Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2920

Shame on Jiya: ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात जिया शंकरने केली क्रौर्याची सीमा पार! चाहतेही संतापले

0
Shame on Jiya: ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात जिया शंकरने केली क्रौर्याची सीमा पार! चाहतेही संतापले


परंतु, ‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरातील इतर स्पर्धक बेबिका धुर्वेपासून ते अभिषेक मल्हान आणि मनीषा राणीपर्यंत सगळ्यांनीच एल्विश यादवला आपला पाठिंबा दर्शवला आहे. सगळ्यांनीच जियावर हल्लाबोल केल्यानंतर, तिने आपली चूक काबुल केली. मात्र, आता एल्विशच्या चाहत्यांना याचा राग आला असून, ते ट्विटरवर जियावर टीका करत आहेत. ‘वीकेंड का वार’मध्ये हा विषय नक्कीच आला पाहिजे, असे चाहते म्हणत आहेत. तर, या प्रकरणानंतर आता ट्विटरवर ‘’शेम ऑन जिया’ ट्रेंड होत आहे.



Source link

Shah Rukh Khan: सुपरस्टार शाहरुख खानची कमाल! ‘जवान’च्या रिलीज आधीच ‘डंकी’ने कमावले १५० कोटी!

0
Shah Rukh Khan: सुपरस्टार शाहरुख खानची कमाल! ‘जवान’च्या रिलीज आधीच ‘डंकी’ने कमावले १५० कोटी!


मीडिया रिपोर्टनुसार, केवळ एकाच भाषेत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमधील ‘डंकी’चा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे. ‘डंकी’ हा चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडेल, असाही अंदाज या चित्रपटाबाबत वर्तवला जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार हिरानी तब्बल पाच वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे.



Source link

Satara Rain Update : सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, पाचगणमधील रस्ते जलमय : ABP Majha

0



<p>साताऱ्याच्या अंबेनळी घाटातील चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळलीय. काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळलीय. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आलाय.&nbsp; घाटात काही स्थानिक आणि पर्यटक अडकल्याची माहिती आहे. साताऱ्यातील जोर गावात यंदा सर्वात जास्त पाऊस पडलाय. मागील 21 तासांत 244 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय.&nbsp;&nbsp;</p>



Source link

Ambenali Ghaat Land Slide: अंबेनळी घाटात कोसळली दरड; वाहतुकीसाठी घाट बंद

0



<p>Ambenali Ghaat Land Slide: अंबेनळी घाटात कोसळली दरड; वाहतुकीसाठी घाट बंद साताऱ्यातील अंबेनळी घाटात कोसळली &nbsp;दरड. चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळल्याने घाट पूर्ण बंद असल्याची माहिती.. &nbsp;</p>



Source link

Vidarbha weather : विदर्भात पावसाचा कहर ! गडचिरोली-चंद्रपूरमध्ये पूरस्थिती; दीडशे गावांचा संपर्क तुटला

0
Vidarbha weather : विदर्भात पावसाचा कहर ! गडचिरोली-चंद्रपूरमध्ये पूरस्थिती; दीडशे गावांचा संपर्क तुटला


नागपूर : विदर्भात गेल्या काही दिवसांपासूंन जोरदार पाऊस सुरू आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही दिवस विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे काही भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर येथे काही ठिकाणी पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तब्बल दीडशे गावांचा संपर्क तुटला आहे.



Source link

Gigi Hadid: सुपर मॉडेल जीजी हदीदला पोलिसांनी केली अटक; ‘या’ कारणामुळे भरावा लागला १००० डॉलर्सचा दंड!

0
Gigi Hadid: सुपर मॉडेल जीजी हदीदला पोलिसांनी केली अटक; ‘या’ कारणामुळे भरावा लागला १००० डॉलर्सचा दंड!


Gigi Hadid Arrested: हॉलिवूडची सुपर मॉडेल आणि अभिनेत्री जीजी हदीद हिला गांजा घेऊन प्रवास केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सुपर मॉडेल जीजी हदीद अनेकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. पण, यावेळेस ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जीजी हदीदला अटक करण्यात आली असून, गांजा हे यामागचे कारण सांगितले जात आहे. जीजी हदीद ब्रेक घेऊन केमन बेटांवर सुट्टी घालवण्यासाठी जात असताना तिने तिच्यासोबत गांजा घेतला होता. यामुळेच तिला अटक करण्यात आली. मात्र, नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली.



Source link

आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, रायगडसह पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट

0
आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, रायगडसह पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट


Maharashtra Rain : राज्याच्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी (Heavy rain) लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचं वातावरण आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली होती. अखेर अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

या भागात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या मुसळदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

मुंबईतही जोरदार पावसाचा अंदाज 

मुंबई आणि ठाण्यात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तळ कोकणात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सोबतच मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.  

वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस

वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा लागल्यानंतर  जिल्ह्यात सर्वदूर प्रथमच जोरदारपणे पावसानं हजेरी लावली.  यामुळं शेतकऱ्यांची चिंता  दुर होणार आहे. जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास या पावसाची मोठी मदत मिळणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस

हिंगोली जिल्ह्यांमध्ये सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली कळमनुरी वसमत औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं कापूस, हळद, सोयाबीन या पिकांना संजीवनी मिळणार आहे. तर जोरदार झालेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

नांदेडमध्ये जोरदार पाऊस, पेरण्यांना वेग येणार 

नांदेडमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या मोसमातील पहिलाच दमदार पाऊस नांदेडमध्ये झाला. या पावसाने जिल्ह्यातील शिल्लक राहिलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. त्यासोबतच जलसाठ्यात वाढ होण्यास देखील मदत होणार आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत नांदेडमध्ये जोरदार पाऊस बरसत असल्याने नांदेडकर आनंदी झाले आहेत. 

वर्ध्यात पावसाची संततधार, नदी नाले तुडुंब 

वर्ध्यात संततधार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र नदी नाले तुडुंब होऊन वाहू लागले आहेत. वर्ध्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. शेतकरी या पावसामुळे सुखावला असून आनंदाचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसानंतर पुन्हा पावसाने जोर धरल्याने सर्वत्र पाणीच पाणी आहे. तर समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने जलाशयाच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीत लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले आहेत. या प्रकल्पातून 12.12 घनमीटर प्रतिसेंकदाने विसर्ग सुरु आहे. लाल नाला, पोथरा नदी, वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain: राज्यभर पावसाची तुफान बॅटिंग, मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट तर पुढचे पाच दिवस राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा



Source link

Maharashtra Assembly Session LIVE : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडणार

0
Maharashtra Assembly Session LIVE : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडणार


Maharashtra Gujarat Border Dispute : महाराष्ट्राच्या जमिनीवर गुजरातचे अतिक्रमण, विनोद निकोलेंनी उपस्थित केला प्रश्न



Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…


Maharashtra Gujarat Border Dispute : महाराष्ट्राच्या जमिनीवर गुजरातचे अतिक्रमण, विनोद निकोलेंनी उपस्थित केला प्रश्न



Source link

Eknath shinde : २०२४ मध्ये सर्व रेकॉर्ड ब्रेक करत मोदी सरकार पुन्हा येणार, एकनाथ शिंदेना विश्वास

0
Eknath shinde : २०२४ मध्ये सर्व रेकॉर्ड ब्रेक करत मोदी सरकार पुन्हा येणार, एकनाथ शिंदेना विश्वास


विरोधकांच्या बैठकीबाबत मुख्यमंत्री म्हणाले, एका बाजूला विचारधारा असलेले संघटन आहे तर दुसरीकडे विरोधक अद्यापही त्यांचा नेता ठरवू शकलेले नाहीत. आत्मविश्वास नसलेले सर्व विरोधक एकत्र आलेले आहेत, अशी टीका त्यांनी केली. २०२४ ला संपूर्ण देशात पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळेल. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. संपूर्ण जगामध्ये आज आपल्या देशाचे नाव आदराने घेतले जात आहे. त्यामुळे विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढी एनडीए बळकट होईल, असे शिंदे म्हणाले.



Source link