Monday, July 13, 2026
Home Blog Page 2876

Dream Girl 2: यावेळी पूजाला डबल आव्हाने, आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’चा ट्रेलर चर्चेत

0
Dream Girl 2: यावेळी पूजाला डबल आव्हाने, आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’चा ट्रेलर चर्चेत


‘ड्रीम गर्ल २’चा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. राज शांडिल्य दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. ‘ड्रीम गर्ल २’मध्ये नुसरत भरुचा, आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट यावर्षी २५ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.



Source link

Nagpur crime: नागपूर हादरले ! भर बाजारात व्यापाऱ्याला धाक दाखवत १ कोटी १५ लाख लुटले

0
Nagpur crime: नागपूर हादरले ! भर बाजारात व्यापाऱ्याला धाक दाखवत १ कोटी १५ लाख लुटले


मंगळवारी रात्री पटेल नामक व्यापाऱ्याचे दोन कर्मचारी हे रात्री ८ च्या दरम्यान, वसूली करून दुचाकीवरुन जात होते. त्यांच्याकडे तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांची रक्कम होती. दरम्यान, हे दोघे व्यापाऱ्याच्या भुतडा चेंबर्स येथील कार्यालयाकडे जात होते. यावेळी बारदाना गल्लीमध्ये आधीच उभ्या असलेल्या दोन लूटारुंनी त्यांना रस्त्यात अडवले. यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत, त्यांच्या कडील रकमेची मागणी त्यांनी केली.



Source link

आजपासून विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक; आज दिवसभरात

0
आजपासून विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक; आज दिवसभरात


2nd August Headline :  पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. या आठवड्यात तीन दिवस कामकाज होणार आहे. आज राज्याच्या नव्या विरोधी पक्षाच्या नेत्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे संसदेत मणिपूर आणि इतर मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी टिळक पुरस्कार कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर आज सायंकाळी महाविकास आघाडी बैठक होणार आहे. 

>> विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. या आठवड्यात तीन दिवस कामकाज होणार आहे. आज विरोधक संभाजी भिडे आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर कॉग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केल्यानंतर आज अध्यक्षांकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राहुरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी निलम गोऱ्हे यांनी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे.
 

>> संसदेचे पावसाळी अधिवेशन 

विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीच्या नेत्यांची सकाळी 10 वाजता राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयात बैठक होणार आहे. सभागृहातल्या विरोधकांच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.

दिल्ली राज्य सरकारच्या अखत्यारीत अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंग विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार आहे. त्यावर आज सभागृहात चर्चा होणार आहे. या विधेयकाला सर्व विरोधी पक्षांचा विरोध आहे. 

>> महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक

आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक विधान परिषदेचे आयोजन विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे यांनी केलं आहे. बैठकीत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, अबू आझमी, शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेना उबाठाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब, एकनाथ खडसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बैठकीला शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ही बैठक पार पडणार आहे. 

>> वंचित घटकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

देशात दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसी समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संविधान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसी समाजाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येणार आहे. 
 

>> आज कोर्टातील महत्त्वाची सुनावणी 

समीर वानखेंविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणांत आपलीही साक्ष नोंदवा अशी मागणी जेष्ठ आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे, त्यावर आज सीबीआय आपली भूमिका मांडणार आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांची आज मुंबई सत्र न्यायालयात हजेरी. चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांच्यासह व्हिडिओकॉनचे वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआय आणि ईडीनं गुन्हा दाखल केला आहे



Source link

Pakistan vs India : पाकिस्तानचा सूर मावळला? चर्चा करण्यासाठी भारताला आवाहन ABP Majha

0
Pakistan vs India : पाकिस्तानचा सूर मावळला? चर्चा करण्यासाठी भारताला आवाहन ABP Majha



<p>Pakistan vs India : पाकिस्तानचा सूर मावळला? चर्चा करण्यासाठी भारताला आवाहन ABP Majha</p>



Source link

Vidyarthi Sanghatna MNS : राज्यभरातून आलेल्या या इन्फ्लुएन्सर्सशी संवाद

0
Vidyarthi Sanghatna MNS : राज्यभरातून आलेल्या या इन्फ्लुएन्सर्सशी संवाद



<p>राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेचा आज १७व्या वर्धापनदिन सोहळा पार पडला.. यानिमित्त मनसेच्या वतीने रिलबाज पुरस्काराची सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर म्हणून प्रभावी रिल्स सादर करणाऱ्या तरुणतरुणींना या सोहळ्यात गौरवण्यात आलं. राज्यभरातून आलेल्या या इन्फ्लुएन्सर्सशी संवाद साधताना राज ठाकरे आणखी खुलले.</p>



Source link

Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांचे पाय कापणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस देऊ; एमआयएम नेत्याचे विधान

0
Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांचे पाय कापणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस देऊ; एमआयएम नेत्याचे विधान


एमआयएम पदाधिकाऱ्याने म्हटले की, भिडे यांचे पोलीस संरक्षण काढून त्यांना पाच मिनिटे आमच्या ताब्यात द्या, असेही वक्तव्य या पदाधिकाऱ्याने केले आहे. सोलापूर शहर जिल्हा एमआयएमच्या वतीने संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन केले गेले. भिडे यांच्या गांधी विरोधातील वक्तव्याच्या राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना त्यात एमआयएम पक्षाचीही भरपडली आहे. सोलापुरात रेल्वे स्थानकासमोरील गांधीजींच्या पुतळ्याला एमआयएमच्या वतीने दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले. नंतर संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यामध्ये पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.



Source link

Ganesh Chaturthi 2023 : मुंबई महापालिकेचा गणेशोत्सवाबाबत मोठा निर्णय; अनामत रक्कमेत कपात, मूर्तीकारांनाही दिलासा

0
Ganesh Chaturthi 2023 : मुंबई महापालिकेचा गणेशोत्सवाबाबत मोठा निर्णय; अनामत रक्कमेत कपात, मूर्तीकारांनाही दिलासा


मुंबई महापालिकेत पार पडलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीसाठी मुंबईतील गणेशोत्सव मंडळाचे समन्वयक, मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार तसेच महापालिका अधिकारी उपस्थित होते. 



Source link

Ajit Pawar : शिंदे-फडणवीस व्यासपीठावर शरद पवारांना भेटले, तुम्ही का भेटणं टाळलं? अजित पवारांनी मनातलं सांगितलं!

0
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस व्यासपीठावर शरद पवारांना भेटले, तुम्ही का भेटणं टाळलं? अजित पवारांनी मनातलं सांगितलं!


याबाबत अजित पवारांना विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितलं की, मी साहेबांचा आदर करतो म्हणून मागून गेलो. आपण आपल्या वडिलधाऱ्यांचा आदर करताना कसं भीतीनं जरा मागून जातो, तसं रिसपेक्ट आहे,’ अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे. कुटूंब वेगळे आणि राजकीय भूमिका वेगळी असू शकते, अशी प्रतिक्रियाही अजित पवारांनी दिली. तसंच साहेबांनी सांगितलं तरी आम्ही त्यांचे फोटो लावणारच, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.



Source link

Bhiwandi Fire : भिवंडीत महाकाल डाईंग कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट

0
Bhiwandi Fire : भिवंडीत महाकाल डाईंग कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट


Bhiwandi Fire : भिवंडीत महाकाल डाईंग कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव दिसून आलंय, भिवंडीच्या अवचित पाडा भागात एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीत भंगारची 15 गोदामं जळून खाक झाली आहेत. दाटीवाटीच्या परिसरात आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग आटोक्य़ात आलीये.



Source link

Nanded : खेकडे पकडायला गेलेल्या दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

0
Nanded : खेकडे पकडायला गेलेल्या दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू


सकनूर गावात डुकरांचा मोठा त्रास होत आहे. शेतातील उभ्या पिकांची डुकरांमुळे नासधूस होत आहे. शेतशिवाराचे डुकरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतांना तारेचे कुंपन घातले असून रानडुक्करांसाठी तारेत विद्युत प्रवास सोडला आहे. या तारेचा स्पर्श झाल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या चार पैकी दोन तरुणांचा या तारेला स्पर्श झाला आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 



Source link