन्यांपूर्वी एका गावातून दुसऱ्या गावात आलेल्या जमावाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राहुल शिवाजी पवार (वय 28, रा. पांगारे, ता. सातारा, जि. सातारा) याचा उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला. यानंतर पांगारे गावच्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत मृतदेहासह रुग्णवाहिका सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेली आणि राजापुरी गावातील मारहाण करून फरार झालेल्यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. युवतीची छेड काढल्यानंतर विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर महिनाभरापूर्वी वाद उफाळून आला होता. या वादात राहुलचा बळी गेला आहे. 

तरुणाच्या खून प्रकरणात सातारा तालुका पोलिसांकडून 16 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यामधील दोन मुले अल्पवयीन आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी करत नातेवाईकांनी राहुलचा मृतदेह एसपी ऑफिसला आणला होता. संतप्त झालेल्या ग्रामस्थांना पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर राहुलच्या मृतदेहावर रात्री पांगारे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी दिरंगाई केल्यास गावकऱ्यांनी  पुन्हा रस्त्यावर येणार असल्याचा इशारा दिला. 

प्रकरण नेमकं काय?

सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील पांगारे गाव आहे. या गावातील मुलं, मुली शेजारी असलेल्या राजापुरी गावात शाळेला जातात. पांगारे गावातील मुलीची राजापुरी गावातील एका युवकाने युवतीची छेड काढली होती. यानंतर  याचा जाब मयत राहुल पवार आणि त्याच्या भावाने विचारला होता. याचाच राग मनात धरून राजापुरीमधील 25 ते 30 युवक साधारण महिन्यापूर्वी पहाटेच्या सुमारास राहुलच्या घरी आले आणि राहुलला घरातून बाहेर बोलावून बेदम मारहाण केली. यावेळी मारहाण झालेल्या राहुलला वरून कोणतीही मारहाण दिसत नव्हती. मात्र, अमानुषपणे केलेल्या मारहाणीमध्ये आतड्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे राहुल उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले. एक महिन्यापासून राहुलवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी  काय कारवाई केली?

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 15 नावांसह इतर 25 ते 30 जणांवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. जखमी राहुलची प्रकृती बिघडत गेल्यावर आरोपींवर 307 चे कलम वाढवण्यात आले. आता राहुलचा मृत्यू झाल्याने आरोपींवर 302 कलम दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन संशयित हे अल्पवयीन आहेत. दुसरीकडे, राहुलला गावात येऊन बेदम मारहाण झाल्यानंतर राजापुरी गावातील ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलच्या घरी येत माफी मागून चूक मान्य केली होती. तसेच आरोपींच्या नावाची यादी तटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि पोलीस पाटलांना दिली होती. तसेच इतर 15 नावे आम्ही नंतर सांगू असेही सांगितले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Siddharth jadhav: सिद्धार्थ जाधव करणार जॉनी लिव्हरसोबत काम, ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र

0
Siddharth jadhav: सिद्धार्थ जाधव करणार जॉनी लिव्हरसोबत काम, ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र


श्री, आदि आणि मानव या तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही गोष्ट असून फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत करण्याचा विडा हे तिघे उचलतात. या फसवणुकीच्या प्रकारणाचा छडा लावताना अनेकदा गुंतागुंती उद्‍भवतात वयातून बाहेर पडताना या तिघांची होणारी त्रेधातिरपीट लेखक दिगदर्शक परितोष पेंटरयांनी अत्यंत खुबीनेदाखविली आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव,जॉनी लिव्हर,श्वेता गुलाटी,तेजस्विनी लोणारी,विजय पाटकर,भरत दाभोळकर,परितोष पेंटर,जयेश ठक्कर,जेसी लिव्हर,विष्णू मेहरा रेशम टिपणीस,अशी कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहेत.



Source link

NCP : राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाचे पुन्हा मोठ्या साहेबांना साकडे; भेटीत काय झालं?, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं!

0
NCP : राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाचे पुन्हा मोठ्या साहेबांना साकडे; भेटीत काय झालं?, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं!


‘पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटरला गेलो होतो. काल आम्ही सगळे मंत्री, नेते साहेबांना भेटलो होतो. मात्र, रविवार असल्यामुळं आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज अधिवेशन सुरू झाल्यानं बहुतेक आमदार मुंबईत आहेत. त्यांनाही पवार साहेबांचा आशीर्वाद मिळावा असं आम्हाला वाटलं. त्यामुळं आम्ही आज पुन्हा पवार साहेबांना भेटलो. साहेब चव्हाण सेंटरला येणार आहेत हे कळल्यावर आम्ही इथं आलो, असं पटेल म्हणाले.



Source link

सातारा : कोयना धरणात गेल्या 24 तासात एक टीएमसीने वाढ

0



Koyna Dam: कोयना धरणात गेल्या 24 तासात एक टीएमसीने वाढ



Source link

Himesh Reshammiya: मैत्रीणच झाली सवत! हिमेश रेशमियाची दुसरी पत्नी आहे तरी कोण?

0
Himesh Reshammiya: मैत्रीणच झाली सवत! हिमेश रेशमियाची दुसरी पत्नी आहे तरी कोण?


एका मुलाखतीमध्ये हिमेशने कबूली दिली होती की त्याने एकमेकांच्या परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.कोमल आणि हिमेशला एक मुलगाही आहे, ज्याची काळजी दोघेही घेत आहेत. तेव्हा हिमेश त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला होता.



Source link

Reaction On Pawar Meet :  अजित पवार- शरद पवार भेटीवरुन ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसची टीका

0
Reaction On Pawar Meet :  अजित पवार- शरद पवार भेटीवरुन ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसची टीका



<p>&nbsp;अजित पवार गटाने शरद पवारांची भेट घेतल्यावरून ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडलंय. शरद पवार यांना भेटून अजित पवार गट सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दानवेंनी म्हटलंय. तर, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं नाना पटोले म्हणालेत.</p>



Source link

Aai Kuthe Kay Karte: ईशाच्या लग्नाला अनिरुद्धचा विरोध, मालिकेत नवा ट्वीस्ट

0
Aai Kuthe Kay Karte: ईशाच्या लग्नाला अनिरुद्धचा विरोध, मालिकेत नवा ट्वीस्ट



Aai Kuthe Kay Karte Serial Update: गेल्या काही दिवसांपासून मालिकेत नवनवीन वळणे येत आहेत. अशात अनिरुद्धने ईशाच्या लग्नाला नकार दिला आहे.



Source link

Kiran Mane: किरण मानेची अभिनेत्रीविषयी पोस्ट, ‘तू सेक्सी आहेस असं तुला वाटतं…’

0
Kiran Mane: किरण मानेची अभिनेत्रीविषयी पोस्ट, ‘तू सेक्सी आहेस असं तुला वाटतं…’



Kiran Mane Social Media Post: किरण माने यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.&nbsp;



Source link

Wardha: मुलगी देण्यास नकार, भाच्याचा मामावर धारदार शस्त्रानं हल्ला; वर्ध्यातील घटना

0
Wardha: मुलगी देण्यास नकार, भाच्याचा मामावर धारदार शस्त्रानं हल्ला; वर्ध्यातील घटना


Wardha nephew attacked uncle: वर्ध्यातील समुद्रपुर परिसरात लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिल्याने तरुणाने मामावर हल्ला केला.



Source link