Monday, July 13, 2026
Home Blog Page 2874

शिक्षणाची दैना! सर्व शिक्षण अभियान कुठंय? धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात चौदा शाळा झोपडीत भरतात!

0
शिक्षणाची दैना! सर्व शिक्षण अभियान कुठंय? धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात चौदा शाळा झोपडीत भरतात!


Dhule ZP Schools : काही दिवसांवर देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) येऊन ठेपला आहे. मात्र आजही ग्रामदिन भागातील देशवासीयांच्या संघर्ष पाचवीलाच पुजल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातील नाशिकसह (Nashik) धुळे, नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील वाड्या वस्त्यांवर आजही पायाभूत सुविधांची वाणवा आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील महादेव दोंडवाडा अनेर अभयारण्यातील अति दुर्गम भागांत वसलेले गाव व अनेक आदिवासी पाडे अजूनही प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे. 

आजही महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक वाड्या वस्त्यांवर धड रस्ते नाहीत ना आरोग्याच्या सुविधा, त्यामुळे त्यामुळे इथल्या नागरिकांना पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी आजही कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. नेहमीच खाचखळग्यांची वाट तुडवत पोटापाण्यासाठी रानोमाळ भटकंती करणाऱ्या आदिवासीं समाजापर्यंत विकासाची गंगा अद्याप पोहोचलेली नाही. शिरपूर (Shirpur) तालुक्यातील अनेक या पाड्यांकडे जाण्यासाठी धड रस्ते नाहीत, शिक्षणाची सोय नाही, उपलब्ध शाळांची पडझड झालेली आहे. वीज आणि पाण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. मूलभूत प्रश्नांचीही सोडवणूक न झाल्याने या पाड्यांवरच्या आदिवासींना विकास म्हणजे काय असतो हेच अजून उमगलेले नाही. शिरपूर पासून काही अंतरावर असलेल्या वाड्या वस्त्यांवरील शाळा (School) आजही कुडाच्या झोपडीत भरत असल्याचे वास्तव आहे. जवळपास चौदा अशाप्रकारच्या शाळा असून प्रशासनाचे साफ दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. 

शिरपूर पासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर हे आदिवासी पाडे (Trble Area) आहेत. वन्यजीवांच्या नावाखाली विविध शासकीय योजनांना तिलांजली देऊन येथे शाबूत मनुष्य प्राण्याला न्याय मिळत नाही. सोहज्यापाडा, चिंचपाणीपाडा, भिवखेडापाडा, तेल्यादेवपाडा, सातपाणीपाडा, जमाईपाडा, कांज्यापाडा, जामनपाणीपाडा, जुनापाणीपाडा या आदिवासी पाड्यांमध्ये विकासाची गंगाच अद्याप पोहोचलेली नाही. या आदिवासी पाड्यांमध्ये जायचे असेल तर रस्त्याचीच सोय नाही. आहे ते रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत असून या मार्गावरून वाहन चालवणे, हे मोठ्याच जिकिरीचे काम आहे. मात्र रोजगार दूर, पाणी, वीज, रस्ते या मुलभूत प्रश्नांकडेही लक्ष देण्यात आले नाही.                           
                
या उलट परिस्थिती अनेर अभयारण्य या क्षेत्रात असून नागरिकांचा अधिवास असल्याने त्यांना नेहमीच गाव सोडून दुसरीकडे स्थलांतराची भीती मनात बसलेली असते. वीज, पाणी, रस्ते अभयारण्याच्या नावाखाली सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाही. तरी आरोग्य, शिक्षणाच्या नावाने बोंब सुरूच असल्याचे दिसत आहे. सोहज्यापाडा, चिंचपाणीपाडा, भिवखेडापाडा, तेल्यादेवपाडा, सातपाणीपाडा, जमाईपाडा, कांज्यापाडा, जामनपाणीपाडा, जुनापाणीपाडा अशा दुर्गम आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण वाढतच असून रखरखीत उन्हाचे चटके सोसत काही पाड्यावर पाण्यासाठीची वणवण सुरूच असल्याची भीषण परिस्थिती पाहायला मिळते.
 

सर्व शिक्षा अभियानाच काय झालं? 

दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी पाड्यात शिक्षणाची गंगा पोहचून या समाजाचा विकास व्हावा, या हेतूने सरकारकडून जवळपास 17 वर्षांपूर्वी सर्व शिक्षा अभियान ही संकल्पना राबवली. तिला कृतीत उतरवण्यासाठी सरकारकडून आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आली होती. पण शालोपयोगी वस्तूंसाठी सरकारकडून पुरवण्यात आलेला हा निधी आदिवासींच्या शिक्षासाठी किती खर्च झाला, असा प्रश्न शिरपूर तालुक्यातील आदिवासी पाड्यात नजर फिरवताच पडतो. सर्व शिक्षण अभियानानुसार शालेय बांधकाम, शौचालये, पाठ्यपुस्तके इत्यादी गोष्टींवर लक्ष पुरवले जाते. मात्र तालुक्यातील बहुतांश शाळांच्या दुरवस्था झाली आहे. गळके छप्पर, डागडुजी अभावी ढासळत चाललेल्या शाळेच्या भिंती, विजेची सोय नसल्याने शाळांतील खोल्यांत पसरलेला अंधार यांमुळे आदिवासींच्या जीवनात शिक्षणाचा दिवा लावून त्यांना प्रकाशवाटांकडे घेऊन जाणाऱ्या या अभियानाचे काय झाले, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

ईतर संबंधित बातम्या : 

Nandurbar News: जिल्हा प्रशासन बेफिकीर; नंदुरबारमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत 200 विद्यार्थ्यांसाठी फक्त तीन वर्गखोल्या, चक्क झोपडीत भरणार शाळा



Source link

Aai Kuthe Kay Karte: अनिषचे आई-वडील दोघांनाही घेऊन जाणार इंदौरला? मालिकेत रंजक वळण

0
Aai Kuthe Kay Karte: अनिषचे आई-वडील दोघांनाही घेऊन जाणार इंदौरला? मालिकेत रंजक वळण


दुसरीकडे अनिरुद्धला ईशाची आठवण येते. सकाळी सकाळी शेजारच्या घरात जोरात गाणी सुरु असतात. ती ऐकून घरात ईशानेच गाणी लावली असे अनिरुद्धला वाटतो. तो पूर्ण पणे विसरतो की ईशा लग्न करुन गेली आहे. त्याला सर्वजण समजावण्याचा प्रयत्न करतात की ईशाला परत घेऊन ये मात्र तो ऐकायला तयार नाही. दरम्यान, अप्पा ईशाला आशिर्वाद देण्यासाठी तिच्या घरी जातात. ते देशमुख कुटुंबातील इतर सदस्यांना देखील सोबत चलण्याचा सल्ला देतात. आता ईशा आणि अनिष इंदौरला जाणार का? अनिष आई-वडीलांशी संवाद साधणार का? आशुतोष आणि अरुंधती त्या दोघांचे पुन्ह लग्न लावणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.



Source link

Nitin Desai: नितीन देसाईंनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केल्या व्हॉइस क्लीप, चार लोकांच्या नावाचा उल्लेख?

0
Nitin Desai: नितीन देसाईंनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केल्या व्हॉइस क्लीप, चार लोकांच्या नावाचा उल्लेख?


पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी हा व्हॉइस रेकॉर्डर ताब्यात घेतला आणि तपास सुरु केला. या व्हॉइस रेकॉर्डरमध्ये नितीन यांनी चार व्यावसायिकांनी कसा छळ केला, आर्थिक व्यवहारानंतर कसा दबाव आणला, हे ध्वनिमुद्रित केल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.



Source link

Baap Manus Trailer: अनुष्का दांडेकरचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, ‘बापमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित

0
Baap Manus Trailer: अनुष्का दांडेकरचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, ‘बापमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित



Anushka Dandekar: बाप आणि मुलीच्या नात्याची मनाला स्पर्श करणारी एक सुंदर गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे



Source link

Raigad Landslide : रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी; २११ गावांना भूस्खलनाचा धोका, राज्य सरकारचा मोठी घोषणा

0
Raigad Landslide : रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी; २११ गावांना भूस्खलनाचा धोका, राज्य सरकारचा मोठी घोषणा


भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी राज्यातील किती गावांना दरड कोसळण्याचा धोका आहे?, असा प्रश्न विधानपरिषदेत विचारला होता. त्यावर मदत व पुनवर्सनमंत्री अनिल पाटील उत्तर देताना म्हणाले की, रायगडमधील इर्शाळवाडी घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका अनेक गावांना आहे. कोकणातील अशी एकूण २११ गावं आहे, ज्यात दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळंच आम्ही रायगड जिल्हा प्रशासनाला हायअलर्टवर राहण्याचा इशारा दिल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळं आता कोकणातील पोलीस, स्थानिक नागरिक, प्रशासन आणि अन्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.



Source link

‘…त्यावेळी मला कसाबची आठवण झाली’; ट्रेन अटेंडंटने सांगितला गोळीबाराचा थरारक अनुभव

0
‘…त्यावेळी मला कसाबची आठवण झाली’; ट्रेन अटेंडंटने सांगितला गोळीबाराचा थरारक अनुभव


Shootout In Train: मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी (31 जुलै) गोळीबाराची घटना घडली, ज्यात आरपीएफ शिपायाने आपले वरिष्ठ सहकारी आणि तीन प्रवाशांचा जीव घेतला. जयपूर-मुंबई एक्स्प्रेस (Jaipur-Mumbai Express Firing) पालघर स्थानकाजवळ पोहोचत असताना चालत्या ट्रेनमध्ये हा गोळीबार झाला. मारेकरी आरपीएफ कॉन्स्टेबल हा त्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. गोळीबार (Firing) प्रकरणी आरोपी कॉन्स्टेबल चेतन सिंहला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शी असलेल्या ट्रेन अटेंडंटने या भयानक घटनेबद्दल सांगितलं आहे.

‘…अन् त्याला पाहून कसाबची आठवण झाली’

त्या दिवशी कृष्ण कुमार शुक्ला हे जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये ट्रेन अटेंडंट म्हणून तैनात होते आणि त्यावेळी त्यांची ड्युटी फक्त B-5 कोचमध्ये होती, जिथे गोळीबाराचा प्रकार घडला. त्यामुळे शुक्ला हेही या प्रकरणाचे साक्षीदार आहेत. त्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, जेव्हा त्यांनी आरोपी जवान चेतन सिंहला कोचमध्ये रायफल घेऊन उभं असलेलं पाहिले त्यावेळी त्यांना अजमल कसाबची आठवण झाली. अगदी त्याचप्रकारे आरपीएफ जवान गोळ्या झाडत असल्याचं त्यांनी म्हंटलं. शुक्ला यांची तब्येत बरी नसल्याने ते रात्री थोडं झोपले होते.

बी-4 आणि बी-5 कोचमध्ये घडला गोळीबाराचा प्रकार

अचानक पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाला आणि त्यांना जाग आली. प्रथम त्यांना शॉर्ट सर्किट झालं असावं, असं वाटलं. हे पाहण्यासाठी ते B-5 कोचमध्ये गेले असता तिथे त्यांनी जे पाहिलं ते थक्क करणारं होतं. चेतन सिंह हातात बंदूक घेऊन उभा होता, तर ASI टिकाराम मीणा ट्रेनमध्ये खाली पडलेले होते. गोळी लागल्याने त्यांच्या आजूबाजूला रक्त साचलं होतं.

काही वेळाने आरोपी चेतन सिंह बी-4 कोचमध्ये गेला. त्यानंतर एक प्रवासी धावत कृष्णकुमार शुक्ला यांच्याकडे आला आणि त्याने सांगितलं की, आरपीएफ जवानाने दुसऱ्या एका प्रवाशावर देखील गोळी झाडली आहे. त्यानंतर चेतन सिंह पुन्हा बी-5 कोचमध्ये आला आणि टिकाराम मीणा यांच्या मृतदेहाजवळ काही वेळ उभा राहिला आणि पुन्हा बी-4 कोचच्या दिशेने गेला.

एकामागून एक चार लोक ठार

आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंहने एकामागून एक चार जणांची हत्या केली होती, ज्यात त्याचे वरिष्ठ टिकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांचा समावेश आहे. बी-4 कोचमधील मोहम्मद हुसेन बुरहानपूरवाला आणि पँट्री कारमधील सय्यद सैफुल्लाह मोईनुद्दीन आणि असगर अब्बास शेख यांची त्याने हत्या केली. सकाळी सहाच्या सुमारास मीरा रोड स्थानकाजवळ प्रवाशांनी चैन ओढून ट्रेन थांबवली, तेव्हा आरोपीने खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तितक्यात त्याला जीआरपीने पकडलं.

हेही वाचा:

Jaipur Express Firing : डोकं आणि छातीत गोळ्या लागून RPF अधिकाऱ्यासह प्रवाशांचा मृत्यू, चारही मृतांना 11 गोळ्या लागल्या



Source link

Nitin Chandrakant Desai: नितीन देसाईंसोबत शेवटच्या फोनवर काय झाली चर्चा?; महेश मांजरेकरांचा खुलासा

0
Nitin Chandrakant Desai: नितीन देसाईंसोबत शेवटच्या फोनवर काय झाली चर्चा?; महेश मांजरेकरांचा खुलासा


गेल्या २० वर्षांपेक्षा आधिक काळ नितीन देसाई कलाविश्वात काम करत होते. त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ अशा अनेक हिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले. त्यांना आजवर चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून पुरस्कार देण्यात आला. आता त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.



Source link

Sholay: शोलेमधील तो सीन हॉलिवूड सिनेमातून केलाय कॉपी? अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

0
Sholay: शोलेमधील तो सीन हॉलिवूड सिनेमातून केलाय कॉपी? अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ



Adil hussain: बॉलिवूड अभिनेत्याने एका हॉलिवूड चित्रपटातील व्हिडीओ शेअर करत हा सीन शोलेमध्ये देखील असल्याचे म्हणत प्रश्न उपस्थित केला आहे. 



Source link

Nitin Desai: ‘हम दिल दे चुके सनम’ ते ‘जोधा अकबर’, नितीन देसाईंने केले होते सुपरहिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन

0
Nitin Desai: ‘हम दिल दे चुके सनम’ ते ‘जोधा अकबर’, नितीन देसाईंने केले होते सुपरहिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन


नितीन देसाई यांचा जन्म १९६५ साली दापोली येथे झाला. त्यांनी मराठी माध्यमातून त्यांचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईमधील जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी १९८७ साली चित्रपटसृष्टीमधील करिअरला सुरुवात केली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी अनेक हिट सिनेमांचे कलादिग्दर्शन केले. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ त्यांचे हे सिनेमे गाजले.



Source link

सातारा : ‘उंच भरारी’तून ६६ जणांना नोकरी | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  दैनिक ‘पुढारी’ने बाल गुन्हेगारीविरोधात आवाज उठवल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी यावर प्रभावी उपाययोजना करत ‘उंच भरारी’ या युवकांसाठी महत्त्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी केली. गेल्या पाच महिन्यांमध्ये शेकडो युवक, युवती यांना मोफत प्रशिक्षण उपलब्ध केले. यातून 66 युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असून सातारा जिल्ह्यातील बाल गुन्हेगारी निर्मूलनाला सुरुवात झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील युवकांवर योग्य मार्गदर्शन, संधी व साधनांअभावी किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार झाले आहेत. अशा क्षेत्रातील युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, खेळ, रोजगार अशा तरतुदी करत पोलिस दलाने ‘उंच भरारी’ ही योजना त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत राबवली. सुरुवातीला जिल्ह्यातील 15 ते 30 या वयोगटातील युवक व त्यांचे पालक यांच्याशी पोलिसांनी संवाद साधला. युवकांना त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करुन देणे. तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे निश्चित करुन नोकरी देण्यावर भर ठेवला.

फेब्रुवारी 2023 पासून सातारा, कोरेगाव, वाई, कराड, फलटण, पाटण या पोलिस उपविभागीय कार्यालय स्तरावर युवकांना एकत्र आणण्यात आले. याठिकणी विविध संस्थामधील मान्यवरांचे शिबिर घेण्यात आले. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्या माध्यमातून युवकांना दुचाकी रिपेअरिंग मॅकेनीकल, चारचाकी रिपेअरिंग मॅकेनीकल, हॉटेल मॅनेजमेंट, वेल्डींग, प्लंबिंग, असिस्टंट इलेक्ट्रीशियन या कोर्सच्या प्रशिक्षणाकरता सातारा जिल्ह्यातून उंच भरारीच्या माध्यमातून कोल्हापूर, भोर, अहमदनगर, संभाजीनगर येथे कोर्सेचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार मारुती सुझुकी, होंडा, रॉयल इनफिल्ड या कंपनीमध्ये युवकांना 12 ते 19 हजार रुपयांपर्यंतच्या मानधनावर नोकरी मिळाली आहे.

सातारा पोलिस दलातर्फे एकूण 255 प्रशिक्षणार्थींना पाठवण्यात आले असून एकूण 56 युवक व युवतींना नोकरी मिळाली आहे. दि. 1 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणासाठी असलेल्या युवकांसोबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर नोकरीला लागलेल्या युवकांसोबत संवाद साधला.



Source link