Monday, July 13, 2026
Home Blog Page 2875

सातारा : दोन महिन्यांत 315 दशलक्ष युनिट वीज निर्मिती | पुढारी

0









[adning id=”1976″]

गणेशचंद्र पिसाळ

पाटण : कोयना धरण तांत्रिक जलवर्षाच्या पहिल्या दिड महिन्यांत पाणीटंचाई व आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्याच कालावधीत तब्बल 1000 मेगॅवॅट क्षमतेचा कोयना जलविद्युत निर्मिती चौथा टप्पा बंद होता. जुलै महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात अपेक्षित पाऊस सुरू झाल्याने धरणात गतवर्षीच्या तुलनेत जादा पाऊस, पाण्याची आवक व पाणीसाठा झाला असला तरी परिणामी गतवर्षीच्या तुलनेत 73.352 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली आहे. आता अपेक्षित पाणीसाठा झाल्याने येणार्‍या काळात ही तूट भरून काढण्यासाठी प्रशासन सकारात्मक प्रयत्न करेल यात शंकाच नाही.

नव्याने सुरू झालेल्या या तांत्रिक जलवर्षात पहिल्या दोन महिन्यांत कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे 6.56 टीएमसी पाण्यावर 303.166 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी 7.96 टीएमसीवर 364.454 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे 1.40 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने 61.288 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली आहे.

पूर्वेकडे कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. आत्तापर्यंत सिंचनासाठी सोडलेल्या 3.67 व पूरकाळात 0.90 अशा 4.57 टीएमसी पाण्यावर 11.432 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचन व पूरकाळातील सोडलेल्या 6.84 टीएमसी पाण्यावर 23.496 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी 2.27 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने 12.064 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.

चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता आत्तापर्यंत एकूण 11.13 टीएमसी पाण्यावर 314.598 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्याचवेळी गतवर्षी 14.80 टीएमसी पाण्यावर 387.950 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकूण 3.67 टीएमसी पाणीवापर कमी पाणीवापर झाल्याने यातून 73.352 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे . पश्चिम वीजनिर्मितीसाठी वर्षभरात 67.50 टीएमसी पाणी लवादाचा आरक्षित कोटा आहे. धरण निर्मितीनंतर पहिल्यांदाच सन 2021 सालात 82.64 टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी वापरले गेले होते.











Source link

सातारा : परळी आरोग्य केंद्रातील रुग्णसेवा सलाईनवर | पुढारी

0


सोमनाथ राऊत

परळी :  रोजची दीडशे ते 200 रुग्णसंख्या असलेले व तालुक्यात उत्कृष्ट म्हणून गौरवलेल्या परळी आरोग्य केंद्रातील रुग्णसेवा सलाईनवर आहे. विविध पदे रिक्त असून आरोग्य केंद्राची इमारत विविध समस्यांनी ग्रासली आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला असून, अनेकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

परळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभार रामभरोसे झाला आहे. अनेक पदे रिक्त आहेत. इमारतीच्या प्रत्येक विभागाला गळती लागली आहे. परिचारिका, वैद्यकीय अधिकारी यांची निवासस्थाने डबघाईला आली आहेत. मात्र, वरिष्ठ आरोग्य यंत्रणा अजूनही सुस्तच आहे. त्यामुळे परळी पंचक्रोशीतील रुग्णांच्या तसेच या ठिकाणी कार्यरत असणार्‍या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. परळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत धावली, रोहोट, करंजे , परळी, नित्रळ अशी पाच उपकेंद्र येतात. सद्यस्थितीत जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांमध्ये परळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फक्त चौदाच प्रसुती झाल्या आहेत. तर दुर्गम धावली उपकेंद्रात पाच प्रसुती झाल्या आहेत मात्र करंजे तर्फ परळी रोहोट आदी उपकेंद्रामध्ये प्रसुतीच होत नाहीत. करंजे तर्फ परळी येथे नियुक्तीवर असलेले वैद्यकीय अधिकारी हे ऑनड्युटी मद्य प्राशन करत असल्याच्या तक्रारी आहेत.

परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दर महिन्यात किमान 15 ते 20 प्रसुती होत असत मात्र आता त्यामध्ये मोठी घट झाली आहे. येथील प्रसूती गृहाची दुरवस्था आहे की अन्य काही गोष्टी कारणीभूत आहेत, याचाही अभ्यास वरिष्ठांनी केला पाहिजे. परळी प्राथमिक आरोग्य केंद्रातून इतरत्र प्रसुतीचे पेशंट का रेफर केले जातात? याचीही चौकीशी करण्याची मागणी होत आहे. या दुर्गम वाड्या वस्त्यांवरील रुग्णांची हेळसांड होत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 40 गावे व दहा हजार 568 इतकी लोकसंख्या आहे. या गावातील रुग्णांना, प्रसूती, लसीकरण साथ रोग अन्य तपासण्या अशा सर्वांसाठीच परळी आरोग्य केंद्रात यावे लागते. या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती आहे मात्र सध्या शासन स्तरावर एकच वैद्यकीय अधिकारी असून दुसरे वैद्यकीय अधिकारी पद हे तात्पुरत्या स्वरूपाचे भरले आहे. याचबरोबर या ठिकाणी पाच शिपाई पदे आहेत मात्र सद्यःस्थितीत ही पदे रिक्त आहेत. धावली, रोहोट या उपकेंद्रातील परिचारिका हे पद रिक्त आहे. परळी येथील आरोग्य सेवक हे पद रिक्त आहे. त्यामुळे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांचे दालन, औषध भंडार, केस पेपर विभाग एवढेच नव्हे तर ऑपरेशन थिएटर या ठिकाणी छताला गळती असल्यामुळे या ठिकाणी भिंतीही ओल्या होत आहेत.

वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका यांची निवासस्थानेही धोकादायक झाली आहेत. त्या इमारतींच्या पत्र्यातून पाणी आत येऊन पत्र्याला असलेली लाकडे कुजली आहेत. त्यामुळे कधी कोणती दुर्घटना घडेल हे सांगता येत नाही. अशी गंभीर परिस्थिती आहे. परळी आरोग्य केंद्रात अग्निशामक यंत्रणाही नाही. इमारतीच्या दुरवस्थेमुळे गावातून आणलेले पाणी नमुन्याचे कॅन फरशीवर ठेवण्यात आले आहेत. तर ऑपरेशन थिएटरमधील काही यंत्रसामुग्रीही व्हरांड्यात ठेवण्यात आली आहे. सायंकाळी सहा नंतर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी थांबत नसतात अशा तक्रारीही ग्रामस्थ वारंवार करत आहेत.



Source link

कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

0
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा


Nitin Desai Suicide Case : प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळं मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी हिंदी, मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शकही होते. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जेजे कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचं शिक्षण घेतलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटसृष्टीत कारकिर्द सुरू केली आहे. मुंबईजवळील कर्जतमध्ये नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओ सुरू केला होता. या स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.



Source link

प्रसिद्ध मराठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

0
प्रसिद्ध मराठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या



प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या केली आहे. मुंबईजवळील कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.



Source link

Satara : सह्याद्री पर्वतरांगेतील रस्त्यांची अवस्था पाहा, देऊर गावातील रस्त्यांची अवस्था बिकट

0



<p>Satara : सह्याद्री पर्वतरांगेतील रस्त्यांची अवस्था पाहा, देऊर गावातील रस्त्यांची अवस्था बिकट</p>



Source link

Shabana Azmi: धर्मेंद्रसोबतचा किसिंग सीन पाहून जावेद अख्तर यांची कशी होती प्रतिक्रिया? शबाना आझमी म्हणाल्या…

0
Shabana Azmi: धर्मेंद्रसोबतचा किसिंग सीन पाहून जावेद अख्तर यांची कशी होती प्रतिक्रिया? शबाना आझमी म्हणाल्या…


‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण जोहरने मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एण्ट्री केली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसोबत अनेक उत्तम कलाकारांची टीम दिसत आहे. त्याने या चित्रपटासाठी जया बच्चन, शबाना आझमी, धर्मेंद्र यांसारख्या दिग्गज मंडळींचे कास्टिंग केले. त्यात चित्रपट प्रदर्शित होताच शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांचा किसिंग सीन समोर आला आहे. हा सीन पाहून काही चाहत्यांनी कौतुक केले तर काहींनी ट्रोल केले.



Source link

Maharashtra Rain Update:पुढील 4-5 दिवस राज्यात मुसळधार, मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट

0
Maharashtra Rain Update:पुढील 4-5 दिवस राज्यात मुसळधार, मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट



<p>पुढील चार-पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस, मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट</p>



Source link

Super Dancer 3: मुलांना अश्लील प्रश्न विचारल्याच्या आरोपावर परिक्षक अनुराग बासूने सोडले मौन

0
Super Dancer 3: मुलांना अश्लील प्रश्न विचारल्याच्या आरोपावर परिक्षक अनुराग बासूने सोडले मौन


पुढे अनुराग म्हणाला, “परीक्षक असल्यामुळे आम्ही जबाबदारीचे पालन करणे खूप गरजेचे आहे. लहान मुलांना कोणते प्रश्न विचारावेत, याविषयी सजग राहणे महत्त्वाचे आहे. मला असे वाटते की यानंतर लहान मुलेसुद्धा बोलण्याबद्दल अधिक जागरून होतील.”



Source link

Jitendra: सचिन पिळगावकरांच्या लेकीशी जितेंद्र यांचा मराठीतून संवाद, ‘सॉरी बेटा…’

0
Jitendra: सचिन पिळगावकरांच्या लेकीशी जितेंद्र यांचा मराठीतून संवाद, ‘सॉरी बेटा…’



Sachin Pilgaonkar: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि सचिन यांच्यातील गोड संभाषण सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.



Source link

Shabana Azmi: धर्मेंद्रसोबतच्या किसिंग सीनवर बोलल्या शबाना आझमी, म्हणाल्या ‘इतक्या देखण्या माणसाला…’

0
Shabana Azmi: धर्मेंद्रसोबतच्या किसिंग सीनवर बोलल्या शबाना आझमी, म्हणाल्या ‘इतक्या देखण्या माणसाला…’


बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित झाला. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटातील तगडी स्टार कास्ट, भव्य दिव्य सेट हे सर्व ट्रेलरमध्ये पाहून चाहत्यांना चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित होताच धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची भलतीच चर्चा रंगली आहे.



Source link