Friday, June 26, 2026
Home Blog Page 30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२६ : ‘आंबेडकरी चळवळ व आजचा तरुण’ विषयावर दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे प्रभावी काव्यमय व्याख्यान

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२६ : ‘आंबेडकरी चळवळ व आजचा तरुण’ विषयावर दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे प्रभावी काव्यमय व्याख्यान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२६ : ‘आंबेडकरी चळवळ व आजचा तरुण’ विषयावर दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे प्रभावी काव्यमय व्याख्यान


फलटण :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२६ यांच्या वतीने नुकताच एक भव्य, प्रेरणादायी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते प्रसिद्ध व्याख्याते ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे यांचे “आंबेडकरी चळवळ व आजचा तरुण” या ज्वलंत विषयावर सादर केलेले काव्यमय व्याख्यान. त्यांच्या ओघवत्या भाषाशैलीने आणि काव्यात्मक सादरीकरणाने उपस्थित श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ता (सर) अहिवळे हे मान्यवर उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन विजय येवले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय निकाळजे, मुन्ना शेख, राजा मारुडा, प्रा. शिवाजी सावंत, जे. एस. काकडे, विकास काकडे ( नगरसेवक ), सोमिनाथ घोरपडे, बाळासाहेब अहिवळे, कामगार संघटनेचे अध्यक्ष सनी काकडे, महादेव गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच युवा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कार्यक्रम अत्यंत सुरळीत आणि प्रभावीपणे पार पडला.
तरुणांना प्रबोधनाचा संदेश
आपल्या व्याख्यानातून नितीन चंदनशिवे यांनी आंबेडकरी चळवळीचा गौरवशाली इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आजच्या तरुणांसमोरील सामाजिक आव्हाने यावर अत्यंत मार्मिक भाष्य केले. त्यांनी तरुण पिढीने आंबेडकरी विचार आत्मसात करून समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांच्या काव्यमय शैलीमुळे विचार अधिक प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत आदर्श अहिवळे, शशिकांत अहिवळे, संघर्ष अहिवळे, सुजल गायकवाड, निसर्ग सावंत, स्वप्नील काकडे, संघराज अहिवळे, रोनित संघकारा अहिवळे, अनिकेत अहिवळे, प्रेम अहिवळे, अमर अहिवळे, साहिल अहिवळे, संविधान काकडे, साईराज कांबळे आणि हरीश काकडे या कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान राहिले.
एकंदरीत, हा कार्यक्रम केवळ जयंती उत्सव न राहता तरुणांसाठी दिशादर्शक आणि समाजप्रबोधन करणारा ठरला.

फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२६ उत्साहात; १ ते १४ एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

0
फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२६ उत्साहात; १ ते १४ एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२६ उत्साहात; १ ते १४ एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

फलटण : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२६’च्या वतीने १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत विविध सामाजिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना दिली जाणार आहे.
समितीने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दररोज सायंकाळी ५ वाजल्यापासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये समाजजागृतीसोबतच मनोरंजन आणि मार्गदर्शनाचा समतोल साधण्यात आला आहे.
 सामाजिक उपक्रम
महोत्सवाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ खेळ आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करून महिलांना सशक्त करण्यावर भर दिला जाणार आहे.
 प्रबोधन व चर्चासत्रे
‘संविधानाने आम्हाला काय दिले?’ या विषयावर विशेष चर्चासत्र, तरुणांसाठी उद्योजकता मार्गदर्शन, तसेच आंबेडकरवादी चळवळीसमोरील आव्हानांवर मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. यामुळे युवकांना प्रेरणा आणि दिशा मिळणार आहे.
 सांस्कृतिक कार्यक्रम
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भीम गीतांचे सादरीकरण, ‘बुद्ध-भीम गीतांचा ऑर्केस्ट्रा’, डान्स स्पर्धा, जादूचे प्रयोग आणि ‘प्रबुद्ध हो मानवा’ गायन पार्टी यांचा समावेश आहे. यामुळे वातावरणात उत्साह आणि सांस्कृतिक रंगत निर्माण होणार आहे.
 विशेष आकर्षणे
९ एप्रिल रोजी ‘व्ही. आय. पी. राहणे’ फेम सन्मान सोहळा पार पडणार असून, १३ एप्रिल रोजी भव्य अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
 १४ एप्रिल : मुख्य दिवस
जयंतीच्या मुख्य दिवशी म्हणजेच १४ एप्रिल रोजी सकाळी भीमज्योत स्वागत आणि ध्वजारोहण होणार आहे. सायंकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, शहरात ठिकठिकाणी निळे झेंडे आणि कमानी उभारून उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.
 समितीचे नियोजन व योगदान
या महोत्सवाचे नियोजन मा. हरिश (आप्पा) काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते आंबेडकरी चळवळीत सक्रिय असून त्यांच्या अनुभवाचा ठसा या महोत्सवात उमटणार आहे. त्यांच्यासह शशिकांत अहिवळे, स्वप्नील काकडे, सुजल गायकवाड, आदर्श अहिवळे, अनिकेत अहिवळे, संघराज अहिवळे, विराज घोडके, निसर्ग सावंत, संघर्ष अहिवळे, अमर अहिवळे, प्रेम अहिवळे, संघकारा अहिवळे, संविधान काकडे आणि साहिल अहिवळे यांसारखे अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
समितीने केलेल्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत असून, हा उत्सव ऐतिहासिक करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
 नागरिकांना आवाहन
“हा उत्सव केवळ आनंदाचा नसून वैचारिक प्रबोधनाचा व्हावा, या उद्देशाने विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची आखणी केली आहे. फलटणमधील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे,” असे आवाहन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे

सातारा झेडपीत ‘खाकी’च्या धाकात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडल्यानंतर सभापती निवडीतही वादाचा अध्याय

0


Satara Jilha Parishad: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या राड्यानंतर आज (4 मार्च) पुन्हा सभापती निवडीवरून जिल्हा परिषदेत वादंग उठले. भाजपने केलेली फोडाफोडी आणि जिल्हा प्रशासन यांच्या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभापती निवडीवर बहिष्कार टाकला. बहिष्कार, घोषणाबाजी आणि थेट आंदोलनामुळे राजकारण तापलं असून आता हा संघर्ष उघडपणे ‘तू-तू, मी-मी’पर्यंत पोहोचला. साताऱ्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना संघर्ष पेटला आहे. या वादानंतर जिल्ह्यातील मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील एका बाजूला तर विरोधात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. 

भाजपकडून प्रत्येक सभापतीपदासाठी एकच अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घोषित केले. महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ऋतुजा विराज शिंदे यांची निवड झाली. समाज कल्याण समितीच्या सभापतीपदाची धुरा ऋषीकेश धायगुडे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली. विषय समिती सभापती म्हणून लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशील कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

आगे आगे देखो होता है क्या 

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून सभापती निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. भाजप आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत सभागृहात प्रवेश केला आणि काही वेळात सभागृहातून बाहेर पडून जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. या घटनेनंतर मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली. शंभूराज देसाई यांनी सभापती निवड झाली म्हणजे जिल्हा परिषदच्या राजकारणाचा कालावधी संपला असं होत नाही. कालावधी पाच वर्षाचा आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असं सांगत आगे आगे देखो होता है क्या असा इशारा देसाई यांनी दिला.

आम्ही काल राजकारणात आलो नाही 

मकरंद पाटील यांनी सांगितले की, राजकारणामध्ये जय पराजय हे होत असतात. आज आमचे सदस्य जरी फोडले असले तरी ही वेळ त्यांच्यावर येणार आहे. आम्ही काल राजकारणात आलेलो नाही हे तुम्ही समजून घ्या. माझ्या कुटुंबात 50 ते 60 वर्ष जिल्ह्याच्या राजकारणाचा वारसा आहे. 100 टक्के याचे प्रतिउत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा पाटील यांनी दिला.

जाणीवपूर्वक सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न 

शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या टीकेला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिले. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा जिल्हा परिषदेत आमचं बहुमत असताना देखील आम्हाला जाणीवपूर्वक सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता, असे सांगितले. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की अध्यक्ष उपाध्यक्ष हा आमच्याकडे बहुमत असल्यामुळे आमचाच होणार. बहुमत नसल्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला हे सिद्ध झालं आहे असे शिवेंद्रराजे म्हणाले. शंभूराज देसाई आरोप आमच्यावर करतात आणि धमकी देखील तेच देतात हे सातत्याने घडल आले आहे. आताही ते म्हणत आहेत अजून पाच वर्ष आहेत तर आम्हीही ते बघायलाच बसलो असल्याचे जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link

सातारच्या ZP सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला

0


Satara Jilha Parishad: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून (20 मार्च रोजी) झालेला वाद ताजा असतानाच आज (4 एप्रिल) सभापती निवडीतही तेच दिसून आले. अध्यक्षपदासाठी भाजपने केलेल्या दंडेलशाहीचा विरोध करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य दंडावर काळी फित बांधून आले. भाजपने फोडाफोडीचा धंदा कायम ठेवला असून आणखी एक सदस्य फोडला आहे.  त्यामुळे सभापती निवडीवर राष्ट्रवादी अन् शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपचे चार सभापती होणार असल्याची माहिती आहे.  दरम्यान, सातारमधील राडा लक्षात घेत आज पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला असला, तरी सदस्यांनी ‘गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात’ असा आरोप केला. त्यामुळे गेटवर पोलिसांशी वादावादी झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे, अध्यक्ष निवडीत मंत्र्यांना झालेली धक्काबुक्की आणि पोलीस प्रशासनावरील आरोपांमुळे तो राज्यभर गाजला.  

अध्यक्ष निवडीत काय घडलं?

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 20 मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडीवेळी जोरदार राडा झाला होता. भाजपने राष्ट्रवादीचे तीन आणि शिंदेसेनेचे दोन सदस्य फोडून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. त्याचवेळी पोलिसांनी एका तक्रारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जिल्हा परिषदेतून बाहेर काढून नेले होते. त्यामुळे त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता. जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हते. 65 पैकी भाजपकडे 27 जागा होत्या, तर बहुमतासाठी 33 ची गरज होती. राष्ट्रवादी (20) आणि शिवसेना-शिंदे गट (15) यांनी एकत्र येत भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीचे 3 आणि शिवसेनेचे 2 सदस्य भाजपने फोडले. एका अपक्ष सदस्याच्या पाठिंब्यासह भाजपने 33 मते मिळवून सत्ता काबीज केली.

मंत्र्यांना धक्काबुक्की आणि पोलिसांवर आरोप

निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रचंड राडा झाला. शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी असा आरोप केला की, त्यांच्या आघाडीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी जाणीवपूर्वक मतदानापासून रोखले. या गोंधळात मंत्र्यांना धक्काबुक्की झाल्याचेही समोर आले, ज्यामुळे ‘शिंदे गट’ विरुद्ध ‘भाजप’ असा संघर्ष महायुतीतच पाहायला मिळाला. या वादाचे पडसाद विधिमंडळातही उमटले. ज्यावेळी हा राडा झाला, त्यावेळचे CCTV फूटेज गायब असल्याचे समोर आले. “वायर तुटल्याने कॅमेरे बंद होते” असे प्रशासनाचे स्पष्टीकरण शंभुराज देसाई यांनी फेटाळून लावत संशय व्यक्त केला. या प्रकरणी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणीही लावून धरण्यात आली होती. सभापती निलग गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षकांचे निलंबाने निर्देश दिले, पण नंतर मागे घेण्यात आले. आता सभापती निवडीसाठी अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link

फलटणमध्ये विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार उघड; ४ लाखांचा दंड, परवाना रद्द करण्याचा इशारा

0
फलटणमध्ये विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार उघड; ४ लाखांचा दंड, परवाना रद्द करण्याचा इशारा

फलटण प्रतिनिधी —फलटण शहरातील विक्रम गॅस एजन्सीच्या अनियमित व निष्काळजी कारभाराचा अखेर पुरवठा विभागाने थेट पंचनामा करत कठोर दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित एजन्सीवर तब्बल ४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, पुढील काळातही कारभारात सुधारणा न झाल्यास एजन्सीचा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे काही काळ गॅस पुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे पुरवठा सुरळीत होत असताना विक्रम गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. परिसरातील नागरिक २० ते २५ किलोमीटर अंतरावरून सकाळी आठ वाजल्यापासून रांगेत उभे राहत आहेत. उन्ह-पावसाची तमा न बाळगता ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्ती गॅस सिलेंडरसाठी दिवसन्‌दिवस प्रतीक्षा करत असल्याचे चित्र आहे.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, अनेकांनी महिनाभरापूर्वी गॅस सिलेंडरची नोंदणी केली असतानाही त्यांना सिलेंडर मिळालेला नाही. याउलट काही सिलेंडर २,००० रुपयांपर्यंत जास्त दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच काही सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक वापरासाठी वळवला जात असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.
याशिवाय १४.५ किलो क्षमतेच्या सिलेंडरमध्ये केवळ १० किलोच गॅस भरला जात असल्याचेही आढळून आले आहे. ग्राहकांना वजन करून देण्यासही एजन्सीकडून टाळाटाळ केली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एजन्सीचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी उद्धट वर्तन करत असल्याच्या तक्रारी देखील पुढे आल्या आहेत.
या सर्व प्रकारामुळे संतप्त ग्राहकांनी बुधवार (१ एप्रिल) रोजी एजन्सी कार्यालय बंद आढळल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. काहींनी कार्यालय पेटवण्याची धमकीही दिली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात घेऊन पुरवठा शाखेचे अधिकारी कांबळे यांनी तातडीने भेट देत एजन्सी व्यवस्थापनाला चांगलीच खरडपट्टी काढली.
दरम्यान, आधीच लावण्यात आलेला ४ लाख रुपयांचा दंड अद्याप वसूल झालेला नसून, तत्काळ सुधारणा करून ग्राहकांना नियमित गॅस पुरवठा करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा पुढील काळात आणखी कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

जपानमध्ये सहलीदरम्यान धम्म उपासिका कालकथित विशाखाताई थोरात यांचे हृदयविकाराने अकस्मात निधन; आंबेडकरी चळवळीत शोककळा

0
जपानमध्ये सहलीदरम्यान धम्म उपासिका कालकथित विशाखाताई थोरात यांचे हृदयविकाराने अकस्मात निधन; आंबेडकरी चळवळीत शोककळा

जपानमध्ये सहलीदरम्यान धम्म उपासिका कालकथित विशाखाताई थोरात यांचे हृदयविकाराने अकस्मात निधन; आंबेडकरी चळवळीत शोककळा

फलटण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे राहणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या व धम्म उपासिका कालकथित विशाखाताई थोरात यांच्या अकस्मात निधनाची अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. दि. १ एप्रिल २०२६ रोजी जपान येथे सहलीदरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
कालकथित विशाखाताई थोरात या बुद्धभूमी फाउंडेशनच्या सभासद असून त्यांनी बुद्ध, धम्म आणि संघ यांच्याप्रती अपार श्रद्धा ठेवत आयुष्यभर सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला. धम्मप्रसार, समाजप्रबोधन आणि मानवतावादी मूल्यांची जपणूक यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले.
त्यांचा साधा, शांत आणि सेवाभावी स्वभाव सर्वांना आपलासा वाटणारा होता. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थ भावनेने समाजासाठी योगदान दिले. त्यांच्या धम्मनिष्ठ जीवनशैलीमुळे त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या होत्या.
त्यांच्या या अचानक जाण्याने आंबेडकरी समाजात तसेच बुद्धभूमी परिवारात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे समाजाची मोठी व अपूरणीय हानी झाली असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
या दुःखद प्रसंगी थोरात कुटुंबीयांच्या दुःखात साहस Times सहभागी असून, त्यांना या कठीण काळात धैर्य व सहनशक्ती लाभो, हीच प्रार्थना व्यक्त करण्यात आली आहे. तसेच,  कालकथित विशाखाताईंना बुद्ध चरणी सुगती लाभो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
️ श्रद्धांजली संदेश
“धम्मसेवेत आयुष्य वेचलेल्या विशाखाताई थोरात यांचे जाणे ही समाजासाठी अपूरणीय हानी आहे. त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.”

नातेपुतेत भीषण अपघात : कालव्यात कार कोसळून तिघांचा मृत्यू, चालक थोडक्यात बचावला

0
नातेपुतेत भीषण अपघात : कालव्यात कार कोसळून तिघांचा मृत्यू, चालक थोडक्यात बचावला

नातेपुते :- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरात आज पहाटे भीषण अपघात घडला. मुंबईहून फोंडशिरसकडे जात असलेली इर्टिगा कार जुन्या पालखी महामार्गावरील निरा उजव्या कालव्याच्या पुलावरून थेट पाण्यात कोसळली. ही घटना सकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
या दुर्घटनेत प्रीती टिळेकर, हनुमंत जठार आणि मंजू जठार  यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे हे तिघे एकाच कुटुंबातील असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चालक सुनील टिळेकर हे मात्र सुदैवाने बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने कठडा तोडत थेट खोल कालव्यात झेप घेतली. अपघात इतका गंभीर होता की कारमधील तिघांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने मोठ्या प्रयत्नांनंतर पाण्यात बुडालेली कार बाहेर काढण्यात आली.
या दुर्दैवी घटनेमुळे नातेपुते परिसरात शोककळा पसरली असून संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर

0
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर

फलटण :- फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि काही अटींसह हा जामीन दिला.
पाच महिन्यांनंतर कारागृहातून सुटका
23 ऑक्टोबर 2025 रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यात आली होती.
गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या बदनेने जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला दिलासा दिला.
प्रकरणाचा तपशील काय?
मूळची बीड येथील असलेली ही महिला डॉक्टर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होती. ती प्रशांत बनकर यांच्या घरी भाड्याने राहत होती.
काही कारणावरून घरमालक आणि डॉक्टर यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर तिच्या राहत्या घराला कुलूप लावण्यात आले.
या घटनेनंतर डॉक्टरने ‘मधूदीप’ हॉटेलमध्ये रूम घेतली. तिने मदतीसाठी प्रशांत बनकर आणि PSI गोपाळ बदने यांच्याशी संपर्क साधला होता, मात्र तिला अपेक्षित मदत मिळाली नाही.
रुमच्या दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी तो तोडला असता, डॉक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी तिने स्वतःच्या हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत बदने आणि बनकर यांच्याकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाचा उल्लेख केला होता.
न्यायालयाचा निर्णय आणि पुढील दिशा
या प्रकरणात पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीत सरकारी आणि बचाव पक्षाने जोरदार युक्तिवाद मांडला. त्यानंतर न्यायालयाने अटींसह गोपाळ बदनेचा जामीन अर्ज मंजूर केला.
या निर्णयानंतर तपास यंत्रणा पुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्हा परिषदेत कडेकोट बंदोबस्त; ४ एप्रिलच्या विशेष सभेसाठी प्रशासन सज्ज

0
सातारा जिल्हा परिषदेत कडेकोट बंदोबस्त; ४ एप्रिलच्या विशेष सभेसाठी प्रशासन सज्ज

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत समाज कल्याण, महिला व बालकल्याण तसेच इतर विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडीसाठी ४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या विशेष सभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. मागील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आदेश जारी करत जिल्हा परिषद इमारतीच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हे निर्बंध ४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सभा संपेपर्यंत लागू राहणार आहेत.
मागील निवडणुकीत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, घोषणाबाजी आणि ढकलाढकलीमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेचे पडसाद विधानसभेत आणि विधान परिषदेतही उमटले होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली होती.
नवीन आदेशानुसार, केवळ नवनिर्वाचित सदस्य, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी यांनाच जिल्हा परिषद परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. इतर सर्वांसाठी प्रवेशबंदी लागू करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकतेने पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने तैनात करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे संभाव्य तणाव टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट, गोपाळ बदनेला जामीन मंजूर, पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर

0


Phaltan Doctor Case: फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या खळबळजनक आत्महत्या प्रकरणात गेल्या पाच महिन्यांपासून कारागृहात असलेल्या बडतर्फ पीएसआय (PSI) गोपाळ बदने याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि काही अटींवर हा जामीन दिला आहे.

Phaltan Doctor Case: पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर

23 ऑक्टोबर 2025 रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आली होती. बदने गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याने जामिनासाठी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.

Phaltan Doctor Case: नेमकं प्रकरण काय होतं?

मूळची बीड येथील असलेली ही महिला डॉक्टर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होती. ती प्रशांत बनकर याच्या घरी भाड्याने राहत होती. काही कारणास्तव घरमालक बनकर आणि डॉक्टर यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर तिच्या घराला कुलूप लावण्यात आले होते. यानंतर तिने ‘मधूदीप’ हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी खोली आरक्षित केली. तिने मदतीसाठी प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ बदने याच्याशी संपर्क साधला होता, मात्र तिला अपेक्षित मदत मिळाली नाही.  दोन दिवस खोलीचा दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी तो तोडला असता, डॉक्टरने आत्महत्या केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, तिने मृत्यूपूर्वी स्वतःच्या हातावर एक चिठ्ठी (नोटीस) लिहिली होती. त्यात गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर याच्या शारीरिक व मानसिक छळामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले होते.

Phaltan Doctor Case: न्यायालयाचा निर्णय

या प्रकरणात फलटण पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीत सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अखेर न्यायालयाने काही अटी घालत बदनेचा जामीन अर्ज मंजूर केला. या निर्णयामुळे तपास यंत्रणांच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Crime News: ऑफिसमधून टॅब चोरला, तब्बल 200 नको ‘ते’ व्हिडीओ, अन् पुढे…; खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक मोठं कांड, नेमकं प्रकरण काय?

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातच्या मुलावर SIT कडून प्रश्नांची सरबत्ती, पण मुलाचं सर्व प्रश्नांना आढेवेढे घेत एकच उत्तर; म्हणाला…

आणखी वाचा



Source link