Wednesday, August 26, 2026
Homeसाताराफलटण शहर उजळलं! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य डायनॅमिक लायटिंगने ऐतिहासिक नगरी...

फलटण शहर उजळलं! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य डायनॅमिक लायटिंगने ऐतिहासिक नगरी दिमाखात

:

फलटण : फलटण तालुक्यात सध्या अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पेठ मंगळवार ते आंबेडकर चौक हा परिसर आकर्षक आणि भव्य डायनॅमिक लायटिंगने झगमगून निघाला असून संपूर्ण फलटण शहर प्रकाशमय झाले आहे. या देखाव्यामुळे नागरिकांमध्ये विशेष उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जयंती महोत्सव समितीने हा उपक्रम हाती घेतला आहे. डॉ. आंबेडकरांना अनोखी मानवंदना देण्यासाठी समितीचे भीमसैनिक अहोरात्र मेहनत घेत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणे आकर्षक रोषणाईने सजवण्यात आली आहेत.
यंदाच्या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पंचशील ध्वजाच्या माध्यमातून एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न. फलटण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने हातात निळा ध्वज घेऊन या उत्सवात सहभागी होत असून सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे दर्शन घडत आहे.
फलटणची ऐतिहासिक नगरी आज नव्या तेजाने उजळून निघाली असून “आपलं सुंदर फलटण, हरित फलटण” ही संकल्पना अधिक दृढ होताना दिसत आहे. नागरिकांच्या सहभागामुळे आणि समितीच्या परिश्रमामुळे यंदाची जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments