Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2905

सातारा : कोयना धरणातील पाणीसाठ्याने गाठले अर्धशतक | पुढारी

0









कराड, पुढारी वृत्तसेवा : मागील पाच दिवसांपूर्वी पावसाचा जोर कमी असल्याने चिंता व्यक्त केल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात मुसळधार पावसामुळे झपाट्याने वाढ होत आहे.  कोयना धरणातील पाणीसाठ्याने रविवारी (दि. २३)  रात्री ११ वाजता अर्धशतक गाठले. महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयात सोमवारपर्यंत सुमारे २५ टीएमसी इतकाच पाणी साठा होता. त्याचवेळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. कोयना, नवजात, महाबळेश्वर यासह पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने पाठ फिरविल्याने धरणातील पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत होती. मात्र, मंगळवारी पावसाचा जोर वाढला होता आणि बुधवारी मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली होती.

पावसाचा जोर पुन्हा मंदावला होता. त्यामुळे पुन्हा पाऊस पाठ फिरवणार नाही ना ? असा संभ्रम असतानाच शनिवारी पावसाचा जोर पुन्हा वाढला आणि शनिवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठा 44 टीएमसीहून अधिक झाला होता. शनिवारी रात्री व रविवारी पावसाचा जोर कायम असल्याने त्यानंतरच्या 16 तासात धरणात 6 टीएमसी पाण्याची आवक होऊन रविवारी रात्री धरणाच्या शिवसागर जलाशयात 50.04 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 55 टीएमसी पाण्याची गरज आहे. रविवारी रात्री धरण एकूण क्षमतेच्या 47.54 टक्के भरले होते. तर धरणातील उपयुक्त पाणीसाठा 45 टीएमसी इतका होता.

हेही वाचलंत का?











Source link

Devendra Fadnavis On CM : Eknath Shinde यांनी मुख्यमंत्री व्हावं, हे मी पक्षाला सांगितल!

0
Devendra Fadnavis On CM : Eknath Shinde यांनी मुख्यमंत्री व्हावं, हे मी पक्षाला सांगितल!



<p>एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं, हे मी पक्षाला सांगितलं, ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट, तर उपमुख्यमंत्री होण्याचा फोन आला तो माझ्यासाठी धक्का होता, फडणवीसांचं वक्तव्य.</p>



Source link

Vasai Virar Flood : नालासोपारा शहरातील सखल भागात साचलं पाणी, शहरातील मुख्य रस्ते जलमय

0
Vasai Virar Flood : नालासोपारा शहरातील सखल भागात साचलं पाणी,  शहरातील मुख्य रस्ते जलमय



<p>वसई विरार नालासोपारा शहरात मागील चार दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला आहे. &nbsp;आजही सकाळपासून वसई विरार क्षेञात पावसाने आपली दमदार इनिंग सुरु ठेवली आहे. सखल भागात पाणी साचलेलं आहे. मागील चार दिवसापासून शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. आजही तिच परिस्थिती आहे. लोकांच्या सोसायटीत, घरात दुकानात पाणी शिरलं आहे. &nbsp;नालासोपारातील सेंट्रल पार्क, &nbsp;आचोले रोड, स्टेशन परिसर, नगिनदास पाडा, गाला नगर, संतोष भुवन, तसेच वसईचा गास सनसिटी रोड, मिठागर वसाहत, डी.जी. नगर, ओम नगर, अग्रवाल नगर, समता नगर, चुळणे तसेच विरारचं बोलींज आगाशी रोड, विवा कॉलेज आजही पाण्याखाली आहे. नागरीकांचे हाल बेहाल झाले आहेत. आज दिवसभर पावसाने आपली इनिंग अशीच सुरु ठेवली तर मग मोठ्या प्रमाणात हानी पोहचू शकते. &nbsp;प्रशासनाकडून अपील करण्यात आली आहे की, आज रविवार आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा बाहेर जाणं टाळा</p>



Source link

Nashik Accident: आईला रुग्णालयातून डिस्चार्ज; तिला घ्यायला गेलेल्या मुलावर काळाचा घाला

0
Nashik Accident: आईला रुग्णालयातून डिस्चार्ज; तिला घ्यायला गेलेल्या मुलावर काळाचा घाला


Nashik Road Accident: नाशिकमध्ये रस्ता अपघात २२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.



Source link

Raj Thackeray UPSC Student : युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार

0
Raj Thackeray UPSC Student : युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार



<p>केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार, तेज पर्व या सामाजिक संस्थेकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.</p>



Source link

Satara: साताऱ्यात खळबळ, एकाच कुटुंबातील चार जण राहत्या घरात मृतावस्थेत आढळले

0
Satara: साताऱ्यात खळबळ, एकाच कुटुंबातील चार जण राहत्या घरात मृतावस्थेत आढळले


आनंदा जाधव (पती) सुनंदा जाधव (पत्नी), संतोष (मुलगा) पुष्पलता (मुलगी) अशी मृतांची नावे आहेत. आनंद जाधव हे ढेबेवाडी येथील सणबूर येथे वास्तव्यास होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी हे सगळेजण त्यांच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा जाधव यांची तब्येत खालावल्याने त्यांना कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर गुरुवारी संध्याकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, आनंदा यांना श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. घरात वीजेची समस्या असल्याने पोर्टेबल ऑक्सिजन मशीनसाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. मात्र, रात्रभर जनरेटर सुरू ठेवल्याने त्यातून निघणाऱ्या धुरामुळे झोपेतच घरातील चौघांचा मृत्यू गुदमरून मृत्यू झाला, असे सांगितले जात आहे. परंतु, शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.



Source link

Amit Thackeray: …म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला; अमित ठाकरेंची प्रतिक्रिया

0
Amit Thackeray: …म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला; अमित ठाकरेंची प्रतिक्रिया


अमित ठाकरे म्हणाले की, शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन आम्ही नाशिकच्या दिशेने निघालो. समृद्धी महामार्गावरून जात असताना सिन्नर येथील टोलनाक्यावर कार थांबवण्यात आली. कारला फास्टटॅग असतानाही टोलनाक्यावरील फाटक उचलण्यात आले नाही. याबाबत कार्यकर्त्यांनी मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना कारण विचारले. त्यावर तांत्रिक कारण असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु, मॅनेजरसह कर्मचाऱ्याने उद्धट भाषेत वापरली. काही वेळानंतर कार सोडण्यात आली. पण, हॉटेल पोहचल्यानंतर टोकनाक्याची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली. राज ठाकरे यांच्यामुळे ६५ टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक बंद झाला, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली.



Source link

लोणावळ्यातील पर्यटकांच्या गर्दीतून सुटका हवीय, मग ‘या’ मिनी भुशी डॅमवर आनंद लुटा…

0
लोणावळ्यातील पर्यटकांच्या गर्दीतून सुटका हवीय, मग ‘या’ मिनी भुशी डॅमवर आनंद लुटा…


Lonavala Dam : लोणावळ्यामध्ये गेल्या आठवडा हा विक्रमी पावसाचा राहिला. अशात पर्यटकांची अपेक्षा ही पूर्ण झाली आणि वीकेंडच्या तोंडावर पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे हा निसर्ग धुक्यात हरवून गेला आहे. भुशी धरण ओसंडून वाहत आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांतून धबधबे खळखळत आहेत. परिणामी पर्यटकांनी हा परिसर फुलून गेलाय. येथे तुफान गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. अशात हौशी पर्यटकांकडून इथं नको ते उद्योगही केले जातात. अशा गर्दीत काही पर्यटक जायला मात्र, कचरत आहे. पण या गर्दी पर्यटकांची वाट लोणावळा लगतच मिनी भुशी डॅम पाहत आहे. या मिनी भुशी डॅमबाबत अनेकांना माहिती नाही.

लोणावळ्यातील ‘मिनी भुशी डॅम’

लोणावळ्यातील भाजे लेणी परिसरात भुशी डॅम प्रमाणेच पायऱ्यांवरून खळखळत वाहणाऱ्या पाण्यात तुम्हाला आनंद लुटता येणार आहे. ज्या पर्यटकांना लोणावळ्यातील गर्दीतून सुटका करायची आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. लोणावळ्याच्या आजुबाजूला अनेक धबधबे आहेत. हा निसर्ग पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात. त्यात सगळ्यात जास्त तरुणांचा समावेश असतो. अनेक नागरिकांच्या अतिउत्साहामुळे गर्दी होते आणि अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे गर्दी नसलेल्या ठिकाणी नागरिक पसंती देतात. त्यांच्यासाठी लोणावळ्यातील भाजे लेणी परिसरातील हा धबधबा अनेक पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे.

वरंधा घाट बंद…

भोर-महाड मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शनिवार (22 जुलै) पासून  भोर- महाड राष्ट्रीय महामार्गावरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरता संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. 22 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत भोर घाट अवजड वाहतुकीकरता संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. 

मढे घाट बंद…

वेल्हा तालुक्यातील केळद-भोर्डी गावाच्या हद्दीतील मढे घाट धबधबा परिसरात प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटकांना दोरखंडाद्वारे खाली सोडण्यास पुढील 60 दिवस प्रतिबंध घालण्याचे आदेश भोर उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी जारी केले आहेत. हा परिसर पर्जन्यमानाचा प्रदेश असल्याने प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये काही संस्था, आयोजक हे पर्यटकांना प्रवाही धबधब्याच्या वरील भागातून खाली दरीमध्ये 200 ते 300 फुटांपर्यंत दोरखंडाद्वारे सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेता धबधब्याच्या ठिकाणी असे कार्य करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.

हेही वाचा-

Pune  PMPML News : PMPMLच्या सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई; तब्बल 36 कर्मचाऱ्यांचं थेट निलंबन

 



Source link

Santacurz: मुंबईच्या सांताक्रुझमध्ये गटर साफ करताना वीजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

0
Santacurz: मुंबईच्या सांताक्रुझमध्ये गटर साफ करताना वीजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू


Santacurz electric shock: मुंबईच्या सांताक्रुझ परिसरात वीजेचा धक्का लागल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.



Source link

कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता

0



Kolhapur Rain Update: कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता



Source link