
Mumbai Police received threat call: मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली.

Mumbai Police received threat call: मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली.

<p>सिन्नरजवळील टोलनाक्याची तोडफोड, अमित ठाकरेंची गाडी अडवल्यानं तोडफोड</p>
Source link

Kiran Mane Social Media Post: “बाईच्या मोहाच्या ‘पिंजर्यात’ अडकला की त्याच्या ‘नशिबानं थट्टा मांडली’च म्हनून समजा” असे किरण मानेने पोस्टमध्ये म्हटले आहे.
Source link

Madhurani Prabhulkar: अरुंधती ही भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
Source link

हॉलिवूडचा प्रचंड लोकप्रिय दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट २१ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची कथा जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर आधारित आहे. नोलनचे चित्रपट हे सहसा पहिल्यांदा बघून कळत नाहीत असं सर्वसामान्यांचं म्हणणं असतं पण नुकताच येऊ घातलेला त्याचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा कित्येक पटीने अधिक गुंतागुंतीचा असूनही तुम्हाला तो समजतो, भावतो. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी यांच्या अफेअरच्या बातम्या सध्या प्रचंड चर्चेत आल्या आहेत. मात्र, दोघांनीही यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, यादरम्यान इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी मूव्ही डेटला जाताना दिसले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मलायका अरोरा काही कामानिमित्त दिल्लीला गेली होती. त्यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. या लूकमध्ये मलायका अतिशय हॉट दिसत आहे. विमानतळावर मलायकाला पाहून चाहत्यांनी गर्दी केली. अनेकांनी तिच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मलायका चिडलेली होती. तिचे हे वागणे पाहून नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

Nashik Crime : नाशिक येथे शनिवारी भर रस्त्यात तरुणाचा पाठलाग करून खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. ही घटना नाशिकच्या बोधले नगर येथे घडली.
Source link

Nanded Rain Update : गेल्या तीन-चार दिवसांपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यात दमदार पाऊस (Rain) कोसळत असल्याने हाहाकार पाहायला मिळत आहे. दरम्यान किनवट आणि माहूर या दोन तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. तर पैनगंगा नदीला पूर आल्याने ती पात्र सोडून वाहत असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेष आणखी चार दिवस नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.
शुक्रवारी रात्री जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने माहूर आणि किनवट तालुक्यातील सगळ्याच मंडळात धुंवाधार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे. दरम्यान माहूर तालुक्यातील टाकळी येथील रामचंद्र भागवत भंडारे (वय 29 वर्षे), भागवत रामचंद्र भंडारे (वय 75 वर्षे) आणि भाग्यश्री रामचंद्र भंडारे (वय 25 वर्षे) हे तिघेही शेतात कामासाठी गेले असताना पुराच्या पाण्यात अडकले होते. दरम्यान बचावकार्य करुन त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तर याच भागातील मोमीनपुरा भागात पुराचे पाणी शिरल्याने, या परिसरातील 80 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
तर नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत किनवट व माहूर तालुक्यातील 13 मंडळात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यात 49.50 मिमी पाऊस झाला आहे. ज्यात नांदेड तालुक्यात 38.20 मिमी, बिलोली- 41.90 मिमी, मुखेड – 12.60 मिमी, कंधार- 13.30 मिमी, लोहा – 18.50 मिमी, हदगाव – 41.50 मिमी, भोकर – 39 मिमी, देगलूर – 33.40 मिमी, किनवट – 150.20 मिमी, मुदखेड – 34.40 मिमी, हिमायतनगर – 30.50 मिमी, माहूर- 185.90 मिमी, धर्माबाद – 26.50 मिमी, उमरी – 37 मिमी, अर्धापूर – 41.20 मिमी, नायगाव – 30.20 मिमी पावसाची नोदन झाली आहे.
दरम्यान मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने 23 जुलै ते 26 जुलै चार दिवसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे 23 ते 26 जुलै ह्या चार दिवसात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर अशा परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पैनगंगा आणि पूस नदीला पूर आला आहे. तर या पुराचा फटका अनंतवाडीसह लेवा बारभाई तांडा आणि परिसरातील गावांना बसत आहे. जवळपास यवतमाळला 216 मिलिमीटर पाऊस झाला आहे. लेवा ते बारभाई तांड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलाला पुराचा फटका बसला आहे. तर हा रस्ता बंद झाल्याने नागरिकान त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पुरामुळे शेतीचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच दोन दिवसांपासून मोबाईलला नेटवर्क देखील नसल्याने संपर्क तुटला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Rain News : पैनगंगा नदीला पूर, महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला; प्रशासन सतर्क

वनिताच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. हास्यजत्रेच्या कलाकारांनी कमेंट करत लक्ष वेधले आहे.प्रियदर्शनी इंदलकरने “असा प्रयोग पुन्हा होणार नाही!” अशी तर, पृथ्वीक प्रतापने “अविस्मरणीय प्रयोग” अशी कमेंट केली आहे. दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत, “महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा मला अभिमान आहे.” असे कमेंटमध्ये लिहिले आहे.