Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2904

सातार्‍याजवळ सशस्त्र दरोडेखोरांची रेकी | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा शहरालगत वाढे फाटा येथे अपार्टमेंट व बंगला पाहून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने धारदार कोयत्यांसह टोळी फिरत असल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांना फुटेज दाखवूनही त्यांनी दखल घेतली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवार, दि. 21 रोजी पहाटे सीसीटीव्हीमध्ये हे दरोडेखोर कैद झाले आहेत. वाढे फाटा परिसरात अनेक अपार्टमेंट तसेच बंगले आहेत. शुक्रवारी पहाटे एका अपार्टमेंट परिसरात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे एका वॉचमनच्या लक्षात आले. वॉचमनने सीसीटीव्ही पाहिल्यानंतर काहीजण तोंडाला मास्क घालून पाहणी करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सीसीटीव्ही व्यवस्थित पाहिल्यानंतर दरोडेखोरांच्या हातात धारदार कोयते व चाकू असल्याचे दिसत होते. ही सर्व घटना पाहून वॉचमन घाबरला. पहाटेची वेळ असल्याने वॉचमनने याबाबतची माहिती सोसायटीमधील काही जणांना देण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोर परिसरात काही बंगल्याची पाहणी करत असल्याचे त्यांच्या हालचालीवरुन दिसत होते. सुमारे 5 ते 7 मिनिटे दरोडेखोर एकाच परिसरात फिरत होते. दरोडेखोर कुठे जातात यावर वॉचमनने लक्ष ठेवले. पहाटे नागरिक फिरण्यासाठी जात असल्याने त्यांची लगबग पाहून काही वेळानंतर दरोडेखोर तेथून पसार झाले.

कंपाऊंडच्या तारा तोडल्या…

दरोडेखोर पाचपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले असता त्यांच्याकडे वाहन कोणते होते, हे समजू शकले नाही; मात्र तिघेजण टेहळणी करत असल्याने त्यांच्या सोबत आणखी काहीजण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरोडेखोरांनी एका कंपाऊंडच्या जाळ्या तोडल्या आहेत. यामुळे ते तयारीनिशी आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

The post सातार्‍याजवळ सशस्त्र दरोडेखोरांची रेकी appeared first on पुढारी.



Source link

Kangana Ranaut: हृतिक रोशननंतर मी वीरदास…; ‘रिव्हॉल्व्हर रानी’तील ‘त्या’ सीनवर कंगना रनौत ‘हे’ काय म्हणाली?

0
Kangana Ranaut: हृतिक रोशननंतर मी वीरदास…; ‘रिव्हॉल्व्हर रानी’तील ‘त्या’ सीनवर कंगना रनौत ‘हे’ काय म्हणाली?


एका मीडिया रिपोर्टमध्ये कंगनाच्या या किसबद्दल लिहिण्यात आले होते. कंगना रनौतने याच रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, ‘हृतिक रोशननंतर मी गरीब वीर दासची इज्जत लुटली? हे कधी घडले?’ यात तिने पुढे हसण्याचे इमोजी देखील टाकले आहेत. २०१६-१७मध्ये हृतिक आणि कंगना यांच्यात जोरदार वाद झाला होता. एवढेच नाही तर, यादरम्यान दोघांमध्ये कायदेशीर वादही झाला. दोघांच्या अफेअरचीही बरीच चर्चा झाली होती, मात्र याला हृतिकने नेहमीच नकार दिला आहे.



Source link

B Subhash: आधी पत्नीची साथ सुटली वर्षभरातच लेकीचंही निधन; प्रसिद्ध दिग्दर्शकावर दुःखाचा डोंगर

0
B Subhash: आधी पत्नीची साथ सुटली वर्षभरातच लेकीचंही निधन; प्रसिद्ध दिग्दर्शकावर दुःखाचा डोंगर


B Subhash Daughter Death: बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बी सुभाष यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बी सुभाष यांच्या मुलीचे निधन झाले आहे.



Source link

Akanksha Juneja: ऑनलाईन जेवण ऑर्डर करणं अभिनेत्रीला चांगलंच महागात पडलं! लागला हजारोंचा चुना

0
Akanksha Juneja: ऑनलाईन जेवण ऑर्डर करणं अभिनेत्रीला चांगलंच महागात पडलं! लागला हजारोंचा चुना


Akanksha Juneja Online Fraud: गेल्या काही काळापासून सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, अनेक कलाकार या घोटाळ्यांना बळी पडले आहेत.



Source link

weather update : विदर्भात, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज, यलो अलर्ट जारी

0
weather update : विदर्भात, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज, यलो अलर्ट जारी


हवामान विभागाने पुणे, सातारा, कोल्हापूर, पालघर, रायगड. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, मुंबई, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



Source link

Jawan: प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी शाहरुख खान झालाय सज्ज; ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘जवान’चं पहिलं गाणं!

0
Jawan: प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी शाहरुख खान झालाय सज्ज; ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘जवान’चं पहिलं गाणं!


‘जवान’ चित्रपटाचा प्रिव्ह्यू व्हिडीओ १० जुलै रोजी रिलीज झाला होता, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लोक या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. मात्र, ट्रेलरची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. या दरम्यान आता ‘जवान’च्या पहिल्या गाण्याची चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाचे पहिले गाणे २६ जुलै रोजी प्रदर्शित होत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



Source link

Samantha Ruth Prabhu: मनोरंजन विश्वातून ब्रेक घेताच समंथा रुथ प्रभूने लूकच बदलला! व्हिडीओ पाहून चाहते म्हणतायत…

0
Samantha Ruth Prabhu: मनोरंजन विश्वातून ब्रेक घेताच समंथा रुथ प्रभूने लूकच बदलला! व्हिडीओ पाहून चाहते म्हणतायत…


या लूकमध्ये समंथा रुथ प्रभू हिने तिचे केस लहान केले आहेत. नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर गोड हसू लेवून तिने आपली जबरदस्त स्टाईल दाखवली आहे. हिरव्या रंगाच्या ब्रालेट टॉपमध्ये समंथा खूपच सुंदर दिसत आहे. ही व्हिडीओ क्लिप शेअर करताना समंथाने हार्ट इमोजी शेअर केला आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच समंथाच्या या नव्या लूकचे खूप कौतुक केले आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. समंथाच्या या लूकवर कमेंट करत अभिनेत्री हंसिका मोटवानीने लिहिले की, ‘नेहमीप्रमाणेच सुंदर.’ समंथाचा हा लूक पाहून चाहते तिला ‘इंडियन बार्बी’ म्हणत आहेत. अनेक लोक सुंदर, जबरदस्त आणि सुंदर अशा कमेंट करून तिची प्रशंसा करत आहेत.



Source link

Rubina Dilaik: ‘छोटी बहु’ रुबिना दिलैक लवकरच आई होणार? व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी बांधला कयास!

0
Rubina Dilaik: ‘छोटी बहु’ रुबिना दिलैक लवकरच आई होणार? व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी बांधला कयास!


या व्हिडीओमध्ये रुबिना एका सुंदर ड्रेसमध्ये अतिशय किलर फोटोपोज देताना दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिला ती प्रेग्नंट आहे का, असे विचारण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘रुबिना प्रेग्नंट आहे का?’ असाच प्रश्न विचारणाऱ्या दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘रुबिनाजी तुम्ही प्रेग्नंट आहात का?’



Source link

Manoj Kumar Birthday: हरिकिशन गिरी गोस्वामी कसे बनले बॉलिवूडचे ‘मनोज कुमार’? हा किस्सा वाचाच…

0
Manoj Kumar Birthday: हरिकिशन गिरी गोस्वामी कसे बनले बॉलिवूडचे ‘मनोज कुमार’? हा किस्सा वाचाच…


मनोज कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले.या चित्रपटांमध्ये’हरियाली और रास्ता’, ‘वो कौन थी’, ‘शहीद’, ‘हिमालय की गोद में’, ‘गुमनाम’, ‘१९६५’, ‘संहारक’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ या चित्रपटांचा समावेश होता.मनोज कुमार यांना’उपकार’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.



Source link

24th July Headline: विधिमंडळ आणि संसदेचे अधिवेशन, इर्शाळवाडीमध्ये बचाव कार्य थांबवलं; आज दिवसभर

0
24th July Headline: विधिमंडळ आणि संसदेचे अधिवेशन, इर्शाळवाडीमध्ये बचाव कार्य थांबवलं; आज दिवसभर


24th July Headline: आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होतेोय. विरोधक 293 च्या प्रस्तावात शेतकऱ्यांच झालेल नुकसान, त्याचसोबत विकास कामांना सरकारने दिलेली स्थगिती यावर चर्चा होणार आहे. यासह आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे, 

इर्शाळवाडी दुर्घटना बचाव कार्य थांबले

बुधवारी, 19 जुलै रात्रीच्या सुमारास इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेचं बचाव कार्य आजपासून थांबवण्यात येणार आहे. चार दिवसाच्या बचाव कार्यानंतर आता हे काम थांबवत असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एकूण 228 लोकसंख्या असलेल्या गावात 27 जणांचा मृत्यू झालाय तर 57 जण अद्याप बेपत्ता आहेत. आतापर्यंत 143 जणांना जिवंत बाहेर करण्यात यश आलय. दोन कुटूंब पूर्ण मयत आहेत. सरकारकडून वाचलेल्या ग्रामस्थांची तात्पुरत्या स्वरूपात कंटेनरमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या कंटनेरची अवस्था वाईट असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणण आहे. सरकार सिडकोच्या माध्यमातून ग्रामस्थाचं कायमस्वरूपी पुनर्वसन करणार आहे.

विधिमंडळ अधिवेशन

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होतोय. विरोधक 293 च्या प्रस्तावात शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्याचसोबत विकास कामांना सरकारने दिलेली स्थगिती यावर चर्चा होणार आहे. ही चर्चा होत असताना विरोधक सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून अधिकारी झालेल्या दर्शना पवार या तरुणीचा खून झाला. राज्यात दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी, महिला बेपत्ता होण्याचे आणि एकतर्फी प्रेमातून महिलांवर वाढलेले हल्ले या विषयावरून विरोधक सत्ताधारी पक्षाला घेण्याचा प्रयत्न करतील. यासोबतच दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना शासनाने  तात्काळ कडक शिक्षा करण्याची मागणी लावून धरतील.

अनेक विभागांच्या पुरवणी मागण्यावरती ही चर्चा होणार आहे. खरं तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्वाधिक पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

विधानपरिषद

विधानपरिषदेत मराठवाड्यात अद्याप पेरणी योग्य पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. या विषयावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 93 अन्वये सूचनांचे निवेदन सादर करतील. या निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी विरोधी पक्ष लावून धरणार आहेत.

इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले होते. यावरून राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. याप्रकरणी सरकारने काय कारवाई केली हा सवाल विरोधी पक्षाकडून प्रामुख्याने उपस्थित होईल.

राज्यात लवकरच गणेश उत्सव येणार आहे. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसबाबत कुठल्याही प्रकारचं राज्य सरकारने धोरण जाहीर केलं नाही. सध्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालण्याच्या विचारात सरकार असल्यामुळे मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

संसदेच्या अधिवेशनाचा तिसरा दिवस

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज सुद्धा संसदेच्या दोन्ही सभागृहात मणिपूरच्या मुद्यावर गोंधळ होण्याची शक्यता आहे. राजस्थान, पश्चिम बंगला आणि छत्तीसगड मध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात भाजप खासदार गांधी पुतळ्यासमोर आंदेलन करणार आहेत, सकाळी 9.30 वाजता. तर इंडिया आघाडीचे नेते आज राज्यसभा विरोधी पक्ष नेत्याच्या दालनात बैठक करणार आहेत.

मान्सून अपडेट 

राज्यात पुढील पाच दिवस कोकण आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. कोकणात पावसाचा जोर तुलनेनं कमी झाला असला तरी गंभीर इशारे देण्यात आलेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला. मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर कमी होणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट देण्यात आलाय. पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

अमरावती

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक आहे. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार बच्चू कडू यांच्या गटात थेट लढत असेल. 

आजच्या सुनावणी

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या याचिकेवर आज शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टात सुनावणी होईल. संजय राऊत यांनी सामना पेपरमध्ये चुकीची बातमी छापून मेधा सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मात्र या बातमीचे स्रोत काय?, असा सवाल कोर्टानं संजय राऊत यांना विचारला आहे.

रस्त्यावरील मॅनहोल्सची झाकणं चोरणाऱ्यांवर रितसर गुन्हा का दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानं दिल्यानंतर पालिका आणि पोलीस प्रशासन या मुद्द्यावर आता अँक्शन मोडमध्ये आले आहेत. मान्सून दरम्यान पाणी भरलेलं असताना मॅनहोल्सची कामं करण कठीण असल्यातं पालिकेनं गेल्या सुनावणीत हायकोर्टात सांगितलं आहे. मात्र या समस्येवर उपाययोजना सुरू असल्याची हायकोर्टात ग्वाही पालिकेनं दिली आहे. यासंदर्भाताल जनहित याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होईल.

DHFL प्रकरणातील आरोपी वाधवान पितापुत्रांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होईल.

 



Source link