Wednesday, August 26, 2026
Homeसाताराराजाळे येथे महिलांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई विवाह संस्कार...

राजाळे येथे महिलांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई विवाह संस्कार दिनाचे नाट्यरूप सादरीकरण


राजाळे येथे महिलांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई विवाह संस्कार दिनाचे नाट्यरूप सादरीकरण

राजाळे (ता. फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला जयंती महोत्सव समितीच्या वतीने ४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या विवाह संस्कार दिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. धम्मदीप बुद्ध विहारात नाट्यरूप सादरीकरणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष विवाह सोहळ्याचा अनुभव साकारण्यात आला.
या नाट्यरूप विवाह सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटणचे माजी सरचिटणीस व बौद्धाचार्य आयुष्यमान बाबासाहेब दिलीप जगताप यांनी भूमिका साकारली, तर त्यागमूर्ती माता रमाई यांच्या भूमिकेत आयु. पारिजातका बाबासाहेब जगताप यांनी प्रभावी अभिनय केला.

या सोहळ्याचे बौद्धाचार्य म्हणून भारतीय बौद्ध महासभा, फलटण शाखेचे माजी अध्यक्ष महावीर भालेराव यांनी संपूर्ण विधी पार पाडला. कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व तयारी महिला समितीच्या सदस्यांनी स्वतःहून केली असून, सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (इंग्लंड) येथील एलएलबी, आयआयटी दिल्ली व एलबीएस कॉलेज मुंबईचे शिक्षण घेतलेले ऍड.निखिल रेखा संजय अडसूळ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित महिलांशी संवाद साधला. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना महिलांच्या पुढाकाराचे अभिनंदन केले व बुद्ध, धम्म आणि संघाच्या विचारांचा अंगीकार करून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला आयु. सुमनबाई खरात, बहिणाबाई भालेराव, शोभा भालेराव, सुरेखा भालेराव, विश्रांती गायकवाड, कुसुम भालेराव, सीमा भालेराव, कल्पना भंडारे, मालन भालेराव, तृप्ती भालेराव, नीलम भालेराव, उज्वला भालेराव, नंदाताई भालेराव, शितल भोसले, अंजली खरात, उमा भालेराव, हौसाबाई खरात, राणी भोसले, चंदाराणी भालेराव, दीपाली कांबळे, शुभांगी भालेराव, मीनाक्षी खरात, शिवानी गायकवाड, ज्योती खरात, अश्विनी भालेराव, सुज्ञा भालेराव, स्वाती कांबळे, काजल सरतापे, संजना रणपिसे, प्रतीक्षा भालेराव, संगीता गायकवाड, कोमल भालेराव, सुप्रिया भालेराव, मानसी भालेराव, स्नेहलता आईवळे, मंगला आईवळे, पुनम भालेराव, रेखा भालेराव, वैशाली भालेराव, चारुशीला भालेराव, माधुरी भालेराव, सोनाली भालेराव, पूजा भालेराव, मोनाली सरतापे, शारदा मिसाळ, सारिका झेंडे, पुष्पा मोरे, उज्वला खरात, रेखा मोरे, छाया जगदाळे, राणी निकाळजे, अनिता खरात, सरिता भालेराव, तृप्ती खरात आदी उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या अनोख्या विवाह सोहळ्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची राजाळे येथे उत्साहात आणि धुमधडाक्यात सुरुवात झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments