Friday, June 26, 2026
Home Blog Page 29

कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि शिक्षणसेवेचा गौरव : विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

0
कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि शिक्षणसेवेचा गौरव : विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि शिक्षणसेवेचा गौरव : विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

फलटण : विठ्ठल बाबुराव निकाळजे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रात जिद्द, कष्ट, निष्ठा आणि प्रामाणिकपणे कार्य करत विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्कार व ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या विठ्ठल बाबुराव निकाळजे यांच्या कार्याचा यावेळी मान्यवरांनी गौरव केला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अर्जुन मलगुंडे सर (लाईफ मेंबर, रयत शिक्षण संस्था सातारा तथा श्री शंभू महादेव माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज, कुकुटवाड) होते. बोलताना ते म्हणाले, अत्यंत हलकीच्या परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.त्यांनी त्यांच्या परिस्थितीविषयी माहिती आताच दिली आहे. माझ्या अगोदरचे वक्ते म्हणाले की, त्याच त्याच गोष्ट उगाळत बसायचे नाही. पण नव्या पिढीला हा इतिहास माहिती असणे खूप आवश्यक आहे. संस्थेने दिलेल्या प्रत्येक शाखेत आपण प्रामाणिकपणे रयत शिक्षण संस्थेची सेवा आपण केलेली आहे. कर्मवीर आण्णांच्या विचारांचे पालन करत आपण ती सेवा केली आहे. आरोग्याचा जर विचार केला तर पंचवीस वर्षांपुर्षापुर्वी पाहिले होते तसेच आजही तुम्ही आहात.त्याचे गुपित मॅडच्या हातात आहे. आपले आरोग्य रोगमुक्त निरोगी रहावे अशी मी प्रार्थना करतो. आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा आपणास मी मनपूर्वक शुभेच्छा.

प्रमुख पाहुणे म्हणून श्री संदीप किर्दत सर (लाईफ मेंबर, रयत शिक्षण संस्था सातारा व प्राध्यापक, शिवाजी कॉलेज सातारा), श्री आबा धायगुडे (उपप्राचार्य, मालोजीराजे विद्यालय व जुनिअर कॉलेज लोणंद), श्री विष्णू काटकर (पर्यवेक्षक, मालोजीराजे विद्यालय व जुनिअर कॉलेज लोणंद), जयपा बेलदार (माजी सरपंच, सोनगाव ग्रामपंचायत), श्री प्रवीण गायकवाड, सौ. एच.आर.सी.एस.आर. फंड कमिशन इंडिया कंपनी, सुरवडी, श्री सुरेश चव्हाण (पोलीस पाटील, चव्हाणवाडी), श्री प्रशांत शिंदे (उपसरपंच, चव्हाणवाडी), श्री गोरख शिंदे (ग्रामपंचायत सदस्य, सुरवडी), श्री चेतन चव्हाण (माजी उपसरपंच, चव्हाणवाडी), श्री सचिन शिंदे (युवा उद्योजक, चव्हाणवाडी), श्री सचिन अहिरेकर (उद्योजक, चव्हाणवाडी), सौ. सुप्रिया अहिरेकर मॅडम (स्कूल कमिटी सदस्य, ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी), श्री सुरेश भोईटे (माजी मुख्याध्यापक, श्रीगोंदा), सौ. प्रतिभाताई शिंदे (जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा), श्री मोरे सर (मुख्याध्यापक, धुळदेव हायस्कूल), श्री सुतार सर (मुख्याध्यापक, भोळी हायस्कूल), सौ. जाधव मॅडम (मुख्याध्यापिका, जिंती हायस्कूल), श्री थोरात सर (कोऱ्हाळे हायस्कूल), तसेच श्री एस.टी. कांबळे सर (मरळी पाटण) उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत भोईटे सर (उपशिक्षक, आदर्श विद्यालय शिरवळ) यांनी केले. प्रास्ताविक श्री सुरेश भोईटे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री दहापट सर यांनी मानले.
या प्रसंगी विद्यालयातील सहकारी सेवक बंधू-भगिनी, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष भीमराव लोंढे सर व सर्व पदाधिकारी, आयु. दादासाहेब भोसले (केंद्रीय असिस्टंट ऑफिसर, समता सैनिक दल), आयु. सोमीनाथ घोरपडे सर (संस्कार सचिव, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा पूर्व), संपूर्ण बीबीएम फॅमिली, सर्व स्नेही-मित्रमंडळी, श्री अरविंद काकडे (आरटीओ मुंबई, निवृत्त), तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

विशेषतः पुणे खराडी येथे धम्मकार्य करणारे आयु. तानाजी जगताप, तसेच बंधू चंद्रकांत निकाळजे, सोनगाव येथील स्नेही व मित्रमंडळी यांनी भावुक होत विठ्ठल बाबुराव निकाळजे यांना मिठी मारून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक स्पर्श लाभला. बीबीएम फॅमिलीच्या वतीने भारतीय बौध्द महासभा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष महावीर भालेराव यांनी बोलकी प्रतिक्रिया देऊन बीबीएम फॅमिलीच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

विठ्ठल बाबुराव निकाळजे यांनी आपल्या सेवाकाळात शिक्षण, संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवत अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित हा गौरव सोहळा उपस्थितांच्या मनात कायम स्मरणात राहील, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. यावेळी ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट स्वागत गीत गायिले. त्याचप्रमाणे हलगीच्या तालावर मान्यवरांचे स्वागत केले.

कालकथित विशाखा इंद्रजित थोरात यांच्या पवित्र अस्थींचे कल्याणमध्ये आगमन

0
कालकथित विशाखा इंद्रजित थोरात यांच्या पवित्र अस्थींचे कल्याणमध्ये आगमन

कालकथित विशाखा इंद्रजित थोरात यांच्या पवित्र अस्थींचे कल्याणमध्ये आगमन

    कल्याण (दि. ०८ एप्रिल २०२६) –कालकथित विशाखा इंद्रजित थोरात यांच्या पवित्र अस्थी आज पहाटे सुमारे ४ वाजता जपानमधील ओसाका येथून कल्याण येथे आणण्यात आल्या. थोरात साहेब स्वतः या पवित्र अस्थी सोबत घेऊन आले असून, परिसरात भाविकांमध्ये श्रद्धा व भावनांचा ओलावा पाहायला मिळत आहे.
आज  दुपार १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत या पवित्र अस्थींचे दर्शन कल्याण येथील मंगला व्हॅली क्लब हाऊस येथे ठेवण्यात येणार आहे.  या काळात मोठ्या संख्येने अनुयायी, नातेवाईक व नागरिक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
तसेच, उद्या दि. ०९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दादर येथील चैत्यभूमी येथे पवित्र अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या विधीसाठीही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जलदान विधीची तारीख पुढे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली असून, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

फलटण प्रजा परिषदेत बाबासाहेबांच्या सहवासाचा अमूल्य ठेवा — गजराबाई मोरे यांच्या आठवणी समाजापर्यंत

0
फलटण प्रजा परिषदेत बाबासाहेबांच्या सहवासाचा अमूल्य ठेवा — गजराबाई मोरे यांच्या आठवणी समाजापर्यंत

फलटण प्रजा परिषदेत बाबासाहेबांच्या सहवासाचा अमूल्य ठेवा — गजराबाई मोरे यांच्या आठवणी समाजापर्यंत

फलटण :- फलटण येथे पार पडलेल्या ऐतिहासिक प्रजा परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासाचा लाभ मिळालेल्या गजराबाई मोरे यांच्या आठवणी समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अलीकडेच पुढे आले आहे. त्या वेळी बाबासाहेबांना जवळून पाहण्याची, त्यांना स्पर्श करून पाया पडण्याची मिळालेली संधी गजराबाई यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला होता.
या अमूल्य ऐतिहासिक आठवणी समाजासमोर मांडल्याबद्दल जयंती समिती तसेच शिलाताई अहिवळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सामान्य कार्यकर्त्यांच्या आणि निष्ठावंत अनुयायांच्या अशा आठवणी केवळ इतिहास जतन करत नाहीत, तर पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात.
बाबासाहेबांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव केवळ मोठ्या चळवळींमध्येच नव्हे, तर अशा सामान्य व्यक्तींच्या आयुष्यात खोलवर उमटलेला दिसून येतो. गजराबाई मोरे यांच्यासारख्या साक्षीदारांच्या अनुभवातून त्या काळातील सामाजिक परिवर्तनाची जाणीव आजच्या पिढीला अधिक स्पष्टपणे होते.
अशा प्रकारच्या ऐतिहासिक स्मृती जतन करून समाजापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असून, यामुळे बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचत राहील.

संघर्षातून घडलेला शिक्षक: आयुष्यमान विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास”

0
संघर्षातून घडलेला शिक्षक: आयुष्यमान विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास”

संघर्षातून घडलेला शिक्षक: आयुष्यमान विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास”

संघर्षातून घडलेला शिक्षक: आयुष्यमान विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास”

साहस Times : जिद्द, कष्ट आणि निष्ठेच्या बळावर आयुष्य घडवणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या आयुष्यमान श्री. विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या या व्यक्तिमत्त्वाने आपल्या अथक परिश्रमातून केवळ स्वतःचेच नव्हे, तर असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्याचे कार्य केले.
त्यांचा जन्म ५ मे १९६८ रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोनगाव येथे झाला. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, वडील शेती व्यवसायात आणि आई गृहिणी दोघेही अशिक्षित असतानाही त्यांनी शिक्षणाची कास कधीही सोडली नाही. तीन भाऊ व तीन बहिणी अशा मोठ्या कुटुंबात वाढताना अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी आपली वाट स्वतःच निर्माण केली.
शेती हा कुटुंबाचा मूळ व्यवसाय असताना वडिलांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. चार कुटुंबांचा भार सांभाळत त्यांनी कष्टाने संसार उभा केला; मात्र १९७६ साली नांगराच्या फाळामुळे झालेल्या धनुर्वाताने त्यांचे अकाली निधन झाले आणि लहान वयातच कुटुंबाचा आधार हरपला. इयत्ता चौथीत असतानाच वडिलांचे छत्र हरपले, तरी त्यांच्या आठवणी मनात आजही ताज्या आहेत. चौथी पास झाल्यावर आणलेले पेढे आणि शेतातील कष्ट हेच पुढील आयुष्याचे प्रेरणास्थान ठरले. त्यानंतरची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. दोन वेळचे अन्नही मिळणे कठीण झाले होते. कुंजीर, माठ, कुरडू अशा साध्या रानभाज्यांवर दिवस काढावे लागले. कधी रात्रीच्या अंधारात ऊस आणून बंद दाराआड उपासमार भागवावी लागली.
गरीबीचे चटके आणि अपमान पचविणारा प्रसंग :
इयत्ता पहिलीमध्ये असताना आईने शेतात ज्वारीची राखण करण्यासाठी पाठविले. सकाळची वेळ होती. मी आणि माझा एक चुलत भाऊ शेतामध्ये जात असताना शेजारच्या शेतात मकेची कणसं लागलेली होती. पोटात खूप भूक लागली होती. आम्ही दोघांनी चार कणसे मोडली. तेवढ्यात एका शेजारच्या माणसाने आम्हाला पाहिले आणि पकडून चावडीवर त्या कणसांसह वरात काढत आणले. शेताचा मालक आला, पोलिस पाटील व गावातील चार प्रतिष्ठित माणसे जमा झाली. आईला तिथे बोलावण्यात आले. त्यावेळी नको-नको ते शब्द ऐकावे लागले. शेवटी आईने माफी मागितली आणि पुन्हा अशी चूक होणार नाही, याचे लेखी स्टेटमेंट लिहून घेतले. तो प्रसंग आजही मनाला चटका लावून जातो.
आईने मोठ्या धैर्याने सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या; पण कुटुंब मोठे असल्याने त्यांना बहिणीकडे शारदानगर येथे पाठवण्यात आले. तिथे शिक्षणासोबत घरकाम, जनावरांची देखभाल अशी सर्व कामे करत त्यांनी दोन वर्षे काढली.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनगाव येथे इयत्ता चौथीपर्यंत झाले. वडिलांच्या निधनानंतर शिक्षणाची जबाबदारी अधिकच वाढली. अशा वेळी त्यांनी बहीण सौ. अनुसया वामन भोसले यांच्या सहकार्याने शारदानगर येथे इयत्ता पाचवी व सहावी पूर्ण केली. त्यानंतर पुन्हा सोनगाव (राजाळे सर्कल) येथे इयत्ता सातवीचे शिक्षण घेतले. इयत्ता आठवी ते दहावीचे शिक्षण जानाई हायस्कूल, राजाळे येथून पूर्ण केले. सन १९८४ मध्ये शाळेच्या पहिल्याच बॅचचा निकाल १००% लागण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.
इयत्ता दहावी (१९८४) बोर्ड परीक्षा होती; पण ४२ रुपयांची परीक्षा फी भरण्यासाठी पैसे नव्हते. आई आठ दिवस वणवण पैसे मागत फिरत होती, पण पैसे मिळाले नाहीत. गावातील एक दानशूर व्यक्ती श्री. रामभाऊ बेलदार यांनी ती फी भरण्यासाठी मदत केली. आईने त्यांच्या शेतामध्ये काम करून पैसे फेडले.
पुढील शिक्षणासाठी त्यांनी बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात प्रवेश घेऊन अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९९१ साली बी.एड. पदवी संपादन करून त्यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न साकार केले.
पुढील शिक्षणासाठी संघर्ष अधिकच वाढला. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक माहिती व साधनसामग्री काहीच नव्हते. अंगावर चांगले कपडेही नव्हते. भावाचा शर्ट-पँट घालून, पायात साधी स्लीपर घालून त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच दूध वितरण, मेडिकलमध्ये काम अशा छोट्या-मोठ्या कामांतून स्वतःचा खर्च भागवत त्यांनी शिक्षण सुरू ठेवले.
बी.एड.साठीही आर्थिक अडचणी आल्या; मात्र मेहुण्यांच्या मदतीने त्यांनी ते शिक्षण पूर्ण केले. उपजीविकेसाठी शेतातील उरलेले धान्य वेचणे, साध्या अन्नावर गुजराण करणे, मित्र तानाजी जगताप यांच्या मदतीने दिवस काढणे. या सर्व संघर्षातून त्यांनी आपला मार्ग तयार केला.
कॉलेज जीवनातील एक आठवण ते आवर्जून सांगतात, ती म्हणजे माथेरान सहल. सहलीला जाण्याची प्रचंड इच्छा होती; पण खिशात इतकेच पैसे होते की ये-जा आणि अत्यल्प खर्च भागेल. तरीही त्यांनी सहलीचा आनंद घेतला. झुक-झुक गाडीतच मुक्काम करून त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले हीच त्यांच्या जिद्दीची ओळख.
इयत्ता बारावीत असतानाच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिक्षक होण्याचा ध्यास घेतला आणि तो पूर्णही केला. घरातील अंधश्रद्धा, जावलीतील बोकड बळी यांसारख्या प्रथा त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून नाकारल्या. थोरल्या भावजयींच्या आजारपणात देवाकडे केलेल्या प्रार्थनेनंतरही त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मनातील देवावरील अंधविश्वास ढासळला. पुढे मेहुणे दादासाहेब भोसले यांच्या सहवासातून त्यांनी विवेक, विज्ञाननिष्ठा आणि परिवर्तनवादी विचार स्वीकारले.
२०१० साली भारतीय बौध्द महासभेच्या बौद्ध धम्माच्या परंपरेनुसार श्रामणेर होऊन त्यांनी धम्म चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. आजही ते तन, मन आणि धनाने या चळवळीत कार्यरत आहेत.
कार्यक्षेत्राची सुरुवात त्यांनी पुणे येथे वेल्डर म्हणून काम करून केली. १९९२ मध्ये सरस्वती माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, बीबी (ता. फलटण) येथे त्यांनी शिक्षक म्हणून सहा महिने सेवा दिली. त्यानंतर १९९४ मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय, पिंपरी-वाघेरी येथे त्यांनी सेवेत रुजू होऊन आपल्या शिक्षक जीवनाला खरी दिशा दिली.
५ जानेवारी १९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी श्री बल्हेश्वर विद्यामंदिर, बेल्हे (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे कार्य केले. १९९९ ते २००३ या कालावधीत कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, मोखाडा (जि. पालघर) या दुर्गम आदिवासी भागात त्यांनी चार वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली.
यानंतर १६ जून २००३ ते ३० नोव्हेंबर २००४ या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, नागाव (ता. महाड, जि. रायगड) येथे त्यांनी कार्य केले. पुढे १ डिसेंबर २००४ ते ३० जून २०१० या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, भोळी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.
१ जुलै २०१० ते १० जुलै २०१४ या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, सुरवडी (ता. फलटण) येथे त्यांनी सेवा दिली. त्यानंतर ११ जुलै २०१४ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव येथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेऊन त्यांना बढती देण्यात आली व पर्यवेक्षक म्हणून १ डिसेंबर २०२२ ते २८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय, दहिवडी येथे त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यानंतर २९ ऑगस्ट २०२३ पासून श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश हायस्कूल, चव्हाणवाडी (ता. फलटण) येथे त्यांनी कार्य सुरू ठेवले असून, ३१ मे २०२६ रोजी ते सन्मानाने सेवानिवृत्त होत आहेत.
३१ वर्षांच्या नोकरीत ते कधीच शाळेत उशिरा गेले नाहीत. रजेवर असताना १९९४ साली एकदाच उशीर झाला. तेव्हा पर्यवेक्षक श्री. वाल्लेकर सरांनी दिलेली शिकवण “वेळेवर या” त्यांनी आयुष्यभर पाळली.
सन २००२ मध्ये अचानक रक्तदाब वाढल्यामुळे त्यांच्या दृष्टीवर गंभीर परिणाम झाला आणि जवळजवळ ९०% दृष्टी कमी झाली. अनेक डॉक्टरांकडे उपचार झाले. डॉक्टरांनी दिलेल्या सकारात्मक शब्दांनी त्यांनी खंबीरपणे या संकटावर मात केली.
७ जून १९९४ रोजी साळूताई लक्ष्मण भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगी साळूताईंनी त्यांना खंबीर साथ दिली. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच त्यांनी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारली.
आज त्यांची दोन्ही मुले अजय आणि विजय उच्च शिक्षित असून वडिलांचा आदर्श पुढे नेत आहेत.
जीवनातील कठीण प्रसंगी चुलत बंधू चंद्रकांत निकाळजे, बहीण आणि मेहुण्यांनी मोठी साथ दिली. १९७६ मध्ये वडिलांचे आणि २०२३ मध्ये आईचे निधन झाले. हा त्यांच्या जीवनातील अत्यंत वेदनादायक टप्पा होता.
शालेय जीवनात त्यांनी खेळ क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. खो-खो, बॉल बॅडमिंटन, टेनिक्वाइट या खेळांमध्ये विद्यार्थ्यांना विभागीय व राज्यस्तरावर नेले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी यशस्वी झाले. प्राजक्ता शिरसाट (मेडिकल ऑफिसर), विनय काशीकर (मॅनेजर), प्रज्ञा शेजवळ (प्राध्यापक), अमोल मोहटकर (अधिकारी), अमेय मांडवकर (डॉक्टर), मेघा लेमन (उद्योजिका), अनिकेत (एमबीबीएस शिक्षण घेत आहे).

प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी नवे ध्येय निश्चित केले आहे. आधुनिक शेती, उद्योग उभारणी, बौद्ध स्थळांना भेट, सामाजिक व धार्मिक कार्यात सहभाग आणि मित्रपरिवारासोबत आनंदी जीवन.
संघर्ष, जिद्द आणि समाजासाठी झटणारी वृत्ती यांच्या बळावर त्यांनी केवळ स्वतःचे आयुष्य घडवले नाही, तर हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या सेवापूर्तीनंतरच्या आयुष्यास मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य लाभो, हीच मनोकामना!

शुभेच्छुक : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी कार्यकारणी व संपूर्ण BBM Family

मंगळवार पेठ, फलटण येथे भीम फेस्टिव्हलचा जल्लोष; साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांची दमदार भीमगीते सादर

0
मंगळवार पेठ, फलटण येथे भीम फेस्टिव्हलचा जल्लोष; साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांची दमदार भीमगीते सादर

मंगळवार पेठ, फलटण येथे भीम फेस्टिव्हलचा जल्लोष; साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांची दमदार भीमगीते सादर



फलटण :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने मंगळवार पेठ, फलटण येथे दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी भव्य “भीम फेस्टिव्हल” चे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण आपल्या अफलातून भीम गीतांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सांस्कृतिक महोत्सव समाजामध्ये समता, बंधुता आणि न्याय या विचारांचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कार्यक्रमामध्ये भीम गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांची उजळणी करण्यात येणार असून, युवकांमध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याचा उद्देश आहे.
स्थानिक नागरिकांसह परिसरातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमाचे नियोजन भव्य स्वरूपात करण्यात आले असून, आयोजकांनी सर्वांना उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.

फलटणमध्ये महत्त्वपूर्ण राजकीय बैठक; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती

0
फलटणमध्ये महत्त्वपूर्ण राजकीय बैठक; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती

फलटण : – फलटण तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग देणारी एक महत्त्वपूर्ण बैठक उद्या, मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ४:३० वाजता कोळकी येथील अनंत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्यामुळे तालुक्यातील राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

या बैठकीत स्थानिक विकासकामांचा आढावा, आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बळकटीकरण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः येणाऱ्या काळातील राजकीय समीकरणांवर या बैठकीचा प्रभाव पडू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. श्रीमंत रामराजे नाईक  यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी ही बैठक फलटणच्या राजकारणाला नवी दिशा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्री क्षेत्र फलटण येथील ऐतिहासिक घोडा यात्रा २०२६  उत्साहात साजरी होणार

0
श्री क्षेत्र फलटण येथील ऐतिहासिक घोडा यात्रा २०२६  उत्साहात साजरी होणार

श्री क्षेत्र फलटण येथील ऐतिहासिक घोडा यात्रा २०२६ उद्या उत्साहात साजरी होणार


फलटण (जि. सातारा) : येथील प्रसिद्ध घोडा यात्रा सोहळा उद्या, मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक उत्साहात साजरा होणार आहे. महानुभाव पंथीयांसाठी “दक्षिण काशी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नगरीत दरवर्षी चैत्र वद्य पंचमीला हा भव्य सोहळा भरतो.
 धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी
फलटण हे महानुभाव पंथाचे महत्त्वाचे केंद्र असून येथे पंचकृष्ण उपासनेची परंपरा आहे. येथील शुक्रवार पेठेतील गवळीवाडा परिसरातील प्राचीन श्रीकृष्ण नाथ मंदिर यादवकालीन असून, या मंदिराला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे.
मंदिराशी संबंधित अनेक दैवी कथा, लीळा आणि चमत्कार आजही भक्तांमध्ये श्रद्धेने सांगितले जातात. बाणगंगा नदीकाठी असलेले श्री चक्रपाणी महाराजांचे जन्मस्थान मंदिर देखील भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे.
 घोडा यात्रेची परंपरा
घोडा यात्रेची परंपरा अठराव्या शतकापासून सुरू असल्याचे मानले जाते. जेजुरीकडे निघालेल्या खंडोबा भक्तांच्या पितळी घोड्याशी संबंधित चमत्कारामुळे ही परंपरा सुरू झाली.
आजही भक्त पितळी घोडे डोक्यावर घेऊन मिरवणुकीत सहभागी होतात. या यात्रेत नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक चांदीचे किंवा पितळेचे घोडे अर्पण करतात.
 .पालखी सोहळा व मिरवणूक
यात्रेच्या मुख्य दिवशी दुपारी सुमारे २ वाजता पालखी मिरवणूक निघते.
श्री आबासाहेब मंदिरातून सुरुवात
तेली आळी, दगडी पूल मार्गे
श्रीकृष्ण मंदिरात आगमन
त्यानंतर बाणगंगा नदीकाठ व इतर प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक
या मिरवणुकीत ढोल-ताशे, लेझीम, करंड्या-ढोलकी यांचा गजर होत असतो. हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होतात.
 भक्ती, नवस आणि परंपरा
भाविक आपल्या नवसासाठी पितळी घोडे अर्पण करतात
अन्नदान, वस्त्रदान यांसारख्या धार्मिक सेवा केल्या जातात
भजन, कीर्तन, प्रवचने यांचे आयोजन
मठपती, गवळी, माळी समाजाचे पारंपरिक मान
 राजाश्रय व परंपरेचे जतन
फलटण संस्थानचे नाईक निंबाळकर घराण्याचा या मंदिरांवर ऐतिहासिक आश्रय राहिला आहे. आजही या परंपरेचे जतन करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
विशेष आकर्षण
पितळी घोड्यांची मिरवणूक
पारंपरिक छबीना सोहळा (रात्री)
विविध प्रांतातून येणारे भाविक
धार्मिक सत्संग व व्याख्यानमाला

फलटणची घोडा यात्रा ही केवळ धार्मिक सोहळा नसून परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा एक अद्वितीय उत्सव आहे. आज यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

जोशी हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात डॉ. प्रसाद जोशी यांना ‘उषा-वैभव पुरस्कार’ प्रदान

0
जोशी हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात डॉ. प्रसाद जोशी यांना ‘उषा-वैभव पुरस्कार’ प्रदान

जोशी हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात डॉ. प्रसाद जोशी यांना ‘उषा-वैभव पुरस्कार’ प्रदान

जोशी हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात डॉ. प्रसाद जोशी यांना ‘उषा-वैभव पुरस्कार’ प्रदान
फलटण : येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित ‘जोशी हॉस्पिटल प्रा. लि.’ च्या रौप्यमहोत्सवी (२५ वर्षे) वर्षपूर्तीनिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘उषा-वैभव पुरस्कार’ सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रसाद जोशी यांना ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना उषा मंगेशकर यांनी डॉ. जोशी यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “हॉस्पिटलमध्ये केवळ रुग्णांची संख्या वाढणे महत्त्वाचे नसून, आलेला प्रत्येक रुग्ण बरा होणे अधिक महत्त्वाचे आहे.” तसेच त्यांनी डॉ. प्रसाद जोशी यांनी पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये येऊन सल्ला द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
उषाताईंनी यावेळी फलटणला यापूर्वी दिलेल्या भेटींची आठवण करून देत पुन्हा एकदा येथे येण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
या भव्य सोहळ्यास विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रल्हाद साळुंखे-पाटील, उद्योगपती दिलीपसिंह भोसले, पत्रकार रवींद्र बेडकिहाळ आणि स्वयंसिद्धा महिला उद्योग समूहाच्या संस्थापिका मधुबाला भोसले यांचीदेखील उपस्थिती लक्षणीय ठरली.
कार्यक्रमात जोशी हॉस्पिटलच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देत समाजात विश्वास निर्माण करणाऱ्या या संस्थेचा गौरव करत उपस्थितांनी डॉ. जोशी यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

फलटण शहर उजळलं! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य डायनॅमिक लायटिंगने ऐतिहासिक नगरी दिमाखात

0
फलटण शहर उजळलं! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य डायनॅमिक लायटिंगने ऐतिहासिक नगरी दिमाखात

:

फलटण : फलटण तालुक्यात सध्या अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पेठ मंगळवार ते आंबेडकर चौक हा परिसर आकर्षक आणि भव्य डायनॅमिक लायटिंगने झगमगून निघाला असून संपूर्ण फलटण शहर प्रकाशमय झाले आहे. या देखाव्यामुळे नागरिकांमध्ये विशेष उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जयंती महोत्सव समितीने हा उपक्रम हाती घेतला आहे. डॉ. आंबेडकरांना अनोखी मानवंदना देण्यासाठी समितीचे भीमसैनिक अहोरात्र मेहनत घेत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणे आकर्षक रोषणाईने सजवण्यात आली आहेत.
यंदाच्या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पंचशील ध्वजाच्या माध्यमातून एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न. फलटण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने हातात निळा ध्वज घेऊन या उत्सवात सहभागी होत असून सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे दर्शन घडत आहे.
फलटणची ऐतिहासिक नगरी आज नव्या तेजाने उजळून निघाली असून “आपलं सुंदर फलटण, हरित फलटण” ही संकल्पना अधिक दृढ होताना दिसत आहे. नागरिकांच्या सहभागामुळे आणि समितीच्या परिश्रमामुळे यंदाची जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजाळे येथे महिलांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई विवाह संस्कार दिनाचे नाट्यरूप सादरीकरण

0
राजाळे येथे महिलांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई विवाह संस्कार दिनाचे नाट्यरूप सादरीकरण


राजाळे येथे महिलांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई विवाह संस्कार दिनाचे नाट्यरूप सादरीकरण

राजाळे (ता. फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला जयंती महोत्सव समितीच्या वतीने ४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या विवाह संस्कार दिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. धम्मदीप बुद्ध विहारात नाट्यरूप सादरीकरणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष विवाह सोहळ्याचा अनुभव साकारण्यात आला.
या नाट्यरूप विवाह सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटणचे माजी सरचिटणीस व बौद्धाचार्य आयुष्यमान बाबासाहेब दिलीप जगताप यांनी भूमिका साकारली, तर त्यागमूर्ती माता रमाई यांच्या भूमिकेत आयु. पारिजातका बाबासाहेब जगताप यांनी प्रभावी अभिनय केला.

या सोहळ्याचे बौद्धाचार्य म्हणून भारतीय बौद्ध महासभा, फलटण शाखेचे माजी अध्यक्ष महावीर भालेराव यांनी संपूर्ण विधी पार पाडला. कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व तयारी महिला समितीच्या सदस्यांनी स्वतःहून केली असून, सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (इंग्लंड) येथील एलएलबी, आयआयटी दिल्ली व एलबीएस कॉलेज मुंबईचे शिक्षण घेतलेले ऍड.निखिल रेखा संजय अडसूळ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित महिलांशी संवाद साधला. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना महिलांच्या पुढाकाराचे अभिनंदन केले व बुद्ध, धम्म आणि संघाच्या विचारांचा अंगीकार करून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला आयु. सुमनबाई खरात, बहिणाबाई भालेराव, शोभा भालेराव, सुरेखा भालेराव, विश्रांती गायकवाड, कुसुम भालेराव, सीमा भालेराव, कल्पना भंडारे, मालन भालेराव, तृप्ती भालेराव, नीलम भालेराव, उज्वला भालेराव, नंदाताई भालेराव, शितल भोसले, अंजली खरात, उमा भालेराव, हौसाबाई खरात, राणी भोसले, चंदाराणी भालेराव, दीपाली कांबळे, शुभांगी भालेराव, मीनाक्षी खरात, शिवानी गायकवाड, ज्योती खरात, अश्विनी भालेराव, सुज्ञा भालेराव, स्वाती कांबळे, काजल सरतापे, संजना रणपिसे, प्रतीक्षा भालेराव, संगीता गायकवाड, कोमल भालेराव, सुप्रिया भालेराव, मानसी भालेराव, स्नेहलता आईवळे, मंगला आईवळे, पुनम भालेराव, रेखा भालेराव, वैशाली भालेराव, चारुशीला भालेराव, माधुरी भालेराव, सोनाली भालेराव, पूजा भालेराव, मोनाली सरतापे, शारदा मिसाळ, सारिका झेंडे, पुष्पा मोरे, उज्वला खरात, रेखा मोरे, छाया जगदाळे, राणी निकाळजे, अनिता खरात, सरिता भालेराव, तृप्ती खरात आदी उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या अनोख्या विवाह सोहळ्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची राजाळे येथे उत्साहात आणि धुमधडाक्यात सुरुवात झाली.